Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
सौंदर्य अनुभवण्यासाठी कधी कधी डोळे बंदही करावे लागतात. - अज्ञात मी कधीही कोणाशीही तुलना करण्याचा प्रयत्न केला नाही. - सचिन तेंडुलकर ज्या वाचनातून तुम्हाला आनंदच मिळत नसेल, तर अशा वाचनाचा काहीही उपयोग होत नाही. - ऑस्कर वाइल्ड स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतःलाच इतके व्यग्र ठेवा, की दुसऱ्यांवर टीका करायला वेळच मिळणार नाही. - चेतन भगत मिळालेले यश हे अंतिम नसते आणि अपयश हे घात करणारे नसते.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

1. जे शब्द तुम्ही सातत्याने निवडता, तेच शब्द तुमचे भाग्य ठरवितात. - ऍन्थनी रॉबिन्स 2. प्रत्येक संकटात काहीतरी फायदा मिळवून देणारे बीज दडलेले असते. - नेपोलियन हिल 3. वर्तमानाच्या उदरात भविष्यकाळ वाढत असतो. - व्होल्टायर 4. तुमचे काम जर बोलत असेल, तर तुम्ही वेगळे बोलण्याची गरज नसते. - हेन्‍री जे. केसर 5. आपण एकावेळी सर्व गोष्टी करू शकत नाही पण आपण एकावेळी एखादी गोष्ट नक्‍कीच करू शकतो. - केल्व्हिन कोलिज 7.

Saturday, January 05, 2013 AT 12:00 AM (IST)

भीती वाटणाऱ्या गोष्टींना समजून घेतले, की त्याबद्दल भीती राहात नाही.  मेरी क्‍यूरी (संशोधक)   प्रवास करणाऱ्याने, नव्या भागात जाताना "आपण इथले नाही' असे कधीही समजू नये.  मॅसन कुली (प्राध्यापक)   दिवास्वप्नात वेळ घालवताना, इतरांचा "दिवस' पुढे जात असतो हे लक्षात घ्या.   ग्रे लिव्हिंगस्टन   वारा हलक्‍या वस्तूंना सोबत नेतो आणि जड वस्तूंना जागेवरच ठेवतो वेळेचेही तसेच आहे.

Saturday, July 14, 2012 AT 12:00 AM (IST)

ज्यामुळे ताण आहे, त्या विचारावर मात करेल असा विचार निवडता येणे हाच ताणातून बाहेर येण्याचा उत्तम मार्ग आहे.   विल्यम जेम्स (तत्त्वज्ञ)   स्वप्ने बघणे आणि ती साकार करणे यात फारसे अंतर नाही मात्र, ते अंतर पार करायचे की नाही, हे प्रत्येकावर अवलंबून आहे.   बी. क्विलियम   ज्यांचे ध्येय ठरले आहे, त्यांना शुभेच्छा देण्यातच ध्येय न ठरलेले अनेकजण धन्यता मानतात.

Saturday, July 07, 2012 AT 07:40 PM (IST)

तुमच्याबद्दल इतरांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही कधीही वस्तुस्थिती नसते.   लेस ब्राऊन (संगीतकार)          अश्रूंविना दुःख म्हणजे आतल्याआत भळभळणारी मोठी जखमच.  ख्रिश्‍चन निवेल बोव्ही (लेखक)   खाण्यासाठी जगणे यापेक्षा जगण्यासाठी खाणे हे महत्त्वाचे.

Saturday, June 30, 2012 AT 05:55 PM (IST)

1. आज्ञा कशी पाळायची, हे ज्याला समजते त्यालाच आज्ञा कशी द्यायची हे समजते. - स्वामी विवेकानंद 2. आपल्या दुःखाचे कारण देव किंवा दैव नसून आपणच असतो, अशी ज्याची धारणा असते तोच दुःखातून बाहेर येऊ शकतो. - सदगुरू वामनराव पै 3. जगण्यासाठी आवश्‍यक असणारी ऊर्जा मिळविण्यासाठी तर अडचणी असतात. - केन्जी मियाझावा (कवी) 4.

Saturday, June 09, 2012 AT 01:10 PM (IST)

समजूनही दुरुस्त केली नाही, तरच ती चूक म्हणावी.  कन्फ्युशियस  सतत खोटे बोलणाऱ्याचा स्वतःवर कधीही विश्‍वास नसतो.   एस.ई.हिन्टन (लेखिका)  पैसे बोलायला लागले, की सत्य शांत होते.  रशियन म्हण  काहीही झाले, तरी उद्या येणारा दिवस हा नवा आणि वेगळा असतो.

Saturday, May 26, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रत्येकाबद्दलच शंका घेतली, तर त्यांच्यावर प्रेम कधी करणार?  मदर तेरेसा              जे जसे आहे तसेच त्याकडे पाहा. आपण कसे आहोत याचा विचार करून त्याकडे पाहू नका.  अनस निन (लेखिका)          आपल्याकडे जे उत्तम आहे, तेच इतरांना द्या आणि ते कधीच पुरेसे नसेल. त्यामुळे आपल्याकडचे सर्वोत्तमच जगाला द्या.  रागाच्या भरात आनंदाचे क्षण विरघळून जातात.

Saturday, May 19, 2012 AT 12:00 AM (IST)

१. यश हे आपल्या आजूबाजूला कुठेतरी आपली वाट पाहात असते ते मिळविण्यासाठी त्या दिशेने एक पाऊल टाकण्याची फक्त गरज असते. - सचिन तेंडुलकर २. विद्वानांना ग्रंथालयांची गरज पडत नाही, कारण तेच ग्रंथालय असतात. - ऍमॉस ब्रॉन्सन अलकॉट ३. कोणत्याही विचारांची मनात पेरणी केली, की तो विचार रुजण्यासाठी, वाढण्यासाठी पाणी घालावे लागतेच. - ओग मॅंडिगो ४. संशयी मनांना नितळ, निर्मळ स्वच्छ बाजू कधी दिसूच शकत नाही. - पब्लिलियस सायरस ५.

Saturday, May 12, 2012 AT 12:00 AM (IST)

शुद्ध निरपेक्ष आनंद हाच कोणत्याही कलेचा उद्देश आहे व तेच तिचे फळ आहे. - साहित्यसम्राट न. चिं. केळकर             ज्याप्रमाणे चंदन घासल्याशिवाय त्यातून सुगंध बाहेर येत नाही, त्याप्रमाणेच स्वतःवर प्रयोग करून पाहिल्याशिवाय आपले सामर्थ्य कसे कळणार? - "काळ'कर्ते शि. म. परांजपे         कर्माला घाबरणाऱ्या माणसांच्या जगण्याला काहीही अर्थ नाही.

Saturday, May 05, 2012 AT 07:08 PM (IST)

चांगला दिवस आणि वाईट दिवस यात तुम्ही त्याकडे कसे पाहता, एवढाच फक्त फरक असतो. - डेनिस एस. ब्राऊन (लेखक) अचानक ओढवलेल्या प्रसंगामुळे घाबरून जाऊ नका त्या प्रसंगाकडे आपण कसे पाहतो, हे आधी तपासा. - रोनाल्ड रेगन दुःखाला धाडसाने सामोरे जायचे असेल, तर "आयुष्यात जितके दुःख असते, त्याचप्रमाणात सुखही मिळतेच,' यावर विश्‍वास ठेवा. - जेरोइन स्लुइटर (खेळाडू) सतत सराव करा आणि यश मिळवा... ध्येयापर्यंत पोचणे इतके सोपे आहे.

Saturday, April 28, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रत्येक गोष्ट ही एकमेकांच्या गरजेतूनच निर्माण झाली आहे. पैसा कामगारांशिवाय तयार होत नाही, आणि कामगार पैशाशिवाय काम करत नाहीत. पोप लिओ xiii           स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय यश मिळत नाही, हे बदलच आपल्याला यशाकडे घेऊन जातात. - अब्राहम लिंकन       उत्साह कायम राहिल्याशिवाय कोणतीही मोठी गोष्ट घडत नाही.

Friday, April 20, 2012 AT 12:00 AM (IST)

  अशक्‍य हा शब्द फक्‍त मूर्खांच्याच शब्दकोशात सापडतो. नेपोलियन             मी भविष्याचा विचार करीत नाही कारण ते आपोआप येतेच. अल्बर्ट आइन्स्टाईन         ज्या विश्रांतीतून काहीही निष्पन्न होत नाही, त्या विश्रांतीची किंमतही शून्य असते.  अज्ञात   कोण बरोबर किंवा कोण चूक हे युद्धात ठरत नाहीच दोघांपैकी कोण राहिले, असाच निकाल युद्धामुळे मिळतो.

Saturday, April 14, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रश्‍नाचे मूळ शोधण्यात वेळ घालविण्यापेक्षा प्रश्‍न सोडविण्यावर भर देणे केव्हाही चांगले. - हेन्‍री फोर्ड             भूतकाळात शिरून पुन्हा नव्याने सुरवात करणे कुणालाही शक्‍य नाही पण आज सुरवात करून "उद्या' चांगला करणे, हे कुणालाही शक्‍य आहे.  शिव खेरा       स्वतःवर विश्‍वास असेल, तर जगात काहीही अशक्‍य नाही.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

काळ्याकुट्ट अंधारानंतर पहाट होतेच. थॉमस फुलर       सौंदर्य ही शक्ती असेल, तर ओठांवरचे हसू ही तलवार आहे. चार्ल्स रिडे   आयुष्यातील प्रत्येक क्षण हा ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी वापरायला हवा. बो बेनट्ट       राग मनाच्या सौंदर्याला बाधा आणतोच पण चेहऱ्याचे सौंदर्यही खराब करतो. अज्ञात     तरुणांमध्ये सुप्त ऊर्जा दडलेली असते.

Saturday, March 31, 2012 AT 12:00 AM (IST)

भलेमोठे पुस्तक शिकविण्यापेक्षा, वाचनावर प्रेम कसे करायचे हे शिकविले पाहिजे. - बी. एफ. स्कीनर (लेखक) कोणी काही शिकविण्यापेक्षा स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हायला हवे. विकासाची दिशा अंतर्मनाकडून बहिर्मनाकडे अशीच असायला हवी. - स्वामी विवेकानंद राग हे कमकुवतपणाचे, सहन करणे हे धाडसाचे आणि विनयशीलता हे सामर्थ्याचे लक्षण आहे. - अज्ञात रोजच्या कंटाळवाण्या जगण्यात एखादी चांगली सवय मजा आणू शकते.

Saturday, March 17, 2012 AT 04:07 PM (IST)

1. जे आशावादी असतात, त्यांच्याकडे सगळे काही असते. - ऍडम बेकर (भाषाशास्त्रज्ञ) 2. आशा बाळगणे ही दुःखातून बाहेर येण्याची सुरवात आहे. त्यातूनही असमाधानच वाट्याला आले, तरीही आशा बाळगणे कधीही सोडू नका. ऍविस जॉन (व्यावसायिक) 3. सहनशीलता आणि चातुर्य हे नेहमी एकमेकांबरोबर असतात. सेंट ऑगस्टीन 4. एखाद्याला क्षमा करणे, हे घाबरट माणसाचे काम नव्हे जो शूर असतो तोच एखाद्याला क्षमा करू शकतो. लॉरेन्स स्टर्न (कादंबरीकार) 5.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

1. चांगल्या सवयींपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. ओव्हिड (कवी) 2. जे पुन्हा जोडता येणार नाही, ते कधीही तोडू नये. जोसेफ जूबर्ट (तत्त्वज्ञ) 3. उतारवयातील प्रवासाची, वाचन आणि शिक्षण हीच खरी तरतूद आहे. ऍरिस्टॉटल 4. पैशासाठी काम करणाऱ्यापेक्षा जो आनंदासाठी काम करतो त्याच्याकडूनच काम करून घ्या. हेन्‍री डेव्हिड देरी 5. संशयाचा डोंगर पक्‍क्‍या विश्‍वासालासुद्धा हलवू शकतो. इराणी म्हण 6.

Saturday, February 25, 2012 AT 12:00 AM (IST)

संधिवाताचा त्रास कमी करणारा आहार सांगा. संधिवात हा संपूर्ण जगभर अनेक लोकांना त्रस्त करणारा चिवट विकार आहे. कोणत्याही प्रकारच्या संधिवातामध्ये वेदना कमी करणे व सांध्यांची झीज आटोक्‍यात आणणे या दोन गोष्टींवर उपाययोजना आखली जाते. संधिवातावरील औषधी चिकित्सेबरोबर काही आहारीय बदल केल्यास निश्‍चितपणे संधिवाताचा त्रास कमी करता येतो.

Saturday, February 18, 2012 AT 12:00 AM (IST)

.
स्वतःला मौल्यवान बनविण्यापेक्षा, स्वतःला यशस्वी बनविण्याचा प्रयत्न करा.  अल्बर्ट आईनस्टाइन   आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आवश्‍यक ती कौशल्ये शिका, ते शक्‍य नसेल तर स्वप्ने बदला. जिम रॉन (उद्योजक)   एखादी गोष्ट साकारण्यासाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच स्वप्नेसुद्धा बघावी लागतात. ऍनाटो फ्रान्स (कवी)   इच्छेवर मात करण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे ती पूर्ण करणे.

Saturday, February 18, 2012 AT 12:00 AM (IST)

1. कोणत्याही प्रसंगात, जे दिसते आहे ते पाहायला घाबरू नका.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

1. एखाद्या ठिकाणाकडे नव्या नजरेने पाहणे म्हणजेच पर्यटन.

Saturday, January 21, 2012 AT 12:00 AM (IST)

एखादी गोष्ट कशी आहे़ यापेक्षा आपण त्याकडे कसे पाहतो, हे महत्त्वाचे आहे. कार्ल जंग महत्वाकांक्षेविना माणूस म्हणजे प्राण नसलेला जीव. पर्ल बेली (गायिका) प्रत्येकाशी नम्रपणे वागा प्रत्येकजण तुमच्याशी नम्रपणे वागेल. जे. क्‍लेकॅम्प (तत्त्वज्ञ) जन्मापासून मृत्यूपर्यंत येणारा प्रत्येक क्षण नवे शिकण्याचा असतो. जे.कृष्णमूर्ती देण्याची वृत्ती असेल तर स्वतःसाठी काही न मागताही सर्वकाही मिळेल.

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

एखादी गोष्ट बदलायची असेल, तर ती प्रथम आहे तशी स्वीकारायला हवी. कार्ल गुस्ताव यंग (मानसोपचारतज्ज्ञ)  युद्ध संपविण्याचा सर्वांत जवळचा मार्ग म्हणजे युद्ध थांबविणे. जॉर्ज ऑर्वेल  स्वतःचा विकास न करता जगाच्या विकासाकडे डोळे लावून बसण्यात काय अर्थ आहे?   मेरी क्‍यूरी (फ्रेंच शास्त्रज्ञ)  आशा ही स्वप्नांना जागविण्याचे काम करते. ऍरिस्टॉटल  अडचणींतून बाहेर यायचे रस्ते हे हृदयातूनच जातात.

Saturday, November 05, 2011 AT 12:00 AM (IST)

कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची सूचना मिळाली, की "हाय अलर्ट' दिला जातो. अमेरिकेत यालाच "रेड कोड' म्हणतात. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्याला दहा वर्षे झाल्याने "अल कायदा'चा धोका लक्षात घेऊन अमेरिकेत नुकताच "रेड कोड लेव्हल 3'चा इशारा देण्यात आला होता. हा इशारा कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईही करता येईल, अशा पद्धतीचा होता. भारतात "हाय अलर्ट' असतो, तेव्हा पुढील गोष्टी पाहिल्या जातात.

Saturday, September 17, 2011 AT 12:00 AM (IST)

माणूस मरतो पण त्याने लावलेले शोध जिवंत राहतात. - जॉन केनेडी झोपणाऱ्या सिंहापेक्षा भुंकणारे कुत्रे कधीही चांगले. - वॉशिंग्टन आयर्व्हिंग "मी महान झालो. तुम्हीही होऊ शकता', असे सांगणारा माणूसच खऱ्या अर्थाने महान असतो. - चार्लस्‌ डिकन्स ज्या गोष्टींवर श्रद्धा आहे, त्यागोष्टी खोलात जाऊन समजावून घ्या. - सेंट ऑगस्टाईन शब्दांपेक्षा कृती नेहमीच बोलकी असते.

Saturday, September 17, 2011 AT 12:00 AM (IST)

सर्जकशील आयुष्य जगायचे असेल, तर हातून चुका होण्याची भीती बाळगू नये. जोसेफ पिअर्स (अमेरिकन लेखक) बोलण्यावरून ज्ञान आणि ऐकण्याच्या एकाग्रतेवरून समंजसपणा ओळखावा. जिमी हेंड्रिक्‍स (अमेरिकन गीतकार) आनंद मिळवण्यासाठी खर्च केलेला वेळ कधीही निरर्थक नसतो. जॉन लेनन प्रश्‍नाचे उत्तर समजून घेतले, की प्रश्‍न आणि उत्तर यात कोणताच फरक राहात नाही.

Saturday, September 03, 2011 AT 12:00 AM (IST)

हवे तसे करू देण्याची मुभा दिली, तरच नवनिर्मिती होऊ शकते. -अल्बर्ट आइन्स्टाईन चुकांची माहिती असेल, तर अचूकतेपर्यंत सहज पोहोचता येते.  - सेंट ऑगस्टाईन मी कोणामागे चालणार नाही. माझ्या मागूनही कोणी चालू नका. चालायचेच असेल, तर माझ्या सोबत चला.  - अल्बर्ट कॅमस जुन्या शस्त्रांनी नवी लढाई लढता जिंकता येत नाही. - विनोबा भावे यशासाठी आवश्‍यक असलेल्या नियोजनात कमतरता असणे, म्हणजेच अपयश.

Saturday, August 13, 2011 AT 12:00 AM (IST)

पूर्वतयारीतच यश दडलेले असते. - अलेक्‍झांडर ग्रॅहम बेल कल्पना करता येणे, हे ज्ञान मिळविण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. -अल्बर्ट आईनस्टाईन स्वत:च स्वत:शी संवाद साधणे, म्हणजेच विचार करणे. ती फार अवघड गोष्ट नाहीच. - प्लेटो विचार करतानाच मोठा, पटकन आणि पुढचा करा. त्या प्रांतात एकाधिकारशाही नाहीच. - धीरूभाई अंबानी कौशल्ये आत्मसात करता येत नसतील, तर स्वप्न बदला. - जीम रॉन प्रबळ इच्छाशक्तीपुढे अडचणी फिक्‍या पडतात.

Saturday, August 06, 2011 AT 12:00 AM (IST)

आपण ठरवू तेवढे आनंदी आपण राहू शकतो.  - अब्राहम लिंकन जोपर्यंत स्वतःला पटत नाही तोपर्यंत कोणीही सांगितले अगदी मीही, कुठेही लिहिलेले असले, तरी त्यावर विश्‍वास ठेवू नका.   - गौतम बुद्ध आनंददायक अनुभवासाठी मनाचा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा. - एमिली डिकिन्सन मनाचा कौल स्वीकारा तेच शहाणपणाचे ठरते.  - ऑप्रा विन्फ्रे शांतता ही लढून नाही, तर समजुतीनेच मिळते.

Saturday, July 30, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2013 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: