टी-ॲक्सेसरीजची क्रेझ
टी-ट्रेंड्स
चहा या पेयाने बहुतेक सर्व भारतीयांच्या मनात स्थान मिळविले आहे. चहा या पेयाची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे, की त्यावरून विविध ॲक्सेसरीज आणि वस्तूदेखील बाजारात मिळू लागल्या आहेत. याविषयी...
किटली लॅम्प शेड्स
इंटिरिअर क्षेत्राचा झालेला विस्तार बघता विविध हॉटेल्स किंवा चाय प्रेमी कट्ट्यांवर कॅलिग्राफी करून किटलीच्या आकाराच्या लॅम्प शेड्स लावून त्या खोलीचे सौंदर्य आणखी वाढविले जाते. लॅम्पशेड नको असल्यास किटलीच्या आकाराच्या एका मातीच्या भांड्यात पणती ठेवून घरातील खिडकी सहज सुंदर प्रकाशित करता येते.
कॅलिग्राफी टीशर्ट
चहाची लोकप्रियता बघून विविध फॅशन डिझायनर्सनी चहाच्या कपबशीला आणि कोट्सला कपड्यांवर स्थान दिले आहे. यामध्ये सिंगल आणि कपल टीशर्ट दोन्ही उपलब्ध आहेत. हे सर्व टीशर्ट मोठ्या शहरात नामांकित दुकानात किंवा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
टी स्टेनर्स
किचन गॅजेट्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला हा प्रकार म्हणजे ‘टी स्टेनर्स’. हे वेगवेगळ्या आकारात मिळतात. हे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर, आपल्या जवळच्या किचन गॅजेट्सच्या दुकानात सहज मिळतात. स्वयंपाकघराच्या सजावटीला शोभतील असे निवडावे.
तुम्ही जर चहा प्रेमी असाल तर या ॲक्सेसरीज जरूर खरेदी कराव्यात आणि आपली आवड जपावी.
टी कोस्टर्स
बाजारात सध्या गृहसजावटीसाठी कापडी, प्लॅस्टिक, लाकडी अशी टी कोस्टर उपलब्ध आहेत. यामध्ये देखील चहा प्रेमींमासाठी टी कोटस, चहाच्या कपची, किटलीची, वाफेची डिझाईन्स पाहायला मिळतात.