चविष्ट रेसिपीज...

शेफ दीपा अवचट 
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

दिवाळी फराळ 
दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. यंदाच्या दिवाळी फराळासाठी नामवंत शेफ्सनी त्यांच्या काही खास पाककृती 'सकाळ साप्ताहिक'च्या वाचकांसाठी दिल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या आणि रुचकर पदार्थांच्या पाककृती दिवाळीची रंगत नक्कीच वाढवतील.

केळ्यांचा पाकातील हलवा 
साहित्य : पिकलेली राजुरी केळी - ६, साखर ३/४ कप , वितळवलेले साजूक तूप ८ चमचे, केशर अर्धा चमचा, वेलची पूड १ चमचा 
कृती ः पिकलेल्या केळ्यांची साले काढून अर्धा इंच रुंद या प्रमाणात त्याच्या गोलाकार चकत्या करून घ्याव्यात. १ चमचा पाण्यात केशर भिजत ठेवावे. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कापलेली केळी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावीत. भाजणे झाल्यावर यात साखर, केशर आणि २ कप पाणी घालून केळी साखर वितळेपर्यंत शिजवून घ्यावे. साखरेचा पाक देखील या दरम्यान घट्ट होईल . या तयार झालेल्या हलव्यात वेलची पूड घालून हा हलवा गार किंवा थंड असताना खावा. हा हलवा फ्रीजमध्ये ठेवल्यास ८ दिवस टिकतो. फ्रीजमध्ये न ठेवल्यास ३-४ दिवस राहू शकतो

नमकीन पुरी 
साहित्य : बारीक दळलेले पीठ ३०० ग्रॅम, अर्धा कप साजूक तूप, ओवा १ चमचा, मीठ चवीपुरते, पीठ मळण्यासाठी २ कप पाणी (५०० मिली )
कृती ः वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्यावे. गरज असेल तितकेच पाणी वापरावे. मळलेले पीठ किमान अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून पुरी लाटावी. कढईत तेल घालून ते कडकडीत गरम झाल्यावर पुऱ्या लालसर सोनेरी रंगात तळून घ्याव्यात. पुऱ्या थंड झाल्यावर त्या हवाबंद डब्यात घट्ट झाकण लावून ठेवावे. या पुऱ्या कधीही लोणचे किंवा चटणीसोबत खाता येतात. सहज ८- १५ दिवस टिकतात  प्रवासासाठी उपयुक्त आहेत

शाही तुकडा 
साहित्य : ब्रेड ४ स्लाइस ,  रबडी ८ चमचे , दूध १० कप, काजू , वेलची पूड अर्धा चमचा, तळण्यासाठी तूप . 
कृती ः ब्रेडच्या कडा कापून स्लाइसचे एक सारखे भाग सुरीने कापून करावेत. गोल्डन कलर  येईपर्यंत हे ब्रेडचे पिसेस फ्राय करावेत . दूध-वेलची पूड मिक्‍स करून त्यात हे तळलेले ब्रेडचे पिसेस ५ मिनिटे भिजत ठेवावे. त्यानंतर हे दुधातील पिसेस काढून हे चौकोन बनेल अशा पद्धतीने एकावर एक ठेवावेत ज्याने एक संपूर्ण स्लाइस तयार होईल. आता या तुकड्यांवर रबडी ओतावी आणि त्यावर काजू पसरावेत  रबडी बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध उकळावे. पाव कप साखर या दुधात उकळत असताना घालावी. दूध दाट झाले, की समजावे रबडी तयार झाली 

कडबोळी 
साहित्य : तांदूळ २५० ग्रॅम, काळे तीळ पाव कप, उडीद डाळ पाव कप . गहू पाव कप , धणे १ चमचा, जिरे अर्धा चमचा . 
कृती ः वरील सर्व साहित्य मध्यम आचेवर त्यांचा रंग बदलेपर्यंत वेगवेगळे भाजून घ्यावे. हे साहित्य भाजून झाले, की  थंड होऊ द्या आणि त्याची बारीक पूड होईपर्यंत मिक्‍सीवर वाटून घ्यावे . 
साहित्य : कडबोळी पीठ -  ११/४ कप (२७० ग्रॅम ), पाणी  ११/४ (मिली ३००), तीळ पाव चमचा, ओवा पाव चमचा, हिंग पाव चमचा , लाल मिरची पावडर पाव चमचा, मीठ पाव चमचा, तेल एक चमचा, तळण्यासाठी तेल . 
कृती ः एका मध्यम आकाराच्या भांड्यात अंदाजे पाणी घेऊन त्यात तीळ, ओवा, लाल मिरची पावडर, हिंग ,मीठ आणि चमचा तेल घालून हे मिश्रण ढवळा. गॅसवर हे भांडे मध्यम आचेवर ठेवून हे पाणी उकळले, की गॅस बंद करून यात कडबोळी पीठ मिक्‍स करावे. हे मिश्रण  व्यवस्थित एकरूप करावे आणि हे मग हे भांडे किमान १० मिनिटं झाकून ठेवावे. एक फ्लॅट ट्रे घ्यावा त्यात हे शिजवलेलं कडबोळी पीठ ओतावे. या 
पिठावर एक चमचा गरम पाणी शिंपडा आणि हे पीठ मऊ होईल अशा पद्धतीने मळून घ्यावे. तयार झालेल्या पिठाचे २० एक सारखे भाग करून त्याचे गोळे करावेत. हे गोळे आधी लोणी लावून मग त्यावर ठेवावेत अर्धा इंच रुंद अशी लांबट पट्टी होईल असे या  गोळ्याला लाटून घ्यावे. वर्तुळाकार पद्धतीने ही पट्टी लाटत त्याला कडबोळीचा आकार द्यावा. सगळ्यात शेवटी  कढईत तेल कडकडीत करून या कडबोळी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे.

राघवदास लाडू 
साहित्य : बारीक रवा ३ ते ४ कप (१३० ग्रॅम ), खवलेले खोबरे अर्धा कप (५५ग्रॅम ), साखर दीड कप (३७५ ग्रॅम ) , वेलची पूड  १ चमचा, बेदाणे १ चमचा, साजूक तूप अर्धा कप , दूध अर्धा कप , पाणी ३/४ कप 
कृती ः तूप कढत करून रवा लाइट ब्राऊन होईपर्यंत भाजावा आणि बाजूस ठेवावा.  कढईत खोबरे हलके भाजून घ्यावे यात दूध आणि भाजलेला रवा घालून दूध आटेपर्यंत हे मिश्रण शिजवावे. एका पॅनमध्ये साखर-पाणी याचे मिश्रण पाक करण्यासाठी ठेवावे. एकूण पाण्याच्या १/३ भाग पाक बनला पाहिजे. एक तारी पाक असणे गरजेचे आहे. रवा, खोबरे, वेलची पूड एकत्र करून मंद आचेवर ठेवावा.  गॅस बंद करून हे मिश्रण थंड करावे आणि थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावेत. लाडू वळताना त्यात बेदाणे घालावेत . 
( हे लाडू फ्रीजमध्ये न ठेवल्यास फक्त ४ दिवस टिकतात )

स्वादिष्ट भात आणि बटाटे 
साहित्य : उरलेला भात २ कप , १ मोठा  बारीक चिरलेला कांदा, पाव चमचा हळद, २ हिरव्या मिरच्या कापलेल्या, उकडलेले हिरवे वाटाणे (मटार) ५० ग्रॅम, अर्धा कप खवलेले खोबरे, १ उकडलेला बटाटा, साखर १ चमचा, चवीनुसार मीठ, १ लिंबू , ४ चमचे रिफाइंड तेल, कोथिंबीर २ चमचे 
कृती ः १.भात धुवून त्यातील पाणी पूर्णतः काढून टाकावे. त्यावर साखर, हळद आणि मीठ घालून एका बाजूला ठेवावे. उकडलेल्या बटाट्याचे अर्धा इंच याप्रमाणात तुकडे करावेत आणि बाजूला ठेवावेत. 
२. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी दाणे, कढी पत्ता घालावा , मोहरी तडतडली, की हिरवी मिरची, कांदा परतावा. 
३. यात बटाटा, मटारचे दाणे घालून २ मिनिटे वाफ द्यावी . 
४. यात ठेवलेला भात घालावा आणि हे मिश्रण खूप उत्तम पद्धतीने मिक्‍स करावेत. 
५. खोबरे घालून मिक्‍स करावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या