Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
"कौन बनेगा करोडपती' पुन्हा एकदा धुमधडाक्‍यात सुरू झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे या कार्यक्रमाला "न भूतो न भविष्यति' असे यश लाभले. "सीझन 7'चेही तेच संचालन करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा. "कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम वाजतगाजत पुन्हा सुरू झाला. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालक असलेल्या या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. ही कमान अजूनही चढतीच आहे.

Saturday, September 14, 2013 AT 11:51 PM (IST)

विविध जाहिराती आणि रंगभूमीवर लीलया वावरणारा निखिल रत्नपारखी आता खलनायकी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. "नारबाची वाडी' या चित्रपटात तो एका खोताकडील मुनिमाची भूमिका करतोय. कोकणातील एका वाडीतील नारबा या शेतकऱ्याची वाडी हडप करण्याची योजना खोत आखत असतो. त्याला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला मदत करणाऱ्या मुनिमाच्या भूमिकेत निखिलने आपली ताकद दाखवून दिली आहे. आदित्य सरपोतदार या तरुण दिग्दर्शकाचा हा दुसरा चित्रपट.

Saturday, September 14, 2013 AT 11:37 PM (IST)

बॉलिवूडला सध्या बरे दिवस नाहीत हेच खरं. संजय दत्त तुरुंगात आहे. आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज (ज्याचा एका चित्रपटासाठी करार झाला होता.) पोलिस कोठडीत आहे. शाहरुख खानही लिंगनिदान प्रकरणात अडचणीत आला होता. आता सलमान खान पुन्हा अडचणीत सापडला आहे. मोटार अपघात प्रकरणात त्याच्यावर मनुष्यवधाच्या कलमाखाली सुनावणी चालवायला न्यायालयानं परवानगी दिली आहे. या कलमाखाली जर सलमानला शिक्षा झाली तर दहा वर्षं त्याला तुरुंगात जावं लागेल.

Saturday, June 29, 2013 AT 09:58 PM (IST)

संजय दत्तवर दोनशे कोटींची गुंतवणूक सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा दिल्यावर संजय दत्तने आपला शरण येण्याचा काळ वाढविण्याची विनंती केली आणि ती चार आठवड्यांसाठी मान्य झाली. 16 मे रोजी संजय दत्तला तुरुंगात जावे लागेल. चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते संजयकडे असलेल्या चित्रपटांची संख्या फार नाही पण जे चित्रपट आहेत त्याचा हिशेब केला तर ही रक्कम दोनशे कोटींच्या पुढे जाते. आता चर्चा सुरू झाली ती संजय दत्तसाठी किती निर्माते थांबतील याची.

Tuesday, May 14, 2013 AT 07:48 PM (IST)

प्रियांका चोप्रा हिची एक बहीण परिणिती चोप्रा हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन आता स्थिरावू पाहत आहे. आता तिची दुसरी एक बहीण मीरा चोप्रा आता "1920-लंडन' या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात तिच्याबरोबरचा नायक विशाल कारवारही याच चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. त्याने आत्तापर्यंत विविध मालिकामध्ये काम केले आहे. मीरा चोप्रा हिची निवड केल्यावर आता या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू झाले आहे.

Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)

"ट्‌वेन्टीफोर' मालिकेत अनुपम खेर "कौन बनेगा करोडपती' या मालिकेनंतर तेवढ्याच ताकदीची व बहुखर्चिक ठरू शकेल अशी मालिका म्हणजे "ट्‌वेन्टीफोर'. या मालिकेचे हक्क रीतसर घेण्यात आले असून, अमेरिकेत गाजलेली ही मालिका आता भरातीय वातावरणात सादर केली जाणार आहे. पुढील महिन्यात येथील एका वाहिनीवर तिचे प्रक्षेपण सुरू होईल. प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनय देव या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे. यात अनिल कपूरची प्रमुख भूमिका असेल, ही बातमी आता जुनी झाली आहे.

Saturday, March 23, 2013 AT 12:00 AM (IST)

मकरंद अनासपुरे पुन्हा विनोदाकडे विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे काही काळ विनोदी भूमिकांपासून लांब गेला होता. मात्र, आता आगामी दोन चित्रपटांत त्याची विनोदी भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यापैकी एक चित्रपट आहे अमोल पालेकरांचा, तर दुसरा चित्रपट आहे पारस मूव्हीज्‌चा "असा हा अतरंगी'. नावातच सर्व काही सांगणाऱ्या या चित्रपटात मकरंद अनासपुरे विनोदी भूमिका करत आहे. त्याच्याबरोबर नायिकेची भूमिका करतेय प्रियांका यादव.

Saturday, March 16, 2013 AT 12:00 AM (IST)

"पानी'मध्ये हृतिक रोशन? शेखर कपूर "पानी' नावाचा चित्रपट करणार होता.. काही ना काही कारणाने त्याला उशीर होत गेला... आता तब्बल 12 वर्षांनी हा चित्रपट पूर्ण होईल अशी आशा वाटू लागली आहे कारण या चित्रपटाला आता हिरो आणि निर्माताही मिळाला आहे. हृतिक रोशन नायकाची भूमिका करणार असल्याची चर्चा सध्या तरी आहे. तसेच "यशराज फिल्म्स'तर्फे चित्रपटाच्या निर्मितीची तयारी आदित्य चोप्राने दाखवली आहे. हृतिकबरोबर यात परदेशी अभिनेत्री असेल. "मासूम', "मि.

Saturday, December 08, 2012 AT 12:00 AM (IST)

सलमानचे दातृत्व सलमान खानच्या "दबंग 2'चे चित्रीकरण नुकतेच संपले. प्रथेप्रमाणे शूटिंग संपले, की युनिटसाठी दणदणीत पार्टीचे आयोजन केले जाते पण या युनिटसाठी ही ठराविक प्रथा बदलण्यात आली. चित्रीकरण संपले तेव्हा सगळे युनिट दुबईत होते. दुबईत जाऊन शॉपिंग नाही, असे होणे शक्‍य नाही. त्यामुळे सगळे जण एका मॉलमध्ये गेले. सगळ्यांचे शॉपिंग ऐन रंगात आले असताना अचानक तेथे सलमान खानची एंट्री झाली.

Saturday, December 01, 2012 AT 12:00 AM (IST)

चोखंदळ श्‍वेता पगार ख्यातनाम दिवंगत साहित्यिक व. पु. काळे यांच्या "पार्टनर' कादंबरीवर "श्री पार्टनर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. खरं तरं कोणत्याही साहित्यकृतीवर चित्रपट तयार करणं अवघड असतं. पण समीर सुर्वे या तरुण दिग्दर्शकाने "पार्टनर' कादंबरीला न्याय दिला. मूळ कथानकाला कोणताही बगल न देता त्याने चित्रभाषेचा अचूक वापर करून आपला चित्रपट सादर केला.

Saturday, November 24, 2012 AT 12:00 AM (IST)

बॉलिवूडची मंडळी हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी धडपडत असतात. मराठी मंडळींना ही संधी अगदी कमी मिळते. त्यामुळे त्यांचे अप्रूप जास्त असते. कोंबडी पळाली... हे गाजलेलं गाणं जिच्यावर चित्रित झाले ती मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला हॉलिवूडमधील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. मदर तेरेसा यांनी व्हॅटिकन सिटीशी जो पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये आपले काम आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी याविषयी विस्ताराने लिहिले आहे.

Saturday, August 11, 2012 AT 06:26 PM (IST)

अजय देवगण काढणार हॉरर चित्रपट बोल बच्चन बॉक्स ऑफिसवर हीट झाला आणि अजय देवगणला उभारी मिळाली आहे. सध्या तो सन ऑफ सरदार या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. अद्याप हा चित्रपट संपलेला नाही. तोच त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा तपशील अजून ठरलेला नाही. पण हा चित्रपट हॉरर असेल हे नक्की. राम गोपाल वर्मा यांच्या भूत या चित्रपटात अजय देवगणने उर्मिला मातोंडकर हिच्याबरोबर काम केले होते. त्यानंतर त्याने हॉररपटात काम केले नाही.

Saturday, July 28, 2012 AT 12:00 AM (IST)

"देविशा फिल्म्स'चा बहुचर्चित "भारतीय... म्हंजी काय रं भाऊ?' हा चित्रपट येत्या 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आदींशी झालेल्या गप्पा. "देविशा फिल्म्स'चा बहुचर्चित "भारतीय... म्हंजी काय रं भाऊ?' हा चित्रपट येत्या 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

Saturday, July 21, 2012 AT 12:00 AM (IST)

नंदिता दास रंगमंचावर वेगळ्या भूमिका करणारी अभिनेत्री नंदिता दास आता रंगमंचावर येत आहे. भारतीय बालचित्रपट समितीची अध्यक्ष असलेल्या नंदिता दासचे करिअर नाटकातूनच सुरू झाले होते. आता ती रंगमंचावर येत आहे ते इंग्लिश नाटकातून. हे नाटक तिनेच लिहिले असून, त्याचे दिग्दर्शनही तीच करणार आहे. या नाटकात ती कामही करणार आहे. या नाटकाच्या कल्पनेने ती एकीकडे उत्साही पण आहे आणि तीनही जबाबदाऱ्या पेलत असल्याने जरा काळजीही करत आहे.

Saturday, July 21, 2012 AT 12:00 AM (IST)

काजोल आणि मैत्री हिंदी चित्रपटसृष्टीत मैत्रीसाठी अनेकजण अनेक गोष्टी करत असतात. करण जोहरच्या "स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटात काजोलने एका गाण्यात सहभागी होण्यास मान्यता दिली आहे. करण जोहर आणि काजोलची मैत्री आहे. या मैत्रीसाठीच तिने या गाण्यात सहभागी होण्यास होकार दिला आहे. करणच्या दृष्टीने काजोल त्याच्यासाठी लकी आहे. त्यामुळे त्याने या चित्रपटात तिला एका गाण्यात सहभागी होण्यासाठी गळ घातली.

Saturday, July 14, 2012 AT 12:00 AM (IST)

सनी देओल बनला कलेक्‍टर! ऍक्‍शनपट सादर करण्यात हातखंडा असलेला दिग्दर्शक म्हणजे अनिल शर्मा. अनिल शर्मा यांनी "गदर - एक प्रेमकथा' सादर करून सनी देओलची लोकप्रियता वाढवली होती. त्यानंतर त्या दोघांनी हीरो आणि अपने या दोन चित्रपटांत एकत्र काम केले होते. अंगावर येणारे सीन आणि प्रचंड मारामारी हे अनिल शर्मा यांच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असतं. आता अनेक वर्षांच्या गॅपनंतर सनी देओल आणि अनिल शर्मा ऍक्‍शनपट बनवत आहेत.

Saturday, July 07, 2012 AT 05:25 PM (IST)

कर्नाटकात तांदूळ व खोबऱ्याचा वापर अधिक केला जातो. सकाळच्या न्याहारीलासुद्धा तांदळाचा रवा, खोबऱ्याचा कीस यांचा वापर करूनच पदार्थ बनविले जातात. असेच काही तांदळाच्या रव्याचे रुचकर पदार्थ.   लाल भोपळ्याचे थालिपीठ साहित्य ः दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी तांदळाचा रवा, चार हिरव्या मिरच्या वाटून, कोथिंबीर, मीठ, तेल. कृती ः - तेलाशिवाय सर्व साहित्य एकत्र करून जरुरीपुरते पाणी घालून कालवून घ्यावे.

Saturday, June 30, 2012 AT 12:00 AM (IST)

"नशीब नवाचे'चा "साम'वर धमाका खासगी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांच्या गर्दीत रिऍलिटी शोचे महत्त्व वेगळेच आहे. विविध वाहिन्या यासाठी नवनवीन कल्पना लढवत असतात. आता साम टीव्हीनेही 28 जूनपासून "नशीब नवाचे' हा रिऍलिटी शो सुरू केला आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. संपूर्ण कुटुंबाला सहभागी होता येईल असा हा "रिऍलिटी शो' आहे.

Saturday, June 30, 2012 AT 12:00 AM (IST)

दिलदार नसिरुद्दीन शाह हिंदी चित्रपटसृष्टीत पैसा आणि ग्लॅमर याच गोष्टींना महत्त्व असले तरी काही सुखद घटना, या नियमाला अपवाद ठरतील अशा घडत असतात. नसरुद्दीन शहा यांनी नुकताच एक चित्रपट स्वीकारला आहे. "चार्ली के चक्कर मै' या रहस्यमय थरारक चित्रपटात नसिरुद्दीन शाह एका पोलिस इन्स्पेक्‍टरची भूमिका करणार आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक मनीष श्रीवास्तव, याचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा नसिरुद्दीन शहा यांनाच डोळ्यांसमोर ठेवून लिहिली गेली आहे.

Saturday, June 23, 2012 AT 01:34 PM (IST)

करिअर ऑप्शन्स ः इन्व्हायर्नमेंटल सायन्स ------ निसर्गात रमण्याची तुम्हाला आवड असेल, तर इन्व्हायर्नमेंटल सायन्स हा करिअर ऑप्शन निश्‍चित चांगला ठरू शकतो. यामुळे तुमची आवडही जपली जाईल व पर्यावरणासाठी भरीव काम करण्याची संधीही मिळेल.  पर्यावरण वाचविण्याची चळवळ आता अधिक तीव्र होऊ लागली आहे.

Saturday, June 09, 2012 AT 12:00 AM (IST)

"साहेब, बिवी'चा सिक्वेल सध्या सिक्वेलचा जमाना आहे. टिगमांशू धुलिया या त्यावेळच्या नवोदित दिग्दर्शकाचा "साहेब, बिवी और गॅंगस्टर' हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. नवीन कलाकार, नवीन दिग्दर्शक असलेला हा चित्रपट अर्थातच कमी बजेटचा होता, त्यामानाने त्याला मिळालेले यश चांगलेच म्हणायला हवे. आता या चित्रपटाचा सिक्वेल येतो आहे आणि त्यात राज बब्बर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोहा अली त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे.

Saturday, June 09, 2012 AT 12:00 AM (IST)

मनोज वाजपेयीचे नवे रूप मनोज वाजपेयीने "सत्त्या'मध्ये साकारलेला भिकू म्हात्रे अद्यापि अनेकांच्या स्मरणात आहे. मनोज वाजपेयीचे आणखी एक रूप आता "गॅंग ऑफ वासेपूर'मध्ये बघायला मिळणार आहे. राजकीय सूडकथा असलेल्या या चित्रपटात मनोज वाजपेयी एका माफिया डॉनची भूमिका करतोय. या चित्रपटातील विविध प्रसंगांचे चित्रीकरण उत्तरेतील अनेक भागांत झाले, पण ते छुप्या कॅमेऱ्याने.

Saturday, June 02, 2012 AT 02:40 PM (IST)

रामगोपाल वर्माचा थयथयाट 'डिपार्टमेंट' चित्रपट अपयशी ठरला असून आता त्याबद्दल दोषी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. अपेक्षेप्रमाणे पहिल्यांदा राम गोपाल वर्माने संजय दत्त आणि धरम ओबेरॉय यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. डिपार्टमेंट च्या निर्मितीत संजय दत्त प्रॉडक्‍शनचा सहभाग होता आणि धरम ओबेरॉय या कंपनीचा "सीईओ' आहे. चित्रपट पडल्याबद्दल वर्माने संजय दत्त आणि ओबेरॉय यांना जबाबदार धरले आहे.

Saturday, May 26, 2012 AT 12:00 AM (IST)

हृतिक रोशन "स्टाइल आयकॉन' "याहू इंडिया' या ई-मेल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीने संपूर्ण देशभरात घेतलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात "स्टाइल आयकॉन' म्हणून हृतिक रोशनला सर्वाधिक पसंती मिळाली. सर्वाधिक तरुणांनी शाहरुख खानला बाजूला सारून रोशनला निवडले आहे. "सेलिब्रिटी कपल्स' या गटात सर्वांत स्टायलिश जोडपे म्हणून ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चनला पसंती मिळाली आहे.

Saturday, May 19, 2012 AT 12:00 AM (IST)

अर्जुन रामपाल आता खाकी वर्दीमध्ये सलमान खान आणि अजय देवगण या दोघांना खाकी वर्दीमध्ये मिळालेले यश पाहून आता अर्जुन रामपाललादेखील आपल्या नव्या भूमिकेबद्दल आशा वाटू लागली आहे. प्रकाश झा यांच्या आगामी "चक्रव्यूह'मध्ये माओवाद्यांशी संघर्ष करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची भूमिका अर्जुन रामपाल करतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन रामपालचे नशीब काही केल्या त्याच्यावर प्रसन्न होत नाहीय.

Saturday, May 12, 2012 AT 12:00 AM (IST)

3 डी मि. इंडिया   हिंदी चित्रसृष्टीत एक एक ट्रेंड येत असतो. मध्यंतरी जुने कृष्णधवल चित्रपट रंगीत करण्याची लाट होती, आता जुने चित्रपट "3 डी' स्वरूपात येऊ घातलेत. जेम्स कॅमेरूनचा "टायटॅनिक' (1997) नुकताच 3 डी स्वरूपात प्रदर्शित झाला. त्याला मिळालेला प्रतिसाद बघता घोस्ट रायडर, स्पायडर मॅन असे अनेक जुने इंग्रजी चित्रपट 3 डी रूप धारण करताहेत.

Saturday, April 28, 2012 AT 12:00 AM (IST)

ज्युलिया रॉबर्टस खलनायकी भूमिकेत हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस्‌ आता खलनायकी भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे. "प्रीटी वूमन' मध्ये विनोदी भूमिका करणाऱ्या ज्युलिया रॉबर्टस्‌ ने यापूर्वी विविध स्वरुपाच्या भूमिका साकारल्या आहेत. दोन हजार एक मध्ये तर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. येत्या 20 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या "मिरर-िंमरर' या चित्रपटात ज्युलिया खलनायिका साकारत आहे.

Saturday, April 14, 2012 AT 12:00 AM (IST)

आशावादी शाहरुख खान "आयपीएल' क्रिकेट स्पर्धेची धूम सुरू झाली असून आत्तापर्यंत यातील काही सामने पार पडले आहेत. या वर्षीच्या सीझनमध्ये तरी "कोलकता नाईट रायडर्स'ची कामगिरी चांगली व्हावी अशी शाहरुख खानला अपेक्षा आहे. "या वेळी खेळणाऱ्या संघात आम्ही चांगले खेळाडू घेतलेले आहेत ते सांघिक कामगिरी करून संघाची कामगिरी उंचावतील,' असा विश्‍वास त्याने व्यक्त केला आहे. "आयपीएल'मधील अन्य काही संघांचे मालक म्हणून काही कलावंतांनी मोठी रक्कम गुंतवली.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रियांकाची व्यावसायिकता प्रियांका चोप्रा ही अत्यंत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या व्यावसायिकतेचा प्रत्यय नुकताच आला. "इंडियन प्रीमियम लीग'मधील क्रिकेट सामन्याच्या उद्‌घाटन सोहळ्यात नेहमीच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आगामी सोहळ्यावेळीदेखील सलमान खान आणि प्रियांका चोप्राचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. ऐन वेळी संयोजकांनी या दोघांबरोबरच करिनाचा कार्यक्रमही ठेवला.

Saturday, March 31, 2012 AT 07:32 PM (IST)

सुधा चंद्रन आणि "नाचे मयूरी' एखादा कलाकार आणि एखादा चित्रपट यांते नाते अगदी अतूट असते. सुधा चंद्रन आणि "नाचे मयूरी ' हा चित्रपट असाच आहे. यातील सुधा चंद्रन यांनी केलेले नृत्य 26 वर्षांपूर्वी प्रचंड गाजले होते. आजही त्या नृत्याचे उदाहरण दिले जाते. जयपूर फूट लावून केलेले नृत्य सुधा चंद्रन यांच्यासाठी जितके महत्त्वाचे आहे तेवढेच अनेक प्रेक्षकांनाही ते महत्त्वाचे वाटते.

Saturday, March 24, 2012 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2013 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: