Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
कॉन्टॅक्‍ट लेन्सचे काही अत्याधुनिक प्रकार आहेत का? उत्तर : कॉन्टॅक्‍ट लेन्सचे कही अत्याधुनिक प्रकार म्हणजे अ) टॉरिक लेन्स ः ज्यामुळे डोळ्यांचा नंबर जरी सिलिंड्रिकल असेल तरी तुम्ही वापरू शकता. ब) डिस्पोजेबल लेन्स ः या लेन्स काही काळापुरत्या मर्यादित असल्यामुळे वापरण्यास अधिक सुरक्षित असतात. यामुळे इन्फेक्‍शन होऊ शकत नाही व लेन्सवर प्रोटीनसुद्धा साचत नाही. क) एक्‍सटेंडेड वेअर : या लेन्स दिवसा - रात्री वापरल्या जातात.

Sunday, February 17, 2013 AT 06:56 PM (IST)

हृदयाच्या रक्‍तवाहिनीच्या आतील बाजूस वाढलेल्या चरबीच्या थराला अथेरोस्क्‍लिरॉसिस म्हणजेच अरुंद झालेली कोरोनरी आर्टरी म्हणतात. यासाठी कोरोनरी अँजिओप्लास्टी ही (coronary angioplasty) उपचारपद्धती रूढ झाली आहे. हाच अथेरोस्क्‍लिरॉसिस मेंदूला जाणाऱ्या रक्‍तवाहिन्यांमध्ये झाल्यावर TIA आणि स्ट्रोक किंवा पक्षाघात (paralysis) देखील होऊ शकतो. या आजारावरदेखील आता अँजिओप्लासटी (anjioplasty) हा उपाय हळूहळू प्रचलित होत आहे.

Saturday, February 09, 2013 AT 04:16 PM (IST)

प्रश्‍न ः आयुष्यमान वाढविणारे पदार्थ कोणते? उत्तर ः दीर्घायुष्यासाठी कोणताही एक आहारीय पदार्थ जबाबदार नसतो. आपली आहार घेण्याची पद्धत, जीवनशैली तसेच आनुवंशिकता, या सगळ्या बाबींचा एकत्रित परिणाम आयुष्यमानाशी संबंधित असतो. आहाराबाबतीत सांगायचे झाले, तर नैसर्गिक वैविध्याचा स्वीकार ही गुरुकिल्ली लक्षात घ्यावी. एका अमेरिकन न्युट्रीशन कुकने दीर्घायुष्याचा लाभ देणारे 14 सुपर फूड्‌स सांगितले आहेत.

Saturday, February 09, 2013 AT 04:07 PM (IST)

वेलनेस

Wednesday, October 03, 2012 AT 06:02 PM (IST)

प्रश्‍न : मला रक्‍तदान करायला आवडते. परंतु प्रत्येक वेळेस रक्‍त कमी असे सांगून ब्लड बॅंक रक्‍त घेत नाही. माझे वजन व्यवस्थित आहे, मग रक्‍त कमी का? मी आहारात काय खाणे अपेक्षित आहे? उत्तर : रक्‍तदान करण्यास पात्र होण्यासाठी आपली हिमोग्लोबिनची (haemoglobin) पातळी 12.5 ग्रॅम प्रतिडेसीलिटरपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. ही पातळी लोहामुळे(iron) योग्य ठेवली जाते.

Saturday, June 16, 2012 AT 12:00 AM (IST)

प्रश्‍न : माझे दात कमकुवत असून नेहमी दुखतात व हिरड्या सूजतात - लाल होतात व पू येतो व तोंडाला दुर्गंधी येते, मी काय करू? उत्तर- दात व हिरड्यांवरील आधुनिक उपचारांमध्ये हलणारे किंवा हुळहुळणारे दात काढावे लागत नाहीत त्याचा रुग्णांना फायदा होतो. दात वाचवता येतात व ठणठणीत होतात, अगदी पेरू व कणीस देखील खाता येतात पण त्यासाठी निष्णात वैद्यकीय सल्ला व योग्य आहाराची जोड आवश्‍यक आहे.

Saturday, May 19, 2012 AT 12:00 AM (IST)

कामाच्या थकव्यातून येणारा निरुत्साह जावा यासाठी काही आहारीय उपाय आहेत का? भरपूर कामानंतर जेव्हा तुम्हाला थकवा येतो, तेव्हा आल्याचा तुकडा हुंगावा. त्या वासाने लगेच उत्साही वाटू लागते. त्याचप्रमाणे संत्री, लिंबू यासारख्या आंबटवर्गीय फळांच्या वासानेदेखील हाच परिणाम साधता येतो. कामाच्या ठिकाणी संत्र्याच्या साली ठेवल्या, तर त्यातील ऍरोमा ऑइल्सने उदासीनता कमी होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. तुळशीची पानेदेखील उत्तम "नर्व्ह टॉनिक' आहेत.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

डॉक्‍टर माझा सेल्सचा जॉब आहे. दुचाकीवर खूप धावपळ करावी लागते. सारखा मोबाईल वापरावा लागतो. खूप बोलावे लागते, त्यामुळे रोज घसा दुखतो, तर मी काय करावे? - या गोष्टीसाठी सर्वप्रथम वैद्यकीय सल्ला घ्या. - शक्‍यतो प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करा. हळू आवाजात बोला, ओरडू नका. - व्यायाम व योगसाधना करून तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. - भरपूर प्राणायाम करून शरीरातील vo-2 max म्हणजे शरीरातील प्राणवायूचे आकारमान वाढवा. - आयुर्वेदातील टिप्स खूप उपयोगी पडू शकतात.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

केस कोरडे पडणे ही समस्या आजकाल कॉमनच झाली आहे. केस कोरडे झाल्याने त्याचे सौंदर्य तर नष्ट होतेच शिवाय पोषणही नीट होत नसल्याचे स्पष्ट होते. केस कोरडे का होतात, यामागेही काही कारणे असतात. कारणे  - आहारात केसांसाठी आवश्‍यक पोषणमूल्यांचा अभाव असेल, तर केस कोरडे होऊ शकतात. - केस सतत उन्हात असतील, तर कोरडे पडू शकतात. - केसांवर बाजारातील प्रॉडक्‍ट्‌सचा भडिमार केल्यानेही ड्राय हेअरची समस्या उद्‌भवू शकते.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

तरुण मुलींचा नाश्‍ता कसा असावा? तरुण मुलींनी सकाळी लवकरात लवकर आणि रोजच्या रोज नियमितपणे नाश्‍ता करणे अपेक्षित आहे. नाश्‍ता टाळणे, हे कुपोषण किंवा पुढे जाऊन स्थौल्याला आमंत्रण आहे, हे लक्षात असू द्यावे. बऱ्याच तरुण मुली सकाळी चहा-बिस्किटे किंवा तत्सम बेकरी पदार्थ चहाबरोबर खाऊन घराबाहेर पडतात. ही सवय अत्यंत अनारोग्यकारक आहे. तरुण व्यक्तींचा सकाळचा नाश्‍ता हा प्रथिने व कॅल्शिअम या अन्नघटकांचा विचार करून बनविलेला हवा.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

मी 42 वर्षांची आहे. नोकरी करते. हल्ली मी अनेक गोष्टी विसरायला लागले आहे. त्याची काय कारणे असतील आणि त्यावर उपाय काय आहेत?  - विसराळूपणाची सर्वसामान्य कारणे म्हणजे लक्ष नसणे किंवा नियोजन नसणे. बरेचदा आपल्या डोक्‍यात अनेक गोष्टी चालू असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही.

Saturday, January 07, 2012 AT 12:00 AM (IST)

माझे वय 30 वर्षे आहे. आमच्या घरात निद्रानाशाची "आनुवंशिकता' वाटते व मला रात्री फारच थोडा वेळ झोप लागते, तर मी काय उपचार करू? - तुमच्या निद्रानाशाची कारणे काय असू शकतात, याचा शोध तुम्हीच घेऊ शकता. ती कारणे डॉक्‍टरांशी सल्लामसलत करून त्यावर उपाय शोधता येईल. झोपेच्या गोळ्या हा मात्र कायमचा उपाय कधीच असू शकत नाही. शरीराचे मालिश करण्यामुळे कदाचित फायदा होऊ शकतो. आयुर्वेद व होमिओपॅथीचा फायदा होऊ शकतो.

Saturday, December 31, 2011 AT 12:00 AM (IST)

छातीत दुखण्यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत? छातीत दुखून हृदयविकाराचा झटका येण्यामागे खालील कारणे प्रामुख्याने दिसतात. लठ्ठपणा, बैठे जीवनमान, चाळीस वर्षांवरील व्यक्ती, अतिमहत्त्वाकांक्षी मन, मधुमेही व्यक्ती, उच्च रक्तदाब, तंबाखू, दारू व मांसाहाराचा अतिरेक, कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण, व्यायामाचा अभाव, अनुवांशिकता, खराब जनुके, चिंताग्रस्त व रागीट व्यक्तिमत्त्व, ताणतणावांचे नियोजनाचा अभाव, अतिशारीरिक व मानसिक श्रम.

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

मासिक पाळीची लक्षणे काय आहेत आणि त्रास होत असल्यास काय उपाय करावेत? मासिक पाळीच्या काळात पोटात किंवा ओटीपोटात दुखणे, डोके दुखणे, कंबर दुखणे, मांड्यात वेदना होणे, मांड्या जड होणे, स्तनांमध्ये जडत्त्व येणे किंवा वेदना होणे, जुलाब होणे, नैराश्‍य येणे वा मलावरोध होणे यांसारख्या तक्‍रारी दिसून येतात. या सर्व तक्‍रारींवर प्रत्येक वेळी औषधे घेण्याची जरुरी नसते. फारच त्रास होत असेल, तर वैद्यकीय सल्ल्यानुसारच एखादे औषध घ्यावे.

Saturday, September 03, 2011 AT 12:00 AM (IST)

मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ कोणते?  शाळकरी मुले व तारुण्यात पदार्पण केलेली मुले यांच्या हाडांची व एकंदरीतच शरीरातील सर्वच पेशींची झपाट्याने वाढ होत असते. या वाढीला प्रथिने, लोह, कॅल्शिअम, तसेच इतर पोषक अन्नघटकांची साथ मिळाल्यास ही वाढ खुंटण्याची भीती राहत नाही. या दृष्टिकोनातून मुलांचा रोजचा डबा हा वैविध्यपूर्ण, परंतु पोषक अशा पदार्थांचा असणे गरजेचे आहे.

Saturday, August 20, 2011 AT 12:00 AM (IST)

मी 30 वर्षांची आहे, मला नेहमी सर्दीचा त्रास होतो. काय काळजी घ्यावी? सर्दी ही ऍलर्जीमुळे किंवा विषाणू-जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे होते. वारंवार होणारी सर्दी ऍलर्जीमुळे असण्याची शक्‍यता जास्त. या प्रकारात नाकात शिवशिवणे, खूप शिंका येणे, नाकातून पातळ पाणी वाहणे असे त्रास होतात, ताप नसतो. ऍलर्जीच्या सर्दीसाठी, ऍलर्जी कशाची आहे ते शोधून काढून त्यापासून दूर राहावे.

Saturday, August 13, 2011 AT 12:00 AM (IST)

नोकरदार महिला आहे. मला बरीच वर्षे जुनाट संधिवाताने त्रस्त केले आहे, हा त्रास कमी करण्यासाठी काय करावे? अती ताणतणाव, नैराश्‍य व मानसिक आजार देखील पाठदुखीला व संधिवाताला कारणीभूत होऊ शकतात. शरीराचा नैसर्गिक आकार राखण्यासाठी व ताणतणावाच्या नियोजनासाठी (sress management) योगसाधना, हलका पण रोज व्यायाम, मित व पौष्टिक आहार ही त्रिसूत्री उपयोगी पडू शकते. आपली पचनक्रिया, श्‍वसनक्रिया, हाडे व सांधे यांची विशेष, सर्व ऋतूंप्रमाणे योग्य ती काळजी घ्या.

Saturday, July 30, 2011 AT 12:00 AM (IST)

Hormonal Balance किंवा थायरॉईड ग्रंथीचे आजार आहेत, मी काय करावे? रक्तातील थायरॉईड संप्रेरकांची पातळी मोजून निदान करता येते, त्यासाठी आपल्याला निष्णात डॉक्‍टरांकडे जाणे फार महत्त्वाचे आहे. इंटरनेटवरील माहितीच्या आधारे, जाहिराती पाहून, स्वतःच कोणतेही निष्कर्ष काढून मनाप्रमाणे औषधे घेऊ नका. वजनातील चढ, उतारांवर लक्ष ठेवा. सर्व लक्षणांची नोंद लिहून ठेवा व ती तज्ज्ञ डॉक्‍टरांना वाचून दाखवा.

Saturday, July 23, 2011 AT 12:00 AM (IST)

मी नेहमी आजारी पडते. सर्व वैद्यकीय चाचण्या नॉर्मल असतात पण औषधे घेऊनही बरे वाटत नाही. काय करू? महिलांमध्ये जगभर ही समस्या आहे, विशेषतः काम व कष्टकरी महिलांमध्ये तर सर्वांत जास्त. चिरंतन सुखाचे "घाट' बांधताना आपण शरीर, मन, बुद्धी यांची चाळण करून टाकतो व सकाळी ऍलोपॅथी, दुपारी होमिओपॅथी व रात्री आयुर्वेदाचा आधार शोधून त्यातून आरोग्य धुंडाळतो, पण ते शक्‍य नसते.

Saturday, July 16, 2011 AT 12:00 AM (IST)

रोगप्रतिकार यंत्रणा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी काय करू? निसर्गसान्निध्य, छंद, मोकळी स्वच्छ हवा, प्रदूषण विरहित पर्यावरण, नेहमीच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढणे, सहलीला जाणे, स्वस्थ, शांत, संथ दिनचर्या, योग्य शारीरिक परिश्रम, परस्परांमधील जिव्हाळा, घराची, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, आतून, बाहेरून शारीरिक स्वच्छता, एकत्र कुटुंब-पद्धती किंवा चांगला मानसिक आधार, नैसर्गिक, संतुलित व शाकाहारी आहार हे उत्तम उपाय आहेत ही यंत्रणा कार्यक्षम व मजबूत ...

Saturday, July 09, 2011 AT 12:00 AM (IST)

उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास आहे, तर माझी जीवनशैली कशी असावी?  योग्य आहार- विहार व विचार, योग्य प्रमाणात झोप असणे, शारीरिक व्यायाम, योग्य दिनचर्या, व्यसनांपासून लांब राहणे, नियमित योगसाधना व आध्यात्मिक मन-बुद्धी-अंतःकरण असणे फार गरजेचे आहे. वजन आटोक्‍यात ठेवणे, महिलांनी विशेष काळजी घेणे आणि आपले मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. भरपूर फळे व भाज्या खाणे. फळे व भाज्या नेहमी ताज्याच खाणे.

Saturday, July 02, 2011 AT 12:00 AM (IST)

नेहमी श्‍वास घ्यायला त्रास होतो व त्यामुळे कधीच "फ्रेश' वाटत नाही. मी काय करू? : वरील प्रश्‍नाला औषधात उत्तर नाही व प्रश्‍नामध्येच एक उत्तर दडलेले आहे. प्रदूषणाच्या व ताणतणावाच्या या जगात वावरताना हा प्रश्‍न विचारला जाणे अत्यंत स्वाभाविकच आहे. फ्रेश वाटत नाही कारण श्‍वास नीट "चालत' नाही. योगासने, व्यायाम, प्राणायाम याचा श्‍वास नीट चालण्यासाठी उपयोग होईल. अंदाजे 90 % डॉक्‍टरांना देखील शास्त्र-शुद्‌ध श्‍वसन करता येत नाही.

Saturday, June 25, 2011 AT 12:00 AM (IST)

बराच प्रयत्न करूनही माझे वजनच कमी होत नाही, काय करू? : त्या करता संतुलित आहार, नियमितपणे व्यायाम, ताणतणावाचे नियोजन, ऊर्जेचा ताळेबंद (calorie management), व आपल्या वजनावर कायम लक्ष ठेवणे हेच प्रभावी उपाय आहेत. बरीच मंडळी जिममध्ये जातात व जीम बंद केल्याबरोबर वजन वाढू शकते. वाढलेले वजन किती वेगाने कमी करावे, याचा मात्र सारासार विचार हवा. अतिरेकी उपासमार, औषधांचा वापर आणि जठरावर केलेल्या शस्त्रक्रिया या मोहात पाडणाऱ्या असून अत्यंत घातक असू शकतात.

Saturday, June 18, 2011 AT 12:00 AM (IST)

पुढच्या पिढीला हृदय-रोग होऊ नये म्हणून काय करावे? हृदयरोग होऊ नये यासाठी शाळा-महाविद्यालयापासूनच सुरवात करायला हवी. या वयातील मुलांना योगसाधनेचे, व्यायामाचे व आहाराचे महत्त्व पटवून देणे आवश्‍यक आहे. शिक्षक आई-वडिलांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरात आनुवंशिकता असल्यास त्याची कल्पना त्यांना आधीच द्यायला हवी.

Saturday, June 11, 2011 AT 12:00 AM (IST)

गंभीर आजारांची आणि मृत्यूची भीती वाटते, ती कशी कमी करावी? गंभीर आजार काही सगळ्यांनाच होत नाहीत फारच थोड्या लोकांना होतात. आपल्या सर्वांना मरण येणारच हे माहीत असूनही जे लोक अतोनात पैसा कमावण्याची धडपड करतात त्यांना गंभीर आजारांची शक्‍यता असते. आजारपणाची चाहूल लागण्यापूर्वीच आपण आपल्या जीवनशैलीत बदल करावेत. आपल्या वयानुसार, कामाच्या स्वरूपानुसार, अनुवंशिकता लक्षात घेऊन हे बदल करावेत.

Saturday, May 28, 2011 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2013 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: