ग्रहमान - १६ ते २२ जून २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 15 जून 2018

ग्रहमान

मेष - नोकरी व्यवसायात आवश्‍यक ते फेरबदल कराल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ती चिकाटीने पूर्ण करावीत. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात तत्पर राहावे व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचलावा. कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. महिलांचा वेळ मजेत जाईल. प्रिय व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

वृषभ - नोकरी व व्यवसायात डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कामाचे नियोजन कराल. त्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक गोष्टींची पूर्तताही होईल. हितचिंतकांची मदत उपयोगी पडेल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. कौटुंबिक सोहळा साजरा कराल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 

मिथुन - पैशाची स्थिती चांगली राहील. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे आखलेले बेत सफल होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. नवीन पदभार स्वीकारला. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सांसारिक जीवनात गोड व उत्साहवर्धक बातमी कळेल. छोटा प्रवास कराल. पाहुण्यांची सरबराई कराल. तरुणांचे विवाह पार पडतील. 

कर्क - व्यवसायात बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. लवचिक धोरण ठेवावेत तर सर्वांशी संबंध सलोख्याचे राहतील. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. पाहुण्यांचे स्वागत आनंदाने कराल. खेळाडू, कलाकारांना त्यांचे क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. 

सिंह - व्यवसाय व नोकरीत प्रगतीचा आलेख वाढत जाईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांनी कार्यतत्पर राहावे. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. मेजवानीचा योग येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. 

कन्या - स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कामाचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात चोखंदळ राहाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामाचा कंटाळा आला तरी हातातील कामे वेळेत पूर्ण कराल. कामात गुप्तता राखावी. महिलांनी आवडत्या छंदात मन रमावावे. नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची थोडी कुरकूर राहील. तरुणांनी अतिधाडस टाळावे. 

तूळ - नोकरी, व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर फायदा होईल. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. यशप्राप्ती होईल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. पैशाचे व्यवहारात गाफील राहू नये. जोडधंद्यातून कमाई होईल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. जुने स्नेहसंबंध पुन्हा निर्माण होतील. तरुणांचे विवाह ठरतील. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 

वृश्‍चिक - अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवून कौतुकास पात्र ठराल. व्यवसायात कामामुळे दगदग वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल. स्वतःचे काम करुन इतरांनाही कामात मदत कराल. महिलांना सामाजिक कामात रस वाटेल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. घरात नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. 

धनू - मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसायात ईप्सित साध्य करण्याचा चंग बांधाल. हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल. नोकरीत हटवादी वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. सहकाऱ्यांच्या मर्मावर बोटे ठेवून टीका करण्याचे टाळावे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. तरुणांनी अविचाराने वागू नये. सामूहिक कामात मन गुंतवावे. 

मकर - कामाचा ताण वाढला तरी कर्तव्यात कसूर करू नये. व्यवसायात अनपेक्षित अडचणी आल्या तरी निराश न होता कार्य करीत राहावे. यश हमखास मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनिक होऊ नये. नोकरीत पैशाच्या मोहापासून चार हात लांब राहावे. सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यानंतर मत प्रकट करावे. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागावे. कामानिमित्ताने प्रवासाचे योग आहे. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या दिमतीत जाईल. बराच पैसे खर्च होतील. खेळाडूंना प्रसिद्धीचे योग आहे. 

कुंभ - संथ गतीने पण हमखास यशाचा मार्ग निवडाल. व्यवसायात कामाच्या कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत आळस झटकून कामे उरकावीत. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन काटेकोरपणाने करावे. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. यशदायक ग्रहमान आहे. 

मीन - नोकरी व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाकावीत. राग आला तरी प्रकट करू नये. हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी तात्त्विक मतभेद टाळावेत. भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क मिळतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

संबंधित बातम्या