ग्रहमान : १८ ते २४ ऑगस्ट २०१८

अनिता केळकर    
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

ग्रहमान 

मेष : मंगळासारखा आक्रमक ग्रह तुमच्या राशीचा स्वामी असल्याने व्यवसायात अचूक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरतील, नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांच्या हातून उत्तम कामगिरी होईल. कामानिमित्ताने प्रवास योग आहे. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांचा वेळ पाहुण्यांची ------ सरबराई करण्यात जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी आळशीपणा झटकून अभ्यासाला लागावे. यश हमखास येईल. 

वृषभ : व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामात कार्य तत्पर राहाणे आवश्‍यक. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून जेवढा फायदा मिळवता येईल तेवढा मिळवावा. नोकरीत तुमच्या कामामुळे तुम्हाला व तुमच्या शब्दाला मान मिळेल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. सण-समारंभाच्या निमित्ताने महिलांची बरीच खरेदी होईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. तरुणांनी अतिसाहस टाळावे. विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी मनाची एकाग्रता ठेवावी. 

मिथुन : तुम्हाला पूरक असे ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात प्रगतीस अनुकूल काळ आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. महत्त्वाचे करारमदार होतील. नोकरीत टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतील. दगदग धावपळ वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता. महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांना यशदायी ग्रहमान. 

कर्क : कामात नवीन आव्हाने स्वीकारून ती तडीस नेण्याचा मानस असेल. व्यवसायात बदल करताना मोठी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. उधार उसनवार टाळावे. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमचेवर सोपवतील. त्यात यशही मिळेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांचा आत्मविश्‍वास वाढेल. प्रियजनांसमवेत छोटीशी सहल काढाल. मुलांच्या मागण्या, हट्ट पुरवाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मित्र-मैत्रिणींवर विसंबून राहू नये. 

सिंह : ग्रहमान व वातावरणाची उत्तम साथ मिळाल्याने उत्साह ओसंडून जाईल. व्यवसायात अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. मनातील मोठे बेत प्रत्यक्षात साकार होतील. जमाखर्चाचे गणित समसमान राहील. नोकरीत भावनेच्या भरात जादा कामे ओढवून घेऊ नये. बेकारांना नोकरी मिळेल. घरात नवीन वाहन, वास्तूंची खरेदीत महिलांचा बराच वेळ जाईल. पाहुण्यांची ये-जा राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. 

कन्या : जीवनात एक नवा दृष्टिकोन ठेवून कामाला लागाल. तुमची झालेली कुचंबणा नाहीशी होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. ती स्वीकारण्यापूर्वी स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखावी. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सहकाऱ्यांवर फारसे विसंबून राहू नये. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. दगदग धावपळ शक्‍यतो टाळावी. विद्यार्थ्यांनी नाचरेपणा करू नये. 

तूळ : व्यवसायात विस्तार करून उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवाल. बॅंका व हितचिंतक यांची मदत खेळते भांडवल उभे करताना होईल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे हातावेगळी कराल. नोकरीत केलेल्या कामाचा आनंद मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. अंगी असलेल्या प्राविण्याचा उपयोग करून यश संपादन कराल. नोकरदारांना अनपेक्षित लाभाची शक्‍यता. महिलांनी घरातील वादविवाद टाळावेत व आवडत्या छंदात मन रमवावे. तरुणांना मनपसंद जीवनसाथी मिळेल. 

वृश्‍चिक : ग्रहमान संमिश्र फळ देईल. तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याला भरपूर वाव मिळेल. व्यवसायात आधुनिकीकरण करून नवीन विचारांचा अवलंब कराल. प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. नवीन आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे होईल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागल्याने चिडचिड होईल. "शब्द हे शस्त्र आहे' हे लक्षात ठेवावे. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावा. महिला चांगल्या कामासाठी खर्च करतील. आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीमान चांगले राहील. विद्यार्थ्यांना शुभ ग्रहमान. 

धनू : तुमच्या जिद्दी व प्रयत्नवादी स्वभावाचा फायदा होईल. व्यवसायात कामात बदल करून नवीन उत्पन्नाचे साधन शोधाल. नवीन योजनांना मूर्त स्वरूप येईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरदार व्यक्तींनी कार्य तत्पर राहावे. जोडधंदा फायदा मिळवून देईल. घरातील महिलांच्या शब्दाला मान मिळेल. रेंगाळलेले प्रश्‍न तडीस लागतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा. यश हमखास मिळेल. 

मकर : युक्ती व शक्तीचा वापर करून व्यवसायात यश संपादन कराल. योग्य व्यक्तीची निवड योग्य कामासाठी कराल. कौशल्याचा वापर करून अभिनव धाडस कराल. पूर्वी लांबवलेले बेत व आर्थिक कामे गती घेतील. नोकरदार व्यक्तींनी मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करू नये. नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे विचार जरी पटले नाहीत तरी प्रतिउत्तर देऊ नये. मोफत सल्ला टाळावा. महिलांनी घरातील मोठ्यांचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्यावा. आप्तेष्ट व प्रियजन यांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी आळशीपणा करू नये. 

कुंभ : अनुकूल ग्रहमान व वातावरणाची साथ लाभेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मनाविरुद्ध जाऊन मोठी कामे करावी लागतील. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. वसुलीकडे लक्ष द्यावे लागले. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची तुमचेकडून बरीच अपेक्षा राहील. तडजोडीचा अवलंब करून कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. आत्मविश्‍वास वाढेल. महिलांचा वेळ आवडत्या छंदात मजेत जाईल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगतील. चांगली बातमी कळेल. अपेक्षित पत्रे येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना गोंधळून जाऊ नये. 

मीन : कामातील प्रगतीचा आलेख चढत जाईल त्याचा आनंद मिळेल. आर्थिक स्थितीही उत्तम असेल. व्यवसायात बाजारातील चढ-उतारांकडे लक्ष द्यावे. त्याप्रमाणे कामात लवचिक धोरण ठेवावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे नेटाने पूर्ण करावे. नोकरीत विनाकारण होणारी धावपळ कमी होईल. कामात बदलाची शक्‍यता. बेकारांना नवीन कामाची संधी. महिलांचा सणाच्या निमित्ताने नटण्या-मुरडण्यात वेळ जाईल. खर्च वाढेल. नातेवाइकांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 
 

संबंधित बातम्या