Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
जॅक्‍सनच्या आठवणी टोकियोमध्ये नुकत्याच झालेल्या एका प्रदर्शनात पॉपस्टार मायकल जॅक्‍सन याचा खड्यांनी मढवलेला हातमोजा ठेवण्यात आला होता. मायकल जॅक्‍सनच्या ठेवणीतल्या अशा अनेक वस्तू त्या प्रदर्शनात रसिकांना पाहायला मिळाल्या. गुलाबी मासे तैपेई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मत्स्यालय एक्‍स्पोमध्ये अनेक देशांमधील शंभरहून जास्त फिश टॅंक्‍स ठेवले होते.

Saturday, November 24, 2012 AT 12:00 AM (IST)

हॉर्नबिलचे सौंदर्य ऱ्हीनोसेरोज हॉर्नबिल या वेगळ्याच पक्ष्याचे हे छायाचित्र. या जातीचे हॉर्नबिल पक्षी आकाराने खूप मोठे असतात शिवाय यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पांढुरक्‍या रंगाच्या चोचीला एक वेगळा वर आलेला भाग असतो. नारिंगी रंगाचा तो भाग या पक्ष्यांचे सौंदर्य खुलवितो. साथ प्रेमळ छकुलीची गोरील्ला हा दिसायला अक्राळविक्राळ प्राणी. त्याचे शिल्प बीजिंगमध्ये उभारण्यात आले होते.

Saturday, July 28, 2012 AT 12:00 AM (IST)

निसर्गप्रेम? युरो फुटबॉलच्या पोर्तुगाल विरुद्ध नेदरलॅंड्‌स या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाने फळे व भाज्यांनी कलाकुसर केलेली टोपी घातली होती. भव्य पृथ्वी संयुक्त संघाच्या ब्राझीलमधील एका परिषदेवेळी पृथ्वीचा भव्यदिव्य असा गोल तयार करण्यात आला होता. त्याशेजारी उभे राहून पोझ देण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. आईस शो शांघायमधील एका आईस शोमध्ये रशियन कलाकारांनी अप्रतिम आविष्कार सादर केला.

Saturday, June 23, 2012 AT 03:14 PM (IST)

नृत्याविष्कार युरो फुटबॉल चॅम्पियनशीपच्या उद्‌घाटनाचा सोहळा कलाकारांच्या नृत्याविष्काराने झाली. गोलाकार असा विशिष्ट प्रकारचा पोशाख घातलेले हे कलाकार नृत्यादरम्यान असे दिसत होते. ओझ्याचा भार... डोक्‍यावरील ओझ्याचा भार इतका झाला, की त्यामुळे डोक्‍यावर पोती वाहणाऱ्या या माणसाचे डोकेच दिसेनासे झाले.

Saturday, June 16, 2012 AT 12:00 AM (IST)

कासवाच्या पाठीवर बिऱ्हाड  अथांग सागरात त्या ब्राऊन बूबी पक्ष्याला एकच आसरा दिसला...आणि तिथे तो आरामात बसला. ऑलिव्ह रिडले कासवाच्या पाठीवर बसून हा पक्षी मस्तपैकी सागरविहार करत होता.  पारा चढला...  तापमान इतके वाढले आहे, की प्राण्यांनाही आता ते सहन होत नाही. जयपूरमधील एक हत्ती तर चक्क पाण्यातच जाऊन बसला.

Saturday, May 26, 2012 AT 12:00 AM (IST)

गुलमोहर अन्‌ पारवा नवी दिल्लीतील एका गुलमोहराच्या झाडावर हिरव्या पारव्याची जोडी बसली होती. लाल गर्द फुलांमध्ये ते पारवे म्हणजे खूपच सुंदर दिसत होते. हजारो क्षण टिपणारा तो... व्हिएन्नामध्ये काही दिवसांपूर्वीच 1923मधील एका दुर्मिळ कॅमेऱ्याचा लिलाव झाला. एकवीस लाख साठ हजार युरोज अशी या कॅमेऱ्याची विक्रमी किंमत होती.

Saturday, May 19, 2012 AT 12:00 AM (IST)

सुरेख फ्लेमिंगो फ्लेमिंगो पक्षी दिसायला अतिशय सुंदर. जवळून पाहिले, तर त्याचे रंग, वळणाकृती मान यांची नजाकत काही औरच दिसते.                       टायटॅनिक दुर्घटनेच्या निमित्ताने... टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने काही माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात एका पथनाट्याचा भाग म्हणून दोन प्रचंड कठपुतल्या तयार करण्यात आल्या होत्या.

Saturday, April 28, 2012 AT 01:34 PM (IST)

  वल्हव रे नाखवा... ढाकातील एक बांगलादेशी नागरिक अत्यंत सफाईदारपणे बांबूच्या मोठाल्या मोळ्या वाहून नेताना त्याचे टिपलेले छायाचित्र. गोलाकार मोळ्यांवर उभे राहून तोल सावरत वल्ही मारायची, अशी कसरत करणे सोपे नव्हे.             ईस्टरच्या निमित्ताने ईस्टरच्या निमित्ताने जर्मनीमध्ये बर्फापासून काही प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.

Saturday, April 14, 2012 AT 12:00 AM (IST)

गरजेपोटी... वाढत्या उन्हामुळे तलाव, ओढे आटू लागलेत. यामुळे पशुपक्ष्यांना पाणी मिळत नाही. मग तहान भागवायची कशी? म्हणूनच माणसांप्रमाणेच प्राणीही आता नळाचे पाणी पिऊ लागलेत. गरज माणसाला सर्वकाही शिकवते. तसेच ती प्राण्यांनाही शिकवते, असे म्हटले पाहिजे.                       टॅटूचे सौंदर्य टॅटूची कला वेगाने पसरते आहे.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

नवे काही देण्यासाठी, नवलाई घडविण्यासाठी स्फूर्ती असावी लागते. अंतर्मनातील ऊर्जा हीच वेगळे घडविण्यासाठी प्रेरणा देते. अशा प्रेरणेतून घडलेल्या नवलकथा खास वाचकांसाठी. निर्जीव ड्रॅगन चीनमधील एका समुद्रकिनाऱ्यावर महिलेच्या समोर चक्क ड्रॅगन उभा ठाकला मात्र त्याने ती घाबरली नाही, तर तिने चक्क त्याच्याकडे पाहून कॅमेरा क्‍लिक केला. कारण तो ड्रॅगन खरा नाही, तर ड्रॅगनसारखा दिसणारा वृक्ष होता.

Saturday, January 21, 2012 AT 12:00 AM (IST)

भूत हूँ मै... पांढरे केस, रंगही पांढरा फटक, मोठे नाक आणि जोडीला भयाण रात्र ही आपली भूताची म्हणजेच, चेटकिणीची सर्वसाधारण कल्पना. अशाच पद्धतीचे "ड्रेस अप' रात्री नाही पण दिवसा इटलीत पाहायला मिळाले. तिथे झालेल्या एका फेस्टिव्हलमध्ये सुमारे 100 महिला अशा पद्धतीचा "अवतार' करून आल्या होत्या. विरघळणारे शिल्प बर्फाचा त्रास सहन करत कुडकुडत बसणारे अनेक असतील पण या बर्फातून काहीतरी "क्रिएटिव्ह' करणारे थोडेच.

Saturday, January 14, 2012 AT 12:00 AM (IST)

न्यूयॉर्कमधील डॉगी कॉस्च्युम पार्टीतील कुत्र्यांचे मजेशीर अवतार आणि थंडीतील बर्फासोबत येणारा ख्रिसमसमधील सॅंटाक्‍लॉज यांच्यासह काही नवल गोष्टींची दखल घेऊया. 1. पॅन अमे रि कन गेम्स पॅन अमेरिकन गेम्स या अ मेरिकेतील मोठ्या स्पोर्टस इव्हेंटची सांगता नुकतीच मेक्‍सिको येथे पार पडली. त्या समारोप समारंभातील सुंदर कलाकृतींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पुढची म्हणजे 2015मध्ये होणारी स्पर्धा कॅनडा येथे पार पडणार आहे. 2.

Saturday, November 05, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2011 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: