|
|
|
|
क्रीडा
भारतीय क्रिकेट संघाला विश्वविजेते बनविल्यानंतर गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कामगिरीवर दक्षिण आफ्रिका खूष असतानाही कुटुंबाला वेळ देण्याला महत्त्व देत त्यांनी संघाला गुडबाय केला आहे. कौटुंबिक कारणास्तव गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ नाकारली.
Saturday, May 18, 2013 AT 07:07 PM (IST)
जागतिक बॅडमिंटनमधील नवी "स्टार' थायलंडच्या राट्चानॉक इंटानॉन ही बॅडमिंटनपटू तिच्या कामगिरीमुळे चर्चेत आली आहे. अठरा वर्षांच्या या खेळाडूने नवी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन सुपर सीरीज स्पर्धेत वयाने मोठ्या असलेल्या प्रगल्भ खेळाडूंनासुद्धा दमवले आहे. थायलंडची 18 वर्षीय राट्चानॉक इंटानॉन जागतिक महिला बॅडमिंटनमधील नवी स्टार ठरली आहे. लहान वयातच ती अनुभवाने प्रगल्भ असलेल्या मोठ्या वयाच्या खेळाडूंना बॅडमिंटन कोर्टवर दमवत आहे.
Monday, May 13, 2013 AT 08:56 PM (IST)
पुण्यातली मॅरेथॉन रेस पाहून "हे काय आहे?' असा भाबडा प्रश्न विचारणाऱ्या संगीता खंडागळे यांनी हळूहळू या क्रीडाप्रकारात प्रावीण्य मिळवलं. इतकं, की राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्यांनी अनेक पदकं मिळवली. आताही 10 मे रोजी तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या स्पर्धेत त्या भाग घेणार आहेत. नंतर इटलीलाही जाणार आहेत. त्यांचा परिचय. सगळं लहानपण आईच्या मागं खुरपणी करत धावण्यात गेलं. दिवसाला मजुरी मिळायची 2 रुपये.
Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)
जागतिक फुटबॉलमध्ये लोकप्रियतेत सरस असलेल्या मॅंचेस्टर युनायटेडने पुन्हा एकदा इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धा जिंकली. विसाव्यांदा हा ग्लॅमरस संघ इंग्लंडचा चॅंपियन क्लब बनला. स्पर्धेच्या 34 व्या फेरीत त्यांनी रॉबिन व्हॅन पर्सी याच्या जबरदस्त हॅटट्रिकच्या बळावर ऍस्टोन व्हिला संघाला 3-0 असे हरविले. या विजयामुळे "मॅन यू'पाशी 16 गुणांची अपराजित आघाडी आली.
Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)
वेगवान आणि थरारक मोटरसायकल रेसिंगमध्ये इटलीचा व्हॅलेन्टिनो रोस्सी हा दिग्गज आहे. तब्बल सात वेळा मोटो जीपी जागतिक विजेतेपद मिळविणारा हा रायडर वयाच्या 34व्या वर्षीही भन्नाट वेगाने ट्रॅकवरून मोटरसायकल चालविताना दिसतो. नव्या मोटो जीपी मोसमाच्या सुरवातीस कतारमध्ये झालेल्या विद्युतझोतातील शर्यतीत स्पेनच्या 25 वर्षीय जॉर्ज लॉरेन्झो याने मुसंडी मारली. रोस्सीला 5.990 सेकंद वेळेच्या फरकाने मागे टाकून त्याने शर्यत जिंकली.
Saturday, April 20, 2013 AT 04:01 PM (IST)
बोल्टचा लक्षवेधी "वॉर्मअप' जमैकन धावपटू उसेन बोल्ट लंडन ऑलिंपिक गाजविल्यानंतर ब्राझीलमधील रिओ दि जानिरो येथे पहिल्यांदाच धावत होता. या स्पर्धेत तो जरा संथ वाटला असला तरी सर्वांत वेगवान धावपटू या लौकिकास साजेल अशीच कामगिरी त्याने करून दाखवली. लंडन ऑलिंपिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकून बीजिंग ऑलिंपिकमधील कामगिरीशी बरोबरी करणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट पुन्हा प्रकाशझोतात आला.
Sunday, April 14, 2013 AT 06:39 PM (IST)
प्रयाग युनायटेडने आयएफए शील्ड स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. या यशामुळे ईस्ट बंगालचा लौकिक मात्र कोलमडला आहे. जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या आयएफए शील्ड स्पर्धेत प्रयाग युनायटेडने विजेतेपद मिळविले. कोलकत्यात होणारी ही प्रतिष्ठेची स्पर्धा 1893 पासून खेळली जाते. प्रयाग युनायटेडने गतविजेत्या ईस्ट बंगाल या कोलकत्याच्याच संघाचा एकमात्र गोलने पराभव केला.
Saturday, April 06, 2013 AT 07:51 PM (IST)
टाईन बॉनची कमाल डेन्मार्कच्या टाईन बॉन हिने तिसऱ्यांदा प्रतिष्ठेची अशी "ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा' जिंकून वयाच्या 33व्या वर्षी करंडकावर आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती सर्वांत वयस्क महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. यापूर्वी 2008 व 2010 मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत तिने बाजी मारली होती. अंतिम लढतीत बॉनची गाठ पडली ती थायलंडच्या 18 वर्षीय राटचानोक इन्टानोन हिच्याशी. वयाचा विचार करता थाई खेळाडू एकदम तरुण, तर बॉन निवृत्तीकडे झुकलेली.
Saturday, March 23, 2013 AT 12:00 AM (IST)
"रेड कार्ड'मुळे गाजलेला सामना चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मॅंचेस्टर युनायटेड व रियल माद्रिद या युरोपातील दोन बलाढ्य आणि तुल्यबळ संघांतील लढतीकडे साऱ्याच फुटबॉलप्रेमींचे लक्ष होते. ओल्ड ट्रॅफोर्डवरील या सामन्यात जिंकणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार होता. पहिल्या टप्प्यात माद्रिद येथे 1-1 अशी गोलबरोबरी झाल्यामुळे दोन्ही संघांना विजय आवश्यक होता.
Saturday, March 16, 2013 AT 12:00 AM (IST)
वर्षाच्या सुरवातीसच विश्वनाथन आनंदचे फिडे मानांकनातील एलो गुणही कमी होते. 2772 एलो गुणांमुळे त्याला कारकिर्दीतील नीचांकावर जावे लागले होते. मात्र जर्मनीतील विजयी कामगिरीमुळे आनंदला पुन्हा सूर गवसला आहे. अखेर जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला सूर गवसला. दीर्घ कालावधीनंतर पाच वेळच्या जागतिक विजेत्या आनंदने क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद मिळविले.
Saturday, March 02, 2013 AT 12:00 AM (IST)
जागतिक फुटबॉलमध्ये आफ्रिकेतील नायजेरिया संघाला "सुपर ईगल्स' म्हटले जाते. तब्बल 19 वर्षांनी त्यांनी गतवैभव प्राप्त केले. आफ्रिका खंडातील प्रतिष्ठित आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा जिंकली. "फिफा'च्या मानांकनात सध्या तिसाव्या स्थानी असलेल्या नायजेरियाने चुणूक दाखविली. आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा त्यांनी शेवटची 1994 मध्ये जिंकली होती. त्या वेळी ट्युनिस येथे झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी झांबियाला 2-1 अशा फरकाने हरविले होते.
Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)
आपल्या जिद्दीच्या जोरावर जगभरातील क्रीडाप्रेमींच्या मनात स्थान मिळविलेल्या ऑस्कर पिस्टोरियसला "कोण होतास तू, काय झालास तू' असे म्हणण्याची वेळ आता त्याच्या चाहत्यांवर आली आहे. जगभरातील प्रेमी युगुल जेव्हा "व्हॅलेंटाइन्स डे' साजरा करत होते, त्याच दिवशी ऑस्करने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार करून आपला व्हॅलेंटाइन रक्तरंजित केला. कृत्रिम पाय असलेला धावपटू, ब्लेड रनर अशी ऑस्कर पिस्टोरियसची ओळख सर्वांनाच परिचयाची आहे.
Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)
महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतात होत असल्यामुळे भारतीय महिला संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र भारताच्या पदरी निराशाच पडली. महिलांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतात होत असल्यामुळे यजमान संघाकडून चमकदार कामगिरी अपेक्षित होती. मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील संघ पुरुषांप्रमाणे विश्वकरंडक जिंकू शकेल का, याबाबत उत्सुकता होती.
Sunday, February 17, 2013 AT 06:47 PM (IST)
फुटबॉल आणि बायचुंग भुतिया हे भारतात खूप यशस्वी समीकरण आहे. ज्यांना फुटबॉलमध्ये रस आहे, त्यांना हे नाव अजिबात अपरिचित नाही. ज्यांना फुटबॉलची गंधवार्ता नाही, त्यांनाही "झलक दिखला जा 3'मुळे भुतिया परिचित झाला. मुलांना गुन्हेगारी किंवा अन्य वाईट गोष्टींपासून लांब ठेवायचे असेल, तर त्यांच्यावर लहानपणीच कला-क्रीडेचे संस्कार व्हायला हवेत, असे त्याचे मत आहे. त्याच्याशी झालेली बातचीत. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना लागून असलेले वसई हे एक उपनगर.
Sunday, February 17, 2013 AT 06:35 PM (IST)
चांगली प्रकृती कमवण्याकरता सकस आहाराची जितकी गरज असते, तेवढीच नियमाने केलेल्या व्यायामाची असते. व्यायामामुळे शरीर सुडौल राहते, कामांना लागणारी शक्ती कमावली जाते. सांधे मोकळे राहतात. कामात गती व अचूकपणा येतो. दीर्घ काळ कष्ट करण्याची क्षमता वाढते. मधुमेह, वाढलेला रक्तदाब आणि रक्तातील मेदघटक यांतील विकृतींना आळा घालण्यास मदत होते. हृदयविकार टाळण्यास मदत होते. फुफ्फुसांची क्षमता वाढते. मन प्रसन्न राहते. उत्साह वाढतो. भूक चांगली लागते.
Saturday, February 09, 2013 AT 04:00 PM (IST)
"हार्ट ऑफ इनक्रेडिबल इंडिया' असे ब्रीदवाक्य सार्थ ठरविणारे मध्य प्रदेश खरोखरच अतुलनीय आहे. ऐतिहासिक. भौगोलिक, सामाजिक अशा सर्वच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशने आपली वेगळी ओळख बनविली आणि टिकविली आहे.
Saturday, February 09, 2013 AT 03:52 PM (IST)
जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचा वारसा कोण चालविणार, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर अजूनही मिळालेले नाही, मात्र आशेचे काही किरण आहेत, त्यापैकी एक म्हणजे पेंट्याला हरिकृष्ण. नेदरलॅंड्समधील नुकत्याच संपलेल्या टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील या हैदराबादस्थित 26 वर्षीय खेळाडूची कामगिरी लक्षात घेता, आनंदनंतर तो जागतिक बुद्धिबळात भारताचा झेंडा फडकावत ठेवू शकतो, अशी अपेक्षा बाळगता येईल.
Saturday, February 09, 2013 AT 03:43 PM (IST)
अँडी मरे याला हरवून सर्बियन नोव्हाक जोकोविच हा मेलबर्न पार्कवर अजिंक्य ठरला आहे. ग्रॅंडस्लॅम अंतिम लढतींतील कामगिरी लक्षात घेता, यूएस ओपनचा अपवाद वगळता, जोकोविचने मरेवर नेहमीच वर्चस्व राखले आहे. जागतिक पुरुष टेनिस मानांकनात अव्वल असलेला सर्बियन नोव्हाक जोकोविच पुन्हा एकदा मेलबर्न पार्कवर अजिंक्य ठरला आहे. या 25 वर्षीय आक्रमक टेनिसपटूने सहा ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत, त्यांपैकी चार वेळा तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेता ठरला आहे.
Saturday, February 02, 2013 AT 12:00 AM (IST)
अर्जुन तेंडुलकरने 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात स्थान पटकावले आहे. सचिनचा मुलगा हे वलय असल्यामुळे तो कुठेही खेळला तरी अर्जुनवरच सारा प्रकाशझोत राहील. क्रिकेटचा "देव' सचिन तेंडुलकर याच्या मुलाने मुंबईच्या 14 वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळविले. अहमदाबाद येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी अर्जुन सचिन तेंडुलकर याने मुंबईच्या संघात स्थान पटकावले.
Saturday, January 19, 2013 AT 12:00 AM (IST)
भारत-पाक या दोन संघांतील कोणतेही सामने असोत, ते त्वेषानेच खेळले जातात. येत्या मार्चमध्ये पाकिस्तान-भारत यांच्यात हॉकी मालिका होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने... भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांत क्रिकेट मालिका झाली. पाच वर्षांनी पाकिस्तानचा क्रिकेट संघ पूर्ण मालिका खेळण्यास भारतभूमीत आला. मुंबईवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या दोन देशातील क्रिकेटला पूर्णविरामच मिळाला होता.
Saturday, January 12, 2013 AT 12:00 AM (IST)
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला व मूळचा इंग्लंडचा असलेला क्रिकेटपटू आणि समालोचक टोनी ग्रेग याचे नुकतेच निधन झाले. क्रिकेटप्रमाणेच त्याने समालोचनाच्या क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले. त्याच्याविषयी - अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने खूप नाव कमावले होते. खेळाडू आणि समालोचक म्हणून त्याने निर्माण केलेले वादंगदेखील त्या त्या काळात खूप चर्चिले गेले.
Saturday, January 05, 2013 AT 12:00 AM (IST)
आशियातील सर्वांत जुना संघ असणाऱ्या मोहन बागान या क्लबवर निलंबनाची नामुष्की आली आहे. आता या संघाचे काय होणार? केवळ भारतात नव्हे, तर आशियातील सर्वांत जुना संघ म्हणून ज्या क्लबची गणना होते, त्या कोलकात्याच्या मोहन बागान ऍथलेटिक क्लबवर निलंबनाची नामुष्की आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सविस्तर चौकशीनंतर या माजी राष्ट्रीय विजेत्या संघाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के.
Saturday, January 05, 2013 AT 12:00 AM (IST)
भारतीय फुटबॉल संघाचा प्रमुख आधारस्तंभ सय्यद रहीम नबी 2012 मधील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू ठरला. आय-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या संघाच्या प्रशिक्षकांची मते अजमावून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नबी याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जागतिक फुटबॉलचा विचार करता, भारतीय फुटबॉल गटांगळ्या खाताना दिसते. "फिफा'शी संलग्न असलेल्या 209 देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक आहे 166वा आहे.
Friday, December 28, 2012 AT 12:00 AM (IST)
इंग्लंड संघाचे कर्णधारपद ऍलिस्टर कुक याच्याकडे जेव्हा आले, तेव्हा संघासमोर खूप आव्हाने होती. मात्र, कर्णधारपदाचा कोणताही परिणाम त्याच्या कामगिरीवर झालेला नाही, हेच त्याच्या धडाकेबाज कामगिरीवरून दिसून येते. भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाने मुंबई आणि कोलकता कसोटी सामन्यात यजमानांचा पुरता धुव्वा उडविला. दारुण अपयशाची टीम इंडियाला अजिबात अपेक्षा नव्हती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या अपयशाला अनेक कारणे असतील.
Saturday, December 15, 2012 AT 06:30 PM (IST)
रेड बुल संघाचा जर्मन ड्रायव्हर सेबॅस्टियन व्हेटेल सलग तिसऱ्या वर्षी फॉर्म्युला वनमध्ये (एफ वन) विश्वविजेता ठरला. या वर्षी चुरस जरा जास्तच होती. ब्राझील ग्रांप्रीत व्हेटेल सहावा आला, त्यामुळे त्याला फेरारीचा दोन वेळचा माजी विश्वविजेता फर्नांडो अलोन्सो याच्यावर अवघ्या तीन गुणांनी मात करता आली. 25 वर्षीय व्हेटेलने दिलेली झुंज कौतुकास्पद आहे.
Friday, December 07, 2012 AT 12:00 AM (IST)
डेव्हिड बेकहॅमने गॅलॅक्सीला अलविदा केला आहे. आता पुन्हा तो इंग्लंडमध्ये परतणार की अन्य देशांत खेळायला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. जागतिक फुटबॉलमधील सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडू डेव्हिड बेकहॅमने आता लॉस एंजलिस गॅलॅक्सी संघाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2007 पासूनचा त्याचा अमेरिकेतील मेजर सॉकर लीगबरोबरचा घरोबा संपुष्टात येणार आहे.
Saturday, December 01, 2012 AT 12:00 AM (IST)
एटीपी टूर टेनिस फायनलमध्ये नोव्हाक जोकोविच याने पुरुष एकेरीत विजेतेपद मिळविले. लंडनला रॉजर फेडररवर त्याने सरळ सेट्समध्ये मात केली. या यशामुळे सर्बियाचा जोकोविच पुन्हा पुरुष एकेरीत अव्वल स्थानी आला. वर्षअखेरीपर्यंत प्रथम क्रमांक त्याच्यापाशीच राहील. पुरुष टेनिसमध्ये या वर्षी कोणा एका खेळाडूची मत्तेदारी राहिली नाही. चारही प्रमुख ग्रॅंडस्लॅम स्पर्धांत चार वेगवेगळे खेळाडू विजेते ठरले. वर्षाच्या सुरवातीची अमेरिकन ओपन जोकोविचने जिंकली.
Saturday, November 24, 2012 AT 12:00 AM (IST)
फॉर्म्युला वन रेसिंग दुनियेतल्या सॉबर एफ वन या संघाची मोनिषा काल्नेटबर्ग यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. एफ-वनमधील त्या पहिलीच महिला आहेत. विशेष म्हणजे त्या मूळ भारतीय आहेत. फॉर्म्युला वन रेसिंग दुनियेतील चौथा जुना संघ असलेल्या सॉबर एफ वन-संघाची टीम प्रिन्सिपल (संघप्रमुख) म्हणून मोनिषा काल्नेटबर्ग या महिलेने कोरियन ग्रांप्रीपासून सूत्रे स्वीकारली. वेगवान कार रेसिंगमध्ये एखाद्या संघाचे टीम प्रिन्सिपलपद भूषविणारी मोनिषा ही पहिली महिला ठरली.
Saturday, October 20, 2012 AT 04:33 PM (IST)
क्रीडांगण ः किशोर पेटकर आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याइतपत ताकद भारतीय फुटबॉलमध्ये आहे, हे नेहरू करंडक स्पर्धेमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र या ताकदीला योग्य वळण भारतीय फुटबॉल महासंघाने द्यायला हवे. भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक विम कोव्हरमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने नेहरू करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत यजमानांनी सलग तिसऱ्यांदा करंडकावर नाव कोरले आणि हॅटट्रिक नोंदविली.
Saturday, September 22, 2012 AT 12:00 AM (IST)
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या नावाला त्या तेंडुलकर, द्रविड यांच्या नावाइतके "स्टार'पण नव्हते. लक्ष्मणने शून्यातून आपली कारकीर्द सुरू केली ती सिद्धही केली आणि वाढत्या वयानुसार "आता बस्स' हा निर्णय कुणी दुसऱ्याने घेण्याऐवजी त्याचा त्यानेच घेतला. "व्हेरी व्हेरी स्पेशल' अशी ज्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची ओळख आहे त्या भारताच्या अनुभवी शैलीदार फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
Saturday, September 01, 2012 AT 05:21 PM (IST)
|
|
|
|