शब्दकोडे क्र. 60
शब्दकोडे क्र. 60
आडवे शब्द
१. वितरण,
३. शिमगा संपला तरी हे उरते,
६. आपल्याकडील शेतीचा दुसरा हंगाम,
७. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती, मोक्ष,
८. पगडा, वर्चस्व,
९. हिंस्र जनावर,
११. बारांचा समूह,
१३. चार घरी जाऊन मागितलेली कोरड्या अन्नाची भिक्षा,
१४. विश्वास, भक्ती मात्र ही अंध नसावी,
१५. पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर,
१६. कोंडमारा,
१८. जानवे बदलण्याचा विधी,
१९. सुंदर स्त्री,
२०. बापापेक्षा श्रेष्ठ, वरचढ असलेला मुलगा,
२१. गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवलेली जागा,
२३. झणझणीत तिखट पिठले,
२५. मूर्ती बनवण्याची पांढरी माती,
२७. कळक, बांबू,
२८. देशाचे, प्रांताचे दोन तुकडे,
२९. स्थूल, जाडजूड,
३०. वाडगा, मोठी वाटी
उभे शब्द
१. आर्यांच्या चारपैकी अरण्यात निघून जाण्याचा,
२. आबाळ, हेळसांड,
४. आकांत, शोक,
५. साध्या वर्तनाचे मूल किंवा अक्षराची साधी, गोंडस धाटणी,
९. हे कुत्रे समर्थाघरचे असेल तर यास सर्व मान देतात,
१०. मोठा नगारा किंवा कडाबीन तोफ,
१२. मस्त, छान,
१५. जन्माच्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पुजली जाणारी देवता,
१६. पिशाच्चाचा संचार,
१७. चामखीळ, तीळ,
१९. व्यर्थ, फुका,
२२. धुंदी, कैफ,
२३. प्रसन्न करणारी वाऱ्याची मंद लहर,
२४. बैलावर नियंत्रण ठेवणारी दोरी,
२६. लहान मुलांचे लोंबते कर्णभूषण