Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
ई-मेलचा वाढता वापर लक्षात घेऊन गुगलने आपल्या जी-मेल सेवेचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरविले आहे. "इनबॉक्‍स' नावाची नवी सेवा गुगलने सुरू केली आहे. ही सेवा लोकप्रिय झाल्यास जी-मेल हा शब्दच "इनबॉक्‍स' नावाने ओळखला जाईल. गुगलने 22 ऑक्‍टोबरला "इनबॉक्‍स' या आपल्या नवीन ऍपची घोषणा करून ई-मेलचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असल्याचे दाखवून दिले.

Tuesday, November 04, 2014 AT 07:47 PM (IST)

शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव्ह जेकबसन आणि न्यू मेक्‍सिको विद्यापीठाच्या ब्रॅंडन श्‍मन्ड या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात सध्या दिसत असलेल्या महासागरांपेक्षाही तिप्पट पाणी पृथ्वीच्या भूगर्भात दडलेले असल्याचे आढळून आले आहे. पाण्याची सर्वसाधारणत: तीन रूपे आपल्याला माहीत आहेत, ती म्हणजे बर्फ, बाष्प आणि द्रवरूप पाणी परंतु भूगर्भातील हे पाणी मात्र एका वेगळ्याच रूपात आहे. हे पाणी जमिनीच्या अंदाजे चारशे मैल खाली आहे.

Saturday, June 28, 2014 AT 04:19 PM (IST)

मानवी भावना ओळखू शकणारा रोबो येत्या काही वर्षांत बाजारात दाखल होतो आहे. भविष्यात हा रोबो माणसाच्या सुख-दुःखातील महत्त्वाचा साथी ठरेल, असा विश्‍वास शास्त्रज्ञ करत आहेत. मानवी भावभावना ओळखू शकणारा हा रोबो कसा आहे. जपानच्या सॉफ्टबॅंक कंपनीने अलीकडेच आपला "पेप्पर' नावाचा रोबोचे प्रात्यक्षिक जगाला दाखवले. या रोबोला चक्क मानवी भावना समजतात. त्याच्याशी बोलत असणाऱ्या माणसाच्या आवाजाच्या चढ उतारावरून तो माणून दु:खी आहे, की आनंदी हे हा रोबो ओळखू शकतो.

Tuesday, June 24, 2014 AT 04:19 PM (IST)

अमेरिकन पत्रकारितेच्या जगात पुलित्झर पुरस्कार सर्वाधिक मानाचा मानला जातो. समितीने सर्वाधिक महत्त्वाचा-लोकहिताच्या पत्रकारितेकरता असलेला हा पुलित्झर पुरस्कार गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकांना देऊन पुन्हा एकदा गदारोळ उडवला आहे. सरकार आणि लोकांमध्ये सुरक्षा व खाजगीपणाच्या दृष्टिकोनातून काय संबंध असावेत, याची समाजामध्ये चर्चा सुरू झाली आहे, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात अमेरिकेत प्रचंड खळबळ उडालेली होती.

Saturday, April 26, 2014 AT 12:00 AM (IST)

आपले काम दुसऱ्याने करावे, ही माणसाची सहजप्रवृत्ती. या प्रवृत्तीतूनच रोबो नावाचे यंत्र माणसाने निर्माण केले. घरातील साफसफाई करण्यासाठी रुंबा नावाचा रोबो एका कंपनीने तयार केला आहे. या रोबोबद्दल - रोबोंना घरी काम करायला लावायचं स्वप्न मानव फार पूर्वीपासूनच पाहत आला आहे. मानवाचं हे स्वप्न घरची साफसफाई करणाऱ्या रोबोनं पूर्ण केलं आहे. किंबहुना गेल्या बारा वर्षांपासून अमेरिकेत पूर्ण करत आहे.

Friday, February 14, 2014 AT 12:00 AM (IST)

मधुमेह झालेल्या व्यक्तीला वारंवार रक्तातील साखर तपासावी लागते. त्यासाठी बोटावर सुईने टोचून रक्त काढावे लागते. मात्र आता रक्तातील साखर तपासण्यासाठी शरीरातील रक्त बाहेर काढण्याची आवश्‍यकता नाही. हा त्रास वाचविण्यासाठीच रक्तविहीन ग्लुकोजमापक यंत्रे बनविण्यात आली आहेत. जगातील प्रत्येक 19 माणसांपैकी एका माणसाला मधुमेह असतो. भारतात हे प्रमाण बहुधा जास्तच असण्याची शक्‍यता आहे. आपल्या सर्वांच्या नात्यातील कुणाला तरी मधुमेह झालेला असतोच.

Wednesday, February 05, 2014 AT 05:19 PM (IST)

बल्ब म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र येतं, त्या चित्रातला बल्ब आता पुढच्या काही दिवसांमध्येच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. कारण या बल्बच्या कार्यक्षमतेवर मात केली आहे, "सीएफएल' आणि 'एलईडी' बल्ब यांनी. भविष्यात या दोन बल्बचा वापर जसजसा वाढू लागेल, तसा एक मोठा काळ उजळविलेला "बल्ब' भूतकाळाच्या अंधारात गडप होईल. 1 जानेवारी 2014 रोजी दूरगामी परिणाम करू शकेल, अशी घटना अमेरिकेत घडली.

Saturday, January 25, 2014 AT 12:00 AM (IST)

जगात अमेरिकेइतकी नौदल सज्जता अन्य कोणत्याही देशाकडे नाही. यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले ते अमेरिकन नौदलात नुकत्याच रुजू झालेल्या "झमवॉल्ट' या विनाशिकेमुळे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही जगातील सर्वांत अद्ययावत युद्धनौका आहे. ज्याप्रमाणे सध्या भारतीय प्रसारमाध्यमातून भारताच्या नवीन विमानवाहू नौकेची चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेत अमेरिकन नौदलात नुकत्याच रुजू झालेल्या "झमवॉल्ट' विनाशिकेची चर्चा होत आहे.

Saturday, December 28, 2013 AT 06:27 PM (IST)

रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी इंटरनेट आणि वायरलेस तंत्रज्ञानाचा आता उपयोग होणार आहे. आजूबाजूच्या वाहनांचा वेग, त्यांची दिशा ही गाडीत बसणाऱ्या चालकाला कळेल आणि इतर वाहनांपासून काही धोका असल्यास तसा अलार्मही मिळेल. स्वनियंत्रित कारविषयी आपण याच सदरातून माहिती घेतली होती पण त्याव्यतिरिक्तही गाड्यांच्या जगात वेगवेगळे प्रयोग जगात सुरू आहेत. इंटरनेट आणि वायरलेस संपर्कामुळे ज्या गोष्टी आपल्याला आधी शक्‍य नव्हत्या, त्या आता शक्‍य झाल्या आहेत.

Saturday, November 16, 2013 AT 12:00 AM (IST)

रस्त्यावरील गाडीला आता पंख येणार आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण रस्त्यावर चालवू शकू आणि जेव्हा हवी तेव्हा आकाशात... ही जादू प्रत्यक्षात यायला अजून थोडीच वर्षं थांबावं लागणार आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओशकोश शहरात 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2013 च्या दरम्यान "एक्‍सपरीमेंटल एअरक्राफ्ट असोसिएशनचा एअर व्हेंचर' नावाचा वार्षिक हवाई सोहळा भरविण्यात आला होता.

Saturday, October 05, 2013 AT 12:00 AM (IST)

नाशिक जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आहेत. अजंठा-सातमाळ रांग, त्र्यंबक रांग अशा डोंगररांगा अनेक किल्ल्यांनी मिळून तयार झाल्या आहेत. त्र्यंबक रांगेतील अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, भास्करगड अशा एकापेक्षा एक सरस गडांनी या परिसराची शोभा वाढविली आहे. महाराष्ट्रात सर्वांत जास्त गडकिल्ले असलेला जिल्हा म्हणजे नाशिक. सेलबारी-डोलबारी रांग, त्र्यंबक रांग, पेठ रांग, अजंठा-सातमाळ रांग, अशा विविध गटांमध्ये नाशिक जिल्ह्यातील किल्ले विभागलेले आहेत.

Saturday, September 14, 2013 AT 08:06 PM (IST)

मूत्रपिंड, यकृत, हात, पाय, त्वचा, कान यासारखे अवयव प्रयोगशाळेत तयार करण्याची प्रक्रिया विविध देशांमध्ये सुरू आहे. इतर अवयवांच्या तुलनेत मेंदूची रचना अतिशय क्‍लिष्ट आहे. त्यामुळे तो प्रयोगशाळेत करणे अत्यंत अवघड आहे. परंतु शास्त्रज्ञांनी मटाराच्या एका दाण्याच्या आकाराचा मेंदू तयार करण्यात यश मिळविले आहे. मानवाच्या शरीराचे विविध भाग प्रयोगशाळेत तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Saturday, September 14, 2013 AT 07:59 PM (IST)

फेसबुक आणि ट्‌विटरमुळे सोशल मीडिया जगतात क्रांती झाली. इथे संवाद साधण्याचे मुख्य माध्यम होते शब्द. आता त्याही पुढे जाऊन संवादाचे माध्यम थेट व्हिडिओत रूपांतरित झाले आहे. 6 सेकंदाच्या छोटाशा व्हिडिओतून तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा. हे नवीनच आव्हान सोशल मीडियासमोर आहे. व्हाइन या स्मार्टफोन ऍपमुळे ते शक्‍य झाले आहे. फेसबुक आणि ट्‌विटरने जग जिंकून आता काही वर्षे उलटून गेली आहेत.

Saturday, September 14, 2013 AT 07:56 PM (IST)

माऊस आणि की-बोर्ड या दोन गोष्टी तर संगणकावर काम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता या दोन गोष्टींत आणखी एकाची भर पडणार आहे, ती म्हणजे लीप मोशन कंट्रोलर. या उपकरणामुळे संगणकाला हवेतूनच आज्ञा देणे शक्‍य होणार आहे. 2002 मध्ये स्टिव्हन स्पिलबर्गचा "मायनॉरिटी रिपोर्ट' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात टॉम क्रूझ संगणकावरच्या फाइल हातवारे करून चाळत असे. "मायनॉरिटी रिपोर्ट' एक विज्ञानपट चित्रपट होता.

Thursday, August 22, 2013 AT 06:28 PM (IST)

सकाळी नाश्‍ता करावा की नाही, याबाबत अनेकांची अनेक मते असतात. पण काही झाले तरी सकाळचा नाश्‍ता चुकवू नये, असे आता सिद्ध झालेले आहे. "हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ'ने केलेल्या अगदी अलीकडच्या अभ्यासातही हीच गोष्ट सांगण्यात आली आहे. त्याबद्दल- सकाळी उठल्यानंतर ठराविक वेळी नाश्‍ता करणे योग्य की अयोग्य? नाश्‍त्याचे हे फॅड परदेशातून आले आहे भारतात त्याची गरज आहे का? केवळ एकदा नाश्‍ता करण्याऐवजी दिवसभरात चार वेळा थोडे थोडे खाणे चांगले आहे का?...

Saturday, August 10, 2013 AT 08:08 PM (IST)

विश्‍वाचे गूढ उकलण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणजेच जेम्स वेब ही अंतराळ दुर्बीण. ही दुर्बीण 8.83 अब्ज डॉलर रुपये खर्च करून 2018 मध्ये अवकाशात सोडण्यात येणार आहे. नासातर्फे पाठविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात जगभरातील 14 देशांचा सहभाग आहे. विश्वाचं गूढ उकलण्यासाठी मानव अक्षरश: हजारो वर्षं प्रयत्न करत आहे.

Saturday, August 10, 2013 AT 08:00 PM (IST)

मानवासारखाच दिसणारा, माणसाप्रमाणे हालचाल करणारा असिमो नावाचा यंत्रमानव होंडा कंपनीने बनविला आहे. 1986 पासून होंडा कंपनी अशा पद्धतीचा यंत्रमानव तयार करण्याच्या प्रयत्नांत होती. अखेर त्याला यश मिळाले आहे. मराठीत रोबोला यंत्रमानव म्हणतात.

Saturday, July 27, 2013 AT 12:00 AM (IST)

साउंड सिस्टिम या क्षेत्रात बोस कंपनी जगप्रसिद्ध आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. अमर गोपाल बोस यांचे नुकतेच निधन झाले. ऐकू येणारा आवाज जसाच्या तसा साउंडमधून ऐकायला आला, तरच त्याचा आनंद घेता येईल, या वेडापायी त्यांनी अनेक संशोधने केली, नवनवी उत्पादने बाजारात आणली. घराघरांत आवाजाची जादू पोचविणाऱ्या या शास्त्रज्ञाला श्रद्धांजली. आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या साऊंड सिस्टिम उपलब्ध आहेत. या सिस्टिममध्ये अनेक प्रकारचे आधुनिक स्पीकर वापरलेले असतात.

Saturday, July 20, 2013 AT 12:00 AM (IST)

इंटरनेटवर वेबसाइट्‌स पाहताना आपल्याला मधूनअधून जाहिरातीही पाहायला मिळतात. या जाहिराती आपल्या आवडीनिवडीनुसार दिसत असतात, असे म्हटले तर विश्‍वास बसणार नाही पण हे खरे आहे, आपण जे काही सर्च करतो, त्यानुसार आपली गरज काय हे ओळखून आपल्याला त्या जाहिराती दाखविल्या जातात.

Saturday, July 13, 2013 AT 12:00 AM (IST)

कोणत्याही वैमानिकाशिवाय चालणारे विमान म्हणजे ड्रोन. विविध हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशी मानवविरहित विमाने बनविण्याच्या प्रयत्नांत शास्त्रज्ञ आहेत. लष्करी वापरासाठी या ड्रोन्सचा उपयोग होतोच पण अंतर्गत सुरक्षेसाठी ड्रोन कशा पद्धतीने वापरता येतील, या संदर्भातही प्रयत्न सुरू आहेत. "युद्धस्य कथा रम्य:' असे एक संस्कृत वचन आहे. त्यातही हॉलिवूडमधल्या युद्धकथा अजूनच जास्त रम्य असतात, असे माझे मत आहे.

Saturday, July 06, 2013 AT 01:42 PM (IST)

फोनवर बराच वेळ गप्पा मारल्यावर कानाजवळचा भाग गरम होतो, हा अनुभव तास न्‌ तास गप्पा मारणाऱ्यांनी घेतला असेलच. हे घडते ते किरणोत्सर्गामुळे. मोबाईलमधल्या किरणोत्सर्गामुळे शरीरावर कोणते परिणाम याबाबत नेमके सांगता येणार नाही पण परिणाम होऊ शकतात, त्यामुळे सावध राहायला काय हरकत आहे? किरणोत्सार किंवा रेडिएशन म्हणजे अणूंनी बाहेर फेकलेली ऊर्जा होय.

Saturday, June 29, 2013 AT 09:20 PM (IST)

गेल्या 20 वर्षांत अनेक नवीन प्रकारची तंत्रज्ञाने उदयास आली आहेत. त्यातील एक अतिशय महत्त्वाचे आणि मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करण्याची ताकद असणारे तंत्रज्ञान म्हणजे जैव तंत्रज्ञान (बायोटेक्‍नॉलॉजी). या तंत्रज्ञानाची एक शाखा म्हणजे जनुक अभियांत्रिकी. या शाखेची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. डी.एन.ए. किंवा डी-ऑक्‍सिरिबोन्यूक्‍लेइक ऍसिड जवळजवळ सर्वच सजीवांमध्ये आढळते. माणसाच्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशींमध्ये डीएनए असतोच.

Saturday, June 15, 2013 AT 12:00 AM (IST)

मधमाशीच्या आकाराचा रोबो बनविण्याच्या प्रकल्पावर काही शास्त्रज्ञ सध्या काम करत आहेत. आव्हानात्मक असणारा हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या रोबोटिक माश्‍यांची फौज वापरून माणसाला जिथे पोचणे शक्‍य होणार नाही, तिथे या माश्‍या पाठवून महत्त्वपूर्ण कामे त्यांच्याकडून करून घेता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी "कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर'मुळे अमेरिकेतील मधमाश्‍यांची पोळी नाहीशी व्हायला लागली.

Tuesday, May 14, 2013 AT 07:16 PM (IST)

अमेरिकेच्या सुरक्षेबद्दल बोस्टन येथील बॉम्बस्फोटानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षा यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी अमेरिकेतील प्राध्यापक मिलिंद तांबे यांनी गेम थिअरीचा वापर करून "आर्मर' यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा भारतात वापरता येईल का, या दृष्टीने तांबे यांची मुंबई पोलिसांशीही बोलणी सुरू आहे.

Friday, May 03, 2013 AT 06:21 PM (IST)

मोबाईल फोनचा सध्याचा आवाज लवकरच बदलणार आहे. सध्या फोनवर बोलताना आपल्या आवाजाबरोबर नको ते आवाज मिसळून ते पलीकडच्या व्यक्तीला विनाकारण ऐकायला लागतात. नव्या "हाय डेफिनीशन व्हॉइस' या तंत्रज्ञानामुळे हे होणार नाही. मोबाइल फोनने गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. जुन्या प्रकारचे फोन जाऊन घराघरात स्मार्ट फोन आले आहेत. फोनवरून फोटो काढणे आता अतिशय साधी गोष्ट झाली आहे.

Saturday, April 20, 2013 AT 03:47 PM (IST)

इंटरनेटच्या उदयापासूनच डिजिटल चलनाविषयी चर्चा सुरू झाली होती. नोटा-नाण्यांऐवजी इंटरनेटवरून पैसे कसे देता येतील याबद्दल पर्याय सुचवले जात होते. डॉलर्स-रुपयापेक्षा वेगळे चलनही शोधले जात होते. पण उत्तर मिळत नव्हते. अखेर 1 नोव्हेंबर 2008 रोजी सातोशी नाकामोटो या माणसाने डिजिटल चलनाविषयी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आणि जगाला बिटकॉइन हे डिजिटल चलन मिळाले... इंटरनेटच्या उदयापासूनच लोकांमध्ये डिजिटल चलनाविषयी चर्चा सुरू झाली होती.

Saturday, April 06, 2013 AT 08:03 PM (IST)

नासा, इस्रो आणि इतर देशांतील सरकारी संस्थांमार्फतच आतापर्यंत अंतराळात जाता येत होते मात्र आता खासगी कंपन्याही या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. अमेरिकेतील "स्पेस एक्‍स' ही त्यांपैकीच एक. यापुढच्या काळात खासगी कंपन्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी वाढण्याची शक्‍यता आहे. अवकाश तंत्रज्ञान हे अतिशय कठीण आणि खार्चिक मानले जाते.

Saturday, March 23, 2013 AT 12:00 AM (IST)

संगणकाच्या "बुद्धीचा' वापर करून काय करामत घडवू शकतो, हे आयबीएमच्या वॉटसनमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कॅन्सरचा रुग्ण बरा होण्यासाठी त्याच्यावर उपचार काय करायचे, हे काम वॉटसन आता करणार आहे. वॉटसन या अनोख्या प्रणालीविषयी - "आयबीएम'चा वॉटसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "आयबीएम'ने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार वॉटसन आता डॉक्‍टरांना वेगवेगळ्या कॅन्सरची ट्रिटमेंट निवडायला मदत करणार आहे.

Saturday, March 16, 2013 AT 12:00 AM (IST)

इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट चालण्यासाठी हवे असते चार्जिंग. हे चार्जिंग होण्यासाठी वायरींचे जंजाळ सांभाळावे लागते. तसेच प्रत्येक गॅझेट्‌सचे कनेक्‍टरदेखील वेगवेगळे असतात. या त्रासातून मुक्त करण्यासाठीच आले आहेत, वायरलेस चार्जर! आपल्याला मोबाईल चार्ज करायचा असतो आणि ऑफिसात दुसऱ्याकडे कुठलातरी दुसऱ्या कंपनीचा चार्जर असतो. मग अशा वेळेला तो चार्जर चालत नाही. बहुतेक सर्वच कंपन्या आजकाल "यूएसबी चार्जर' वापरतात.

Tuesday, March 12, 2013 AT 04:56 PM (IST)

एखाद्या पानावर आपल्याला हवा तो मजकूर, हव्या त्या रंगात "प्रिंट' करता येतो, एवढेच प्रिंटरचे काम आपल्याला माहीत होते परंतु आपल्याला हवी ती वस्तू "प्रिंटर'च्या मदतीने तयार करता येणे, हे आता शक्‍य झाले आहे. प्रिंटिंग क्षेत्रातील "थ्रीडी' या नव्या क्रांतीबद्दल... अचानक एक दिवस घरी पाहुणे येतात. घरात फक्त सहाच कपबशा आहेत आणि पाहुणे आठ आहेत. मग तुम्ही आपल्या थ्रीडी प्रिंटरकडे वळता आणि उरलेल्या दोन कपबशा चक्क "प्रिंट' करता..

Saturday, February 09, 2013 AT 03:40 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2014 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: