Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
ती, मी आणि लव्हेंडरची फुले. नाजूक, कोमल आणि अत्यंत सुवासिक अशा लव्हेंडर फुलांसारखीच आमची मैत्री. आमच्या मैत्रीचा सुगंध आजही तसाच नवा, ताजा आहे अगदी त्या लव्हेंडरच्या फुलांसारखा!  फिका जांभळा रंग आणि त्या रंगाची फुले आम्हा दोघींना खूप आवडायची पण त्या रंगाला ज्या फुलांवरून हे नाव मिळाले, ती फुले मात्र आम्ही पाहिली नव्हती. निसर्गातही हा रंग तसा क्वचितच पाहायला मिळतो, म्हणूनच त्याचे आम्हाला कौतुक.

Saturday, May 26, 2012 AT 12:00 AM (IST)

सदमा म्हणजे धक्का. आयुष्यात वळणावळणावर अनेक धक्के बसतात काही अपेक्षित तर काही अनपेक्षित. पुणे-नाशिक रस्त्यावरून एका रात्री जाताना एका चालकाला अपघात झाल्याचे दिसले. त्याला मदतीचा हात दिला आणि काही दिवसांनी...  बडीशेप चघळत बाहेर पडलो तेव्हा रात्रीचा जवळजवळ एक वाजला होता.

Friday, May 25, 2012 AT 12:00 AM (IST)

रोज रात्री बऱ्यावाईट आठवणींचा निरोप घेऊन आपण झोपी जातो आणि सकाळी नव्या दमानं कामाला लागतो. कुठून येतो हा उत्साह? निसर्गाच्या चैतन्यमयी आविष्कारात कोणती ताकद असते? शाळेला सुटी लागली, की आजोळी जायचे हे ठरलेले असे. तिथे रोज पहाटे "घन:श्‍याम सुंदरा...' ही भूपाळी लावली जायची. सुटीच्या दिवसांत त्या भूपाळीमुळे जाग आली, की चिडचिड व्हायची. ते बघून एके दिवशी आजीने त्याचा अर्थ व सकाळी लवकर उठण्याची सवय कशी चांगली असते ते समजावून सांगितले.

Saturday, November 26, 2011 AT 12:00 AM (IST)

वयात आल्यावर प्रत्येकजण कुणाच्या न कुणाच्या प्रेमात पडतोच. कधी ते व्यक्त होतं किंवा कधी ते आयुष्यभर अव्यक्त राहतं. व्यक्त झालेल्याला प्रेम मिळालं आणि अबोल राहिलेल्या ते मिळालं नाही असं काही नसतं. प्रेम व्यक्त करो अथवा न करो ते कायम मनात असतंच. टपोऱ्या थेंबानी पडणारा पाऊस, चहूकडे पसरलेला हिरवागार निसर्ग, समोर तुडूंब भरलेला "मोती' तलाव, आणि त्या तलावाच्या काठावरून एकाच छत्रीतून जाणारे ते दोघे..

Saturday, July 30, 2011 AT 12:00 AM (IST)

"दर वर्षी येतोस, तरीही लिहायला लावतोस स्वतःवर अजूनही तितकीच व्याकूळ करते तुझी येणारी प्रत्येक सर'' असं तुझं सगुण रूप. इतर दोन ऋतुंपेक्षा पूर्णपणे वेगळे असलेलं. तुला नुसतं अनुभवता येतं असं नाही, तर तू येताना दिसतोय. तुझं अस्तित्व रुक्ष माणसाच्या मनातही ओलावा निर्माण करते.

Saturday, July 23, 2011 AT 12:00 AM (IST)

डायऱ्यांमध्ये तू घालून ठेवलेल्या खुणा मला खुणावत होत्या. त्यातल्या काही कविता मलाही पाठ होत्या. तू सुरवात केलीस. पाहिजे त्या शब्दावर, पाहिजे तितका जोर देत अर्थाच्या अस्तरासकट कविता उलगडत गेलास. भावसमाधी हा शब्द याआधी नुसता ऐकलेला, आता अनुभवला.   काव्यसोहळा तुझ्याच जाई-जुईच्या अंगणात व्हावा, असा तुझा मानस होता.

Saturday, July 16, 2011 AT 12:00 AM (IST)

"आजकाल मला बाबांशी बोलावसं वाटत नाही. त्यांच्या बोलण्याबद्दलही तसं मनापासून काही वाटत नाही. पूर्वी बाबा कसे हवेहवेसे वाटायचे. त्यांच्यापाशी हट्ट करावासा वाटायचा पण आता तर घरी जाणंच नकोसं झालंय असं ते वागतात. असं बोलतात, की जणू त्यांची मुलगी त्यांच्या गळ्यात धोंड झालीये.'' फक्त श्‍वास घेण्यापुरतं थांबून ती मुलगी सलग आपल्या मोबाईलवरून पलीकडल्या व्यक्तीशी हे सगळं धडाधड बोलत होती. मी तिथेच होतो. तिथल्याच टपरीवर घेतलेल्या चहाचा ग्लास हातात होता.

Saturday, July 09, 2011 AT 12:00 AM (IST)

स्वेच्छा निवृत्ती घेतली म्हणजे छंद जोपासण्यासाठी मोकळा वेळ मिळेल, असं वाटतं पण बऱ्याचदा तसं होत नाही. आता ही व्यक्ती घरीच असणार आहे, असं समजून सगळे त्या व्यक्तीला गृहीत धरतात. एकच आठवडा राहिला चारच दिवस राहिले, असं करता करता स्वेच्छा निवृत्तीचा शेवटचा दिवस आला मन थोडंसं सैरभैर झालं. शेवटी सहवासाचं प्रेम असतंच ना! निरोप समारंभ जसा पार पडतो, तसाच पार पडला. नारळ, पुष्पगुच्छ नि भेटवस्तू घेऊन घरी येताना हलकं-हलकं वाटत होतं.

Saturday, June 25, 2011 AT 12:00 AM (IST)

मोहना माझ्या शेजारच्या ब्लॉकमध्ये राहते. तिला पिंकी नावाची दीड वर्षाची मुलगी आहे. परवा सकाळीच घाईघाईत आली नि म्हणाली, ""पिंकीला तुमच्याकडे ठेवू का? मी पटकन निरोप सांगून येते.'' ""किती वेळ लागेल? माझी कामं उरकायचीयेत,'' मी विचारलं. ""आलेच दहा-पंधरा मिनिटांत,'' म्हणून ती गेलीसुद्धा. हातातलं बिस्किट संपेपर्यंत पिंकी गप्प होती. ते संपलं. हात पुसले नि मग तिचा चेहरा कावराबावरा झाला. ओठ बाहेर काढत म्हणाली, ""आई.

Saturday, June 18, 2011 AT 12:00 AM (IST)

माझ्या घरासमोरील हिरव्यागार गुलमोहराच्या झाडावरून इकडून-तिकडे उडणाऱ्या चिमण्या पुन्हा दिसू लागल्या आणि मला कमालीचा आनंद झाला. कित्येक दिवसांची खंत भुर्रकन उडून गेली. चिमण्यांचं असं नाहीसं होणं, मनाला फार लागून राहिलं होतं. अलीकडच्या काळात पिकांवर फवारण्यात येणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांमुळे चिमण्यांसारख्या पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता मध्यंतरी वाचनात आली होती.

Saturday, June 11, 2011 AT 12:00 AM (IST)

"स्पर्श' या गोष्टीचा "बाऊ' करणं योग्य नाही. स्त्री - पुरुषांच्या मैत्रीत आपल्याला नेमकं तेच अनैतिक वाटतं. कुठलीच मैत्री स्पर्शानं डागाळत नसते. ती घरात शिरल्या शिरल्या तिच्या अस्तित्वाचा, फक्त तिचाच असा सूक्ष्म गंध नाकात शिरला. घरात आम्ही दोघंच आहोत या जाणिवेनं तिच्या हालचालीत अवघडलेपण आलं. दारालगतच्या दिवाणावर ती भिंतीला अलगद टेकून बसली. ऐकण्या-बोलण्यासाठी एक तास हातात होता.

Saturday, May 21, 2011 AT 12:00 AM (IST)

आयुष्य हे सुख-दुःखाचे एक मिश्रण असते. सुखाचे क्षण पटकन उडून जातात, दुखाःच्या क्षणी मात्र कोलमडून जायला होते. एखादी घटना किंवा समस्या आयुष्याचे चित्र पालटून टाकते. अशा वेळी लढण्याची, जगण्याची इच्छा हेच आपल्या हातातील खरे शस्त्र असते. त्याचाच उपयोग समर्थपणे केला पाहिजे. रविवारची छान सकाळ होती. रोजच्याप्रमाणे वेळेचे भान ठेवणे गरजेचे नव्हते. जरा निवांतपणा होता. नुकतीच एक लांब रपेट मारून आले होते.

Saturday, April 02, 2011 AT 12:00 AM (IST)

"का य करायचेय मुलांना शिकवून शेवटी घरचेच काम करायचे ना?' या मानसिकतेतून बहुसंख्य भारतीय समाज बाहेर पडल्याची चिन्हे आहेत. खेडोपाडीच्या वाड्या-वस्त्यांवरच्या पालकांनादेखील आपली मुले शाळेत जावीत, शिकावीत असे वाटायला लागलेले आहे. आपण शिकलो नाही, आता मुलांनी तरी शिकावे, या उद्देशाने मुलांना शाळेत घातले खरे पण तिथे जाऊन मुलांना लिहायला वाचायला येते का, आकडेमोड करायला जमते का, हे प्रश्‍न प्रश्‍नच राहिले आहेत.

Saturday, March 19, 2011 AT 12:00 AM (IST)

राजस्थानात दर वर्षी "मरू-महोत्सव' साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. केवळ देशभरातून नव्हे, तर संपूर्ण जगातून आलेले पर्यटकही त्यात सहभागी होतात. या महोत्सवाविषयी...

Saturday, March 19, 2011 AT 12:00 AM (IST)

इंट्रो- हंगेरीतील स्त्रियांमध्ये "ग्लास ऍण्ड बोल पार्टी' हा प्रकार प्रिय आहे. यामध्ये फक्त दोनच पदार्थ करावे लागतात. ग्लासमध्ये वाईन आणि बोलमध्ये "हंगेरियन गुलांश' असतो. गुराख्यांचा असणारा "गुलांश' हा पदार्थ हंगेरीमध्ये राष्ट्रीय पदार्थ म्हणून गणला गेला. जवळपास सर्वांच्याच जेवणात हा पदार्थ आढळतो. हंगेरीमध्ये माझ्या मैत्रिणीशी, ख्रिस्तीनशी खूप गप्पा होत असत. दोघींनाही एकमेकींच्या देशांबद्दल कुतूहल होते.

Saturday, January 01, 2011 AT 02:45 AM (IST)

मी माझ्या लेकीला केव्हापासून न्याहळत होते पण त्याचं तिला भानही नव्हतं. स्वत:च्या लांबसडक केसांच्या प्रेमातच होती ती... वेगवेगळ्या तऱ्हेनं केसांना वळवत त्या वेगवेगळ्या वळणात स्वत:ची छबी न्याहळण्यात गुंग होती ती! आता ओणवी होत सारे केस मानेवरून खाली घेत झटक्‍यात सरळ होता होता त्यांना टॉवेलमध्ये किती छान लपेटलं होतं तिनं! मला टीव्हीवरील शॅम्पू किंवा साबणाच्या जाहिरातींमधील मुलींची आठवण झाली.

Saturday, December 18, 2010 AT 12:15 AM (IST)

  ब्र दलत्या काळाप्रमाणे मेकअपची तंत्रेही बदलली आहेत. असे असले, तरी योग्य मेकअपसाठी काय आवश्‍यक आहे याची माहिती असेल, तर आपले रंगरूप अधिक उठावदार आणि प्रभावी करता येते. चांगल्या मेकअपचे तंत्र एकदा अवगत केले, की सणा- समारंभासाठी आपला आपण मेकअप करता येतो. कसा करायचा मेकअप? 1. सर्वप्रथम कपाळ, गाल, डोळे, नाक, हनुवटी आणि मानेवर क्‍लिन्सिंग क्रीमचे थेंब लावून खालून वर या पद्धतीने वर्तुळाकार संपूर्ण चेहऱ्यावर जिरवावे.

Saturday, December 04, 2010 AT 02:00 AM (IST)

सौंदर्य फक्त चेहरे आणि पेहरावात नसून आपण जेथे जेथे वावरतो त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी सौंदर्य असतेच. ते सौंदर्य टिपता आले पाहिजे. एकदा, हे सौंदर्य टिपता आले, की आनंदाच्या आणि समाधानाच्या अनेक घटनांचे आपण साक्षीदार होतो. हां, यासाठी गरज फक्त एकच, सौंदर्यदृष्टीची! संध्याकाळच्या मस्त हवेत फिरायला बाहेर पडले. मी नेहमी वेगवेगळ्या रस्त्यावरून फिरते. प्रत्येक रस्त्यावर काही तरी छान गोष्टी बघायला व अनुभवायला मिळतात.

Saturday, December 04, 2010 AT 12:15 AM (IST)

मेष   प्रवास घडतील वृषभ   योग्य निर्णय घ्या मिथुन   कामाचे चीज होईल कर्क   घाईने कृती नको सिंह   खरेदीचे बेत ठरतील कन्या   कामाचा व्याप वाढेल तूळ   खर्चाचे बजेट कोलमडेल वृश्‍चिक   सुवार्ता कळेल धनू   प्रगतीचा चढता आलेख मकर   आनंदवार्ता कळेल कुंभ   धोरणात बदल करा मीन   कामाचे फळ मिळेल मेष     तुमची कामाची जिद्द दांडगी राहील.

Saturday, November 20, 2010 AT 02:00 AM (IST)

भाषेचा वापर करताना नामे, क्रियापदे, विशेषणांचे अर्थ आणि त्यांच्या वेगवेगळ्या छटा लेखकाच्या शैलीनुसार त्या शब्दाला अनेक नवे अर्थ देत जातात. या अर्थांमुळे मूळचे वाक्‍य अधिक प्रभावी आणि अर्थश्रीमंत बनते. मी अलीकडेच to hang something on somebody म्हणजे एखाद्याच्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माथी मारणे, त्याला त्या चुकीबद्दल जबाबदार धरणे या idiom चा विचार केला होता. हा आलंकारिक शब्दप्रयोग नुकताच पुन्हा वाचनात आला.

Saturday, November 20, 2010 AT 12:15 AM (IST)

मेष राशीच्या षष्ठात शनी व व्ययात गुरूचे वास्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या मनात यशाविषयी अनेक शंकाकुशंका निर्माण झाल्या असतील. तुम्ही थोडे धास्तावलेलेही असाल, पण तरीही नवीन वर्षात इतर ग्रहांची साथ राहील, तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. राश्‍याधिपती मंगळ आर्थिक आघाडीवर आबादीआबाद ठेवेल. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा उठवायचा, हे तुम्हीच ठरवायचे आहे. धंदा-व्यवसायात नवीन वर्षात कामाच्या विस्ताराच्या कल्पना मनात घोळतील. नोव्हें.-डिसें.

Tuesday, November 02, 2010 AT 01:30 AM (IST)

झाडाला सुचत जातात कळ्या तेव्हाच असते त्याचे "झाडपण'! त्याची सावली, त्याचा विस्तार त्याचे आयुष्य, त्याचे "मी'पण! झाड जेव्हा नुसते असते, घनभारल्या फांद्या पेलीत तेव्हाही ते असते नांगरीत अंकुरण्याचे दंश शोधीत! झाड जेव्हा पाने ढाळते तेव्हाही ते असते फुलत रिते होतानाही, असते भरत, हे त्यालाच असते कळत! नसते सुखदुःख झाडाला पान-फूल-फळ सावलीचे, ऊन्ह-पाऊस-वारा-वादळ त्याचे घर बिजलीचे! झाड वेचत जाते कळ्या मातीमधल्या काळोखात झाड पुन्हा "झाड' होते ख ...

Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)

मेष ः आशावादी रहाल वृषभ ः कृतीवर भर द्या मिथुन ः श्रमाचे चीज होईल कर्क ः यश मिळेल सिंह ः प्रवास घडेल कन्या ः पैशांची चिंता मिटेल तूळ ः धावपळीची शक्‍यता वृश्‍चिक ः प्रकृतीला जपा धनू ः कामे मार्गी लागतील मकर ः आनंदाचे क्षण येतील कुंभ ः सण-समारंभात भाग घ्याल मीन ः इच्छा पूर्ण होतील मेष    आशावादी दृष्टिकोन राहील. जुनी येणीही वसूल होतील. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षांना खरे ठराल. त्यांचे आज्ञेचे पालन करून मर्जी संपादन करू शकाल.

Saturday, October 23, 2010 AT 01:00 AM (IST)

अमुक एका नवसाला पावणाऱ्या देवाला एखाद्या भाविकाने चांदीचा हार, चांदीची शाल अर्पण केल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. अलीकडे हे प्रमाण वाढल्याचेही लक्षात येईल. पूर्वी खणा-नारळाने देवीची ओटी भरणं तसंच 21 किंवा 51 नारळांचं तोरण अर्पण करणं इथपर्यंत परमेश्‍वराबद्दलची भक्ती व्यक्त करण्याची भावना होती. आता जसजशी आपली लाइफस्टाइल बदलत गेली तसतशी भक्ती व्यक्त करण्याच्या भावनेतही फरक पडत गेल्याचं आढळेल.

Saturday, October 02, 2010 AT 12:00 AM (IST)

सह्यादीच्या कुशीत विसावलले महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहेच पण या महाबळेश्‍वरचे खरे सौंदर्य पाहायचे असेल तर आडवाटांचे रस्तेच चोखाळले पाहिजेत. जंगलांतून वाट काढताना पावलापावलावर निसर्ग विलक्षण रूपात भेटत असतो. निसर्गाचे हे उनाड रूप पाहण्याची मजा काही औरच. म हाराष्ट्राच्या पश्‍चिमी तटावर दक्षिणोत्तर उभा पसरलेला काळाकभिन्न, रौद्र, निबिड जंगलांनी वेढलेला सह्याद्री राज्याचे भौगोलिक वैभव आहे.

Saturday, September 18, 2010 AT 12:15 AM (IST)

कुत्रा हा जगभरातील सर्वांत लोकप्रिय पाळीव प्राणी आहे. उपयुक्ततेच्या निकषावर ही लोकप्रियता आधारली आहे. चीनमध्ये तर आपल्या बारा राशींप्रमाणे बारा प्राण्यांची वर्षे असतात. त्या त्या प्राण्याचे गुणावगुण त्या वर्षी जन्मलेल्या मुलांमध्ये दिसतात, असेही म्हटले जाते. भाषासमृद्धीसाठीही कुत्र्यांचे योगदान आहेच.... इं टरनेटवर "भटकत' असताना "चायनीज ज्योतिषशास्त्र आणि कॅलेंडर' पाहात होतो.

Thursday, July 22, 2010 AT 03:33 PM (IST)

खामसवाडी - लग्न म्हटले की गाजावाजा, मुलगी पाहणे, साखरपुडा, हुंडा, रुखवत, मानपान या बाबींना महत्त्व दिले जाते. या सर्व खर्चिक बाबींना फाटा देऊन हुंडा न घेता, रुखवत, मानपानाला महत्त्व न देता फक्त नवा पोशाख परिधान करून लग्न उरकता येते, याचे आदर्श उदाहरण खामसवाडी (ता. कळंब) येथील रणजित विठ्ठल गरड या तरुणाने घालून दिला आहे. खामसवाडी (ता. कळंब) येथे शुक्रवारी (ता. 28) हा लग्नसोहळा झाला.

Monday, June 14, 2010 AT 06:37 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: