|
|
|
|
पर्यटन
लहानपणी भक्त प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची गोष्ट वाचलेली आठवत असेल. भक्त प्रल्हादाच्या भक्तीला धावून येणारे नरसिंह यांची मंदिरे मात्र पाहिली जात नाहीत. येत्या 23 मे रोजी असलेल्या नरसिंह जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दोन ऐतिहासिक नरसिंह मंदिरांना भेट देऊया. मार्च-एप्रिलची परीक्षांची गडबड संपते नि मुलांचा सुटीचा मूड तयार होतो.
Saturday, May 18, 2013 AT 06:50 PM (IST)
ट्रेकिंग करतानाच कधी कधी एखादी वेगळी वाट धुंडाळली जाते. कधी ती वाट फसते, तर कधी शॉर्टकट म्हणून उपयुक्त ठरते. चंद्रगडमार्गे महाबळेश्वरला जाताना अशीच एक नवी वाट आम्हाला सापडली. त्याबद्दल... चंद्रगड ढवळे घाटातून अत्यंत निबीड, निर्जन अरण्यातून महाबळेश्वरच्या आर्थरसीट पॉइंट अर्थात मढी महालची चढाई हा सह्याद्रिप्रेमींचा आवडता ट्रेक! पंढरीची वारी करावी, तशी हौशी मंडळी हा ट्रेक करतात.
Tuesday, May 14, 2013 AT 07:19 PM (IST)
आफ्रिका खंडातील केनिया हा देश तसा छोटासाच पण वन्य प्राण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. जगभरातून नष्ट होत चाललेल्या अनेक दुर्मिळ प्राण्यांचे व पक्ष्यांचे येथे दर्शन होते. त्यामुळे हा देश श्रीमंतच मानावा लागेल. वनमालाअक्काच्या केनियातील नैरोबी येथे राहणाऱ्या दीपक व विद्याने आम्हा सर्वांना केनियाची सफर घडवण्याची मनोकामना व्यक्त केली.
Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)
निसर्ग आणि पर्यावरण या क्षेत्राबद्दल आता जनजागृती होते आहे. पत्रकारितेमध्येही या विषयांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या विषयासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात सतत डोकावत असतात. अगदी आपल्या परिसरातील स्वच्छता असो, नाहीतर पश्चिम घाटासंबंधी डॉ. गाडगीळ यांचा अहवाल असो जैववैविध्य, वन्यजीवन तस्करी, धारणाक्षम विकास हे शब्द आपल्याला सतत भेटत असतात.
Saturday, April 20, 2013 AT 04:17 PM (IST)
अहमदनगर जिल्ह्यात असलेले हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसूबाई हे गड अनेकांना माहीत असतील पण याच जिल्ह्यात आणखीही काही अपरिचित किल्ले आहेत. त्यापैकी काही किल्ले कुटुंबासह पाहायला म्हणून जाता येऊ शकते. अशा तीन किल्ल्यांची माहिती. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या गडकोटांचे आगार म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात वीसपेक्षा अधिक किल्ले असून, त्यातील बहुतांश किल्ले हे "बुलंद-बेलाग' या विशेषणांना साजेसे आहेत.
Saturday, April 20, 2013 AT 04:06 PM (IST)
ट्रेकर्ससाठी आव्हान समजला जाणारा एक गड म्हणजे हरिश्चंद्रगड. उंच कातळ पार करून या गडावर जावं लागतं. या गडावर गेल्यावर कोकणकड्याच्या रूपानं आणखी एक भन्नाट जागा पाहायला मिळते. श्वास रोखून धरायला लावणारा हा अनुभव असतो. पार्ल्यातील "हॉलिडे हायकर्स' नावाच्या संस्थेतर्फे रायगड टकमक टोक रॅपलिंग मोहिमेविषयी मी टिळक मंदिरामध्ये वाचलं. तिथं गेल्यावर संभाजी चोपडेकर या मुलाशी बोललो.
Sunday, April 14, 2013 AT 06:32 PM (IST)
बर्फाळ प्रदेशातून थंड बोचरे वारे सोसत प्रवास करण्याची मजा काही औरच! चार कैलास पर्वतांपैकी किन्नर कैलास पर्वताची पायी यात्रा करणाऱ्या ट्रेकर्सच्या अनुभवातूनच समृद्ध झालेले हे प्रवासवर्णन. प्राचीन भारतीय पुराण व संस्कृत ग्रंथांमध्ये चार कैलास पर्वतांचे वर्णन केले जाते. त्यापैकी आदिकैलास (उत्तराखंड), कैलास मानसरोवर यात्रा (तिबेट, चीन), मणिमहेश कैलास (हिमाचल प्रदेश) अशा तीन कैलास पर्वत यात्रा पूर्ण केल्या होत्या.
Saturday, April 06, 2013 AT 07:57 PM (IST)
हिमाचल प्रदेशातील धौलाधार रेंज पाहण्यासाठी अनेक पर्यटक हिमाचल प्रदेशाला भेट देतात. या भेटीत "मॅक्लिऑडगंज' येथील दलाई लामा यांची मॉनेस्ट्री, कांगडा व्हॅलीतील निसर्गदर्शन, Norbulingka Institute असे बरेच काही पाहता येते. हिमाचल प्रदेशाच्या वायव्येला (North-West) हिमालयाच्या "धौलादार' रेंज सुरू होतात आणि याच पहाडांमध्ये वसले आहे मॅक्लिऑडगंज (Mcleodganj) हे जगप्रसिद्ध ठिकाण.
Saturday, March 23, 2013 AT 12:00 AM (IST)
काही वर्षांपूर्वी नव्याने तयार झालेले राज्य छत्तीसगड तेथील नक्षलवादी कारवायांसाठी कायम चर्चेत राहिले आहे. याच छत्तीसगडमध्ये पर्यटनासाठीही अनेक सुंदर ठिकाणे आहेत. भारताचा नायगरा अशी ओळख असणारा चित्रकूट धबधबाही तिथे आहे. चित्रकूट आणि तीरथगड या धबधब्यांचे पर्यटन आणि त्यानिमित्ताने छत्तीसगडची सैर करताना खूप मजा येते.
Saturday, March 16, 2013 AT 12:00 AM (IST)
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा एक भाग बनलेले बेट पोर्टो रिको. साधारण उष्ण पण आल्हाददायक हवामान असल्याने खूप थंडीच्या मोसमात येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. पाच-सहा दिवसांच्या भटकंतीत हे छोटेसे बेट आपल्याला पुष्कळ आनंद देते.... अमेरिकेच्या उत्तर-पूर्व भागात बर्फ आणि कडाक्याच्या थंडीमुळे हिवाळा जोरदार असतो.
Thursday, March 14, 2013 AT 06:37 PM (IST)
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कुमाऊँ प्रदेशाची सफर आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. भौगोलिक सौंदर्य, वास्तुकला, हिमालयाची बर्फाळ शिखरे यामुळे भटकंतीचा आनंद दुप्पट होतो. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कुमाऊँ प्रदेशाला स्वतःचे असे वेगळे निसर्गसौंदर्य लाभलेले आहे.
Wednesday, March 13, 2013 AT 04:17 PM (IST)
त्रिनिदाद म्हटले, की लगेच आठवतो ब्रायन लारा आणि क्रिकेट. ते साहजिकही आहे. पण त्यापलीकडेही या बेटावर खूप काही पाहण्यासारखे आहे, समजून घेण्यासारखे आहे. आस्वाद-आनंद घेण्यासारखा आहे... नुकत्याच झालेल्या प्रवासात त्रिनिदाद बेटावरची एल्विना नावाची एक मैत्रीण मिळाली. प्रथम भेटीतच मला ती खूप आवडली. तिचे खळखळून हसणे आणि भरभरून बोलणे मनाला भावले.
Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)
चहाचे मळे, बॅकवॉटर, शिकारा किंवा हाऊस बोट, मसाल्याचे पदार्थ, शहाळी अशा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या केरळची सहल करण्याचा योग आला. तेव्हा तिथले सौंदर्य पाहून अक्षरशः आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. आमच्यासारख्या कायम कॉंक्रीटच्या जंगलात राहणाऱ्यांना अधूनमधून निसर्गातल्या हिरवाईची ओढ लागते. "हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे' असं दृश्य खरोखरंच पाहायचे असेल, तर आपल्याला मुन्नारच गाठायला हवे.
Monday, February 18, 2013 AT 01:27 PM (IST)
"जिंदगी एक सफर है सुहानाऽऽ यहॉं कल क्या हो किसने जाना' या गाण्यामध्ये आयुष्य म्हणजे सुहाना सफर आहे आणि ज्या सफरीमध्ये उद्या काय होईल हे कुठल्याही माणसाला कधीच कळलं नाही आणि कळणारही नाही, असं सांगितलं आहे. हे तर आम्हाला माहिती आहे असं कुणीही म्हणेल. तसं नाहीये. हे सांगण्यात काहीतरी विशेष आहे. ते म्हणजे मी हे गाणं सिंगापूरला टॅक्सीत बसलेलो असताना ऐकलं. टॅक्सी ड्रायव्हर चिनी होती. माझ्याबरोबर टॅक्सीत राजन मोहाडीकर होता.
Saturday, February 02, 2013 AT 12:00 AM (IST)
पर्यटनाला निघाले, की मंडळींचा उत्साह अमाप असतो. त्याच वेळी आपल्या आरोग्याबाबत मनामध्ये कुठेतरी धाकधूक असतेच. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी, याबद्दलचे मार्गदर्शन. गेल्या वीस वर्षांत झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे मध्यमवर्गीय भारतीय लोकांचा परदेशातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा कल वाढलेला दिसतो. अलीकडे देशातील धार्मिक पर्यटनाला, नव्याने विकसित झालेल्या धर्मस्थळांमुळे चालना मिळालेली आहे.
Friday, February 01, 2013 AT 12:00 AM (IST)
साहस पर्यटनाची संकल्पना अजूनही आपल्या देशात बाल्यावस्थेतच आहे. मलेशियात मात्र त्याचे प्रगत रूपच पाहायला मिळाले. साहस पर्यचनाकडे जास्तीत जास्त पर्यटक कसे आकर्षित करता येतील, हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. दक्षिण आशियातील सर्वात उंच अशा किनाबलू शिखराची मोहीम हा त्याचाच एक दाखला.
Saturday, January 26, 2013 AT 12:00 AM (IST)
जगातल्या महागड्या देशांपैकी एक देश म्हणजे डेन्मार्क, अशी आतापर्यंतची या देशाची ओळख असली, तरी ही ओळख त्या देशासाठी पुरेशी नाही. स्वच्छता, शिस्त, मदत करण्याची वृत्ती यामुळे हा देश भावतो. येथील प्रमुख आकर्षणांमध्ये लिटल् मर्मेडचा स्टॅच्यू हे एक आहे. जसा पॅरिसचा आयफेल टॉवर, न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तसा लिटल् मर्मेडचा पुतळा म्हणजे डेन्मार्कची ओळख आहे.
Saturday, January 12, 2013 AT 08:27 PM (IST)
ठरवून काही करायचं म्हटलं, तर ते घडून येत नाही. पण मनात जबरदस्त इच्छा असेल तर मात्र मनातली गोष्ट आपल्या मनःशक्तीच्या बळावर घडून येते, असं मला नेहमी वाटतं. माझ्या बाबतीत हे असं अनेक वेळा घडल्याचं मला ठाऊक आहे. राजस्थानातील भटकंतीसुद्धा अशीच अचानक घडून आली. एका अत्यंत जवळच्या डॉक्टर मित्राच्या मुलीचं लग्न जयपूरला होतं... त्यामुळं जयपूरला जाणं झालं म्हणून बिकानेर... जैसलमेर करीत घरी परतायचं ठरवलं.
Saturday, January 05, 2013 AT 12:00 AM (IST)
हिवाळ्याचे दिवस हे पर्यटनासाठी उत्तम असतात. शांत आणि निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायचे असे मनात घोळत असेल, तर वेळास हे ठिकाण त्यासाठी उत्तम आहे. फिरण्याच्या प्लॅनमध्ये एखादा गड-किल्लाही असावा, असे वाटत असल्यास मुरुड-जंजिरा पर्यटनाचा सर्वस्वी आनंद देऊ शकतो. थंडीच्या मोसमात महाराष्ट्रातील पर्यटनाला बहार असते.
Saturday, January 05, 2013 AT 12:00 AM (IST)
टोकियोला भेट द्यावी, हे स्वप्न एका परिषदेच्या निमित्ताने पूर्ण झाले. तेथे गेल्यावर तिथली स्वच्छता, जपानी माणसांमधला मृदूपणा, छोट्या-छोट्या गोष्टींची केलेली जपणूक... हे पाहून आपण टोकियोच्या प्रेमात पडलो नाही तर नवलच ! जपानमधील 63 व्या आंतरराष्ट्रीय आयुर्विमा व गुंतवणूक परिषदेसाठी देशविदेशातील विमा प्रतिनिधी व गुंतवणूक सल्लागार एकत्र येणार होतो. भारतातून या परिषदेसाठी 18 जणांना निवडले होते. महाराष्ट्रातील त्यात आमच्या सहा जणांचा ग्रुप होता.
Saturday, December 29, 2012 AT 12:00 AM (IST)
महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या कळसूबाई शिखरासह नाशिक जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. या कळसूबाई शिखराच्या पूर्वेकडच्या भागातल्या किल्ल्यांची भटकंती फारच कमी वेळा केली जाते. गिर्यारोहणासाठी उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या या काळात या किल्ल्यांना ट्रेकर्स भेट देऊ शकतात.   नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा गिर्यारोहणासाठी सर्वोत्कृष्ट कालावधी समजला जातो.
Saturday, December 15, 2012 AT 06:38 PM (IST)
हरिद्वारपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रुरकी येथे मी काही दिवसांसाठी राहायला आले होते. या दरम्यान राजाजी नॅशनल पार्कला दोनदा भेट देण्याची संधी मिळाली. जंगलातील भटकंती तशीही मला आवडतेच... त्यात राजाजी नॅशनल पार्क हॉटेलपासून हाताच्या अंतरावर आहे म्हटल्यावर मी ही संधी सोडणे अशक्यच होते तसेही सध्या या भागात चारधाम यात्रेमुळे तीर्थयात्रींचा पूर आलाय.
Saturday, December 08, 2012 AT 12:00 AM (IST)
युरोपमधील वीस ते पंचवीस देशांची सफर करताना त्या प्रत्येक देशात काही ना काही वेगळे आढळले. वास्तुकला, खाद्य संस्कृती, खरेदी अशा प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नावीन्यपूर्ण मला दिसले. माझ्या युरोप सहलीचा वृतान्त. युरोप खंडात तशी बरीच छोटी मोठी राष्ट्रे आहेत. या सर्व राष्ट्रांना त्यांचा पारंपरिक इतिहास, संस्कृती व वास्तुकलेचा अनमोल ठेवा आहे.
Saturday, December 01, 2012 AT 12:00 AM (IST)
हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट उरकून व्हिएन्नाची ट्रेन पकडण्यासाठी बुडापेस्टच्या केलेटी स्टेशनवर आम्ही आलो. तिथल्या प्लॅटफॉर्मवर फारसा गजबजाट नव्हता मात्र फलाट फार बुटका (Low) होता. गाडी आल्यानंतर डब्यात चढण्यासाठी चार पायऱ्यांचा उपयोग करावा लागला. वातानुकूलित गाडीला एक फर्स्ट, तर चार इकॉनॉमी वर्गाचे व एक पॅंट्री असे फक्त सहा डबे होते. प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती.
Saturday, November 24, 2012 AT 12:00 AM (IST)
विदर्भातील गोंदिया जिल्हा तसा दुष्काळी पण इथल्या नवेगाव पक्षी अभयारण्यात अनेक सुंदर पक्षी पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे सारस पक्षी. दुर्मिळ अशा सारस पक्ष्याला पाहण्यासाठी नवेगावला गेलो पण वास्तव वेगळेच होते. गोंदिया जिल्ह्यातील काही खेडेगावात सारस पक्ष्यांचे बऱ्यापैकी संवर्धन होते आहे. किमान पंचवीस सारस जोड्या या भागात घरटी बांधून आहेत, ही बातमी वाचली आणि मन हरखले. मनात आले, की या सारस पक्ष्याला पाहायला जावेच.
Saturday, October 27, 2012 AT 06:51 PM (IST)
फ्रान्सच्या शिरपेचात मानाचा तुरा समजला जाणारा आयफेल टॉवर अनेक वादविवादांमधून बाहेर पडून आजही दिमाखात उभा आहे. पॅरिसच्या कुठल्याही कोपऱ्यातून दिसेल, असा हा टॉवर असल्याचे तिथले नागरिक अभिमानाने सांगतात. नुकतीच वाचनात एक बातमी आली- युरोपमधील सर्वांत किमती स्मारक आयफेल टॉवर असून, त्याची किंमत 344 अब्ज पौंड्स आहे. हे वाचताना माझ्या डोळ्यांसमोर आयफेल टॉवरच्या आठवणी तरळल्या.
Tuesday, October 09, 2012 AT 07:49 PM (IST)
देशातील काही भाग पर्यावरणासाठी राखून ठेवण्यासाठी नॅशनल पार्क तयार करण्याची संकल्पना अमेरिकेत पहिल्यांदा नावारूपाला आली ती यलोस्टोन नॅशनल पार्कमुळे. त्यानंतर जगभरात अनेक राष्ट्रीय उद्याने तयार झाली. बावीस एकरवरील "यलोस्टोन' म्हणूनच महत्त्वाचे ठरते. आतापर्यंत अमेरिकेला अनेकदा जाणे झाले होते.
Saturday, September 22, 2012 AT 12:00 AM (IST)
भारताच्या शेजारीच असलेला भूतान हा अत्यंत छोटासा देश. भाषा, संस्कृती, परंपरा या सर्वच बाबतींत भारतापेक्षा अगदी वेगळा. तिथे गेल्यावर जाणवणारा आपलेपणा त्या देशाची मनात एक वेगळी प्रतिमा तयार करतो. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी कुठल्यातरी अतिपरिचित नसलेल्या ठिकाणाची निवड करायची, या शिरस्त्याप्रमाणे भारताचा चिमुकला शेजारी "भूतान' पाहायचा असे ठरले. हिमालयाच्या कुशीत असलेल्या या देशाची सहल म्हणजे एक अत्यंत आनंददायक अनुभव होता.
Tuesday, September 11, 2012 AT 05:26 PM (IST)
फिरायला गेल्यावर कधीकधी अनपेक्षित ठिकाणी आपण जातो आणि त्यातून आपल्याला भरपूर आनंद मिळतो. कन्याकुमारीपासून जवळच असलेले "लॅंड्स एंड' हे ठिकाण असाच आनंद देते. जमिनीचा शेवट व अथांग पसरलेला समुद्र हे दृश्य पाहायला मिळणे हाच येथील अपूर्व अनुभव ठरतो. कन्याकुमारीच्या अलीकडे पंधराएक किलोमीटर असलेल्या "मरुदमलै' नावाच्या डोंगरावर मी उभा.. डावी-उजवीकडे म्हणजे अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम दिशांना समुद्र दिसतोय.
Saturday, September 01, 2012 AT 01:03 PM (IST)
कोकणाला जशी सागरकिनाऱ्याची साथ लाभली आहे, तसेच वैभवसंपन्न गडकिल्ल्यांची परंपराही लाभली आहे. पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांऐवजी हे गडकिल्लेच पर्यटकांचे आकर्षण ठरतात. मृगगड पृथ्वीच्या उदरातील उलथापालथीमधून तयार झालेला ज्वालामुखीजन्य काळ्याकभिन्न खडकांनी बनलेला आपला सह्याद्री! अनादी अनंत कालापासून मानवाला पर्वतांचे आकर्षण वाटत आलेले आहे.
Monday, August 27, 2012 AT 03:08 PM (IST)
|
|
|
|