ग्रहमान : २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

अनिता केळकर  
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

ग्रहमान

मेष ः  नोकरी - व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित बदल होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. दगदग, धावपळ वाढेल. महिलांनी अलिप्त धोरण ठेवून आपल्या छंदात मन रमवावे. कामाचा मनस्वी कंटाळा आला असेल तर कुटुंबासमवेत छोटी सहल काढावी. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. यश मिळेल.

वृषभ ः नोकरी व व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल करू नये. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पाऊले टाकावीत. राग आला तरी प्रकट करू नये. शांत राहावे. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांनी तात्त्विक मुद्‌द्‌यांवरून होणारे इतरांशी वादविवाद टाळावेत. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गोंधळ करू नये.

मिथुन ः पैशाची सध्याची स्थिती उत्तम राहील. त्यामुळे तुमचा उत्साह व आनंद द्विगुणित होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. महिलांना घरात प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल. पाहुण्यांची ये-जा राहील. खेळाडू, कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. तरुणांनी अतिसाहस करू नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल ग्रहमान.

कर्क ः बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. कामात बदल करून नवीन विस्ताराचे बेत मनात येतील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करून कामे ओढवून घेऊ नये. पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर राहावे. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. अनपेक्षित लाभ होईल. विद्यार्थ्यांनी मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

सिंह ः माणसांची पारख करणे जिकिरीचे जाईल. खरे व खोटे यातील फरक ओळखा. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रत्येक पाऊल विचाराने टाकावे. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत परदेशगमनाचे योग येतील. नवीन ओळखी होतील. महिलांनी कामाचा उरक पाडावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी स्वतःचे कामाचे कौशल्य वाढवावे. 

कन्या ः कामाचे व पैशाचे योग्य नियोजन करून कामात उलाढाल वाढवाल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिकीकरण कराल. नोकरीत कामात बिनचूक राहून वरिष्ठांना चुकांवर बोटे ठेवण्याची संधी देऊ नये. मनाविरुद्ध वागावे लागेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. तुमचे व तुमच्या कामाचे कौतुक घरातील व्यक्तींकडून होईल. पूर्वी दुर्लक्षित केलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतील.

तूळ ः वातावरणानुसार लवचिक धोरण ठेवलेत तर फायदा होईल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत तत्त्वाला मुरड घालून तडजोड करावी लागेल. नको त्या कामात बराच वेळ व पैसे खर्च होतील. कौटुंबिक स्वास्थ्याचा अनुभव घ्याल. महिलांच्या मनाप्रमाणे कामे होतील. केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांचे  विवाह ठरतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणे आवश्‍यक. कदाचित परीक्षा अचानकपणे जाहीर होईल.

वृश्‍चिक ः ग्रहमान अनुकूल असल्याने सुप्त इच्छा - आकांक्षा सफल होतील. पूर्वी केलेल्या कामाचे यश आर्थिक स्वरूपात मिळेल. व्यवसायात नवीन घडामोडी घडतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामात सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नये. कामानिमित्ताने प्रवास कराल. घरात लांबचे नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. आनंदाची बातमी कळेल. कलाकार, खेळाडूंना, राजकारणी व्यक्तींना मागणी राहील. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

धनू ः नोकरी - व्यवसायात स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. कुणावरही अवलंहबून राहू नये. आर्थिक गुंतवणूक करण्याआधी सखोलतेने विचार करावा. पैशाची तंगी थोडी जाणवेल. परदेशव्यवहाराच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहाल. बेकारांना नवीन नोकरीची संधी चालून येईल. महिलांनी ऐकीव बातमीवर विश्‍वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. भागीदाराचे विचार न पटल्याने वादविवाद होतील. तरुणांनी अविचाराने वागू नये. विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून अभ्यासाला लागावे.

मकर ः ’रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती तुमची असेल. व्यवसायात चालू कामापेक्षा वेगळे काम स्विकाराल आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. शेअर्ससारख्या जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. नोकरीत कामामुळे वरिष्ठ जादा सवलती व सुविधा देतील. मात्र त्याचा गैरफायदा घेऊ नये. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. नातेवाईक, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.

कुंभ ः मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद निराळाच असतो, त्याची मजा चाखाल. चांगल्या ग्रहमानाचा लाभ घ्यावा. व्यवसायात प्रगतीला पूरक वातावरण मिळेल. नवीन ओळखी होतील. पैशाची तजवीज करुन भविष्यात फायदा उठवाल. नोकरीत कामाच्या नवीन जबाबदाऱ्या पेलाल. पगारवाढ व बढती मिळण्याची शक्‍यता आहे. तरुणांचे विवाह ठरतील. घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहील. प्रकृतीची साथ मिळेल. 

मीन ः चंचल व अविचारी स्वभावाला लगाम घालून संयमाने वागावे. व्यवसायात मनातील स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळेल. ओळखीच्या उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. पैशाचे वसुली झाल्याने चार पैसे हातात शिल्लक राहतील. नोकरीत कामाचा ताण व कष्ट कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. सहकारी व वरिष्ठांची मदत याकामी होईल. घरात तडजोडीचे धोरण ठेवाल. घरगुती प्रश्‍न मिटून मतभेद नाहीसे होतील. आनंदाची बातमी कळेल. कलावंत व खेळाडूंना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा व मानसन्मान मिळतील.

संबंधित बातम्या