ग्रहमान : २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८

अनिता सं. केळकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

ग्रहमान

मेष : रवी, मंगळ अनुकूल आहेत. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित कामे मिळतील. नोकरीत नवीन कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. महिलांनी अलिप्त धोरण ठेवावे. नोकरदार महिलांना कामाचा कंटाळा आला असेल तर मित्रमैत्रीणीसमवेत छोटी सहल काढावी. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. 

वृषभ : व्यवसायात ध्येयधोरणे ठरवाल. स्वतःची कुवत ओळखून कामे हाती घ्यावीत. अतिधाडस करु नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. घरकामातही तत्पर राहाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान. 

मिथुन : व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल करु नयेत. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत तुमच्या कामामुळे तुमचे व कामाचे महत्त्व वरिष्ठ व सहकाऱ्यांना कळून येईल. बेरोजगारांना अतिचिकीत्सा न करता नोकरी स्वीकारावी. महिलांचा कामाचा झपाटा चांगला राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. 

कर्क : माणसाची पारख करणे व्यवसायात महत्त्वाचे राहील. प्रत्येक पाऊल टाकताना विचाराने टाकावे. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायात नवीन विस्ताराचे बेत मनात घोळतील. नोकरीत पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर राहावे. आर्थिक लाभ होतील. महिलांचा गृहसजावटीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. 

सिंह : बराच काळ रेंगाळलेली कामे गती घेतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. कामामुळे नवीन ओळखी होतील. नोकरदार महिलांना कामातील कौशल्य दाखवता येईल. महिलांना कौटुंबीक स्वास्थ्य मिळेल. मनाप्रमाणे वागता येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल. 

कन्या : कामाचे व पैशाचे योग्य नियोजन करुन कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात सतर्क राहावे लागेल. कामातील बदल भविष्यात फायदा मिळवून देतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे. कामात बिनचूक राहणे फायद्याचे. महिलांना पूर्वी लांबवलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. आनंदाची बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी संभ्रमावस्था टाळावी. 

तूळ : "तेरड्याचा रंग तीन दिवस'' असे धोरण ठेवाल. ग्रहमान व वातावरणानुसार बदलत राहाल. व्यवसायात लवचिक धोरण अवलंबाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत विक्षिप्त व तऱ्हेवाईकपणा कमी करावा. तत्वाला मुरड घालून तडजोड करावी. महिलांना मुलांकडून चांगली बातमी कळेल. पैशाची चिंता मिटेल. 

वृश्‍चिक : तुमचे कामाचे बाबतीत घेतलेले अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन घडामोडी घडतील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. सहकाऱ्यांवर फार विसंबून राहू नये. कामाचे बेत गुप्त ठेवावे. महिलांनी तात्त्विक मुद्यावरुन होणारे वादविवाद टाळावेत. कलावंत, राजकारणी, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. 

धनू : नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात पुढे जाल. नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सखोलतेने विचार कराल. नोकरीत अनपेक्षित कामे होतील. वरिष्ठ नवीन संधी देतील. त्याचा फायदा उठवावा. बेरोजगांरांना ही नोकरीची संधी मिळेल. महिलांनी सलोख्याचे धोरण ठेवावे. तर लाभ होईल. मनःशांती मिळेल. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे. 

मकर : कर्तव्यात कसूर करु नये. महत्त्वाकांक्षा व जिद्द बाळगून अर्धवट कामे मार्गी लावाल. अवघड कामात यश मिळवाल. व्यवसायात व्यवहारी धोरण ठेवलेत तर फायदा होईल. पैशाचे व्यवहार करताना चोख राहावे. नोकरती कुसंगत टाळावी. हलके कान ठेवून गैरसमजुतीचे घोटाळे टाळावेत. कामाचा झपाटा चांगला राहील. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे. दगदग, धावपळ कमी करावी. प्रतिष्ठा मिळेल. 

कुंभ : स्वप्ने साकार होतील. व्यवसायात अतिउत्साहापोटी नवीन कामे स्वीकाराल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. नोकरीत आर्थिक आवक सुधारेल. कामात बढतीचे योग आहे. दुरच्या प्रवासाचे बेत निश्‍चित होतील. महिलांना अपेक्षित चांगली बातमी कळेल. आनंद व उत्साह वाढेल. कलाकार, खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल ग्रहमान. 

मीन : नाचरेपणा कमी करुन व्यवसायात लक्ष द्यावे. कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. सहकारी व वरिष्ठांची साथ मिळेल. घरात महिलांना संतती संदर्भात गोड बातमी कळेल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. अनावश्‍यक खर्च मात्र टाळावेत. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.

संबंधित बातम्या