Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
शब्दाशब्दांत एक इंग्रजी धारावाहिक पहात असताना 'the dog ran out the door' हे वाक्‍य ऐकले आणि एकदम आठवले की, असे म्हणणे चुकीचे नसले तरी आपल्याकडे आपण 'out' नंतर 'of' टाकल्याशिवाय काही राहात नाही. हा 'of' वाक्‍यात सर्रास कोणी व का वापरायला सुरवात केली कोण जाणे परंतु त्याची प्रत्येक वाक्‍यात गरज नाही, हे मात्र नक्की.

Monday, May 30, 2016 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत खूप यशस्वी काय सांगताय काय! ज्या शब्दांच्या उपयोगात आपला जरा गोंधळ होतो, अशा शब्दांमध्ये नक्कीच वर्णी लागते ती म्हणजे cell आणि battery या शब्दांची. साहजिकच हे समान अर्थी नाहीत. शास्त्रोक्तरीत्या पाहिले, तर या शब्दांमध्ये थोडासा फरक आहे. Battery म्हणजे A container consisting of one or more cells, in which chemical energy is converted into electricity and used as a source of power.

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत खूप चिडलेला काय सांगताय काय! Scale आणि ruler या शब्दांच्या उपयोगात आपल्याकडे लोकांचा थोडा गोंधळ होतो, असे माझ्या पाहण्यात आले आहे. अनेक वेळा मी मुलांना किंवा त्यांच्या पालकांना "पट्टी' या शब्दासाठी scale हा शब्द वापरताना ऐकले आहे. म्हणून या आठवड्यात scale आणि ruler या शब्दांविषयी थोडे. तर सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे, की ruler आणि scale हे समानअर्थी शब्द नव्हेत.

Monday, May 02, 2016 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत सही करणे काय सांगताय काय! आपण ज्या शब्दांचा चुकीचा उपयोग करतो, अशा शब्दांमध्ये नक्कीच वर्णी लागते, ती म्हणजे better of ची! सर्वप्रथम ध्यानात घेण्याची बाब म्हणजे, योग्य शब्द better of असा नसून better off असा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याचा अर्थ in a more desirable or advantageous position, especially in financial terms असा होतो. त्यामुळे काही लोक त्याचा better या अर्थाने जो उपयोग करतात तो चुकीचा आहे. उदा.

Monday, April 18, 2016 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! कधी कधी समजतच नाही, की इंग्रजी भाषेला आपण भारतीयांनी केलेल्या योगदाचा अभिमान वाटावा की आश्‍चर्य? सर्जनशीलतेचीही काही मर्यादा असते हो. आता बघा ना, आपण आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करतो. त्यांच्या मित्रमैत्रिणींना बोलावतो. मग ते आपल्या मुलांना Gift देतात व आपण त्यांना Return gift देतो.

Monday, March 28, 2016 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत स्वगत काय सांगताय काय! Watch a film आणि see a film यामध्ये खूप लोकांची गडबड होते, असे माझ्या लक्षात आले आहे. I watched a film last evening आणि I saw a film last evening यापैकी कोणते वाक्‍य व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे व कोणते चूक यात भल्याभल्यांचा गोंधळ होतो. तसे पाहायला गेले, तर दोन्हीही चूक नाही. ब्रिटिश व अमेरिकन लोक दोन्हीचा उपयोग एकमेकांच्या जागी करतात.

Monday, February 01, 2016 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत संदीप नूलकर, व्यावसायिक अनुवाद कंपनीचे संचालक वैवाहिक काय सांगताय काय! रेल्वेच्या प्रवासाशी निगडित काही शब्द इंग्रजीच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहेत. किंबहुना ते भारतीय इंग्रजीमधले असल्याने भारताबाहेर या शब्दांच्या उपयोगातून कोणालाही काहीही बोध होण्याची फारशी शक्‍यता नाही. रेल्वेने प्रवास करत असताना आपण Second a/c किंवा Third a/c ने प्रवास करतो, असे म्हणतो.

Monday, January 04, 2016 AT 12:00 AM (IST)

संदीप नूलकर, व्यावसायिक अनुवाद कंपनीचे संचालक लुकडा काय सांगताय काय! इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही, त्यामुळे असेल किंवा अजूनही काही कारणे असतील पण भारतीय माणसांचे इंग्रजी अगदी सरळसोपे असते. एखाद्या शब्दाचे माफकच अर्थ आपल्याला माहीत असतात. त्या शब्दांच्या विविध छटांपर्यंत आपण कधी पोचतच नाही. इतक्‍यातच कानावर पडलेल्या वाक्‍याने हे अजून प्रकर्षाने जाणवले.

Monday, December 21, 2015 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत दर्जा उदाहरण काय सांगताय काय! बोलताना व्याकरणामध्ये होणाऱ्या चुकांऐवजी उच्चारांमध्ये होणाऱ्या काही चुका या आठवड्यात आपण पाहणार आहोत. उच्चारांमधल्या चुका म्हटले, की माझ्या डोक्‍यात प्रामुख्याने दोन शब्द येतात. काहीशा जास्तच प्रमाणात ते माझ्या कानावर पडले असावेत. ते शब्द म्हणजे parents आणि message. बरेच लोक त्यांचा उच्चार मॅसेज आणि पॅरेंट्‌स असा करतात. त्यांचा योग्य उच्चार मेसेज आणि पेरेंट्‌स असा आहे.

Monday, December 07, 2015 AT 12:00 AM (IST)

गलिच्छ काय सांगताय काय! एका वाचकाने विचारलेल्या प्रश्‍नाविषयी या आठवड्यात आपण थोडे बोलू. तर प्रश्‍न असा होता, की "till' आणि "until' यात काही फरक आहे का, की दोन्ही शब्द एकच आहेत? तसे पाहायला गेले, तर till आणि until हे समान अर्थीच शब्द आहेत. परंतु, त्यांच्या उपयोगात थोडा फरक आहे. Till चा उपयोग informal, तर until चा उपयोग हा formal वाक्‍यात व जास्त करून लिहिताना केला जातो. वाक्‍याच्या सुरवातीलाही till च्याऐवजी until चाच उपयोग अधिक योग्य आहे.

Monday, November 23, 2015 AT 12:00 AM (IST)

चिवचिवाट काय सांगताय काय! विचार मराठीतून करायचा, त्यानंतर इंग्रजीमध्ये त्या वाक्‍याचे चटकन भाषांतर करायचे आणि मग ते वाक्‍य बोलायचे किंवा असे करून वर्षानुवर्षे वापरात आणलेले शब्द अथवा शब्दांच्या जोड्यांचा उपयोग करायचा... आपण अनेकदा अशा पद्धतीने इंग्रजी बोलत असतो. असे करण्यात तोटा असा असतो, की प्रत्येक वेळा आपले शब्द, शब्दांच्या जोड्या किंवा वाक्‍य बरोबर असतीलच असे नाही.

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत स्वागत कक्ष काय सांगताय काय! भारतातील इंग्रजी बोलणाऱ्या असंख्य आया आपल्या तान्ह्या मुलांबरोबर काही तरी भयानक करत असाव्यात, असा एखाद्या पाश्‍चात्य देशात राहणाऱ्या माणसाचा गैरसमज झाला, तर नवल नसावे. पण मला सांगा, आई-वडील आपल्या पोटच्या पोराच्या जिवावर का बरे उठतील? अशक्‍यच आहे ते. मग हा विषय आला तरी कुठून? त्याचे असे आहे, की आपण कधी कधी असे इंग्रजी बोलतो की आपल्याला म्हणायचे असते एक आणि अर्थ होतो भलताच.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

शब्दाशब्दांत चाहता काय सांगताय काय! "पण लेका, तू नक्की येणार ना?' खात्री करण्यासाठी मी मित्राला विचारले. क्षणाचाही विलंब न करता मित्र चटकन उद्‌गारला, "होरे, I will come 100%.' आता मला सांगा माणूस अर्धवट कसा येऊ शकेल? आला तर पूर्णच येईल ना! त्याचे असे आहे, मराठी बोलताना आपण सहज, "हो, मी 100% येईन,' असे म्हणून जातो. अर्थात आपण "100%' हे adverb म्हणून वापरतो. परंतु, इंग्रजीमध्ये "100%' हे "adverb' होऊ शकत नाही.

Sunday, October 04, 2015 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! मी इंग्रजीचा जितका सखोल अभ्यास करतो तेवढे माझ्या हे लक्षात येते, की भारतीय इंग्रजीमध्ये एखादी गोष्ट कशी म्हणावी हे जरी उमजत नसले, तरी ब्रिटिश इंग्रजीमध्ये म्हणता येत नाहीत अशा गोष्टींची संख्या फारच कमी आहे. परवाच एका वाचकाने मला विचारले, की एखाद्याशी आडदांडपणे वागणे, हे इंग्रजीमध्ये कसे म्हणायचे? म्हटले बघावे, की भारतीय माणूस हे कसे म्हणेल! म्हणून ओळखीतील दोघांना विचारले.

Sunday, September 06, 2015 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! भारतीय इंग्रजीमध्ये आपण करत असलेली अजून एक चूक या आठवड्यात आपण पाहू या. समजा तुम्ही कोणाला विचारले, How was the response to the music festival this year? तर असे उत्तर मिळू शकते, The response was good but there were less people as compared to the last year. 'Less' आणि 'fewer' हा गोंधळ फार जुना आहे व अद्याप न उलगडलेल्या कोड्यासारखा आहे. खोलात शिरलात तर या शब्दांच्या उपयोगाबाबत अनेक नियम, उपनियम व अपवाद सापडतील.

Wednesday, February 05, 2014 AT 05:24 PM (IST)

काय सांगताय काय! Are you growing your hair आणि Are you growing your hair out? केस वाढवण्याच्या बाबतीत 'to grow' या क्रियापदाचे असे दोन उपयोग ऐकले आणि त्याबद्दल खुलासा करायचे ठरवले. मग लंडन येथील आमच्या बिट्‌सच्या कार्यालयात काम करणाऱ्या ब्रिटिशबाईंनाच विचारले. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण असे 'to grow' हे काही विशिष्ट गोष्टींशी संबंधित असते. समजा, तुम्ही तुमचे केस पर्म केले असतील तर तुम्ही म्हणू शकाल, की I don't like my perm anymore.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! आमच्या लहानपणापासून ते अगदी आजही ऐकायला येणारे 'time please' म्हणजे नक्की काय असावे, याचे मला कुतूहल लागून राहिले होते. लहान मुले खेळताना मधेच थांबायचे झाले, तर तळहाताच्या मागील बाजूची पापी घेऊन 'time please' असे म्हणतात. त्यातून त्यांना आपल्या इतर सवंगड्यांना "थांबा' असे सांगायचे असते. मात्र याचा असा वापर मूळ इंग्रजीमध्ये होत नाही.

Saturday, August 10, 2013 AT 07:50 PM (IST)

काय सांगताय काय! भाषेत करिअर करू पाहणाऱ्या बऱ्याच जणांना मी मार्गदर्शन करीत असतो. अशाच एका मार्गदर्शन सत्रासाठी एक मुलगी व तिचे वडील गेल्या आठवड्यात माझ्याकडे आले होते. फ्रेंचच्या पेपरात किती मार्क पडले, असे मी मुलीला विचारले. तिने चटकन उत्तर दिले, "फ्रेंचमध्ये ना, मला out of होते.' 'Out of'चा वापर "पैकीच्या पैकी' मार्क मिळाले हे सांगण्यासाठी केलेला ऐकण्याची माझी काही ही पहिली वेळ नव्हती.

Saturday, April 20, 2013 AT 05:02 PM (IST)

काय सांगताय काय! भारतीय इंग्रजीमध्ये आढळणाऱ्या एका गोष्टीबद्दल मी या आठवड्यात तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल मला कळले तेव्हा मलाही खूप आश्‍चर्य वाटले. काही शब्द आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात इतक्‍या वेळेला वापरतो, की आपल्याला त्यात काहीच वेगळे वाटत नाही. एका ब्रिटिश व्यक्तीने मला सांगितले, की भारतीय लोक मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना "ते expire झाले' असे म्हणतात हे काही तितकेसे बरोबर नाही.

Saturday, March 16, 2013 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय ! भारतीय इंग्रजीमध्ये आढळणारी आणखी एक चूक म्हणजे 'back' या शब्दाचा चुकीच्या ठिकाणी केलेला वापर. The last time I saw him was when he visited Pune 10 years back किंवा Oh! That was a long time back अशा वाक्‍यांमध्ये 'back'चा वापर अयोग्य आहे. तिथे 'ago' वापरणे अधिक योग्य ठरेल. The last time I saw him was when he visited Pune 10 years ago किंवा Oh! That was a long time ago. थोडक्‍यात, "वेळे'च्या संदर्भात बोलताना 'back' वापरावे.

Wednesday, March 13, 2013 AT 04:15 PM (IST)

काय सांगताय काय! Had you ordered for a chicken pizza or for a paneer chilli pizza? दारावर आलेल्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयने मला विचारले. 'Order' नंतर 'for' वापरताना ऐकण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती. भारतीयांच्या prepositions विषयी असलेल्या गोंधळाची उदाहरणे आपण याआधी पाहिलेली आहेतच. 'Order for' ही त्यातच पडलेली एक भर. वास्तविक, 'order' नंतर 'for' या 'preposition'ची गरजच नसते.

Saturday, February 23, 2013 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! आपल्या ओळखीचे कोणी रुग्णालयात असेल, विशेषतः "आयसीयू'मध्ये वगैरे असेल, तर आपल्या सगळ्यांनाच, "माझा मित्र खूप serious आहे. He is in the ICU' अशा आशयाचे काहीतरी म्हणण्याची सवय असते. अशा प्रकारच्या वाक्‍यांमध्ये बाकी काही चूक नसली तरी 'serious'चा वापर मात्र साफ चुकीचा आहे. आपण जेव्हा, "माझा मित्र खूप serious आहे,' असे म्हणतो तेव्हा आपल्याला खरेतर 'My friend's condition is very serious' असे म्हणायचे असते.

Sunday, February 17, 2013 AT 06:55 PM (IST)

संपादकांना सूचना- Blow (noun) - A stroke with the.......... fist...........or other weapon, ठोसा. fist या शब्दाबद्दल खात्री करावी. - प्रूफरीडर ............................................................................ शब्दाशब्दांत संदीप नूलकर - व्यावसायिक अनुवाद कंपनीचे संचालक स्वप्नात रमणे काय सांगताय काय ! 'Sure shot' असे म्हणण्याची काही लोकांना सवय असते. "तो येईल असे वाटते का रे तुला?' "हो. काळजी करू नकोस.

Saturday, February 09, 2013 AT 02:02 PM (IST)

काय सांगताय काय! भारतीय इंग्रजीमधील चुकांबद्दल प्रत्येक आठवड्याला लिहिताना कराव्या लागणाऱ्या संशोधनामुळे मला कधीकधी बरोबर असलेले शब्द किंवा वाक्‌प्रचारांचीही शंका येऊ लागते. माझ्या बाबतीत नुकतेच असे घडल्याने मनात विचार आला, की माझ्या वाचकांचेही असेच होत असेल काय? म्हणून या आठवड्यापासून अधूनमधून, एखाद्या वेळी चूक वाटले तरी बरोबर असलेले शब्द किंवा वाक्‌प्रचारांची ओळख करून देणार आहे.

Saturday, January 12, 2013 AT 02:34 PM (IST)

काय सांगताय काय ! ज्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाषेने क्रियापदे दिली आहेत तिथे उगाच नामाचा वापर करणे हीसुद्धा इंग्रजी बोलताना भारतीयांना असलेली एक चुकीची सवय आहे. आता Don't tell lies!  किंवा Don't give bad words!  किंवा He put emphasis on  हीच वाक्‍ये पाहा ना. येथे tell  किंवा give  किंवा put  या शब्दांची खरेतर अजिबातच गरज नाही.

Saturday, January 05, 2013 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय ! Prepositions आणि भारतीय लोक यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. त्याबाबतीतील उदाहरणे मी याआधीच्या लेखांमधून दिलेली आहेतच. या लेखात पाहूया Prepositionsची अशीच अजून एक चूक. Where is the bank located? The bank is located near to my house. उत्तरातील 'to' चुकीचा आहे व तो वापरण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. तो 'to' न वापरल्याने कितीही चुकल्याचुकल्यासारखे झाले तरी तो मोह आवरा.

Saturday, December 29, 2012 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय ! जे लोक आपल्या मते उत्कृष्ट इंग्रजी बोलतात, अशा लोकांच्या तोंडी आणि तेही तरुणांच्या तोंडी आपण 'he was like'  किंवा "she was like'  अशी वाक्‍यरचना ऐकली असतील. "I asked her if she wanted to join us for a movie and she was like, no, I can't. I have to study.'  ऐकताना हे कितीही स्टायलिश वाटले, तरी व्याकरणाच्या दृष्टाने हे काहीसे चूकच आहे.

Saturday, December 01, 2012 AT 12:00 AM (IST)

काय सांगताय काय! अझहरुद्दीन या क्रिकेटपटूची एक सवय होती, की तो इंग्रजी बोलताना जवळपास प्रत्येक वाक्‍याची सुरवात You know असे म्हणून करायचा. आपल्यातील बऱ्याच लोकांना असेच काही शब्द विनाकारण वापरण्याची सवय असते. मग तो 'actually,' 'obviously', 'generally', 'seriously' किंवा अजून कुठला शब्द असो. आपण भारतीय लोक इंग्रजी बोलताना असे बरेच शब्द वापरत असतो.

Saturday, October 20, 2012 AT 04:29 PM (IST)

काय सांगताय काय! भारतीय इंग्रजीमधील ज्या चुकीबद्दल आपण या वेळी बोलणार आहोत, त्या चुकीबद्दल माझी दोन मते आहेत. 'He is my cousin brother' असे म्हणणे जरी इंग्रजीमध्ये चुकीचे असले, तरी संदर्भावरून 'cousin', "हा' आहे, की "ही' आहे हे ओळखणाऱ्या ब्रिटिशांनी माझ्या मते भारतीय इंग्रजीकडून 'cousin brother' या शब्दाची भेट स्वीकारावी. परंतु, जोपर्यंत ब्रिटिश असे करत नाहीत तोपर्यंत मात्र आपण 'cousin' या शब्दानंतर 'brother' किंवा 'sister' हा शब्द वापरू नये.

Tuesday, October 09, 2012 AT 07:37 PM (IST)

काय सांगताय काय ! कोणाची उंची किती आहे व त्यात किती वाढ होत आहे, हा विषय आमच्या लहानपणी नेहमीच चर्चेचा असायचा. त्या वेळेला खूप ऐकिवात असलेला असा एक शब्द काही दिवसांपूर्वी परत एकदा कानावर पडला आणि लहानपण व भारतीय इंग्रजीमधील चुका याची एकत्रच आठवण झाली. "अरे, तो कसला हाईटेड आहे' हे वाक्‍य परत एकदा ऐकले.

Saturday, August 18, 2012 AT 06:42 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: