Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
वेगळ्या वाटेने जाणारी माणसे स्वतःच्या मनाची हाक ऐकून चालू लागतात, तेव्हा यशापयशाची काळजी करत बसत नाहीत. आपल्याला जे वाटते ते जीव ओतून केले, की आपोआप समाधानाची वेगळी वाट तयार होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लघुपट दिग्दर्शक समीर शिपूरकर आणि "अवकाश निर्मिती' या संस्थेतील त्याचे सहकारी मित्र.

Saturday, April 21, 2012 AT 12:00 AM (IST)

समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी पूर्णवेळ काम करणे हे एक वेगळ्या वाटेचे करिअर होऊ शकते? त्याबद्दल विचारपूर्वक आखणी करून, भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करून, या क्षेत्रांतील लोकांशी बोलून आपल्या कार्याची दिशा ठरवणे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणे शक्‍य आहे? याचे उत्तर होय असे आहे. या उत्तरातून निर्माण झालेले एक आश्‍वासक मॉडेल मेळघाटामध्ये आता चांगले रुजले आहे. हे मॉडेल राबविणाऱ्या डॉ. आशिष आणि डॉ.

Saturday, April 14, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रत्येकामध्ये एक संशोधक दडलेला असतो पण संशोधन करायचे तर त्यासाठी उच्चशिक्षित असले पाहिजे किंवा संशोधनाच्या कामाचा पूर्वानुभव असला पाहिजे या विचाराने अनेकजण त्या वाटेला जाण्याचा विचार सोडून देतात. "पुकार' ही मुंबईतील संस्था आपल्या युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून याच संशोधकवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

डॉ. सचिन अनिल पुणेकर. वयाच्या पस्तिशीतच वनस्पतिशास्त्रात जागतिक दर्जाचे संशोधन केलेला एक निसर्गवेडा संशोधक. जैवविविधता, वनस्पती वर्गीकरण शास्त्र, वनस्पती परिस्थितीकी शास्त्र, परागीभवन शास्त्र, परागकणांवर अभ्यास, औषधी वनस्पती, वनस्पती-भौगोलिक शास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. पश्‍चिम घाटातील भटकंतीत 18 नवीन वनस्पतींच्या जातींचा शोध लावला आहे.

Thursday, March 22, 2012 AT 12:00 AM (IST)

पाळीव प्राण्यांचे लाड करायला त्यांचे मालक असतात पण रानटी प्राण्यांची काळजी कोण घेणार, या दृष्टिकोनातून डॉ. विनया जंगले यांनी पशुवैद्यकाची वेगळी वाट चोखाळली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये वाढलेल्या डॉ. विनया जंगले आज पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत महत्त्वाचे योगदान देत आहेत. मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वैद्यकीय अधिकारी या नात्याने त्या कार्यरत आहेत.

Saturday, March 17, 2012 AT 12:00 AM (IST)

उज्ज्वला आचरेकर ही अनवट वाटांचे वेड असलेली स्त्री. शहरी, सुस्थित जीवन झिडकारून त्यांनी गोव्यातील आडगावात उजाड माळरानावर नंदनवन फुलवले, तिथे आगळे पर्यटन उभे केले, स्वतःतील आणि गावातील इतर महिलांमधील उद्योजकता जागवली. एवढेच नव्हे, तर स्त्रियांचे आत्मभान जागृत करून त्यांच्या जगण्याचा परीघ वाढावा यासाठी "दिशा' हे शिबिर घेण्यास सुरवात केली. नंतर "शोध सहजीवनाचा' आणि "लग्ना, तुझा रंग कसा?' ही शिबिरेही लोकप्रिय केली.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

इथे कोणतेही तारण न ठेवता कर्ज मिळते. परस्परांवरील विश्‍वास आणि कष्ट करण्याची तयारी, हेच तारण असते. शिवाय, तुम्ही भरलेल्या व्याजाच्या रकमेतून तुमची बचतदेखील होते. भरीस भर म्हणून कर्जदाराचा विमादेखील उतरवला जातो. कष्टकरी महिलांचे जीवन उजळवून टाकणाऱ्या योजना राबविणारी ही स्वयंसेवी संस्था 19 वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहे. डॉ.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

मानसिक आजारांबद्दल आणि रुग्णांबद्दलही आपल्या समाजात समज कमी आणि गैरसमज अधिक असतात. जसा शारीरिक आजार, तसाच मानसिक आजार अशा निकोप दृष्टीने अजूनही या आजारांकडे पाहिले जात नाही. तशी दृष्टी तयार व्हावी आणि मानसिक रुग्णांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रतिष्ठेचे स्थान मिळावे, यासाठी "स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेच्या माध्यमातून अनिल वर्तक आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत आहेत.

Saturday, February 25, 2012 AT 12:00 AM (IST)

  सॉफ्टवेअर इंजिनिअर ते केंद्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य हा किशोर रिठे यांचा प्रवास अनेक चढउतारांचा आहे. निसर्गाचे शिक्षण, त्याचा अभ्यास, त्याचे संवर्धन आणि संवादांतून समस्यांचे निर्मूलन, असे पर्यावरण रक्षणाचे "मेळघाट मॉडेल'च त्यांनी उभे केले आहे. त्यांच्या "सातपुडा फाउंडेशन'चे काम आज मेळघाट, ताडोबा, अंधारी, पेंच आणि काही प्रमाणात मध्यप्रदेशातील कान्हा आणि पेंच या प्रचंड मोठ्या क्षेत्रात सुरू आहे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

लंडनच्या मादाम तुसॉं वॅक्‍स म्युझियमबद्दल आपण बरेच ऐकून असतो. जगातील एकमेवाद्वितीय काम, अशी आपल्या मनाने त्याची नोंद घेतलेली असते. जी मंडळी लंडनला जातात, ती तेथील भारतीय पुतळ्यांबरोबर फोटो-बिटो काढून घेतात पण अशी कलाकृती आपणही तयार करावी, असा विचार किती कलाकारांच्या मनात येतो? सुनील कंडल्लूर यांनी असा विचार केला, हेच त्यांचे वेगळेपण आहे.

Saturday, January 28, 2012 AT 12:00 AM (IST)

समाजातील समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था आयुष्यभर स्वतःला झोकून देतात पण कामातच सारी शक्ती खर्च झाल्याने बाहेरचा समाज, प्रसारमाध्यमे किंवा संबंधित सरकारी खाती यांच्याशी संवाद साधण्याचे कौशल्य विकसित करायला त्यांच्याकडे वेळ, मनुष्यबळ किंवा कधीकधी इच्छाशक्तीही राहात नाही. त्यातून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

Saturday, January 21, 2012 AT 12:00 AM (IST)

आपल्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण दलित म्हणजे "अनस्किल्ड लेबर' असे समीकरण आहे. गाव सोडून ही मंडळी शहरात आली तरी धुणी-भांडी, कचरा वेचणे, बिगारी-गवंडीकाम अशीच कामे त्यांच्या वाट्याला येतात. ते झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. दलितांना गावातच सन्मानाचे जीवन द्यायचे, तर त्यासाठी सशक्त आर्थिक चळवळ हवी. ती उभारली आहे मराठवाड्यात ऍड. एकनाथ आवाड यांनी. दलित, भूमिहीन महिला भागधारकांची बॅंक काढून त्यांनी दलित चळवळीला एक वेगळा आयाम दिला आहे. या आगळ्या प्रयोगाविषयी...

Saturday, December 31, 2011 AT 12:00 AM (IST)

नवी आव्हाने स्वीकारणे हेच एखाद्याच्या आयुष्याचे ध्येय असेल, तर ती व्यक्ती कधीच एका जागी थांबून- साचून राहणार नाही. यशाचे एक शिखर सर केल्यावर स्वतःकडे कौतुकाने पाहत बसण्याऐवजी अशा व्यक्तीला पुढचे आव्हान खुणावेल. हॉटेल मॅनेजमेंटमधल्या नव्या वाटा चोखाळणाऱ्या राजेंद्र केळशीकर यांचा प्रवास असाच एका आव्हानातून दुसऱ्या आव्हानाला भिडणारा आहे.

Saturday, December 24, 2011 AT 12:00 AM (IST)

"थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली ऍन्ड ऍक्‍ट लोकली' हे ब्रीद आहे ठाण्याच्या "हरियाली' या संस्थेचे! पर्यावरणाच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे काम करणाऱ्या या संस्थेने रचनात्मक कामाची वेगळी वाट चोखाळली आहे. कोणत्याही सरकारी योजना किंवा आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता केवळ श्रमदान आणि टाकाऊतून टिकाऊ या तंत्राचा वापर करीत "हरियाली'ने ठाणे व मुंबई परिसरातील पर्यावरण "जिवंत' ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येकाने आयुष्यात एक तरी झाड लावावे, असे म्हणतात.

Saturday, December 17, 2011 AT 12:00 AM (IST)

कोल्हापूर आणि परिसरातील तब्बल तीस हजार महिला आज स्वयंरोजगार, गृहउद्योग, शेती, बचतगट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. स्वतःला हतबल, परावलंबी मानणाऱ्या महिलांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या, त्या क्षमतांना ठिणगी देणाऱ्या कांचनताई परुळेकर आणि त्यांच्या स्वयंसिद्धा या संस्थेविषयी. पतीच्या अकाली निधनामुळे खचलेल्या बिस्मिल्ला मुजावर आज पर्स, पिशव्या विकून आपला संसार समर्थपणे चालवत आहेत.

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

आपला समाज निरोगी हवा आणि हे आरोग्य सर्वंकष हवे, या विचारांनी प्रेरित झालेल्या डॉ. सतीश गोगुलवार आणि त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी गडचिरोलीतील आदिवासींच्या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी वेगळ्या वाटा शोधल्या, त्याची गोष्ट.   घनदाट जंगल, आदिवासी आणि नक्षलवादी यापलीकडे गडचिरोली जिल्ह्याशी आपली ओळख नाही. त्यातल्या त्यात डॉ. अभय बंग आणि डॉ.

Saturday, December 03, 2011 AT 12:00 AM (IST)

"घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती...' असे स्वप्नातले घर कुठे असते का हो? असेलही कदाचित एक-दोन ठिकाणी पण बहुतांश घरे अशांतच असतात. भांडणतंटे व वादविवादांतून प्रेम, असेच घराचे रूप असते. तशात लहान मुले असतील, तर गदारोळ बघायला नको! दोन मुले असली तरी पालक वैतागून जाण्याच्या आजच्या स्थितीत एका घरात चक्क पन्नास मुले राहात आहेत.

Saturday, November 26, 2011 AT 12:00 AM (IST)

परदेशातल्या मिनिएचर म्युझियमप्रमाणं भारतातलं पहिलं मिनिएचर रेल्वे म्युझियम पुण्यामध्ये सुरू करण्यात आलं. लहान मुलांनीच नाही, तर मोठ्यांनीही आपले छंद जोपासावेत, यासाठी भाऊसाहेब जोशी यांच्यासारख्या हरहुन्नरी कलाकारानं या म्युझियमची संकल्पना मांडली. लोकांची गर्दी... तिकिटासाठी रांग... मग लाल सिग्नलचा हिरवा सिग्नल होतो आणि आत जाण्यासाठी गडबड उडते. आत पोचल्यावर आपल्याला एक छान सरप्राईज मिळतं.

Saturday, November 19, 2011 AT 12:00 AM (IST)

आपल्या मुलाला "सेरेब्रल पाल्सी' झाल्याचे समजले आणि नेत्रा तेंडुलकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, त्यातून त्या सावरल्या आणि मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्या काळात आपल्या मुलासारखी खूप मुले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि या विशेष मुलांसाठी त्यांनी "झेप' ही संस्था सुरू केली.

Saturday, November 12, 2011 AT 06:27 PM (IST)

घेतले ल्या ज्ञानाचा, केलेल्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा या भूमिकेतून कागद-काच-कष्टकरी पंचायतीमार्फत लक्ष्मी नारायण यांनी काम सुरू केले. या कामाने कचरावेचकांचा जगण्याचा स्तर गेल्या वीस वर्षांत निश्‍चितच उंचावला आहे. पुण्यातल्या फर्ग्युसनमधून ती बीए झाली. मग मुंबईला गेली आणि तिथं तिनं एमएसडब्लू केलं. मूळची पुण्याची म्हणून पुण्याला परत आली. तिला वाटायचं ः आपण एवढं शिकलो.

Saturday, November 05, 2011 AT 12:00 AM (IST)

अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून न्याय मिळवून देण्याबरोबरच ऍड. असीम सरोदे हे "सामाजिक परिवर्तनाचे माध्यम' म्हणून वकिली या पेशाकडे पाहतात. वकिलीच्या माध्यमातून सामाजिक समस्या कशा सोडविता येतील, यासाठी ते काम करत आहेत. ""तुम्ही माझी केस एक पैसाही न घेता लढवली, त्यावेळी मी काही देऊ शकलो नाही. मला फसवले गेले होते पण तुमच्यामुळेच मी बाहेर येऊ शकलो. आता मी भाजीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून एवढे पैसे जमले ते तुम्हाला पाठवीत आहे'...

Saturday, September 17, 2011 AT 12:00 AM (IST)

शेती म्हणजे बेभरवशाचा व्यवसाय. त्यातून किती पिकेल? पिकल्यावर भाव काय मिळेल? हे सगळेच अनिश्‍चित. पण या अनुत्तरित प्रश्‍नांवर मात करून पुण्यातील माण गावच्या ज्ञानेश्‍वर बोडके यांनी "फायद्याच्या शेती'चे गणित आखले आणि ते सिद्धही करून दाखवले. ''एऽऽ जा आमच्या पोरांना बिघडवू नको. असली कुठे शेती केलीय का कुणी? 5 गुंठ्यांत 5 लाख मिळणार म्हणतोय. आम्ही पण शेती केलीय. आख्खी हयात घालवली या मातीत पण एवढे पैसे बघितले नाही कधी.

Saturday, September 10, 2011 AT 12:00 AM (IST)

समाजापासून कायमच दूर असलेल्या वेश्‍यावस्तीतील महिलांचे आणि मुलांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी स्नेहालय ही संस्था गेल्या अकरा-बारा वर्षांपासून सोलापूर भागात काम करते आहे. दुर्लक्षित राहिलेल्या या वस्तीला स्नेहालयच्या कामामुळे आधार मिळत आहे. वेश्‍या आणि त्यांची मुले यांच्याबाबत साधारणत: समाजाची वृत्ती ही तोंड फिरवण्याची असते. हे दोन्ही घटक जीवन गाडा ढकलत असताना रोज कोणत्या अग्निदिव्यातून जात असतात, याची सामान्यांना कल्पना नसते.

Saturday, September 03, 2011 AT 12:00 AM (IST)

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या भागात प्रयत्न सुरू आहेत. अनेक व्यक्ती त्यासाठी सर्वस्व पणाला लावून काम करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी झपाटलेली अशीच एक व्यक्ती म्हणजे भाऊ काटदरे. दुर्मिळ होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालविले असून त्यांना "कासववाले भाऊ' म्हणूनच ओळखले जाते.

Saturday, August 27, 2011 AT 12:00 AM (IST)

पर्यावरण, प्राणी, पक्षी, जंगल, जमीन यांच्या रक्षणासाठी गेल्या 25 वर्षांपासून "निसर्ग मित्रमंडळ' लढा उभारत आले आहे. त्याची दखल राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत सगळ्यांना घ्यावी लागली. निसर्गाची आवड असणाऱ्या परिवर्तनवादी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या निसर्ग मित्रमंडळाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

Saturday, August 20, 2011 AT 12:00 AM (IST)

मूळ प्रश्‍नाच्या खोलात जाऊन प्रश्‍नाशी संबंधित असलेल्यांच्या मानसिकतेत बदल करायचा. त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल पण माघार घ्यायची नाही. ही समाजसेविका संध्या चौगुले यांच्या कामाची अनोखी रीत आहे. साताऱ्यातली काही गावे त्यांनी अशीच बदलली आहेत. एकेका गावाला सलग एक वर्ष, काही गावांना सलग दोन वर्ष असा संघर्ष करून त्यांनी हा बदल घडवून आणला आहे. "या पद्धतीने वेळ लागेल, होणारे बदल मात्र कायमचे असतील'' हे संध्याताईंचे म्हणणे आहे.

Saturday, August 13, 2011 AT 12:00 AM (IST)

साध्या माणसांत किती ताकद असते आणि योग्य दिशा दिली, तर ती काय करू शकतात, याचं भारावून टाकणारं उदाहरण बहादरपूरच्या नीलिमा मिश्रा यांनी निर्माण केलं आहे. कामावरील निष्ठा आणि ग्रामीण महिलांना उभं करण्याचा ध्यास या त्यांच्या चळवळीकडं "रॅमन मॅगसेसे पुरस्कार' चालत आला आहे. एम. ए. ( सायकॉलॉजी) पर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांच्या मनात खूप काही करण्याची ऊर्मी निर्माण झाली.

Saturday, August 06, 2011 AT 12:00 AM (IST)

आजही आपला जवळजवळ सत्तर टक्के समाज ग्रामीण भागात राहतो आणि त्यापैकी अनेकजण विशेषतः महिला अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत.

Saturday, July 30, 2011 AT 12:00 AM (IST)

बिहारसारख्या अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या राज्यात "सुपर 30' हा अनोखा उपक्रम सुरू आहे. गरीब घरातल्या विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी उच्च दर्जाचे मार्गदर्शन व राहण्या-खाण्याची मोफत सेवा देणारा हा उपक्रम गेल्या काही वर्षांत खूपच चर्चेत आला. हा उपक्रम सुरू करण्यामागे बिहारमधीलच एक आनंद कुमार यांची प्रेरणा आहे. "सुपर 30' हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे?-कदाचित नसेलही पण ते ऐकून 30 आकड्याशी संबंध असणारे काहीतरी, एवढीच कल्पना येते.

Saturday, July 23, 2011 AT 12:00 AM (IST)

मोहन सावळाराम ननावरे. लहानपणी खांद्यावर पोतं घेऊन कचरा वेचला. मध्येच शिक्षणाची ठेच लागली आणि पुढची वाटच बदलली. कागद-काच-पत्रा-कष्टकरी पंचायत सुरू झाली. बघता बघता कचऱ्यातून एक एक माणूस वेगळा होऊ लागला. प्रसंग एक : कधीचा ते माहीत नाही. पण कचरा वेचणाऱ्या महिला संघटित नव्हत्या, तेव्हाचाच. वेळ संध्याकाळची अंधार पडत आलेला खांद्यावर कचऱ्याचं पोतं घेऊन एक महिला आपलं शोधक काम संपवून घरी चाललेली. ती एकटी असल्याचं पाहून एक जण तिला अडवतो.

Saturday, July 16, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: