Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 

विनोद
-
Saturday, March 24, 2012 AT 12:00 AM (IST)

 
नवी शिकवण
खूप दिवसांनी दोन मैत्रिणी एकमेकींना भेटतात.
पहिली - काय गं? तुझा मुलगा बोलायला शिकला का?
दुसरी - हो चांगलाच शिकलाय. आता त्याला गप्प कसे राहायचे हे मी शिकवितेय.
 
सुगरण बायको
नव्याने लग्न झालेले दोन मित्र आपल्या बायकोबद्दल बोलत असतात.
पहिला - माझी बायको माझ्यासाठी दररोज वेगवेगळी भाजी करते.
दुसरा - हे काहीच नाही. माझी बायको रोज एकच भाजी करते; पण रोज त्याची चव वेगवेगळी असते.
 
सुधारणा
शहरातील वेड्यांच्या रुग्णालयाला एक राजकीय नेता भेट देतो. त्याच्या भेटीसाठी रुग्णालय व्यवस्थापन सर्व वेड्यांना रांगेत उभे करतात. रांगेतील शेवटचा वेडा त्याच्याशी हस्तांदोलन करतो आणि विचारतो, "तुम्ही कोण आहात?'
नेता उत्तरतो, "मी आपल्या भागाचा खासदार आहे.'
ते ऐकून वेडा म्हणतो, "मीसुद्धा जेव्हा इथे आलो होतो तेव्हा माझेही उत्तर तेच होते. होईल.. होईल हळूहळू सुधारणा होईल.'
 
घोटाळेबाज
सुरेशची नोकरीसाठी मुलाखत सुरू असते. मॅनेजर त्याला म्हणतात, "तुमचा बायोडेटा चांगला आहे; पण आम्हाला महत्त्वाच्या कामाची जबाबदारी घेणारा माणूस हवा आहे. तुमची ती तयारी आहे का?'
"हो अर्थातच सर, आधीच्या कंपनीत होतो तेव्हा त्या ठिकाणी जेवढे घोटाळे झाले, त्या सर्व घोटाळ्यांची जबाबदारी घेण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही निश्‍चिंत राहा...' सुरेश उत्तरतो.
 
खेकड्याची चाल
खेकडे नेहमी तिरके चालतात; पण एक खेकडा तरुण सरळ चालत असतो. त्याची सरळ चाल एका खेकडा तरुणीला आवडते. ती त्याच्या प्रेमात पडते. ते दोघे लग्न करतात. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तो खेकडा परत तिरके चालू लागतो. त्याची खेकडा बायको म्हणाते, "तुम्ही "सरळ'मार्गी होतात म्हणून मी तुमच्याशी लग्न केले. आता तुम्ही परत तिरके चालायला लागलात.' नवरा खेकडा म्हणातो, "अगं मला रोज रोज थोडीच दारू प्यायला मिळणार आहे?'
 
 
कविता
काव्यवाचनाचा कार्यक्रम सुरू असतो. एक कवी उठतो आणि वही उघडून वाचायला लागतो. "उद्या दुपारी चार नंतर...' श्रोते म्हणतात, "बहोत खूब बहोत खूब..' कवी पुढे वाचतो, "डिपॉझिट पन्नास बाकी शंभर..'
श्रोते पुन्हा म्हणतात, "वा वा सुंदर सुंदर यमक... सुंदर यमक.'
कवी म्हणतो, "अहो थांबा.. थांबा.. ही कविता नाही. मी चुकून बिलबुक आणले आहे.'
 
 
 
 
 
 
 
आळशी माणूस
जगातल्या आळशी माणसाचा शोध घेणे सुरू असते. फार शोध घेऊनही आळशी माणूस सापडत नाही. एका गावात गेल्यावर एक माणूस झाडावर झोपलेला त्यांना सापडला. पण त्याला पाहूनही ते निराश झाले. गावकऱ्यांना ते म्हणाले, "आळशी कॅटॅगिरीत याला घेता येणार नाही कारण झाडावर झोपला म्हटल्यावर तो झाडावर चढलाच असणार ना ' तेव्हा स्थानिक नागरिकांनी खुलासा केला, "" झाड उगवताना तो झाडावर चढला होता..''
 
पार्किंग
पुणे शहरांत कंजूष संतोष आपली गाडी चालवत होता. पार्किंगला जागा न मिळाल्यामुळे तो देवाची प्रार्थना करीत म्हणतो, "देवा, मला पार्किंगला जागा मिळू दे. मी दर रविवारी दहा जणांना जेवण देईन.' एवढ्यात त्याला पार्किंगसाठी जागा दिसते. संतोष लगेच देवाला म्हणतो, " देवा, मिळाली जागा. तुम्ही प्रयत्न करण्याची अजिबात गरज नाही'

कसे फसवले?
आपल्या इमारतीची लिफ्ट खराब असताना खोडकर महेशने सुरेशला घरी जेवायला बोलावले आणि आपल्या दहाव्या मजल्यावरच्या फ्लॅटला कुलूप लावून दरवाजावर "कसे फसवले' असा फलक लावला. सुरेशने ते वाचले आणि त्याखाली लिहिले "मी इथे आलोच नव्हतो.'
 
कुलूप
घराचे कुलूप काढण्याचे प्रयत्न करणारा मद्यपी म्हणातो, "अरे, माझे घर हलते आहे, कुणीतरी या आणि ते पकडा रे...'
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
विश्‍वास
(दोन मित्र बऱ्याच दिवसांनी भेटतात)
अमर - अरे संजू माझ्या मित्राने सांगितले, की तू गावालाच असतो म्हणून.
संजू - नाही अरे त्याने चुकीचे सांगितले तुला. मी बऱ्याच दिवसांपासून पुण्यातच आहे.
अमर - खोटे नको बोलूस. माझा तुझ्यापेक्षा माझ्या मित्रावर जास्त विश्‍वास आहे.
 
लोकसंख्या
कविता - मी जेवढ्या वेळात एक श्‍वास घेते तेवढ्या वेळात देशात एक नवे मूल जन्माला येते.
पूजा - अगं बाई तुझी ही सवय सोड आता, देशाची लोकसंख्या खूप वाढली आहे.
 
जेवणाशिवाय जिवंत
सुजय - तू जेवणाशिवाय जिवंत राहू शकतोस का?
अजय - नाही बुवा.
सुजय - मला ते शक्‍य आहे.
अजय - कसे काय?
सुजय - न्याहारी करून
 
दुर्बीण
रमेश - अरे मयूर तू कुठं निघालास आणि हे तुझ्या हातात काय आहे?
मयूर - जरा गावाला चाललोय, लांबच्या नातेवाइकाला पाहायला जायचे आहे. त्यांना नीट बघता यावे म्हणून ही दुर्बीण बरोबर घेतलीय.
 
स्मरणशक्ती
ऐंशी वर्षांचे दोन ज्येष्ठ एकमेकांना बागेत भेटतात.
पहिला ः अलीकडे माझी स्मरणशक्ती खूपच कमी झाली आहे रे.
दुसरा ः मला पण तसेच काहीसे होते आहे.
पहिला ः आता कालचेच बघ ना, कालच कुणाचे तरी निधन झाले, तो चंदूलाल होता की तू होतास हेच मला आठवत नाही.
 
डोळे पुढे कान मागे
शिक्षक - राजू तू सांग बरं, तू जेव्हा फटाके लावतोस तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग आवाज येतो असं का बरं?
राजू - सोप्पं आहे कारण आपले डोळे पुढे आणि कान मागे आहेत.
 
भांडणाचे कारण
एका घरात नवरा - बायकोचे जोरदार भांडण सुरू असते. भांडणाचा आवाज ऐकून एक पोलिस घरात शिरतो. पोलिस घरात जाऊनही भांडण सुरूच असते. शेवटी दोघांच्या भांडणात पोलिस पडतो आणि जोरात ओरडतो, "या घरात कुटुंबप्रमुख कोण आहे?'
बायको म्हणते, "ते कोण हे ठरवण्यासाठीच भांडण सुरू आहे.'
 
साहेब नक्की कुठे
एका दुकानात रिसेप्शनपाशी एक माणूस येतो आणि विचारतो, "साहेब आहेत का, मला भेटायचंय त्यांना.'
रिसेप्शन काउंटरवरची मुलगी म्हणते, "काय काम आहे? कशासाठी भेटायचे आहे तुम्हाला?'
"काही नाही तुम्ही फक्त ते आहेत, की नाही ते सांगा,' माणूस म्हणतो.
"तुम्ही कोण ते सांगा आधी, विक्रेते? बिल वसूल करणारे? की साहेबांचे मित्र?'
"मी तीनही आहे,' माणूस सांगतो.
"नीट काय ते सांगा, विक्रेते असाल तर साहेब मीटिंगमध्ये आहेत. बिल वसूल करणारे असाल तर साहेब चार-पाच दिवसांसाठी शहराबाहेर गेलेत आणि मित्र असाल, तर आत जा आणि साहेबांना भेटा,' रिसेप्शनवरची मुलगी सांगते.


 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2011 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: