ग्रहमान  

अनिता केळकर
गुरुवार, 19 जुलै 2018

मेष ः तुमच्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर रेंगाळलेली कामे पुर्ण कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून उरक पाडाल. पैशाची ऊब मानसिक स्वास्थ उत्तम ठेवेल. नोकरीत अपेक्षित सहकार्य लाभेल. मनाप्रमाणे काम करता येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घर कामात बराच वेळ दवडावा लागेल. आनंदाची बातमी कळेल.

मेष ः तुमच्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर रेंगाळलेली कामे पुर्ण कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून उरक पाडाल. पैशाची ऊब मानसिक स्वास्थ उत्तम ठेवेल. नोकरीत अपेक्षित सहकार्य लाभेल. मनाप्रमाणे काम करता येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घर कामात बराच वेळ दवडावा लागेल. आनंदाची बातमी कळेल.

वृषभ ः मंगळ तुमच्या भाग्यात आल्याने कोणत्याही निर्णय घेताना तडफेने घ्याल. आर्थिक प्रश्‍न सुटतील. व्यवसायात अशक्‍यप्राय कामातही यश मिळवाल. वेळेचा व पैशाचा उपयोग योग्य कारणासाठी होईल. नोकरीत सहकारी व वरिष्ठ यांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. न चिडता कामे करत राहा. कामातील बेत गुप्त ठेवावेत. खर्च वाढेल.

मिथुन ः व्यवसायात नवीन दिशा सापडेल. कामाचा विस्तार करण्याचे विचार मनात घोळतील. नवीन कामे हाती घेताना त्याचे ताळेबंद करुन मगच पुढे जावे. आर्थिक येणे वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत स्वःताचे काम करुन इतरांना मदत कराल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. कामात अतिविश्‍वास घातक ठरेल. महिलांना मनःस्वास्थ जपता येईल.

कर्क ः ’दाम करी काम’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. फायदा मिळून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्यावीत. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत आमिष दाखवून सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करुन घ्याल. कामाचा ताण वाढेल. प्रवास घडेल. महिलांनी कामात सावध दृष्टिकोन ठेवावा.

सिंह ः ’’खाईन तुपाशी...’’ असा बाणा राहील. ग्रहांची अनुकूलता लाभल्याने मनातील बेत साकार होतील. व्यवसायात कामांना वेग येईल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. हितचिंतकांची मदत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करुन घ्यावा. सहकारी कामात मदत करतील. तुमचा आत्मविश्‍वास वाढेल.

कन्या ः ग्रहांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात वाढ होईल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमच्या कामाचे महत्त्व कळल्याने तुमची पत वाढेल. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल. घरात महिलांचा मूड जरा वेगळाच भासेल. विश्रांती घेण्याकडे कल राहील. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीने आनंद वाटेल. शुभकार्य ठरतील.

तूळ ः रेंगाळलेली व अर्धवट राहिलेली कामे हाती घेऊन पुर्ण कराल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. तुमचा दृष्टिकोन विशाल असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. मानसिक समाधान लाभेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. घरात खर्च वाढतील तरी आवश्‍यक गोष्टींसाठीच असेल. महिलांना मनाजोगती खरेदी करता येईल.

वृश्‍चिक ः अत्यंत धोरणी राहून भविष्याची तरतूद कराल. व्यवसायात आवश्‍यक ते बदल करुन यश मिळवाल. पैशांची चिंता मिटेल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे करू शकाल. नोकरीत इतरांचे सहकार्य कसे मिळवताय यावर तुमच्या कामाचा ताण अवलंबून राहिन. शब्द हे शस्त्र आहे. हे लक्षात ठेवावे. महिलांनी कामात सतर्क राहावे.

धनू ः भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे कराल. व्यवसायात कामात चोखंदळ राहाल. नवीन कामे झपाट्याने पूर्ण करण्याचा मानस असेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीज होईल. कामाच विस्तार करण्याचे बेत सफल होतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्याचा उपयोग करावा.

मकर ः व्यवसायात कामाचा ताण वाढला तरी कामाचे समाधान मिळेल. त्यामुळे त्रास जाणवणार नाही. दिलेल्या शब्द पाळण्यासाठी अथक परिश्रम घ्याल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागल्याने चिडचिड होईल. सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेल हे गृहीत धरू नये. महिलांची कामामुळे दगदग होईल. विश्रांती घ्यावीशी वाटेल.

कुंभ ः तडजोडीचे व लवचिक धोरण ठेवलेत तर सर्व क्षेत्रात लाभ होईल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. अर्थप्राप्तीचे प्रमाण वाढल्याने पैशाची चिंता मिटेल. वादविवाद टाळून कामे हातावेगळी करण्याकडे कल राहील. महिलांना कामाचा हुरूप येईल.

मीन ः ’प्रयत्ने वाळूचे...’ हे लक्षात ठेवावे. व्यवसायात कामात कोणतीही कसूर ठेवू नये. नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नये. सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करुन घ्यावीत. नोकरीत वादविवाद टाळून कामे उरकावीत. सुसंगती लाभेल. वरिष्ठ कामाच्या निमित्ताने सवलती व अधिकार देतील. वेळेचे महत्त्व पाळावे.

संबंधित बातम्या