Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत कथा यशाची नवलकथा वेगळ्या वाटेने ग्राफिक्स स्टोरी
 
आजची तरुण मुले मूलभूत संशोधनाकडे वळत नाहीत, असा नाराजीचा सूर नेहमीच ऐकायला मिळतो. मात्र ज्या तरुण विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे, त्यांना योग्य वातावरण मिळाले, तर त्यांच्याकडूनही समाजोपयोगी संशोधन होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव तिडके आणि त्याचा चमू. सायन्स फॉर सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आपल्या कामाची समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. सौरऊर्जेच्या मदतीने अन्नधान्य वाळविण्याचा शास्त्रशुद्ध प्रयोग हा त्यापैकीच एक.

Saturday, April 21, 2012 AT 12:00 AM (IST)

चित्रपट माध्यम आपल्याला खुणावते आहे, हे ओळखून इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याने अर्धवट सोडून दिले. त्याच्या आवडीला घरातूनही प्रोत्साहन मिळाले मात्र एक अट होती, ती म्हणजे या माध्यमाची पूर्ण ओळख करून घेण्याची! त्याप्रमाणे या क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्याने चित्रनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

Saturday, April 07, 2012 AT 12:00 AM (IST)

कविता करण्यासाठी एकांताच्या शोधात तो किल्ल्यावर जाऊ लागला आणि कवितेसोबत किल्ल्यांशीही त्यांचे नाते जुळले ते कायमचेच. स्वतःचे लग्नही त्याने वसईच्या किल्ल्यावरच करणाऱ्या श्रीदत्तने या इतिहासाचे वर्तमान बदलण्याचा वसाच घेतला. किल्ला स्वच्छ असावा, तिथे लोकांचा राबता असावा, स्थानिक लोकजीवनात किल्ल्याला महत्त्वाचे स्थान असावे, यासाठी श्रीदत्त गेली 12 वर्षे त्याच्या सहकाऱ्यांसह धडपडतो आहे.

Saturday, March 10, 2012 AT 12:00 AM (IST)

रोज आपला दिवस जसा उजाडतो, तसाच तिचाही उजाडतो. फरक एवढाच असतो तिला जाग येते, ती हॉर्नबिलच्या आवाजाने. घाईघाईने ती आवरते आणि चालू लागते जंगलाची वाट... कारण तिला वाचवायचे असतात दुर्मिळ होणारे हॉर्नबिल. पुण्याच्या अमृता राणेने निवडलेल्या या अनोख्या करिअर ऑप्शनबद्दल. तिचे नाव अमृता राणे. बी.एस्सी. (बॉटनी) पुण्यात झाल्यानंतर अमृताने ब्रिटनमधील "युनिव्हर्सिटी ऑफ नॉरेच'मधून "इकॉलॉजी अँड कॉन्झर्व्हेशन' या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले.

Saturday, March 03, 2012 AT 12:00 AM (IST)

देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये रोज अनेक एकटी मुले भरकटलेल्या अवस्थेत दाखल होतात. दारिद्य्राचा चटका असह्य झाल्याने, प्रेम आणि विश्‍वासाची ऊब न मिळाल्याने चांगल्या आयुष्याच्या शोधात ही मुले घराबाहेर पडतात. घर सोडल्यावर त्यांच्या लक्षात येते, की आपण आगीतून फुफाट्यात आलो आहोत... पण तोपर्यंत परतीचा रस्ता बंद झालेला असतो.

Saturday, February 25, 2012 AT 12:00 AM (IST)

निसर्ग जपण्याची आणि तो फुलविण्याची तळमळ जिथे कारणी लागेल, असे एक नवीन बिझनेस मॉडेल केतकी घाटे आणि मानसी करंदीकर या दोघींनी सुरू केले. गेल्या दहा वर्षांत त्यांनी फक्त पुण्यातच नव्हे, तर भारतभरात छोट्या- मोठ्या विकास प्रकल्पांवर निसर्गाचा बळी जाऊ नये आणि जमिनीच्या मालकांनाही त्या जागेचा पुरेपूर आनंद घेता यावा, यासाठी व्यावसायिकदृष्ट्या काम केले.

Saturday, February 18, 2012 AT 12:00 AM (IST)

सरकारी योजना म्हणजे त्या फक्त कागदावरच राहणार, त्या प्रत्यक्षात येणे महामुश्‍कील असा आपला सर्वांचा समज असतो पण असा समज करून थांबून न राहता जेव्हा एखादी संस्था, एखादी व्यक्ती त्या योजनेचा पाठपुरावा करते आणि मुख्य म्हणजे समाजाला कायदा साक्षर करून योजनेचा लाभ घ्यायला सक्षम बनवते, तेव्हा एक नवी वाट सुरू होते. अशा नव्या वाटेने चालणाऱ्या तरुण कार्यकर्त्याविषयी-   सरकारी योजना आणि त्यांची अंमलबजावणी हा आपल्याकडे चेष्टेचा विषय आहे.

Saturday, February 11, 2012 AT 12:00 AM (IST)

ब्रिटनमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी, बंगला-गाडी, आंतरराष्ट्रीय बॅंकांमध्ये बॅंकबॅलन्स असे सगळे गाठीशी असताना आणि करियरच्या दृष्टीने उज्ज्वल भविष्यकाळ खुणावत असताना त्याकडे विचारपूर्वक पाठ फिरवून एक डॉक्‍टर दांपत्य सोयीसुविधांचा स्पर्श न लाभलेल्या खानदेशातील एका छोट्या गावी परतते. खेड्यातील रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी, तिथल्या आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी धडपडण्याचे व्रत अंगीकारते.

Saturday, January 21, 2012 AT 12:00 AM (IST)

ज्याला शिकायचे आहे, पुढे जायचे आहे त्याला परिस्थितीचा अडथळा कधी जाणवत नाही. एकेकाळी रोजंदारीवर काम करणारा अल्पशिक्षित तरुण आज गावागावांत विज्ञान कार्यशाळा घेतो, शिक्षकांनाही इंग्रजीतून विज्ञानातल्या संज्ञा समजावून सांगतो, हे त्या जिद्दीचेच एक उदाहरण. टाकाऊ वस्तूंपासून खेळणी तयार करता करता आपल्या टाकाऊ आयुष्यालाही नवी ओळख देणाऱ्या शिवाजीची, एका धडपड्या विज्ञान उपासकाची ओळख.

Saturday, January 07, 2012 AT 12:00 AM (IST)

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले कितीही बुद्धिमान असली तरी त्यांची गोची होते ती इंग्रजीतून संवाद साधताना. इंग्रजी शब्दसंग्रह उत्तम असेल तर या अडचणीवर मात करता येते, हे लक्षात आल्यावर नाशिकजवळच्या एका छोट्या खेड्यातील सुनील खांडबहाले या तरुणाने शब्दकोशांशी मैत्री केली. पुढे माहिती- तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग करत त्याने कॉम्प्युटर, सीडी, इंटरनेट तसेच मोबाइलमध्येही भारतीय भाषांमधले शब्दकोश युजर फ्रेंडली रूपात आणले.

Saturday, December 31, 2011 AT 12:00 AM (IST)

आपल्या समाजात पुरुषांचे स्वयंपाकाशी नाते अजूनही तितकेसे रुजलेले नाही. काही पुरुष जबाबदारीच्या जाणिवेने बायकोला हातभार लावतील, काही करिअर म्हणून हे आव्हान स्वीकारतील पण स्वयंपाक ही एक कला आहे आणि ती तुम्हाला सर्जनशील निर्मितीचा आनंद देते, अशा ठाम विचाराने या क्षेत्रात पाऊल ठेवणारी व्यक्ती, तरुण वयातच आपला ठसा उमटवेल यात शंका नाही. तरुण शेफ नीलेश लिमये यांच्याशी गप्पा मारताना हेच जाणवते.

Friday, December 23, 2011 AT 05:12 PM (IST)

सगळ्या तरुणाईला स्वप्नरंजन करायला लावणारं तरल, रोमॅंटिक भावगीत ते एखादं ढिंचॅक गाणं एखादी ठसकेबाज झणझणीत लावणी ते अभंग अशा कोणत्याही गायनप्रकारात लीलया वावरणारी आताच्या पिढीतली गायिका कोण? असा प्रश्‍न कुणी विचारला, तर बेला शेंडेचं नाव ओठावर येतंच. सध्या मराठी चित्रपटसृष्टीवर गारूड करणारी गायिका असं बेला शेंडेचं वर्णन केलं, तर त्यात काही वावगं नाही. शेंड्यांच्या घरात गाण्याचंच वातावरण.

Saturday, December 17, 2011 AT 12:00 AM (IST)

एखादे गाव बदलण्यासाठी लोकांना बरोबर घेऊन काम करायचे, तर लोकांच्या गरजा नेमक्‍या काय आहेत आणि कोणत्या कामासाठी ते आपल्याला साथ देतील, याचा विचार करायला हवा. काही कामे लोकांच्या कलाने घ्यायला हवीत तर काही कामे लोकांना पटेपर्यंत ऑप्शनला टाकायला हवीत. अशा प्रॅक्‍टिकल विचारांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू पाहणाऱ्या संतोष गवळे या विदर्भातील तरुणाविषयी- यवतमाळ हा विदर्भातला एक मागा स जिल्हा.

Saturday, December 10, 2011 AT 12:00 AM (IST)

एव्हरेस्टसारखं शिखर सर करणं अत्युच्च आनंद देणारं असतं यात वाद नाही पण त्याहूनही आनंददायी असतो तो त्या शिखरापर्यंतचा प्रवास. ते आव्हान, तो अनुभवच खूप काही शिकवून जात असतो... एव्हरेस्ट सर करणाऱ्या कृष्णा पाटीलशी मारलेल्या गप्पा. देवावर आणि आपल्या कामावर श्रद्धा असली, की काहीही अशक्‍य नाही असं तिला वाटतं. कदाचित या विश्‍वासामुळंच माऊंट एव्हरेस्ट सर करणारी ती भारतातील सर्वांत लहान महिला गिर्यारोहक बनली आहे.

Saturday, December 03, 2011 AT 12:00 AM (IST)

कातरवेळी "नसतेस घरी तू जेव्हा' अशी प्रेयसीच्या विरहाची भावना गाणारा सलील "दमलेल्या बाबाची कहाणी' गाऊन सध्याच्या कुटुंबव्यवस्थेतल्या बापाची अगतिकता आळवतो, तर दुसरीकडे "लपविलेल्या काचा' या पहिल्याच पुस्तकात जाणिवा समृद्ध करणारं लेखनही करतो. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सलीलच्या जीवनगाण्याविषयी... रसिकांनी भरलेलं प्रेक्षागृह...स्टेजवर फक्त तीन जण.. गाण्याच्या मैफलीचे कोणतेही संकेत न पाळणारं कार्यक्रमाचं सादरीकरण...ऐन रंगात आलेली मैफल...

Saturday, November 26, 2011 AT 12:00 AM (IST)

राधेला बावरी बनवून गालावर खळी खुलवणारा स्वप्नील बांदोडकर, मराठी तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनला आहे. घरात गायनाचा वारसा नसतानाही लहानपणापासूनच त्याचा गाण्याकडे कल होता. मधुर आवाज आणि सुरांचे शास्त्रोक्त शिक्षण यांच्या जोरावर स्वप्नीलने स्वतःचा चाहतावर्ग तयार केला आहे. प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहात त्याचे नाव पुकारले जाते आणि एकच जल्लोष होतो...कोणी त्याच्या गाण्याची वाट पाहत असतो, तर कोणी फक्त त्याच्या येण्याची...

Saturday, November 19, 2011 AT 12:00 AM (IST)

युरोपियन आणि अमेरिकन लोकांचे वर्चस्व असणाऱ्या टेनिस ऑफिशिएटिंगच्या क्षेत्रांत त्यांनी मेहनत, चिकाटी आणि हार न मानण्याची वृत्ती या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण केले. टेनिसलाच आपले सर्वस्व मानणाऱ्या, आशियातील पहिली महिला गोल्ड बॅगेज रेफरी झालेल्या शीतल अय्यर यांचा प्रवास . तिचे पहिले प्रेम टेनिस. वडिलांनी तिची टेनिसशी ओळख करून दिली. या क्षेत्रात खेळाडू, कोच, अंपायर, रेफरी अशा सगळ्या भूमिका तिने बजावल्या. टेनिस हेच तिचे आयुष्य बनले.

Saturday, November 12, 2011 AT 12:00 AM (IST)

"मन उधाण वाऱ्याचे...' गाणं आलं आणि प्रचंड लोकप्रिय झालं.. त्याबरोबरच "गुरू ठाकूर' हे नावही प्रकाशझोतात आलं. गद्यलेखन, कॅरिकेचर्स, पद्यलेखन, अभिनय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुरू ठाकूर यांना या गाण्यानं ओळख मिळवून दिली. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही जमिनीवर पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या या कलावंताचा परिचय. अध्यात्मात जसं गुरू भेटणं मुश्‍कील असतं.. त्यासाठी शिष्याची प्रचंड तळमळ असावी लागते तसंच काहीसं गुरू ठाकूर आणि माझ्या भेटीचं झालं.

Saturday, November 05, 2011 AT 12:00 AM (IST)

भारताने हॉकीमध्ये विश्‍वकरंडक मिळविला आणि "युवराज वाल्मीक' हे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले.. झोपडपट्टीही मोठी म्हणता येईल अशा भागात एका छोट्याशा खोलीत तो राहतो. त्याच्या घरची स्थिती बिकट आहे... वगैरे बातम्या येऊ लागल्या पण आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता खेळावरच लक्ष करण्याचा समजूतदारपणा या युवा खेळाडूकडे आहे. त्याच्या यशाची कहाणी. त्या घटनेला आता अकरा वर्षे झाली. आंतरशालेय हॉकी स्पर्धा सुरू होती. एका मुलाने त्यात चमक दाखवली.

Saturday, October 08, 2011 AT 12:00 AM (IST)

प्रकाश आमटे यांच्या शिबिरात श्रमदानाचे संस्कार झाले. वडिलांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगितला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची संगत लाभली. समाजसेवेचे बाळकडू परिस्थितीनेच दिले. कोपरगाव तालुक्‍यातून नाशिकला जाऊन महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना यंत्रसामग्री पुरविणाऱ्या उद्योजक कृष्णा चांदगुडे यांची वाटचाल. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत सामाजिक जाणिवांचे बाळकडू मिळाले.

Saturday, October 01, 2011 AT 12:00 AM (IST)

हर्षद जहागीरदार. वय - 32 वर्षे. शिक्षण - डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) क्षेत्र - कंपन्यांचे ब्रॅंडिंग. कौटुंबिक पार्श्‍वभूमी   उद्योगांची कोणतीही पार्श्‍वभूमी घरात नाही. घरातील वातावरण नोकरदाराचेच. घरची परिस्थितीही खूप श्रीमंतीची नव्हती. मात्र, मुलांची तळमळ समजून घेणारे पालक असल्याने हर्षदला उद्योजक बनता आले. नोकरीच कर आणि अमुक रक्कमच घरात आण, असा हेका त्यांनी लावला असता, तर व्हर्च्युऑसिटी ही कंपनी प्रत्यक्षात आलीच नसती.

Saturday, September 24, 2011 AT 04:12 PM (IST)

सध्याचे यशाचे प्रचलित समीकरण नाकारून वैभव निंबाळकरने आयपीएस होण्याचा मार्ग निवडला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) प्रवेश मिळत असताना तो नाकारून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात झळकून सर्वांत तरुण आयपीएस अधिकारी बनण्याचा मान 25 वर्षीय वैभव निंबाळकर याने मिळवला आहे.

Saturday, September 24, 2011 AT 03:31 PM (IST)

निर्मला मंगळू गायकवाड  वय - 25 वर्षे (जन्मतारीख ) शिक्षण - एम.एस्सी. (ऑर्गॅनिक) क्षेत्र - प्रशासकीय सेवा. कौटुंबिक पार्श्‍वभूमी  वडील मंगळू गायकवाड हे शेतमजूर. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असे कुटुंब. दिवसभर शेतमजुरी करून कुटुंब चालविताना उदरनिर्वाहाची भ्रांतच. यशाकडे वाटचाल   ओढा (ता. नाशिक) येथे गायकवाड कुटुंब राहते. निर्मला गायकवाड हे शेंडेफळ.

Saturday, September 24, 2011 AT 03:07 PM (IST)

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चमकण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती अडथळा ठरते, या समजाला छेद देत नाशिकच्या तिघांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यातील एक आहेत, नंदुरबारच्या जिल्हा पोलिस अधीक्षक शारदा राऊत. जिद्द अन चिकाटीच्या जोरावर त्यांनी दिल्लीच्या तख्तावर कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. एवढेच नव्हे, तर आताच्या जीवनात "कम्युनिटी पुलिसिंग'ला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शारदा राऊत वय - 30 वर्षे. शिक्षण - एम. कॉम.

Saturday, September 24, 2011 AT 02:59 PM (IST)

शालेय जीवनापासूनच निसर्गाचे, जंगलाचे, वन्यजीव, पशु-पक्ष्यांचे कमालीचे आकर्षण होतेच. हेच आकर्षण नाशिकच्या किरण रहाळकरला वन्यजीवांसह जंगलातील जैवविविधतेत करिअरकडे घेऊन गेले. पण केवळ प्रशिक्षित संशोधक होण्यापर्यंत किरणने स्वतःला मर्यादित ठेवलेले नाही. पुढचे पाऊल म्हणून त्याने संशोधनाला कृतीयुक्त संवर्धनाची जोड दिली.

Saturday, September 24, 2011 AT 01:47 PM (IST)

स्वित्झर्लंड मधील "लार्ज हैड्रॉन कोलायडर' या प्रकल्पासाठी कार्यरत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीममध्ये समावेश असणाऱ्या, अनुपमा कुलकर्णी यांनी आपल्या कामानेच वेगळेपण सिद्ध केले आहे. नाव ः अनुपमा पद्मनाभ कुलकर्णी वय : 40 वर्षे शिक्षण : व्हीजेटीआयमधून इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका. कऱ्हाडच्या शासकीय महाविद्यालयात बीई(इलेक्‍ट्रिकल) पदवी. क्षेत्र : संशोधन.

Saturday, September 24, 2011 AT 02:37 PM (IST)

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत "रायफल शूटिंग'मध्ये डोंबिवलीच्या संयुक्त हसमनीस हिने विशेष प्रावीण्य मिळविले आहे. एका बाजूला आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी नोकरी, तर दुसऱ्या बाजूला रायफल शूटिंगचा नियमित सराव या दोन्ही आघाड्यांवर सध्या तिची कसरत सुरू आहे. नाव : संयुक्‍ता सुरेंद्र हसमनीस वय : 26 वर्षे शिक्षण : एम.ए.

Saturday, September 24, 2011 AT 02:32 PM (IST)

केवळ सोळाशे रुपयांची हातगाडी आणि पाच हजार रुपये ऑफिसचे डिपॉझिट भरून व्यवसायाची सुरवात करणाऱ्या भाऊसाहेब चौधरी यांची हायड्रोजन गॅस सप्लायरच्या क्षेत्रात संपूर्ण भारतात "मोनोपॉली' आहे. नाव : भाऊसाहेब पंढरीनाथ चौधरी वय : 41 वर्षे शिक्षण : बी.कॉम क्षेत्र : हायड्रोजन गॅस सप्लायर कौटुंबिक पार्श्‍वभूमी : भाऊसाहेब चौधरी हे मध्यमवर्गीय कुटुंबातच वाढले. सध्या ते डोंबिवलीत पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत.

Saturday, September 24, 2011 AT 01:47 PM (IST)

पिढीजात असलेला व्यवसाय सांभाळणे यासाठीही कौशल्य हवेच. जळगावच्या किरण बच्छाव यांनी सातपुडा ऑटोमोबाईलची सूत्रे हाती घेतली आणि कौशल्याने त्याची भरभराटही केली. नाव : किरण बच्छाव वय : 34 वर्षे शिक्षण : पुण्यातील भारती विद्यापीठात प्रॉडक्‍शनमध्ये बी.ई.चे शिक्षण घेतले. त्यानंतरचे पदव्युत्तर शिक्षण (एम.एस.) इंग्लंडच्या सन्डरलॅंड विद्यापीठातून पूर्ण केले. क्षेत्र : ऑटोमोबाईल कौटुंबिक पार्श्‍वभूमी : वडील प्रा. डी. डी.

Saturday, September 24, 2011 AT 01:36 PM (IST)

आजोबांच्या व्यावसायिकतेचा आदर्श समोर ठेवत जळगाव जिल्ह्यातील विवेक भोळे यांनी आर्किटेक्‍ट क्षेत्रात देश-विदेशात नाव कमाविले आहे. नाव : विवेक भोळे वय : 39 वर्षे शिक्षण : प्राथमिक शिक्षण असोदा(जि. जळगाव) येथे, बारावीपर्यंतचे शिक्षण जळगावमधील नूतन मराठा महाविद्यालयातून, तर आर्किटेक्‍चरचे शिक्षण जे.जे.स्कूल मध्ये झाले. क्षेत्र : आर्किटेक्‍चर कौटुंबिक पार्श्‍वभूमी विवेक भोळे यांचे आजोबा सोमा भोळे हे जिद्दीने टेलरिंग व्यवसायात उतरले होते.

Saturday, September 24, 2011 AT 01:34 PM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card  |  RSS
© Copyrights 2012 SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: