ग्रहमान : ३० जून ते ६ जुलै २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 28 जून 2018

ग्रहमान 

मेष : राशीच्या अनुकूल रवी, मंगळ, शुक्र असल्याने कामे यशस्वी होतील; मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. व्यवसायात माणसांची पारख करणे महत्त्वाचे राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. व्यवसाय विस्ताराचे बेत मनात घोळतील. नोकरीत पैशाच्या मोहापासून दूर राहावे. आर्थिक लाभ होतील. महिलांचा घरासाठी खर्च होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. 

वृषभ : बराच काळ रेंगाळलेल्या कामांना गती येईल. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत परदेशगमनाचे योग आहे. कामामुळे नवीन ओळखी होतील. नोकरदार महिलांना कामात कौशल्य दाखवता येईल. कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. मनाप्रमाणे वागता येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

मिथुन : महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित कामे मिळतील. नोकरीत नवीन कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. नोकरदार महिलांना कामाचा कंटाळा आला असेल तर मित्र-मैत्रिणींसमवेत छोटी सहल काढावी. महिलांनी अलिप्त धोरण ठेवावे. वादविवाद टाळावेत. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्‍यक आहे. 

कर्क : व्यवसायात ध्येयधोरणे ठरवून कृती करावी. स्वतःची कुवत ओळखून कामे स्वीकारावी. अति धाडस टाळावे. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. घरात महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. कामाचा उरक दांडगा राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान. 

सिंह : कामाच्या बाबतीत घेतलेले निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. नवीन घडामोडी घडतील. नोकरीत सहकाऱ्यांवर विसंबून राहू नये. कामातील बेत गुप्त ठेवावेत. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांनी वादविवाद टाळावेत. हट्टी, हेकेखोर स्वभावाला बंधनात ठेवावे. विद्यार्थी, कलावंत, खेळाडूंना यशदायी ग्रहमान. 

कन्या : महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. स्वप्ने साकार होतील. व्यवसायात अति उत्साहापोटी नवीन कामे स्वीकाराल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत आर्थिक आवक सुधारेल. कामात बढतीचे योग. लांबच्या प्रवासाचे बेत निश्‍चित होतील. महिलांना अपेक्षित चांगली बातमी कळेल. आनंद व उत्साह वाढेल. घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील. तब्येतीची साथ मिळेल. 

तूळ : कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात नवीन योजना हाती घ्यावी. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची साथ मिळावी. कर्तव्यतत्पर राहावे. घरात महिलांना संततीबाबत चांगली बातमी कळेल. प्रियजनांच्या गाठीभेटीने आनंद मिळेल. अनावश्‍यक खर्च टाळावेत. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा. 

वृश्‍चिक : व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. आर्थिक बाबतीत मात्र फारशी हालचाल करू नये. नोकरीत तुमच्या कामामुळे तुमचे महत्त्व वरिष्ठ व सहकाऱ्यांना कळून येईल. बेरोजगार व्यक्तींनी अतिचिकित्सा न करता नोकरी स्वीकारावी. महिलांचा मूड बदलता राहील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहे. 

धनू : कामाचे व पैशाचे नियोजन योग्य करून कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे लागेल. कामातील बदल भविष्यात लाभदायी ठरेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे. कामात कमीत कमी चुका करून प्रगती करावी. पूर्वी काही कारणाने लांबलेल्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे. मनन व चिंतन करावे. विद्यार्थ्यांनी उजळणी योग्य प्रकारे करावी. 

मकर : महत्त्वाकांक्षा व जिद्द बाळगून अर्धवट कामे मार्गी लावाल. कर्तव्यात कसूर करू नये. व्यवसायात पैशाचे व्यवहार करताना दक्ष राहावे. नोकरीत हलके कान ठेवून गैरसमजुतीचे घोटाळे टाळावेत. कामाचा वेग वाढता राहील. महिलांनी तब्येत सांभाळून दगदग धावपळ करावी. सलोख्याचे संबंध ठेवावेत. आवडत्या छंदात मन रमवावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास सखोलतेने करावा. तरुणांनी लहरीपणा टाळावा. 

कुंभ : ग्रहमान व वातावरणानुसार ध्येयधोरणात बदल कराल. व्यवसायात लवचिकता आणून स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न कराल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत तुमच्या तत्त्वाला मुरड घालून तडजोड करावे. आळस झटकून कामाला लागावे. महिलांनी मुलांकडून प्रगतीची चांगली बातमी कळेल. नवीन खरेदी होईल. कामाचे समाधान मिळेल. 

मीन : नशिबाची साथ मिळाल्याने व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती कराल. पैशाची चिंता मिटेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची संधी देतील. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांना मनःशांती मिळेल. सलोख्याचे धोरण ठेवावे. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांना पूरक ग्रहमान.

संबंधित बातम्या