भलेमोठे पुस्तक शिकविण्यापेक्षा, वाचनावर प्रेम कसे करायचे हे शिकविले पाहिजे.
- बी. एफ. स्कीनर (लेखक) 
कोणी काही शिकविण्यापेक्षा स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हायला हवे. विकासाची दिशा अंतर्मनाकडून बहिर्मनाकडे अशीच असायला हवी.
- स्वामी विवेकानंद राग हे कमकुवतपणाचे, सहन करणे हे धाडसाचे आणि विनयशीलता हे सामर्थ्याचे लक्षण आहे.
- अज्ञात 
रोजच्या कंटाळवाण्या जगण्यात एखादी चांगली सवय मजा आणू शकते.
ऍल्डॉस ह्युक्झ्ले (लेखक) रोज केलेल्या थोड्या थोड्या प्रयत्नांची बेरीज म्हणजे यश.
- रॉबर्ट कोलर (लेखक) 
एखाद्या देशाची महानता आणि तेथील माणसांचे वर्तन तपासायचे असेल, तर मुक्या प्राण्यांना तेथे कशी वागणूक दिली जाते हे तपासा.
- महात्मा गांधी