|
|
|
|
संपादकीय
अभिनेता संजय दत्तचे तुरुंगापासून लांब राहण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर त्यांने अगतिक होऊन कायद्याची अपरिहार्यता स्वीकारली आणि त्याला अखेर तुरुंगात जावे लागले. गेले काही दिवस दूरचित्रवाणी वाहिन्यांना याशिवाय दुसरा कोणताही विषय नव्हता आणि आगामी काही काळ वाहिन्या याच विषयावर रेंगाळत राहतील. याच विषयाबरोबर गेले काही दिवस व्यापाऱ्यांच्या आंदोलनाने सारे राज्य अस्वस्थ आहे.
Saturday, May 18, 2013 AT 12:00 AM (IST)
पाकिस्तानी तरुंगात खितपत पडलेल्या सरबजितसिंगची अखेर क्लेशदायक झाली आहे. त्याचे ब्रेन डेड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले तेव्हाच त्याच्या मृत्यूची शंका सर्वांना आली होती. सरबजितच्या सुटकेऐवजी पाकिस्तानने त्याला मृत्यू दिला. पाकिस्तानच्या हिणकसपणामुळे सरबजितचा मृत्यू झाला आहे. त्याच्या जवळच्या नातेवाइकांना पाकिस्तान सरकारने भेटूही दिलेले नाही.
Saturday, May 04, 2013 AT 12:00 AM (IST)
लडाखमध्ये चीनने केलेली घुसखोरी आणि तेथील बदलते वातावरण यावरून आता भारत-चीन संबंधांवर पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली. अर्थात चीनची ही घुसखोरी नवी नाही. 2009 मध्ये चीनने अशीच लडाखमध्ये घुसखोरी केली होती त्या वेळी आपण तीव्र निषेधसुद्धा केला नव्हता. आता आपण निदान निषेध तरी केला आहे. 1962 च्या युद्धानंतर आपले आणि चीनचे संबंध दुरावले गेले आहेत. त्या वेळी निर्माण झालेली दरी आजही तशीच आहे. अर्थात यासाठी भारताला जबाबदार धरता येणार नाही.
Saturday, April 27, 2013 AT 12:00 AM (IST)
राज्याचा कारभार पाहणाऱ्यांनी लोकभावनांची कदर करायची असते मात्र राज्यकर्तेच भावनांशी खेळू लागले तर जनमानस दुखावल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दुष्काळाच्या संदर्भात केलेले वक्तव्य असेच लोकभावना दुखावणारे आहे.
Saturday, April 20, 2013 AT 01:14 PM (IST)
मुंब्रा इमारत दुर्घटनेच्या मृतांची संख्या 75 वर गेल्यानंतर नेटिझन्सपासून ते सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा उद्रेक अनावर झाला. वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर बांधकाम व्यावसायिकांपासून ते सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी या सर्वांना इंटरनेटवरून शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या गेल्या.
Sunday, April 14, 2013 AT 06:26 PM (IST)
महाराष्ट्रात वेगवेगळ्या संपांचा सिलसिला सातत्याने सुरू असतो. एलबीटीच्या प्रश्नावरून सुरू असलेला व्यापाऱ्यांचा बंद, प्राध्यापकांचा संप असे काही काही ना सुरू असते. आज राज्यात वारंवार इतके बंद होतात की सामान्य माणसाने कुठे जायचे अशा प्रश्न आहे. रोजीरोटीच्या लढाईत त्याचे प्रापंचिक ताण असंख्य असतात. या ताणांवर उतारा म्हणून विविध सणांच्या निमित्ताने तो स्वतःच उपाययोजना करत असतो.
Saturday, April 06, 2013 AT 07:22 PM (IST)
जागतिक महिलादिन जवळ आला असताना, एका शिक्षिकेने प्राथमिक शाळेतील एका मुलीला पाचशे उठाबशांची शिक्षा दिली. मालवणमध्ये विद्येच्या प्रांगणात घडलेली ही घटना अस्वस्थ करणारी आहे. "छडी लागे छम छम विद्या येई घमघम' ही म्हण तत्त्व म्हणून मान्य केली, तरी आता छडी मारण्याचे दिवस कायद्याने संपले आहेत आणि शिक्षा देऊन शिकविण्याचा जमानाही कालबाह्य झाला आहे. अशा काळात एका मुलीला अन् तेही एका शिक्षिकेने पाचशे उठाबशांची शिक्षा देण्याचा प्रकार अघोरीच म्हणावा लागेल.
Saturday, March 09, 2013 AT 01:50 PM (IST)
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की, राजकारण्यांची भाषा व बोली कमालीची बदलते. वागण्यात तर इतका फरक पडतो, की समोरच्याला अरे, आपले नेते असे का वागायला लागले याचा प्रश्न पडावा. नेत्यांचा या वर्तन व्यवहाराचे प्रतिबिंब सरकार चालविण्याच्या पद्धतीवरही पडते. निवडून आल्यावर सरकार जेव्हा स्थिरस्थावर होते, त्या वेळची त्यांची भाषा व धोरणेही एकदम कडक असतात. नेत्यांनी इस्त्री केलेल्या कपड्यांसारखीच.. घडी मोडता मोडत नाही.
Saturday, March 02, 2013 AT 12:00 AM (IST)
सध्या दुष्काळाचा दाह सर्वांना होरपळून टाकतो आहे. केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर एरव्ही पाण्याने समृद्ध राहणाऱ्या नाशिक-नगरसारख्या जलसंपन्न जिल्ह्यांबरोबरच राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळाच्या झळांचे चटके बसताहेत. सर्वांना "त्राही माम' करायला लावताहेत. एका बाजूला पाणीटंचाई व दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असतानाच लग्नांचा हंगामही जोरात सुरू आहे.
Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)
कोणत्याही घरातली स्वयंपाकाची जागा हे त्या घराच्या संपूर्ण आरोग्याचं, जीवनशैलीचं शक्तिस्थळ असते. ते स्वयंपाकघरच जर घाणेरडं असेल, तर त्याचा परिणाम घरातल्या माणसांच्या थेट आरोग्यावरच होतो, हे सांगायला कसल्याही संशोधनाची गरज नाही. स्वयंपाकघराची स्वच्छता हा अत्यंत आवश्यक व घराच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्यक्रमाचा विषय असतो. भारतीय वैद्यकीय अकादमीच्या (आयएमए) नव्या सर्वेक्षणाने घराच्या स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आणला आहे.
Sunday, February 17, 2013 AT 06:49 PM (IST)
सामान्य माणूस रोजीरोटीच्या लढाईत मेटाकुटीस येतो. भाकरीची भूक भागविण्यासाठी तो सारं जगणं पणाला लावतो. त्याची स्वप्नं भाकरीभोवतीच फिरतात. करायचं खूप असतं. स्वप्नांचे इमलेसुद्धा खूप असतात. लौकीक अर्थानं ज्याला प्रगती म्हणतात, ती व्हावी म्हणून प्रत्येकजण अखंड धडपडत असतो. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर रोज नवी स्वप्नं जन्माला येतात. मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक रात्रीचा अंधार पुढं सरकताना पुन्हा स्वप्नंच पुढं जातात.
Saturday, February 09, 2013 AT 01:46 PM (IST)
पुरंदर तालुक्यातील थापेवाडी गावात एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बक्षिसाच्या नावाखाली मद्यधुंद लोकांनी केलेली "दौलतजादा' शिक्षण क्षेत्राला व महिलांच्या सन्मानाला धक्का पोचवणारी आहे. मुळात शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मद्यधुंद लोक आलेच कसे, याची चौकशी व्हायला हवी. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक आहे.
Saturday, February 02, 2013 AT 12:00 AM (IST)
अलीकडच्या काळात फोफावलेले बुवा, बाबा किती बेताल होऊ शकतात याचा लाइव्ह टेलिकास्ट आसाराम बापू यांनी केला आहे. नवी दिल्लीत बलात्काराची बळी ठरलेल्या मुलीसंदर्भात अजब विधाने करून या बापूंनी आपल्यातील "बाप' नव्हे तर स्त्रीकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन दाखवून दिला आहे. बलात्कारानंतर संबंधित तरुणीविषयी देशभरातून हळहळ व्यक्त झाली. तिच्या नातेवाइकांच्या दुःख-वेदना साऱ्या देशवासीयांना आपल्याच वाटल्या.
Saturday, January 12, 2013 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्लीतील बलात्कारपीडित तरुणीचा करुण अंत झाल्यावर देशभरात भावनांचा उद्रेक होतो आहे. त्या तरुणीची तेरा दिवस मृत्यूशी झुंज सुरू असतानाही देशभरात जे पडसाद उमटले ते संवेदनशील सामान्य माणसाचं उत्स्फूर्तपणे व्यक्त होणंच होतं. मात्र जाता जाता त्या बलात्कारपीडित तरुणीनं जो अंगार पेटवला आहे तो असा तसा विझता कामा नये.
Saturday, January 05, 2013 AT 01:14 PM (IST)
महात्मा गांधींच्या गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी सत्तेची हॅटट्रिक तर साधली आहेच, पण राज्यात भाजपला पाचव्यांदा सत्तेचा शिरोमणी प्रदान करून स्वतःचा वरचष्मादेखील सिद्ध केला आहे. एरवी भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार म्हणून मोदी कायम चर्चेत असतातच. आता नव्याने गुजरात विधानसभेत कमळ फुलवून मोदी दिल्लीवर चाल करण्यासाठी सिद्ध होताना दिसतील.
Saturday, December 22, 2012 AT 07:11 PM (IST)
पिंपरीमधील कासारवाडीतील एका चिमुकलीवर झालेला अत्याचार, पुण्यात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एका तरुणाने विद्यार्थिनीवर कोयत्याने केलेला हल्ला, डोंबिवलीत चार वर्षांच्या चिमुरडीवर रिक्षावाल्या काकाने केलेला बलात्कार, कांदिवलीत विवाहितेवर रसायन फेकून तिला लायटरने जाळण्याचा प्रयत्न... गेल्या काही दिवसांत पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या अस्वस्थ करून टाकणाऱ्या या घटना आहेत.
Saturday, December 15, 2012 AT 12:00 AM (IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर "फेसबुक'वर टिप्पणी करणाऱ्या तरुणींना अटक केलेले पोलिस आता कारवाईला सामोरे जात आहेत. ठाण्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकासह पालघरच्या निरीक्षकांवर निलंबनाची वेळ आली आहे. एरवी कोणतीही स्फोटक परिस्थिती हाताळण्याच्या गमजा मारणारे पोलिस दोन तरुणींनी भावनेच्या भरात केलेली कृती नीटपणे हाताळू शकले नाहीत.
Saturday, December 01, 2012 AT 12:00 AM (IST)
कसाबला फाशी द्यायला तुम्ही चार वर्षं का लावली, असा सडेतोड सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारला केला असता, त्याचबरोबर "चला त्यांनी एकतरी चांगलं काम केलं.. ' असा शेलक्यातलाही हाणला असता. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोबाईलद्वारे वेगवेगळे एसएमएस फिरत राहिले. काही जणांनी तर "बाळासाहेबांनी वरती'पण ठाकरी शैलीत काम करायला सुरवात केलेली दिसते.
Saturday, November 24, 2012 AT 07:09 PM (IST)
इक "राज' था जिसके लिए मैं कभी फरिश्ता था वैसे भी मेरा और उसका खून का रिश्ता था हम दोनों के बीच सियासत का रास्ता आया वह इतना बेइमान निकला हैरान हो गया हूँ मैं कैसे भूल पावू किस दौर में और कब इमान का वास्ता था.. यंदाच्या शिवसेनेच्या या आणि अशा अनेक शब्दभावना दसरा मेळाव्यानंतर मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे शिवतीर्थावर उत्स्फूर्तपणे व्यक्त होत गेल्या.
Saturday, October 27, 2012 AT 06:03 PM (IST)
शक्ती स्वरूपिणीचं नवरात्र सध्या सुरू आहे. घटस्थापनेपासूनचे नऊ दिवस साधनेचे.. उपवासाचे.. अध्यात्माचे.. मनाच्या गाभाऱ्यात जाण्याचे.. गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर येणारा नवरात्रोत्सव आता महाराष्ट्रात बहुतेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रूपात साजरा केला जातो. देवीची पूजा व घटस्थापनेची परंपरा घराघरात जपली जाते. श्रद्धा भावनेने साजरी केली जाते. या श्रद्धेत अलीकडे भावनांच्या सार्वजनिक प्रकटीकरणाचे मेगा इव्हेंट होऊ लागले आहेत.
Saturday, October 20, 2012 AT 04:07 PM (IST)
ताकाला जाऊन भांडे लपविण्याची सर्वसामान्य मानसिकता भारतीय समाजामध्ये आहे. ते हवे तर असते. पण "नको नको ना...' असं म्हणत गावाच्या गप्पा झोडायच्या आणि मग ताकावर यायचं असा वर्तन व्यवहार चाललेला असतो. भारतीय महसूल सेवेतील माजी सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करून ताक आणि भांड्याच्या मानसिकतेची भारतीय जनमानसाला आठवण करून दिली आहे.
Tuesday, October 09, 2012 AT 07:54 PM (IST)
प्रत्येक कुटुंबासाठी व कुटुंबातल्या प्रत्येकासाठी अशी ओळख निर्माण केलेल्या "सकाळ साप्ताहिका'ने आपला रौप्यमहोत्सवी टप्पा पूर्ण करून पुढच्या वाटचालीसाठी सज्जता केली आहे. 2 ऑक्टोबर 1987 ला सुरू झालेल्या सकाळ साप्ताहिकाने नियतकालिकांच्या विश्वात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. वाचकांशी विश्वासाचं अतूट नातं जपण्यासाठी या साप्ताहिकाची शब्दसाधना सुरू आहे.
Monday, October 01, 2012 AT 07:38 PM (IST)
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने गेल्या आठवड्यात जे धडाकेबाज निर्णय घेतले, त्याचे पडसाद सर्वसामान्य माणसांबरोबरच राजकीय क्षेत्रात तीव्रपणे उमटत आहेत. सहा गॅस सिलिंडरमध्ये वर्षभर घर चालवा, ही सरकारची भूमिका सामान्य माणसांना हबकून टाकणारी आहे, तर डिझेलच्या दरवाढीने महागाईचा भडका उडणार आहे मात्र ज्या पार्श्वभूमीवर डॉ.
Saturday, September 22, 2012 AT 12:00 AM (IST)
समस्त पुणेकरांसह महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांच्या श्रद्धेचा विषय असलेला गणेशोत्सव यंदा वेगवेगळे सामाजिक संदर्भ घेऊन साजरा होतो आहे.
Saturday, September 15, 2012 AT 12:00 AM (IST)
समस्त पुणेकरांसह महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांच्या श्रद्धेचा विषय असलेला गणेशोत्सव यंदा वेगवेगळे सामाजिक संदर्भ घेऊन साजरा होतो आहे.
Thursday, September 13, 2012 AT 03:24 PM (IST)
पुणे शहर पोलिस दलातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याने पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अस्वस्थ करणारी आहे. गैरहजर राहण्याच्या कारणावरून संबंधित प्रशिक्षणार्थी पोलिसाकडे त्याच्या प्रशिक्षकांनी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती, असे या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीत नोंदविण्यात आले आहे. हे आणखीनच धक्कादायक आहे. शिक्षकदिनाच्या आदल्या दिवशी एका प्रशिक्षणार्थीची झालेली अशी अखेर ही अत्यंत वेदनादायक आहे.
Saturday, September 08, 2012 AT 12:00 AM (IST)
कोळशाची काजळ"माया' कॉंग्रेसला सध्या भलतीच अडचणीत आणत आहे. संसदेत व संसदेबाहेरही कोळसा प्रकरण गाजते आहे. कोळसा खाणींच्या वाटपात केंद्र सरकार व मुख्यतः कॉंग्रेस पक्षाने 10 लाख कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार केल्याचा जो आरोप होत आहे, त्यामुळे राजकीय आखाड्यात काहूर उठले आहे.
Saturday, September 01, 2012 AT 01:19 PM (IST)
टायमिंग साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे "माहीर' आहेत. मात्र लोकभावनेच्या बरोबरच लोकजीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतःचा कार्यक्रम ठरवायला हवा आणि त्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे. असे झाल्यास मराठी माणसे त्यांना अधिक प्रतिसाद देतील. टायमिंग साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे "माहीर' आहेत.
Wednesday, August 29, 2012 AT 04:09 PM (IST)
एका बाजूला निवडणुकांचा काऊंटडाऊन आणि त्याचवेळी घटक पक्षांकडून होत असलेली कोंडी यामुळे बेजार झालेल्या कॉंग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना पुढची चाल देऊन पक्षासाठी प्रभावी खेळी केली आहे. कॉंग्रेसला आगामी निवडणुकीसाठी प्रतिमा हवी होती. तळागाळातून वर आलेले हे नेतृत्व कॉंग्रेसला संकटातून बाहेर काढण्यासाठी "सुशील' पर्याय ठरू शकते.
Saturday, August 11, 2012 AT 04:09 PM (IST)
आपले बॉस सॉलिड सेल्फ सेंटर्ड आणि सेलफिश असतात यार!... सगळं पॉलिसीमेकिंग स्वतः सेफ राहून... एखादं मिशन सक्सेसफुल झालं तर क्रेडिट घ्यायला सगळ्यात पुढं असतात... मी टीमकडून करवून घेतलं. कोण किती राबलं, कोणाचं नेमकं क्रिएशन काय होतं... कसं कॉंट्रिब्युशन मिळालं, ते नाही सांगणार वर... स्वतःचीच टिमकी वाजवत राहणार, कसं करवून घेतलं म्हणून... आणि काम फसलं तर पोरांवर खापर फोडून मोकळे...
Saturday, August 04, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|