Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
पोपट आणि हल्ला घरात फर्निचर तयार करायला आलेल्या एका कारागिराला एक महिला सांगते, ""मी बाहेर जातेय तुम्ही आपले काम करत राहा, घरात मोती कुत्रा व पोपट आहे. हे दोघेही तुम्हाला त्रास देणार नाहीत. कुत्रा चांगला आहे पण पोपट जे काही बोलेल त्याकडे दुर्लक्ष करा तो खूप धोकादायक आहे.'' कारागीर काम करत राहतो. मोती कुत्रा खरेच त्रास देत नाही. पण पोपट मात्र त्या कारागिराला सतत शिव्या देत असतो.

Friday, April 13, 2012 AT 12:00 AM (IST)

जाहिरात अशीही विमा कंपनीच्या कार्यालयात स्वागत कक्षात नेमणूक असलेला एक कर्मचारी सतत झोपी जात असे. सहकाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी त्याला झोप आवरत नसे. अखेरीस व्यवस्थापकांनी त्याच्या टेबलवर फलक लिहिला, "तुम्हाला अशी निवांत झोप हवी असेल, तर आमच्याकडे विमा उतरवा.'   ...तर काय होईल एका छोट्या राष्ट्रातील नागरिकांची बैठक झाली. आपला देश सुधारण्यासाठी काय करावे, यावर दीर्घ काळ चर्चा झाली.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

मी ओळखले नाही! मध्यम वयाच्या आशाबाईंना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्‍टरांनी काही काळ उपचार केल्यानंतर त्या देवाची प्रार्थना करू लागल्या. देव प्रसन्न झाला. देवाने आशाबाईंना आणखी चाळीस वर्षे जगाल, असा आशीर्वाद दिला. दवाखान्यातून बाहेर पडताना आशाबाई नट्टापट्टा करून बाहेर पडल्या. रस्त्यावर आल्यावर त्या अपघातात मृत्युमुखी पडल्या. मृत्यूनंतर त्यांनी देवाला संतापून विचारले. ""तुम्ही मला आणखी चाळीस वर्षे जगण्याचा आशीर्वाद दिला होता.

Saturday, March 31, 2012 AT 12:00 AM (IST)

  नवी शिकवण खूप दिवसांनी दोन मैत्रिणी एकमेकींना भेटतात. पहिली - काय गं? तुझा मुलगा बोलायला शिकला का? दुसरी - हो चांगलाच शिकलाय. आता त्याला गप्प कसे राहायचे हे मी शिकवितेय.   सुगरण बायको नव्याने लग्न झालेले दोन मित्र आपल्या बायकोबद्दल बोलत असतात. पहिला - माझी बायको माझ्यासाठी दररोज वेगवेगळी भाजी करते. दुसरा - हे काहीच नाही. माझी बायको रोज एकच भाजी करते पण रोज त्याची चव वेगवेगळी असते.

Saturday, March 24, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रवास रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव सहप्रवाशाला म्हणाले, ""मला कमी ऐकू येतं हे मला ठाऊक होतं पण आता तर असं वाटतयं, की मी ठार बहिराच झालोय. कारण तुम्ही मघापासून बोलत आहात आणि त्यातलं अवाक्षरही मला ऐकू येत नाहीय.'' सहप्रवासी गणपतराव म्हणाले, ""आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो च्युईंगम खात होतो!'' पैसे नवरा : पैसे.. पैसे.. पैसे... कशाला हवे असतात गं तुला इतके पैसे? खरं तर तुला पैशापेक्षा जास्त अकलेचीच गरज आहे.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

दोघांची जाहिरात तिसऱ्याला लाभ शेजारी-शेजारी साड्यांची तीन दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो - आकर्षक साडी सेल तिसरा दुकानदार पाटी लावतो - जबरदस्त साडी सेल मधला दुकानदार शक्कल लढवून पाटी लावतो ः मुख्य प्रवेशद्वार! लेटर गंपू- तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलेस? झंपू - आधी फोनच केला होता, पण एक बाई सारखी सांगत होती, प्लीज ट्राय लेटर.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

गाण्याचा क्‍लास  संगीता-  तू गाण्याचा अभ्यास बंद का केला.  बंटी-  गळ्यामुळे.  संगीता-  का गळ्याला काय झालं?  बंटी-शेजारच्या गप्पू पहिलवानाने धमकी दिलीय, की जर मी पुन्हा गाणं गायलं तर गळा दाबेन म्हणून.  नाव  टिंकू- आई, मला आज बॅंकेत काम करणाऱ्या शेजारच्या मावशीचे नवे नाव कळाले.

Saturday, January 07, 2012 AT 12:00 AM (IST)

. डॉन को ढुँढो डॉनको सिर्फ ग्यारह मुल्कोंकी पुलिसही नही, मै भी ढूँढ रहा हूँ, मुझे उससे "रा वन'की टिकटके पैसे वापस लेने है हॉटेलमध्ये उतरलेला ग्राहक रागारागाने मॅनेजरकडे जातो. "हे बघा तुमच्या वेटरने काय केलेय.. त्याच्याकडे दाढीसाठी पाणी मागितले, तर त्याने हे गटारातले पाणी आणून दिले.' "अहो, नाही..' मॅनेजर गडबडीने म्हणतो, "हा तर मी तुमच्यासाठी पाठविलेला चहा आहे.' एकदा धर्मेंद्रच्या घरी रात्री चोर येतो. धर्मेंद्रला जाग येते आणि तो ओरडतो..

Saturday, January 07, 2012 AT 12:00 AM (IST)

वाघाचा इगो प्राणिसंग्रहालयात आलेल्या एका मुलाला वाघाने हल्ला करून ठार मारले. ते पाहून माकडाने वाघाला विचारले, "मला सांग, एवढ्या गर्दीत तू त्याच मुलाला का मारलेस?' वाघ (रागाने) ः मारू नको तर काय करू? तो माझ्याकडे बघून एकसारखा बोलत होता, "ए केवढी मोठ्ठी मांजर, केवढी मोठ्ठी मांजर म्हणून! कुछ भी करने का, लेकिन अपना इगो हर्ट नहीं करने का.' चुकीचा सल्ला दीर्घ आजाराने ग्रस्त अण्णा नातवाबरोबर डॉ. जोशींकडे जातात.

Saturday, December 31, 2011 AT 12:00 AM (IST)

बंडू : अगं आई, मी खेळताना चिखलात पडलो. आई : पडलास तो पडलास आणि अंगातल्या नव्या कपड्यांची पार वाट लावलीस. बंडू : मी तरी काय करू, पडताना मला कपडे काढायला वेळच मिळाला नाही. पहिला : अरे याऽऽर.. एक दिवस हा मोबाईल मला कंगाल करेल. दुसरा : का रे बाबा काय झालं? पहिला : अरे, सतत बॅटरी लो.. बॅटरी लो येतंय याच्यावर. आतापर्यंत मी 20 बॅटरी बदलल्या आहेत.

Saturday, December 17, 2011 AT 12:00 AM (IST)

"नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो'ने (एनसीआरबी) देशातील महानगरांच्या वाहतूक-व्यवस्थेचे चित्र मांडणारा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. वर्षभरात पंधरा हजारांपेक्षा अधिक बळी गेलेल्या तमिळनाडू, आंध्र, उत्तर प्रदेश या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्राचा चौथा क्रमांक (14 हजार 63 बळी) आहे. यासंदर्भात गंभीरपणाने, जाणतेपणाने विचार करून तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.

Saturday, November 05, 2011 AT 12:00 AM (IST)

पोलिस : तू दिवसाढवळ्या चोरी का केलीस? चोर : काय करणार, रात्री झोप येते साहेब.. महेश : माझा दात काल दुखत होता. अमित : हो का? मग अजून दुखतोय का दात? महेश : माहीत नाही रे.. दात तर डॉक्‍टरांनी काढून त्यांच्याकडे ठेवला. गंगूबाई : तुमच्या बंड्याने आमच्या बाळूला दगड फेकून मारला. यमुनाबाई : बंड्याचा डोळा तर फुटला नाही ना? गंगूबाई : अहो, कपाळाला खोक पडली म्हणून निभावले, नाही तर डोळाच फुटला असता.

Saturday, November 05, 2011 AT 12:00 AM (IST)

आनंदी क्षण लग्नाच्या वाढदिवशी सुप्रिया श्रीकांतला म्हणते, "तुला आठवतंय का रे, तू जेव्हा मला प्रपोज केलंस तेव्हा मी किती बावचळले होते ना.. एक तास होतो आपण सोबत पण मी काही बोलूच शकले नव्हते तुझ्याशी.. आणि आत्ता..'' तिचे बोलणे सुरू असतानाच, तिला तोडत श्रीकांत म्हणाला, "हो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी वेळ होता.'' 32 दात घशात (दोन मित्र भांडत असतात.) पहिला - माझ्या वाटेला नको जाऊ, 64 दात घशात घालीन. मधेच तिसरा मित्र येतो.

Saturday, September 03, 2011 AT 12:00 AM (IST)

नवरदेव वेड्याच्या इस्पितळात सगळे वेडे बेभान होऊन नाचत असतात. एक मात्र शांत उभा असतो. डॉक्‍टर येतात आणि नाचणाऱ्या वेड्यांना विचारतात, काय रे काय झालं? नाचताय का तुम्ही? नाचणारे वेडे - दिसत नाही का लग्नाची वरात चालू आहे. डॉक्‍टर शांत बसलेल्याला विचारतात, तू का नाही नाचत? शांत वेडा - अहो, मी नवरदेव आहे मी कसा नाचेन. व्याख्यान एकदा दारू पिऊन धोंडू रस्त्याने डुलत डुलत चाललेला असतो.

Saturday, July 30, 2011 AT 12:00 AM (IST)

फोटोग्राफर नेहमी फोटो काढताना म्हणतो, स्माईल प्लीज! मग आपण हसतो. तो फोटो काढतो. आपण फोटो घेतो. स्टोरी खतम! पण "स्माईल प्लीज' असं सांगावं लागणं, हीच चुकीची गोष्ट नाही का? कसं ठेवायचं चेहऱ्यावर सतत हसू? या प्रश्‍नाचं उत्तर प्रत्येकानं स्वतःच शोधायला हवं. डिक्‍शनरी शिक्षक तावातावात सांगत असतात, "माझ्यावर खूप संकटे आली तरी मी डगमगलो नाही. कारण माझ्या डिक्‍शनरीत "इम्पॉसिबल' हा शब्दच नाही.

Saturday, July 23, 2011 AT 12:00 AM (IST)

वेडा कुठला! वेडा - काय रे तू काय शिकलायस? दुसरा - बी.ए. वेडा - काय वेडा आहे अरे तू? फक्त दोनच अक्षरं शिकलास ती पण उलटी. --------- सो सिंपल मुन्नाभाई - अगर बिना दात के कुत्तेने काटा तो क्‍या करनेका. सर्किट - सिंपल है भाय.. बिना सुई का ऑपरेशन कर डालनेका.. ------ ए माने? शिक्षक वर्गात हिंदी शिकवत असतात. ए माने.. विद्यार्थी - ऍपल. शिक्षक - जोर से बोलो विद्यार्थी - जय माता दी...

Saturday, July 16, 2011 AT 12:00 AM (IST)

जगातला प्रत्येक माणूस वेगळा आहे. एक चेहरा दुसऱ्यासारखा नाही तसंच हसण्याच्या तऱ्हासुद्धा प्रत्येकाच्या निरनिराळ्या आहेत. कुणी हाऽहाऽऽहाऽऽऽ असं हसतं, तर कुणी होऽहोऽऽहोऽऽऽ असं तर कोणी मंद स्मित करतं. कसंही असू दे पण प्रत्येकानं हसलं मात्र पाहिजेच! सायकल आणि नेपोलियन बाबा लहान असतानाची त्यांची सायकल पप्पूने दुरुस्तीसाठी नेली. सायकलची अवस्था पाहून सायकलदुकानदार म्हणाला, "ही सायकल दुरुस्त होणं अवघड आहे.

Saturday, July 09, 2011 AT 12:00 AM (IST)

कारण राम : का रे? का रडतोयस. श्‍याम : बायकोशी भांडण झालं. ती म्हणाली एक महिना बोलायचं नाही. राम : मग तर तू खूष असायला हवंस. श्‍याम : आज शेवटचा दिवस आहे. -------- बघा जरा बागेत प्रियकर प्रेयसीला, "प्रिये, मला तुझ्या डोळ्यात आख्खं जग दिसतंय.' बाजूने चाललेला एक जण ते ऐकतो आणि म्हणतो, "माझा कुत्रा हरवलाय. जरा दिसतोय का ते बघा.

Saturday, July 02, 2011 AT 12:00 AM (IST)

अल्सर कशाने? डॉक्‍टर (पेशंटला) - रोज बाहेर खाल्ल्यामुळे तुम्हाला अल्सर झाला आहे. पेशंट - ठीक आहे, डॉक्‍टर. आजपासून मी पार्सल नेऊन घरी खात जाईन. ----- बदला पती - जर ऑपरेशनदरम्यान मला काही झाले तर तू त्या डॉक्‍टरशीच लग्न कर. पत्नी - असे का म्हणताय? पती - त्याचा बदला घ्यायचा असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. ----- तुमचीच मुलगी मॅडम - आज यायला उशीर का झाला? विद्यार्थी - मॅडम गाडीच पंक्‍चर झाली होती.

Saturday, June 25, 2011 AT 12:00 AM (IST)

पप्पांचा स्वभाव शिक्षक (राजूला)  - समजा, तुझ्या पप्पांनी 500 रुपयांचे कर्ज काढले आणि 10% व्याजाने ते एका वर्षात फेडले तर ते किती परत करतील? राजू  - काहीच नाही. शिक्षक  - एवढे साधे गणित येत नाही तुला? राजू  - मॅडम, मला गणित येते पण तुम्हाला माझ्या पप्पांचा स्वभाव नाही माहीत. ----- धमकी (महेश घाबरत घाबरत) पोलिस पोलिस मला धमक्‍यांचे फोन येतायत...

Saturday, June 11, 2011 AT 12:00 AM (IST)

सल्ला क्रिकेट खेळताना एक मुलगा रजनीकांतच्या घराची काच फोडतो. रजनीकांत येऊन त्याला हळू खेळण्याचा सल्ला देतो. तो मुलगा आता मिसबाह उल हक या नावाने ओळखला जातो. अवघड प्रश्‍न शिक्षक ः पप्पू, जर 2 आणि 2, 4 तर 4 आणि 4 किती? पप्पू ः हे बरोबर नाही सर. तुम्ही नेहमी सोपे प्रश्‍न स्वतः सोडवता आणि अवघड प्रश्‍न मला विचारता. धोरणी प्रपोज करण्यासाठी कोणता दिवस चांगला? 1 एप्रिल. प्रपोजल मान्य केलं तर ठीक नाही तर एप्रिल फूल म्हणता येतं.

Saturday, June 04, 2011 AT 12:00 AM (IST)

  सल्ला क्रिकेट खेळताना एक मुलगा रजनीकांतच्या घराची काच फोडतो. रजनीकांत येऊन त्याला हळू खेळण्याचा सल्ला देतो. तो मुलगा आता मिसबाह उल हक या नावाने ओळखला जातो. अवघड प्रश्‍न शिक्षक ः पप्पू, जर 2 आणि 2, 4 तर 4 आणि 4 किती? पप्पू ः हे बरोबर नाही सर. तुम्ही नेहमी सोपे प्रश्‍न स्वतः सोडवता आणि अवघड प्रश्‍न मला विचारता. धोरणी प्रपोज करण्यासाठी कोणता दिवस चांगला? 1 एप्रिल. प्रपोजल मान्य केलं तर ठीक नाही तर एप्रिल फूल म्हणता येतं.

Saturday, June 04, 2011 AT 12:00 AM (IST)

गुरुजी - काय रे तुझं आणि हरीषच्या उत्तरपत्रिकेतलं उत्तर सारखं कसं? विद्यार्थी - गुरुजी दोघांनाही प्रश्‍न एक होता ना त्यामुळं उत्तरपण सारखंच आलं. ----- प्रेयसी - माझ्या वाढदिवसाची काय भेट आणलीयस? प्रियकर - ते बघ, बाहेर एक लाल रंगाची फेरारी उभी आहे ना... प्रेयसी - काऽऽय खरंच... प्रियकर - .... त्या रंगाचे नेलपॉलिश आणले आहे तुला मी. ----- छोटू - अरे नदीच्या पाण्यातून वाफ कशी येतेय रे? मोटू - नदीतले मासे बहुतेक चहा करत असावेत...

Saturday, May 28, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: