ग्रहमान : २६ मे ते १ जून २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 24 मे 2018

ग्रहमान
 

मेष : व्यवसाय व नोकरीत उत्तम संधी चालून येतील. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहील. शुक्राची साथ दिलासा देईल. नवीन मोठ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. सर्व कार्यात यश मिळेल. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. नोकरदारांना विशेष लाभ होतील. महिलांनी घाईने निर्णय घेऊ नयेत. कामे मनाप्रमाणे होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. 

वृषभ : धार्मिक व सामाजिक कामात विशेष रस घ्याल. अर्थप्राप्ती मनाप्रमाणे होईल. व्यवसायात अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. परदेशगमनाची संधी येईल. नोकरीत बदल किंवा बदलीस अनुकूल वातावरण लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. महिलांना आवडत्या छंदातून प्रसिद्धी मिळेल. मंगलकार्य घरात ठरतील. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल. 

मिथुन : मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चीज होईल. अनुभवांचा उपयोग होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत तणावाचे वातावरण दूर होईल. वरिष्ठांचे गैरसमज दूर होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचे आरोग्य चांगले राहील. आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. विद्यार्थ्यांना अभ्यासास पूरक ग्रहमान लाभेल. 

कर्क : मनातील सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बराच काळ रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात परिस्थितीनुसार तडजोडीचे धोरण ठेवावे. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. हितचिंतकांची साथ मिळेल. नोकरीत पैशाच्या हव्यासापोटी चुकीचा मार्ग अवलंबू नये. सहकारी व वरिष्ठांची मदत आवश्‍यक तेथे घ्यावी. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे. 

सिंह : स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखून पुढे जावे. कामाचा व्याप वाढेल. व्यवसायात आर्थिक बाबतीत काटेकोर राहून व्यवहार करावे लागतील. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. मानसन्मान मिळतील. महिलांनी घरात सुसंवाद साधून कामे उरकावीत. मुलांनी अतिधाडस करू नये. विद्यार्थी, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना परदेशगमनाची संधी. 

कन्या : महत्त्वाची कामे धसास लागतील. आर्थिक प्रगती उत्तम राहील. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. चांगले बदल घडतील. दगदग धावपळ वाढेल. नोकरीत महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पेलाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पैशाचे व्यवहारात बेफिकीर राहू नये. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. सहजीवनाचा आनंद उपभोगाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करू नये. 

तूळ : धार्मिक, सामाजिक कामातून प्रसिद्धी मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. कामाच्या पद्धतीत बदल करुन फायदा मिळवाल. अचानक धनलाभाची शक्‍यता. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांचा मूड पाहून आपल्या मागण्या मांडाव्यात. कामात गुप्तता राखावी. हितशत्रुंपासून सावध राहावे. महिलांना घरात जबाबदारीची भूमिका पार पाडावी लागेल. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व अधिक प्रशंसनीय राहील. विद्यार्थ्यांनी डोके शांत ठेवून संयमाने गावावे. 

वृश्‍चिक : व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त कसा फायदा घ्यायचा ते ठरवावे. नवीन योजना साकार करताना सर्वांचे सहकार्य लाभेल. नोकरीत कामांना गती मिळेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. नावलौकिक मिळवाल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगतिपथावर राहणे शक्‍य होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. 

धनु : व्यवसाय नोकरीत अपेक्षित यश मिळेल. मनातील इच्छा आकांक्षा फलद्रुप होतील. व्यवसायात कामांना मूर्त स्वरुप येईल. महत्त्वाचे करारमदार ठरतील. पैशाचा अतिमोह मात्र टाळावा. बेकारांना नोकरी मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना आरोग्याची उत्तम साथ मिळेल. संतती कडून आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. तरुणांना जीवनात अपूर्व संधी चालून येतील. 

मकर : आर्थिक बाबतीत तुम्ही सतत विचार करता त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी करावा. दूरदृष्टी ठेवून आलेल्या संधीचा फायदा घ्यावा व पुढे जावे. व्यवसायाची अनेक दालने तुम्हाला खुली होतील. नोकरीत तूर्तास कोणताही बदल करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. कलाकार, खेळाडूंना घवघवीत यश मिळेल. महिलांना आपल्या आवडत्या छंदात वेळ घालवता येईल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान आहे. 

कुंभ : अनेक अडचणीवर मात करुन कामात प्रगती कराल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जाहिरात व आधुनिक पद्धतीचा वापर कराल. उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. खेळत्या भांडवलाची सोय हितचिंतक व बॅंकाची मदत होईल. नोकरीत कर्तव्याला प्राधान्य देऊन कामे पूर्ण कराल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा ठेवू नये. महिलांनी सर्वांनी मिळते जुळते घेऊन वागावे. 

मीन : ग्रहमान व वातावरणाची साथ मिळेल. अनेक कामातून यशश्री मिळेल. आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत राहील. व्यवसायात व नोकरीत मानसन्मान मिळतील. नवीन कामे हाताळण्याची संधी मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांना मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत चिंता कमी होईल. चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.

संबंधित बातम्या