Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
पंचखाद्याचे मोदक साहित्य ः एक वाटी खोबऱ्याचा कीस, पाव वाटी खारीकपूड, बदामाचे काप चार चमचे, चार चमचे काजूची पूड, दोन चमचे किसमिस, अर्धी वाटी तळलेला डिंक, दोन चमचे भाजलेली खसखस, एक वाटी पिठीसाखर, गरम तूप व दोन चमचे साय. कृती ः खोबऱ्याचा कीस, खारीक, काजूपूड, बदामाचे काप, डिंक, खसखस सर्व एकत्र करा. पिठीसाखर घाला. दोन चमचे गरम तूप, साय घाला. वेलचीपावडर घालून गोळा बनवा. मग मोदकाच्या साच्यातून मोदक तयार करा.

Saturday, September 07, 2013 AT 12:00 AM (IST)

पराठे हा मूळ पदार्थ पंजाबचा आहे. नंतर तो गुजराथी- मुस्लिम लोकांकडे आला. मग महाराष्ट्रातही तो लोकप्रिय झाला. त्यात अनेक प्रकारची भर पडत गेली. विविध प्रांतांत विविध प्रकारे तो केला जातो. साधे पराठे साहित्य ः दोन वाट्या कणीक, मीठ, तूप किंवा तेल. कृती ः कणीक मीठ घालून थोडेसे मोहन (तेलाचे) घालून भिजवावी. लिंबाएवढे गोळे करून पुरीएवढे लाटून थोडेसे तेल लावून (ज्वारीच्या, तांदळाच्या पिठावर) खणासारखी घडी करावी.

Wednesday, September 04, 2013 AT 06:09 PM (IST)

पावसाळ्यात टाकळा, चंदनबटवा, नवलकोल, चवळी अशा काही रानभाज्या हमखास विकायला येतात. या भाज्यांमध्ये पोषणमूल्ये असतात- जी ऋतुमानानुसार शरीराला आवश्‍यक असतात पण अनेकांना या भाज्या कशा करतात, हेच माहीत नसते. त्यांच्यासाठी या पावसाळी भाज्यांच्या रेसिपीज.

Saturday, August 24, 2013 AT 07:13 PM (IST)

पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. त्यामुळे गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. उपलब्ध भाज्यांपासून तयार होणारे पॅटिस किंवा कटलेट गरमागरमच सर्व्ह केले जातात. स्टार्टर म्हणून किंवा सकाळ-संध्याकाळचा नाश्‍ता म्हणून हे खमंग पदार्थ करायला काहीच हरकत नाही. मकई पॅटिस साहित्य ः दोन वाट्या स्वीटकॉर्न दाणे, दोन बटाटे, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार लिंबूरस, मीठ, साखर. कृती ः बटाटे व कणसाचे दाणे उकडून घ्या.

Saturday, August 10, 2013 AT 06:20 PM (IST)

पावसाळ्यात गरम गरम कढी, सार, रस्सम असे खाद्यप्रकार चवीने खाल्ले जातात. भात, पोळी, भाकरी या सगळ्यांबरोबर ते छान लागतात. यंदाच्या पावसाळ्यात असे काही पातळ पदार्थ करून पाहायला हरकत नाही.

Saturday, July 20, 2013 AT 12:00 AM (IST)

आषाढी एकादशीला उपवास करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मराठी पंचांगानुसार एका वर्षात 24 एकादशी येतात. तीन वर्षांनंतर येणाऱ्या अधिक महिन्यात एक एकादशी वाढते. धार्मिकदृष्ट्या एकादशीला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व वैज्ञानिकदृष्ट्याही आहे. या काळात पृथ्वीभोवती झिरो-जी-बेल्ट असतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण कमी असते. यामुळे पचनक्रिया मंद होते. या काळात उपवास केल्याने इंद्रियांची क्षमता वाढते.

Saturday, July 13, 2013 AT 05:24 PM (IST)

मुलांना उन्हाळ्याची सुटी लागली की सतत नवीन काहीतरी खाऊ हवा असतो. एरवी वेळेच्या गणितामध्ये न बसणाऱ्या पदार्थांची अशा वेळी हमखास "डिमांड' होते. केक हा त्यापैकीच एक पदार्थ. मुलांच्या पार्टीसाठी त्यांना आवडतील अशा काही केक्‍सच्या रेसिपीज.   स्ट्रॉबेरी डेट्‌स केक साहित्य ः दीडशे ग्रॅम खजुराचे तुकडे, अडीचशे ग्रॅम मैदा, 200 ग्रॅम वितळलेले लोणी, 180 ग्रॅम दही, 180 ग्रॅम साखर, एक लहान चमचा बेकिंग पावडर. आयसिंगसाठी ः दीडशे मि.लि.

Tuesday, May 14, 2013 AT 07:58 PM (IST)

भारतीय संस्कृतीत सण आणि त्यानिमित्त बनवले जाणारे पदार्थ यांची चपखल सांगड घातली गेलेली दिसते. ऋतुबदलांच्या सांध्यांवर येणारे सण आणि त्यासाठी बनवले जाणारे पदार्थ हे येत्या ऋतूत काय खायला हवे याची रुजवात करून देत असतात. संक्रांतीला बाजरीची भाकरी, लोणी, लेकुरवाळी भाजी, खिचडी, गुळाची पोळी तीळ लावलेली हा मेनू काय किंवा थंडीच्या दिवसात जेव्हा पोटात भरपूर भूक लागलेली असते, अशा वेळेला येणाऱ्या दिवाळीच्या सणाला फराळाची योजना काय...

Saturday, April 06, 2013 AT 08:14 PM (IST)

सकाळचा ब्रेकफास्ट हा हवाच. त्यातून गृहिणी सर्व्हिस करणारी असली तर तिची धावपळ काही विचारूच नका. मग अशा वेळी ब्रेड, अंडी यांपासून बनवता येणारे पदार्थ कामी येतात. असे पदार्थ रंगतदार कसे करता येतील, ते पाहू. फ्राइड टोस्ट ः साहित्य ः सहा ब्रेडचे स्लाइस, अर्धा कप दूध, एक अंडे, एक कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, पाव चमचा हळद, मीठ, लोणी.

Saturday, March 02, 2013 AT 12:00 AM (IST)

थंडीच्या दिवसांत तीळ आरोग्यासाठी चांगले असतात. म्हणूनच संक्रांतीला तिळगूळ करण्याची पद्धत आहे. तिळाचे हे पौष्टिक गुणधर्म लक्षात घेता, तिळाचा वापर इतरही काही पदार्थांमध्ये करता येऊ शकतो. तिळाचा म्हैसूरपाक साहित्य ः दोन वाट्या तीळ, दीड वाटी साखर, तीन वाट्या तूप. कृती ः तीळ खमंग भाजून त्याची पूड करा. साखरेत पाव वाटी पाणी घालून पाक करायला ठेवा. एकतारी पाक करा. एकीकडे तूप गरम करायला ठेवा.

Saturday, January 12, 2013 AT 08:45 PM (IST)

मस्त सुखद थंडी, थंडीमुळे खवळणारी भूक आणि डोळ्यांसमोर सुंदर भाज्या आणि फळांचे ढीग! छान छान, चविष्ट पदार्थ बनवायला अजून काय कारण हवं? खरंच बाजारात ताज्या ताज्या भाज्यांचे आणि फळांचे ढीग पाहून छान काहीतरी बनवावंसं वाटतं ना? ताजे मटार, केशरी लाल गाजरं, पांढराशुभ्र फ्लॉवर, हिरव्या तरतरीत रंगाच्या पालेभाज्या, कोथिंबिरीच्या जुड्या, फ्रेश रंगांची उधळण करणारी डाळिंब, संत्री, लहानपण जागवणारी बोरं, पेरू...

Saturday, December 29, 2012 AT 12:00 AM (IST)

सोमवार लेअर पराठा साहित्य ः दोन वाट्या कणीक, एक वाटी मुगाची डाळ, दोन चमचे तांदळाची पिठी, रवा, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, जिरेपूड, अर्धा चमचा दालचिनी + लवंग पूड, कोथिंबीर, तीळ, ओवा, तेल, तूप, हळद. कृती ः मुगाची डाळ दोन तास भिजवा. कणकेत तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळद, जिरेपूड व दोन चमचे तेल घालून पाण्याने भिजवा. डाळ वाटून घ्या.

Saturday, October 27, 2012 AT 07:00 PM (IST)

पालकाची पातळभाजी, पालक पनीर अशा भाज्या तर करता येतातच पण रायता, आम्लेट, आंबोळी असे चटपटीत पदार्थही करता येऊ शकतात. पालकाचे असेच काही वेगळे पदार्थ. पालकातील रसदार वांगी साहित्य ः पाव किलो छोटी वांगी, एक जुडी पालक, अर्धी वाटी नारळाचा चव, 10-12 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या चमचाभर लिंबाचा रस, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, तेल, कोथिंबीर, जिरे, हळद, साखर. कृती ः वांग्याचे देठ काढून मधोमध चिर द्यावी. पालक निवडून धुऊन चिरून घ्यावा.

Saturday, October 20, 2012 AT 04:43 PM (IST)

गव्हल्याची खीर, शेवयाची खीर, रव्याची खीर...खिरीचे यापेक्षा वेगळे प्रकार माहीत आहेत? नाही ना? पण खिरींचे पुष्कळ प्रकार आहेत. खीर आवडणाऱ्यांसाठी या काही वेगळ्या खिरी. चिकू वॉलनट खीर साहित्य ः दोन चिकू, अर्धा लिटर आटवलेले दूध, चार-पाच चमचे साखर, पाव वाटी अक्रोड, दोन चमचे तांदूळ, अर्धा चमचा तूप. कृती ः कढईत अर्धा चमचा तूप घेऊन त्यात दोन चमचे धुतलेले तांदूळ घालावेत. जरा परतून मग त्यात पाऊण लिटरचे आटवून अर्धा लिटर केलेले दूध घालावे.

Saturday, September 22, 2012 AT 06:34 PM (IST)

गणेश चतुर्थीला प्रथेप्रमाणे उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. त्याव्यतिरिक्त रोज वेगळा नैवेद्य काय दाखवायचा असा प्रश्‍न पडू शकतो. त्यासाठीच नैवेद्याच्या काही वेगळ्या पाककृती.   उकडीचे मोदक साहित्य ः दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन वाट्या पाणी, चिमूटभर मीठ, दोन चमचे तूप. सारणासाठी ः दोन वाट्या साखर किंवा गूळ, एक खवलेला नारळ, पाव वाटी खसखस, वेलदोड्याची पूड. कृती ः खोवलेले खोबरे, साखर किंवा गूळ एकत्र करून शिजवावे.

Saturday, September 15, 2012 AT 12:00 AM (IST)

दुधी भोपळ्याच्या भाजीला नाके मुरडणारेच अनेक जण असतात, पण ही गुणकारी भाजी निरनिराळ्या प्रकारांनी बनवून चविष्ट करता येते. दुधी भोपळ्याच्या भाजीचेच काही वेगळे प्रकार. दुधी भोपळ्याची भाजी मनापासून आवडणारी माणसे अगदीच कमी. सर्वसाधारणपणे ही भाजी म्हणजे आजाऱ्यासाठी करायची पथ्याची भाजी असे समजले जाते. म्हणूनच तिला थोडा नवा साज चढवला तर ती खाल्ली जाण्याची शक्‍यता नक्कीच वाढेल. आपल्या आहारात ही भाजी असायला हवी, कारण ती अतिशय गुणवान भाजी आहे.

Tuesday, September 11, 2012 AT 05:11 PM (IST)

रमजानचा पवित्र महिना संपतो त्या ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मीयांचे रोझे अर्थात उपवास संपतात. या दिवशी त्यांचे काही पारंपरिक पदार्थ केले जातात. शीर कुर्मा हा त्यापैकीच एक. असेच काही पारंपरिक चविष्ट पाककृती खास रमजान ईदनिमित्त.

Saturday, August 18, 2012 AT 05:37 PM (IST)

धिरडे हा आपला पदार्थ दाक्षिणात्य डोशासदृश असला तरी वेगळा आहे. यात आंबवण्याची कृती नसून, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक वा तांदळाचे पीठ वा ज्वारीचे पीठ घेतले जाई व पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही.

Saturday, August 11, 2012 AT 06:42 PM (IST)

श्रावण महिना हा उपवासांचा महिना. आपले उपवास म्हणजे खरे तर मेजवानीच असते. उपवास याचा मूळ अर्थ पोटाला विश्रांती असा असला, तरी आपण मात्र उपास म्हणजे जेवणात बदल असाच करतो. मग साबूदाणा, शेंगदाणे, रताळी, वरीचे तांदूळ या सर्वसाधारणपणे उपासाला चालणाऱ्या पदार्थांपासून अनेक चविष्ट पाककृती केल्या जातात. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वडे, भजी, ढोकळे, केक, पुऱ्या केल्या जातात. फक्त त्यासाठी कच्चा माल वापरला जातो तो उपवासासाठी चालणाऱ्या पदार्थांचा.

Saturday, August 04, 2012 AT 08:52 PM (IST)

पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे पदार्थ खाणे टाळले जाते पण चाट हा प्रकार असा आहे, की जो आवर्जून बाहेरच खाल्ला जातो. मग असे चाट घरीच केले तर? कितीही खा आणि पोटाची चिंताही करू नका! भेळ, पाणीपुरी, चाट ही नावे उच्चारली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते कारण हे पदार्थ लहानथोर सर्वांनाच प्रिय आहेत. उत्तर भारतात सामोसे, कचोरी, पाणीपुरी वगैरे सर्वच पदार्थ चाट या नावाखाली मोडतात.

Saturday, July 14, 2012 AT 12:00 AM (IST)

पावसात भिजून घरी आल्यावर काहीतरी गरमागरम पोटात जावे अशी इच्छा असते. टेस्टी आणि कलरफुल सूप्स पोटाची आणि जिभेची गरज नक्की भागवू शकतात. यंदाचा पावसाळा हेल्दी आणि चिअरफुल करण्यासाठी सूप्सचे हे प्रकार करून पाहायलाच हवे. जेवणाच्या आधी सूप पिण्याची प्रथा आपल्याकडे आता रुजली आहे मात्र जिथून ही पद्धत आपल्याकडे आली, त्या पाश्‍चात्त्य देशांमध्ये सूप म्हणजे तोंडीलावणे नसते, तर कधी कधी ते संपूर्ण जेवणच असते.

Saturday, July 07, 2012 AT 05:44 PM (IST)

कर्नाटकात तांदूळ व खोबऱ्याचा वापर अधिक केला जातो. सकाळच्या न्याहारीलासुद्धा तांदळाचा रवा, खोबऱ्याचा कीस यांचा वापर करूनच पदार्थ बनविले जातात. असेच काही तांदळाच्या रव्याचे रुचकर पदार्थ.   लाल भोपळ्याचे थालिपीठ साहित्य ः दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, एक वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी तांदळाचा रवा, चार हिरव्या मिरच्या वाटून, कोथिंबीर, मीठ, तेल. कृती ः - तेलाशिवाय सर्व साहित्य एकत्र करून जरुरीपुरते पाणी घालून कालवून घ्यावे.

Saturday, June 30, 2012 AT 12:00 AM (IST)

रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून मग वेगवेगळे मसाले वापरून चटकदार भरल्या भाज्या अधूनमधून बनविल्या, की घरची मंडळी खूष! या भाज्या अर्थातच फळभाज्यांच्याच करतात. काही फळभाज्या लोकांना आवडत नाहीत पण भरली भाजी मात्र असे लोकसुद्धा आवडीने खातात.

Saturday, May 26, 2012 AT 12:00 AM (IST)

जेवणाची खरी मजा चटणी आणि कोशिंबिरीसोबतच असते. कच्च्या भाज्या शरीराला पोषणमूल्य तर देतातच शिवाय कोशिंबिरीला खुसखुशीतही बनवतात. उन्हाळ्यात आवर्जून खाव्या अशा कोशिंबिरींच्या रेसिपीज. जेवणात कोशिंबीर असायलाच हवी हे सांगायला आता आहारतज्ज्ञांची गरज राहिलेली नाही. फक्‍त हल्ली कोशिंबिरीला सॅलड म्हणायची प्रथा आहे. सॅलड आणि कोशिंबीर यांचा आत्मा एकच असला तरी करण्याची पद्धत खूपच वेगळी.

Saturday, May 12, 2012 AT 12:00 AM (IST)

बाजारात आंबा यायला उशीर झाला असला, तरी कैरीने मात्र बाजारपेठांत प्रवेश केला आहे. लोणचे, मोरांबा बनवण्यासाठी तर कैरीचा वापर होतोच पण कैरीची आमटी, चटणी आणि भातही छान होतो. कैरीच्या अशा काही पारंपरिक व वेगळ्या पाककृती.

Saturday, May 05, 2012 AT 07:32 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2013 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: