ग्रहमान : २८ एप्रिल ते ४ मे २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

ग्रहमान

ग्रहमान : २८ एप्रिल ते ४ मे २०१८

मेष : या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल. कामात थोडी निराशा येईल, पण काम चालूच ठेवाल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील. पैशाची चिंता मिटेल. सहकारी व हितचिंतकांची कामात मदत होईल. हौसेने एखादे काम हाती घ्याल, त्यात थोडा त्रास होईल. नोकरीत अतिउत्साहाच्या भरात कोणतेही आश्‍वासन देऊ नका. कामात थोडा धीर धराल. सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करावी. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रकृतीमान सुधारेल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थोडा हात सैल सोडाल. 
वृषभ : स्वकर्तृत्त्वावर विश्‍वास ठेवून कार्य करीत राहिला तर यश नक्की येईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. भांडवलाची तरतूद झाल्याने प्रगतिपथावर राहाल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील. वरिष्ठ कामात न मागता सवलत देतील. परदेशव्यवहारांना चालना मिळेल. घरात मंगलकार्य ठरेल. फावल्या वेळात तुम्ही छंद जोपासू शकाल. महिलांना सभोवतालच्या व्यक्तींचे अंदाज अचूक येतील. 
मिथुन : व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करून फायदा मिळवाल. तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास उत्तम काळ आहे. काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. हातातील कामे पूर्ण होतील. नोकरीत आश्‍वासने देण्यापूर्वी तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, याचा अचूक अंदाज घ्यावा. आवडीचे काम मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. घरात मुलांकडून सकारात्मक विचारांची देवघेव होईल. चांगली बातमी कळेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील. 
कर्क : दिर्घकाळानंतर चांगले ग्रहमान लाभले आहे, त्याचा फायदा घ्यावा. व्यवसायात ठोस पावले उचलून कृती कराल. मनावरचे दडपण दूर होईल. अपेक्षित पैसे हातात मिळाल्याने नव्या योजना साकार होतील. परदेश व्यवहाराची नवीन संधी चालून येईल. नोकरीत उत्साहवर्धक वातावरण लाभेल. ओळखीचा उपयोग होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ मिळेल. घरात लांबलेले कार्य निश्‍चित ठरेल. परदेशगमनाची संधी चालून येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांना कामाची योग्य दिशा मिळेल. उत्साह वाढेल. 
सिंह : कामात आळस झटकून प्रगती करावी. सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळवावे. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांचा उपयोग कराल. भागीदाराच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. नोकरीत ""आपले काम बरे आणि आपण बरे'' हे धोरण उपयोगी पडेल. नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब सहन करावा लागेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांचा सहवास लाभेल. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. 
कन्या : मानसिक आनंद मिळवून देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ चांगल्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. अडीअडचणींवर मात करून कामात प्रगती कराल. नवीन आखलेले बेत सफल होतील. आर्थिकस्थितीही सुधारेल. नोकरीत तुमच्या सूचनांचा विचार वरिष्ठ करतील. मान व प्रतिष्ठा मिळवून देतील. आवश्‍यक ती कामे ओळखीचा उपयोग होऊन होतील. घरात चांगला बदल घडेल. मनोकामना सफल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. 
तूळ : प्रयत्न व कष्ट यांची योग्य सांगड घातलीत तर यश फार दूर नाही, असा अनुभव येईल. व्यवसायात शिस्त व योग्य नियोजनाने कामे होतील. पैशामुळे कोणाशी हितसंबंध दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मध्यस्थांवर सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवावी. नोकरीत हाताखालच्या व्यक्तींकडून काम कसे करून घेता यावर यशाची भिस्त राहील. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलतीही देतील. घरात किरकोळ मानापमानाचे प्रसंग उठतील. शांत रहा, दगदग, धावपळ कमी करावी. महिलांनी स्वतःचा छंद जोपासावा. 
वृश्‍चिक : आशावादी राहाल. स्वप्ने साकार होतील. व्यवसायात ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी मिळेल. फायदा मिळवून देणारी कामे मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत नवीन कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काम मिळेल. वरिष्ठ मतलब साध्य करण्यासाठी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात शुभकार्याची नांदी होईल. नातेवाईक, आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. 
धनू : सर्व आघाड्यांवर सज्ज राहावे. तुमचे प्रत्येक काम महत्त्वाचे असेल. व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित मांडल्याशिवाय सुरवात करू नये. महत्त्वाची कामे ----- हाताळून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. कमाई मनाप्रमाणे होईल. नोकरीत गरजेनुसार कामांना अग्रक्रम राहील. मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याकडे कल राहील. प्रवासयोग संभवतो. घरात गृहसजावट, नवीन खरेदीचे मनसुबे ठरतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. 
मकर : मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. व्यवसायात कामानिमित्ताने विविध सरावरील व्यक्तींशी भेटीगाठी होतील. नवीन कल्पना मनात येतील. पैशाचा ओघ राहिल्याने जुनी देणी देता यतील.कामानिमित्ताने प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. पगारवाढ मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. घरात छोटा समारंभ साजरा कराल. आत्मविश्‍वास वाढेल. तरुणांना नवीन संधी आकर्षित करतील. प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. 
कुंभ : मनाला दिलासा देणारे ग्रहमान लाभल्याने निःश्‍वास टाकाल. व्यवसायात नेहमीच्या कामाचा तणाव असेल तरीही तुम्ही त्याची पर्वा करणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने अनेक बेत पूर्ण होतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल. वेळेचे गणित मांडून कामे उरकावीत. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील व जादा सवलत देतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात शुभ समाचार कळेल. वेळ मजेत जाईल. छोटीशी सहल काढाल. महिलांना मनःशांती लाभेल. 
मीन : ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल. मनातील अनेक बेत साकार करण्यासाठी पावले उचलाल. व्यवसायात वेळेत कामे पूर्ण केलीत तर बराच फायदा होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. नवीन योजनांना मुहूर्त लाभेल. नोकरीत विशिष्ठ कामासाठी परदेशगमनाची संधी मिळेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. घरात सांसारिक जीवनात आनंद देणारी बातमी कळेल. सुवार्ता मनाला उभारी देईल. प्रकृतीमान सुधारेल.

संबंधित बातम्या