Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
सूर तिला लहानपणीच गवसले, गाण्याचे अन्‌ जगण्याचेही. आजी आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिचा गाण्याचा प्रवास सुरू झाला... भारतीय शास्त्रीय गायनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सावनी शेंडे-साठ्ये यांच्या यशाची कथा. ---           ""मी अगदी बारा- तेरा वर्षांची असेन तेव्हाची गोष्ट... दिल्लीला माझ्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्यासमोर मला गायचे होते.

Saturday, August 11, 2012 AT 04:23 PM (IST)

"नॉट ओन्ली मिसेस राऊत' या चित्रपटातील सरकारी वकिलाची भूमिका करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा मिलिंद शिंदे त्यानंतर "वादळवाट' "लक्ष्मणरेषा' आणि "अग्निहोत्र' अशा विविध मालिकांमध्ये दिसत राहिला. आपल्या विविध भूमिकांनी सगळ्यांचे लक्ष वेधणाऱ्या या कलावंताची प्रमुख भूमिका असलेला "बाबू बॅन्ड बाजा' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या अभिनेत्याची भूमिका असलेले पाच चित्रपट एकदम प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.

Saturday, July 28, 2012 AT 12:00 AM (IST)

काही चिमुकल्या मुलांना भरपूर शिकायचे आहे पण पालकांची चणचण ही त्यांच्या विकासाच्या आड येऊ पाहते. या बिकट परिस्थितीतून मुलांना मुक्त होता यावे, यासाठी "बिनभिंतीच्या शाळेचा' हात देण्याचे काम संतोष वाघ करत आहे. असलेल्या नोकरीत "पर्मनंट' होणे ही आजच्या काळात लागलेली लॉटरीच ! "काही तरी वेगळे करायचे,' म्हणून संतोषने हातात असलेल्या "पर्मनंट' नोकरीचा नाद, तर सोडलाच पण स्वतःचे वेगळे असे "अस्तित्व'ही निर्माण केले.

Saturday, July 21, 2012 AT 12:00 AM (IST)

दर शंभरामागं एक मूल हे "विशेष मूल' आहे. या मुलांना जगण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आणि ते कायम राहण्यासाठी त्यांना कोणा एकाचा नेहमीच आधार हवा असतो. प्रौढ विशेष मुलांना हा आधार सामुदायिकरीत्या देण्यासाठी "नवक्षितिज'च्या माध्यमातून डॉ. नीलिमा देसाई काम करत आहेत.     "चला आता आपल्याला व्हॉलिबॉल खेळायचाय...

Saturday, June 30, 2012 AT 12:00 AM (IST)

"भुईशास्त्र' हे ऐश्‍वर्य पाटेकर यांच्या जगण्याचंच तत्त्वज्ञान म्हणावं लागेल. जगण्यात लहानपणापासूनच आलेल्या अस्वस्थतेतून त्यांना कविता सापडली. निर्मळ मनानं विशुद्ध माणसाचा शोध घेणं हाच "भुईशास्त्रा'चा आत्मा आहे. जन्मापासून सोबत करणाऱ्या त्यांच्या कवितेला नुकतीच "युवा साहित्य अकादमी पुरस्काराची' शाबासकीही मिळाली आहे. "भुईशास्त्रा'ची निर्मितीप्रक्रिया काय? तुमचं जगणं कवितेत कसं आलं?..

Tuesday, June 26, 2012 AT 05:30 PM (IST)

"भुईशास्त्र' हे ऐश्‍वर्य पाटेकर यांच्या जगण्याचंच तत्त्वज्ञान म्हणावं लागेल. जगण्यात लहानपणापासूनच आलेल्या अस्वस्थतेतून त्यांना कविता सापडली. निर्मळ मनानं विशुद्ध माणसाचा शोध घेणं हाच "भुईशास्त्रा'चा आत्मा आहे. जन्मापासून सोबत करणाऱ्या त्यांच्या कवितेला नुकतीच "युवा साहित्य अकादमी पुरस्काराची' शाबासकीही मिळाली आहे.   "भुईशास्त्रा'ची निर्मितीप्रक्रिया काय? तुमचं जगणं कवितेत कसं आलं?..

Saturday, June 16, 2012 AT 06:39 PM (IST)

विदर्भातील एका सर्वसाधारण कुटुंबातले विजयराज बोधनकर आता मुंबईतले नावारूपाला आलेले चित्रकार आहेत मात्र ते अपघाताने या क्षेत्रात आले नाहीत. स्वतःतल्या कलागुणांना आधीच ओळखून जाणीवपूर्वक आपल्यातल्या चित्रकाराला त्यांनी घडवले. केवळ चित्रनिर्मितीवरच ते थांबले नाहीत तर समाजप्रबोधनासाठी कीर्तन, कथाकथनाचे कार्यक्रमही ते करतात. यशाचे मूळ कुठेतरी खोल अंतरंगात दडलेले असते. कुठल्याही बाह्यशक्तींच्या प्रभावाने खरेखुरे यश मिळवता येत नाही.

Saturday, June 02, 2012 AT 03:57 PM (IST)

कुत्र्याला हौस म्हणून पाळले जाते पण नंतर अनेकांना या कुत्र्याचाच त्रास होऊ लागतो. तो चिडतो, भुंकत राहतो, प्रसंगी चावतोही ! कुत्रे असे का वागतात, हा प्रश्‍न विक्रम होशिंग याच्या मनात आला आणि सुरू झाला या कुत्र्यांचे वागणे समजून घेण्याचा े बदलण्याचा प्रवास .  पौड बसस्थानकापासून थोडे पुढे गेले, की खिबालेवाडी हे डोंगरकुशीत वसलेले गाव लागते. या गावातच कुत्र्यांची शाळा भरते.

Saturday, May 26, 2012 AT 12:00 AM (IST)

बाहेरचा गोंगाट कानावरही पडू न देता मुले डार्विनचा उत्क्रांतवाद समजून घेण्यात रमली होती. हॉल गर्दीने खचाखच भरलेला होता. मुलांसमोर उभे असलेले संजय पुजारी सर अत्यंत तन्मयतेने डार्विन कोण होता, त्याचा संशोधन प्रवास सागरी प्रवासाएवढा कसा अथांग होता, त्याने साऱ्या जगासमोर विज्ञान जिज्ञासा आणि कुतूहलाने झपाटल्यानंतर माणूस काय अफाट कार्य उभे करू शकते, हे कसे दाखवून दिले हे याची देही याची डोळा चित्र उभे करत होते.

Saturday, May 19, 2012 AT 12:00 AM (IST)

नाटक, चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या तसेच विविध जाहिरातींमधून झळकत असलेल्या देखण्या किरण करमरकरचे बऱ्याच दिवसांनंतर "आरोही' या मराठी चित्रपटातून दर्शन झाले. या चित्रपटानंतर तो आता "पुणे - 52' या मराठी चित्रपटात भूमिका करणार आहे. अभिनयाचे नाणे खणखणीत असलेल्या या कलावंतांशी साधलेला रोखठोक संवाद. दूरचिवाणीच्या विविध वाहिन्यांवरील हिंदी मालिकांमध्ये काही वर्षांपूर्वी मराठी कलाकार अगदी अभावानेच दिसत.

Saturday, May 12, 2012 AT 12:00 AM (IST)

अध्यात्माच्या नावाखाली बुद्धीला न पटणाऱ्या अनेक गोष्टी आपण करतो मात्र विज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. डॉ. सुधाकर कलावडे यांचे "लोकभ्रम आणि वास्तव' हे पुस्तक हाच वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित करते. "लोकभ्रम आणि वास्तव' या पुस्तकाद्वारे डॉ. सुधाकर कलावडे यांनी वैज्ञानिक दृष्टी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आत्मसात करून, त्यानुसार आचरण घडविणारा समाज असा व्यापक विचार मांडलेला दिसतो.

Saturday, May 05, 2012 AT 12:00 AM (IST)

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये विठ्ठल कामत हे नाव आघाडीवर आहे. मात्र केवळ व्यवसाय न करता समाजाला मदत होईल असे अनेक उपक्रम कामत राबवितात. पर्यावरण हा तर त्यांचा अतिशय आवडीचा विषय. आपला व्यवसाय करत असताना पर्यावरणाला सांभाळण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी केला आहे...   "एन्व्हायर्नमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री' हा विचारही कोणी काही वर्षांपर्यंत केला नव्हता.

Saturday, May 05, 2012 AT 12:00 AM (IST)

पारंपरिक घरगुती पदार्थ रुचकर असतात, पौष्टिक असतात, हे मान्य असले तरी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना ते करायला सवड नसते. काहींना आवड नसते. पण हॉटेलचे पदार्थ वारंवार खाणे पचत नाही आणि परवडतही नाही. त्यातूनच "रेडी टू इट' हा नवा व्यवसाय जन्माला आला. घरगुती पदार्थ आणि "रेडी टू इट'चा मेळ घालत भारती वैद्य यांनी एक चतुर मध्यममार्ग शोधून काढला. शिरा, उपमा, कांदेपोहे, मसालेभात, कटाची आमटी, मूग हलवा, बासुंदी...

Saturday, April 28, 2012 AT 05:11 PM (IST)

"आत्मकथा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शुभांगी गोखले यांनी पुढे अनेक मालिका, चित्रपटांतून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तेवढ्यावरच न थांबता कथा, ललित लेख यांद्वारेही त्यांनी वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. शुभांगी गोखले हे खूप "इन्टेन्स' व्यक्तिमत्त्व आहे. जे करायचे ते पूर्णपणे झोकून देऊन, हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या यशाचे गमक त्यांच्या जडणघडणीत, ठाम विचारसरणीत आणि त्यांच्या पारदर्शी, काटेकोर जीवनशैलीत आहे...

Saturday, April 14, 2012 AT 12:00 AM (IST)

बिबट्याचे शहरात दर्शन झाले, गावात येऊन त्याने कुणावर हल्ला केला, शेतातल्या विहिरीत बिबट्या सापडला, या आणि अशा बातम्या अलीकडे वारंवार कानावर येतात आणि बिबट्या आणि माणूस अशा जणू दोन मतप्रवाहांचे दोन तटच समोरासमोर उभे ठाकतात पण बिबट्याच नव्हे, तर जंगलातले प्राणी आणि माणूस यांच्यातल्या संघर्षाचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही एका मताच्या बाजूने उभे राहणे चुकीचेच. तो अभ्यास करण्याचे काम विद्या अत्रेय करत आहेत.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

" विज्ञान ही एक विचारपद्धत आहे' हा त्यांचा विश्‍वास आहे. याच विश्‍वासाने ते मुलांसाठी विज्ञानप्रसाराचे काम करतात. मुलांना अवघड वाटणाऱ्या गणितासारख्या विषयाला सोपे करणारी एक पद्धत त्यांनी विकसित केली आहे. संस्थेच्या माध्यमातून एका मोठ्या कार्यक्रमात रूपांतर करत तिचा अनेक शाळांमध्ये प्रसारही केला आहे. विज्ञान आणि गणित या विषयांना समाजातील गरीब घरांमधील मुलांपर्यंत पोचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या विवेक मॉंटेरो यांच्याविषयी...

Saturday, March 24, 2012 AT 12:00 AM (IST)

फय्याज शेख हे नाट्य आणि संगीतातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या फय्याज यांनी गेली 46 वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

दलितांच्या प्रगतीचा मार्ग संघर्षातून आणि शिक्षणातून जातो, हा आजवरचा अनुभव पण त्या जोडीला दलितांमधील उद्योजकता विकसित करून त्यांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे आणि त्यादृष्टीने उद्योजक बनण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आव्हानात्मक काम दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज करते आहे. दलित समाजाच्या प्रगतीचे वेगळे मॉडेल रुजवू पाहणाऱ्या मिलिंद कांबळे या उद्योजकाविषयी.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

मेकअप ही एक आभासी कला आहे. वास्तवाच्या जितक्‍या जवळ जाईल, तितकी ती प्रेक्षकांना भावते. त्यामुळेच कमीत कमी आणि साधा मेकअप यावर भर देत व्यक्तिरेखा उभ्या करण्याचे आव्हान विक्रम गायकवाड यांनी सुरवातीपासूनच पेलले. "मेकअप करण्यापूर्वी स्क्रिप्टचा अभ्यास करणारा कलावंत,' असे विक्रमजींचे वर्णन केले जाते, ते त्यामुळेच. समाधानासाठी काम आणि समाधान होईपर्यंत काम, हे ब्रीद घेऊन बॉलिवूडमधील या वेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

Saturday, February 25, 2012 AT 12:00 AM (IST)

आ पले दैवत असणाऱ्या कलावंतांच्या पुढच्या पिढीकडूनही रसिकांच्या तशाच अपेक्षा असतात. ते ओझे पेलणे प्रत्येकालाच झेपते असे नाही. जेव्हा सुधीर फडके यांच्यासारख्या दिग्गज कलावंताचा समृद्ध वारसा लाभतो, तेव्हा हे आव्हान अधिकच अवघड असते पण श्रीधर फडके यांनी ते नुसते पेललेच नाही, तर आपली वेगळी ओळखही निर्माण केली. कलेच्या प्रांतात निःसंशय योगदान दिले. संस्कार आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी केलेल्या कलासाधनेचा प्रवास...

Saturday, February 18, 2012 AT 12:00 AM (IST)

स्वतःचे काम जीव ओतून करणे, कामात तडजोड न करणे, स्वतः कामाचा आनंद घेणे आणि आपल्या सोबत्यांनाही त्या आनंदात सहभागी करून घेणे ही प्रथितयश लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांच्या यशाची व्याख्या आहे. या व्याख्येची त्यांच्याबरोबर फोड करायला घेतली की लक्षात येते, या निकोप दृष्टिकोनामुळेच प्रतिमाताईंचे सारे आयुष्यच एक आनंददायक आणि कार्यमग्न प्रवास झाला आहे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये ज्या सेक्रेटरी असायच्या त्यांची नावे बहुधा डॉली, लिली, पिंकी अशी असायची आणि विशेष म्हणजे त्यांना नावाने हाक मारून भलतीच जवळीक निर्माण होऊ नये यासाठी त्यांचे साहेब किंवा त्यांच्या आसपासची माणसे त्यांना साधारणतः मिस डॉली, मिस लिली किंवा मिस पिंकी म्हणायचे. हाच वारसा आपण भारतीय इंग्रजीमध्ये आजही सुरू ठेवलेला आढळतो. नावाने हाक मारणे विचित्र वाटेल म्हणून आपण असे म्हणायला जातो पण वास्तविक हे चूक आहे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

पशुखाद्य विकण्यासाठी गोठ्यांमध्ये कॉल करणारा मार्केटिंगच्या सर्वांत खालच्या फळीचा सेल्समन ते एका मल्टिनॅशनल कंपनीचा "एशिया पॅसिफिक सीईओ' अशी उत्तुंग झेप घेणारा अस्सल मराठमोळा कॉर्पोरेट बॉस अशी सचिन अधिकारी यांची ओळख सांगता येईल.

Saturday, January 28, 2012 AT 12:00 AM (IST)

"मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नेणारा नव्या पिढीचा दिग्दर्शक' अशी उमेश कुलकर्णी याची खास ओळख आहे. चित्रपटाकडे पाहण्याचा त्याचा वेगळा, स्वतंत्र दृष्टिकोन आहे. व्यावसायिक निकषांच्या पलीकडे जाणारा विचार त्याच्याकडे आहे. आपल्या आजूबाजूच्याच गोष्टींचा त्याने चित्रपटाच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच उमेशचे आतापर्यंतचे काम हे त्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाचेच प्रतिबिंब आहे. त्याचे चित्रपट एकदम वेगळेच असतात.

Saturday, January 21, 2012 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय!  इंग्रजी बोलताना प्रश्‍नाचे उत्तर हो किंवा नाही असले तर बहुतांश लोक दरवेळेला फक्त "yes' किंवा "no' असेच म्हणताना आढळतात. वास्तविक, फक्त "yes' किंवा "no' म्हणून थांबावे, की त्यापुढे अजून काही म्हणावे हे प्रश्‍नावर अवलंबून असते. "Is this M. G.

Saturday, January 14, 2012 AT 12:00 AM (IST)

हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं, की पुढं यशाचं आणखी कोणतं शिखर असणार? असं कुणालाही वाटू शकतं. "आपलं क्षेत्र वेगळं आहे, ते आपल्याला खुणावतंय', ही जाणीव असेल, तर एका वेगळ्याच प्रवासाला सुरवात होते. मिलिंद गुणाजींच्या बाबतीत काहीसं असंच झालं. मॉडेलिंग आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये आपलं बस्तान बसवल्यानंतरही गुणाजी यांनी भटकंती हा आपला प्राण आहे, हे ओळखलं आणि पुस्तक, टीव्ही, प्रत्यक्ष इव्हेंट्‌स अशी अनेक माध्यमं चोखाळत एक नवा मार्ग तयार केला.

Saturday, January 14, 2012 AT 12:00 AM (IST)

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांत वेळोवेळी रमणारे अभिराम भडकमकर सातत्याने नवीन काही करताना दिसतात. त्यांच्या एकूण कारकिर्दीकडे बघता आपल्या प्रत्येक कलाकृतीसीठी त्यांनी काही वेगळे केलेले दिसते. विषयापासून मांडणीपर्यंत प्रत्येक बाबतीत ते प्रयोगशीलता जपतात. त्यांच्या या प्रवासाविषयी-  लेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा सर्वच क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या अभिराम भडकमकर यांचे व्यक्तिमत्त्व एकदम शांत.

Saturday, January 07, 2012 AT 12:00 AM (IST)

लाखो लोकांना नवी दृष्टी देणारे डॉक्‍टर म्हणून महाराष्ट्र तात्याराव लहाने यांना ओळखतो पण त्यांचे काम हे केवळ ऑपरेशन्सची संख्या वाढवण्यापुरते किंवा खेडोपाडी जाऊन ऑपरेशन्स करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. एका सरकारी रुग्णालयाला अत्याधुनिक आणि आरोग्य यंत्रणेला रुग्णाभिमुख करण्याचे आव्हान स्वीकारणारा प्रशासक म्हणूनही डॉ. लहाने यांच्या कारकिर्दीकडे पाहावे लागते. हे काम यशस्वी करण्यासाठी केवळ कळवळा नाही, तर दूरदृष्टीही लागते.

Saturday, December 31, 2011 AT 12:00 AM (IST)

अलीकडच्या काळात भारतीय तरुणांना "ग्लोबल व्हीजन' मिळाले, ते इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजीच्या क्षेत्रामुळे. आज मध्यमवर्गीय तरुण पिढीचा या क्षेत्रात बहुतांश सहभाग आहे पण जेव्हा या क्षेत्राची सुरवात झाली तेव्हा जागतिक उद्योगाचे, बदलांचे भान फार थोड्याजणांना होते. अनेक आयटी कंपन्यांची सुरवात ज्या बुद्धिमान तरुणांनी केली, त्यांच्यात हा एक समान गुण प्रकर्षाने दिसतो. त्याला पुढे कष्ट, बुद्धिमत्ता या गोष्टींची जोड मिळते.

Saturday, December 17, 2011 AT 12:00 AM (IST)

एसएमएस आणि ईमेल्सवरच संवाद आणि वर्ड-एक्‍सेलमध्येच काम करण्याच्या जमान्यात प्रत्यक्ष हाताने लिखाण ही कृती जवळपास नामशेष होत चालली आहे. अशा जगात हस्ताक्षरांना बोलके करणारी व्यक्ती खरे तर कालबाह्यच व्हायची पण या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत एका व्यक्तीने अक्षरे हीच आपली पॅशन मानली, सुलेखन कलेला जोपासले आणि तिला व्यावसायिक गणितांमध्येही बसवले. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सर्जनशील प्रवासाची ही कहाणी. एखादा कागद कोरा असतो...

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: