Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
काही वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात काम करत आहे. विविध सिरीअल्स, मराठी चित्रपट, रिऍलिटी शो मध्ये मला बऱ्यापैकी काम असते. घरी आई, वडील, धाकटा भाऊ आणि माझी बायको व मुलगा असे असतो. घरचे सगळे छान आहे परंतु सध्या मला एक समस्या भेडसावते आहे. गेल्या काही दिवसांपासून मला कामाचा फारसा उत्साह राहिला नाही, असे जाणवते आहे. त्याचा कामावरही परिणाम होत आहे. आजकाल दिग्दर्शक मला टाळताहेत असे वाटते.

Saturday, May 05, 2012 AT 12:00 AM (IST)

"आमचे प्रश्‍न आम्हाला ठरवू द्या, त्यांचा प्राधान्यक्रम आमच्या चर्चांतून येऊ द्या आणि उपायांवरही आमच्याच मतांना स्थान द्या,' या ग्रामीण महाराष्ट्राच्या मानसिकतेला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. विकासयोजनांसाठीची तरतूद करताना देशविकासाचा हा बदलता चेहरा नजरेआड करता येणार नाही.

Saturday, April 14, 2012 AT 12:00 AM (IST)

ग्रामीण भागाच्या आरोग्य-व्यवस्थेला झालेला आजार केवळ गोळ्या देऊन, सलाईन लावून, इंजेक्‍शन करून बरा होणारा आहे, की त्यासाठी शस्त्रक्रियेचीच गरज आहे, हे तपासून पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी उपाययोजना केली, तरच ही व्यवस्था "अतिदक्षता विभागा'तून बाहेर येऊ शकेल.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! या आठवड्यात आपण भारतीय इंग्रजीमधील एक अशी चूक पाहणार आहोत, जी बहुधा आपल्यासह आपल्या आसपासचा प्रत्येक माणूसच करत असेल. "तू येतो आहेस ना?' मधल्या "ना'वर आधारित ही चूक विविध प्रकारच्या वाक्‍यांतून दिसते. जसे- 'You are coming, no?' 'You will eat, na?' आता तसे पाहिले, तर no किंवा na हे इंग्रजी प्रत्यय नाहीत.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

मी सध्या मेडीकलच्या दुसऱ्या वर्षाला आहे. साधारण मी दहावीत असल्यापासून आई-बाबांचे वाद, भांडणे चालू आहेत. बाबांचे एका स्त्रीबरोबर अफेअर असल्याचे समजल्यानंतर आई खचून गेली व त्यांच्यात वाद निर्माण व्हायला लागले. मी बारावीत असताना ते त्या बाईबरोबर वेगळीकडे राहायला गेले होते. बाबा चांगले वागतात. घरात वेळही देतात पण या घटनेनंतर घर अशांत झाले आहे. बाबांबद्दलही प्रचंड तिरस्कार जरी निर्माण झाला, तरी त्यांच्याबद्दल मनात प्रेमसुद्धा आहे.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

मी एक मेकॅनिकल इंजिनिअर असून माझी बायको राष्ट्रीयकृत बॅंकेत ऑफिसर म्हणून नोकरी करते. आमचा प्रेमविवाह आम्हाला 14 वर्षांची मुलगी आहे. सुरवातीला मी एका कंपनीत काम करत होतो. तिथे चांगला पगार होता. नंतर एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यावर मी तिकडे गेलो पण चार वर्षांतच ती कंपनी बंद पडली. त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात भागिदारी होती आणि आमच्यात वितुष्ट झाले. त्यात मला खूपच आर्थिक फटका बसला.

Saturday, March 31, 2012 AT 12:00 AM (IST)

1. मी पंचवीस वर्षांची तरुणी असून माझ्या लग्नाला 1 वर्षे पूर्ण झाले आहे. लग्न ठरविताना माझ्या पतीने लग्न झाल्यानंतर तुला पुढील शिक्षण घेता येईल, त्यासाठी मी मदत करीन असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र माझ्या पदव्युत्तर शिक्षणाला घरच्यांनी विरोध केला आहे. माझे पती याबाबत काहीच बोलत नाहीत. "तू घरच्यांचे ऐक' एवढेच सांगतात. मला माझे करिअर करायचे आहे.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

माझे वय 62 वर्षे असून आहे. मी आणि माझी पत्नी गेली पस्तीस वर्षे सुखाने संसार करत आहोत. आम्हाला दोन मुले असून मोठी मुलगी अमेरिकेत असते. मुलगा आयटी कंपनीत काम करतो. मुलगा,सून, दोन नातवंडे असे आम्ही सगळे एकत्रच राहातो. सून प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. दोघांचीही आर्थिक कमाई चांगली आहे. मी निवृत्त प्राध्यापक असून मलाही चांगली पेन्शन आहे. एकंदरीत सर्व स्थिती चांगली आहे परंतु हल्ली एक समस्या निर्माण झालेली आहे.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

1. माझे वय 26 वर्षे आहे. माझे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झाले आहे. वडिलांच्या दबावामुळे मी लग्न केले. माझा नवरा उच्चशिक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या कुटुंब सुस्थितीत आहे. घरातील व्यक्तींबाबतही माझी कोणती तक्रार नाही. व्यक्ती म्हणून माझा नवरा चांगला असला, तरी आयुष्याचा जोडीदार म्हणून तो माझ्या मनाला पटलेला नाही. घरात माझे मन लागत नाही. घरातून निघून जावे, असे विचार येतात. मी काय करावे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

1)मी 44 वर्षांची अविवाहित असून मला डायबेटिस आहे. मला एक मोठा भाऊ व बहीण आहे. दोघांचेही लग्न झालेले असून ते वेगळे राहतात. वडील लहानपणीच गेल्यामुळे आईनेच सर्वांचा सांभाळले. तिला रक्तदाबाचा आजार असल्याने मीच तिचे सगळे करते. मोठा भाऊ आणि बहीण येऊन जाऊन असतात, चौकशी करतात, अधून मधून मदतही करतात. आईच्या आजारपणामुळे मला नोकरी करता येणे शक्‍य होत नाही, तसेच व्यवसाय करायचा, म्हटला तर भांडवलही नाही. काय करावे सुचत नाही.

Saturday, February 04, 2012 AT 12:00 AM (IST)

मी एक गृहिणी आहे. मला दोन मुले आहेत. एक पदवीधर असून पुढील शिक्षण घेत आहे आणि दुसऱ्याने नुकतेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. मुलांकडे नीट लक्ष देता यावे, म्हणून मी माझी पूर्वीची नोकरी सोडली . मी घरासाठी, संसारासाठी सतत स्वत: कष्ट करते परंतु त्याची जाणीव कोणालाही नाही. मी काहीही विचार मांडायला लागले, की पती "तुला काय कळतंय?' असे बोलून मला गप्प करतात. यामुळे माझा आत्मविश्‍वास हरवत चालला असून जीवनात काहीच अर्थ नाही, असे मला वाटू लागले आहे.

Saturday, January 21, 2012 AT 12:00 AM (IST)

माझी मुलगी (वय 19) प्रेमात पडली आहे. मुलगा आमच्या जातीचाच आहे परंतु तो सध्या तरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही. त्याचे वडील व्यावसायिक आहेत, स्वतःचे घर आहे परंतु बापकमाईवर जगणारा मुलगा जावई म्हणून मला नको आहे. मुलीचे लग्न एवढ्यात करू नये, असे मला वाटते परंतु प्रेमप्रकरणामुळे तिचे शिक्षण बंद करावे व तिला घरातच बसवावे किंवा लगेच लग्न करून द्यावे, अशी तिच्या आईची इच्छा आहे. मी गोंधळून गेलो आहे. काय करावे? - श्री. पाटील, लातूर.

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 19 वर्षांची असून, मी सध्या डी.एड करत आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे मला त्यांचा सहवास खूप कमी मिळतो. त्यामुळे मला खूप एकटे वाटते. पाच वर्षांपासून असलेल्या रिलेशनशिपबद्दल मला त्यांना खूप सांगावेसे वाटते, आमचे आता ब्रेकअप झाले आहे पण आई-बाबांच्या टेंशनकडे पाहून मला काही सुचत नाही. माझी आई खूप कडक आहे पण या लपवाछपवीमुळे मला अपराध्यासारखे वाटते आहे. काय करावे?  - शिवानी तू आता सज्ञान झाली आहेस.

Saturday, November 19, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 19 वर्षांची असून, मी सध्या डी.एड करत आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे मला त्यांचा सहवास खूप कमी मिळतो. त्यामुळे मला खूप एकटे वाटते. पाच वर्षांपासून असलेल्या रिलेशनशिपबद्दल मला त्यांना खूप सांगावेसे वाटते, आमचे आता ब्रेकअप झाले आहे पण आई-बाबांच्या टेंशनकडे पाहून मला काही सुचत नाही. माझी आई खूप कडक आहे पण या लपवाछपवीमुळे मला अपराध्यासारखे वाटते आहे. काय करावे?  - शिवानी तू आता सज्ञान झाली आहेस.

Saturday, November 19, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 27 वर्षांची विवाहिता असून, मी व माझे पती दोघेही आय.टी. कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जॉब करतो. लग्नाला जेमतेम एक-दीड वर्ष झाले आहे पण आमच्यात आतापासूनच भांडणे सुरू झाली आहेत. घरी आम्ही दोघेच असतो. दोघांच्याही कामाच्या वेळा अनियमित. कधी-कधी तर घरी यायला रात्रीचे दहा वाजतात. आम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच उरत नाही. त्यामुळे गैरसमज, चिडचिड, भांडणे हे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. मी काय करू? तुम्ही दोघेही आय.टी.

Saturday, September 03, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 45 वर्षांची गृहिणी आहे. माझी दोन्ही मुले कॉलेजला आहेत. आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आमचे एकत्र कुटुंब आहे. मी सगळ्यांचे करते परंतु नवऱ्याला माझी किंमत नाही. माझी अथवा मुलांची ते कोणतीही हौस करत नाहीत. आम्ही दोघे बाहेर गेलेले माझ्या सासूला आणि जावेलाही आवडत नाही. मी माहेरी गेलेलेही नवऱ्याला आवडत नाही. घरात बसून खूप कंटाळा येतो. नवऱ्याच्या विचित्र स्वभावामुळे घरातून निघून जावे अथवा स्वत:चे आयुष्य संपवावे असे वाटते.

Saturday, August 20, 2011 AT 12:00 AM (IST)

माझ्या मुलीचे गेली दोन वर्षे एका मुलाबरोबर अफेअर होते. दोन्ही घरातून या नात्याला मान्यता होती. तो मुलगा प्रोफेशनल सिंगर आहे. माझी मुलगी सुंदर आहे, त्यामुळे त्याला आवडली असावी. त्याने अचानक एक महिन्यापूर्वी माझ्या मुलीशी नाते तोडले. माझ्या मुलीच्या सांगण्यावरून गेले काही महिने त्यांच्यात छोटी छोटी भांडणे सुरू होती. माझ्या मुलीच्या तिच्या मित्रांबरोबर असणाऱ्या नात्याबद्दल त्या मुलाला आक्षेप होता. त्यामुळेच त्याने नाते तोडले असे कळले.

Saturday, August 06, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 28 वर्षांचा आहे. मला कधीही मुलींबद्दल आकर्षण वाटत नाही, याउलट मला समलिंगी आकर्षण वाटते. त्यामुळे मला लग्न करायचे नाही. लग्न करून मी एखाद्या मुलीच्या आयुष्याचे नुकसान करेन असे वाटते पण माझे आई-वडील आता लग्नाची जबरदस्ती करत आहेत. या परिस्थितीत मी काय निर्णय घेऊ? तू लग्न का करत नाहीस, ते तुझ्या वडिलांना विश्‍वासात घेऊन स्पष्टपणे सांग. तुझ्या समस्या तुझ्या आई-वडिलांना माहिती नसल्यामुळे, ते तुला लग्न करण्याची जबरदस्ती करत आहेत.

Saturday, July 30, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 42 वर्षांची गृहिणी आहे. मला दोन कॉलेजवयीन मुले आहेत. माझ्या पतीचा स्वभाव गेल्या काही महिन्यांत चिडचिडा झाला आहे. बारीक सारीक गोष्टींवरून हल्ली त्यांना लगेच राग येतो. खरेतर मुळात त्यांचा स्वभाव शांत आहे पण हल्ली मुलांवरसुद्धा छोट्याछोट्या कारणांवरून राग काढतात. दोनवर्षांपूर्वी धंद्यामध्ये मोठे नुकसान सोसावे लागले होते तेव्हापासून ते चिडचिडे झाले आहेत. त्यांचे सिगारेट ओढण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे.

Saturday, July 23, 2011 AT 12:00 AM (IST)

मी डिव्होर्सी आहे. मला दोन मुले आहेत. त्या दोघांची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. मोठी मुलगी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. धाकटा मुलगा दहावीत आहे. माझ्या मुलीचा मला कधीच त्रास झाला नाही पण मुलाची मला खूप काळजी वाटते. तो माझ्याशी बोलतच नाही. पूर्वी मला तो सगळे सांगायचा पण आता काहीही सांगत नाही. माझ्याशी गूढ आणि तुटक वागतो.

Saturday, July 16, 2011 AT 12:00 AM (IST)

हिंदू असून माझी प्रेयसी मुस्लीम आहे. आम्ही लग्न करायचे ठरवले आहे. आम्ही हिंदू पद्धतीने लग्न करावे आणि लग्नानंतर तिने हिंदू धर्म स्वीकारावा असा माझ्या घरच्यांचा आग्रह आहे पण या गोष्टीला तिच्या घरच्यांचा विरोध आहे. आम्ही कोणत्या पद्धतीने लग्न करणे योग्य? तुम्हाला हिंदू पद्धतीने विवाह करायचा असल्यास दोघेही हिंदू असणे आवश्‍यक आहे.

Saturday, July 09, 2011 AT 12:00 AM (IST)

53 वर्षांची गृहिणी आहे. मागील दोन- तीन वर्षांमध्ये आमच्या जवळच्या नातेवाइकांपैकी दोघेजण दीर्घकालीन आजाराने निवर्तले. ओळखी-पाळखीतील माझ्या वयाच्या आसपास असलेल्यांना काही ना काही व्याधींनी ग्रासलेले आहे. माझ्या प्रकृतीच्या फारशा तक्रारी नाहीत तरीही हल्ली कुठे काही आजारपणाबद्दल ऐकले की लगेच मला धास्ती वाटू लागते, की मला काही होणार तर नाही ना. टी.व्ही वरील मालिका बघताना, दु:खी प्रसंग चालू असेल तर लगेच रडायला येते.

Saturday, July 02, 2011 AT 12:00 AM (IST)

माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली. आमचा प्रेम विवाह आहे. माझा नवरा प्रेमळ आहे, परंतु संशयी आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतो परंतु त्याला सतत वाटते, की माझी बाहेर कोणाशी तरी जवळीक आहे. माझे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक त्याच्या या स्वभावामुळे मला फोनही करत नाहीत. मी काय करावे? तुझा नवरा प्रेमळ, कर्तव्यदक्ष आहे परंतु तो संशय घेतो आणि त्याचाच तुला त्रास होतोय.

Saturday, June 25, 2011 AT 12:00 AM (IST)

1) मी "एम.पी.एम.' केलेले असून नुकत्याच एका नामवंत खासगी कंपनीत जॉब करण्यास सुरवात केली आहे. मी पुण्यात राहणारी मध्यमवर्गीय मुलगी आहे. महाविद्यालयात असताना माझे अनेक मित्र मैत्रिणी होते. कोणी भेटल्यानंतर "हाय' म्हणणं फार तर "शेकहॅन्ड' करणं, इतपतच माझी मोकळे वागण्याची कल्पना. परंतु या कंपनीमध्ये माझे समवयस्क मुलं, मुली एकमेकांशी फारच मोकळेपणाने वागतात. एकमेकांना जवळ ओढणे.. हातात हात घेऊन बोलत बसणे.. अशा गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत.

Saturday, June 18, 2011 AT 12:00 AM (IST)

मी माझ्या मनाप्रमाणे कधी बोलू शकेन?   आपले आईवडील जे म्हणतात- सांगतात, त्याप्रमाणे वागण्याचा साधारणपणे माणसाचा कल असतो. पुढे मोठे झाल्यावर शिक्षक म्हणतील, मित्र म्हणतील, बॉस म्हणेल, जोडीदार म्हणेल, तसे माणूस वागू लागतो. आपण सगळे काही करतो आहोत कारण आपण ते करायलाच हवे, असा विचार तो करू लागतो आणि ती गोष्ट त्याला खूप सोपी वाटू लागते. पण खरेच त्याला हे सगळे मनापासून करायचे असते का? अशावेळी थोडा "ब्रेक' घ्या.

Saturday, June 11, 2011 AT 12:00 AM (IST)

1) माझी मुलगी 8 वर्षांची आहे. तिच्या शाळेतून अचानक तक्रारी यायला सुरवात झाली आहे. वर्गात लक्ष नसते, परीक्षेत काही लिहीत नाही, नखे कुरतडते वगैरे. त्यामुळे तिचे मार्क्‍स खूपच कमी झाले आहेत. घरात अभ्यास घेताना सगळे व्यवस्थित म्हणून दाखविते पण परीक्षेत अर्धेच लिहून येते. खोटे बोलायला सुरवात केली आहे. माझ्या मिस्टरांची फिरतीची नोकरी आहे. मला खूप काळजी वाटते.

Saturday, May 28, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: