ग्रहमान : २ ते ८ सप्टेंबर

अनिता केळकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

ग्रहमान
 

मेष - साथीला ग्रहमान फारसे अनुकूल नाही. तरी तब्येतीची काळजी घ्यावी. कफ व पित्त विकारांवर वेळीच उपचार करावा. व्यवसायात तूर्तास कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. अनावश्‍यक खर्चावर बंधने ठेवावीत. नोकरदार व्यक्तींनी कोणतेही मतप्रदर्शन करू नये. कामात चोखंदळ राहावे. महिलांनी बोलता वागता तारतम्य बाळगावे. वादविवाद टाळावेत. 

वृषभ - व्यवसायात कामांना म्हणावी तशी गती मिळणार नाही, तरी नाराज होऊ नये. खेळत्या भांडवलाची उभारणी करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात तुमच्याकडून बरीच अपेक्षा ठेवतील. दगदग, धावपळ होईल. महिलांना घरकामात बराच वेळ घालवावा लागेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सतर्क राहावे लागेल. 

मिथुन - कामात व व्यवसायात मनाप्रमाणे प्रगती होईल. निर्णय अचूक ठरतील. पैशाची चिंता मिटेल. अनपेक्षित पैशाची ऊब सुखावह ठरेल. नोकरीत लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. तरुणांचे विवाह ठरतील. घरात महिलांना नवीन खरेदीचा आनंद लुटता येईल. आनंददायी घटना मन प्रफुल्लित करेल. 

कर्क - तब्येतीची साथ उत्तम राखण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक वाटेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शत्रूंच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. कामातील बेत गुप्त ठेवावेत. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांना दगदग, धावपळ करावी लागल्याने थोडी विश्रांतीची गरज भासेल. 

सिंह - व्यवसायात कामाचा उरक पाडावा. नवीन कामे हाती घेण्यापूर्वी त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करावा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत अडथळे, अडचणी आल्या तरी कामाचा वेग कमी होऊ देऊ नये. दुसऱ्यावर विसंबून न राहता कामे हातावेगळी करावी. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. महिलांना सभोवतालच्या वातावरणानुसार धोरण बदलावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी एकाग्रता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

कन्या - जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागलात तर फायदा होतो, हा अनुभव येईल. चांगली बातमी मन सुखावेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरदार महिलांना वरिष्ठांची अनुकंपा राहील. सवलती व भत्ते मिळतील. नोकरीत मनाप्रमाणे वागता येईल. नवीन ओळखी होतील. महिलांना मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच दीर्घकाळची दुखणी डोके वर काढतील. तरी प्रकृतीची काळजी घ्यावी.

तूळ - ग्रहमान संमिश्र फळं देणारे आहे. व्यवसायात बदल करुन उलाढाल वाढवाल. नवीन विचाराचा अवलंब कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. त्यामुळे ते तुमची खुशामत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना प्रियजन, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. खर्चाचे बजेट कोलमडेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. तरुणांचे विवाह जमतील. प्रकृती उत्तम राहील. 

वृश्‍चिक - प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचे आहे. वेळेचे व कामाचे गणित योग्य आखून त्याप्रमाणे वागाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पैशाची वसुली होईल. नोकरीत मानसन्मानाचे योग येतील. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. महिलांच्या शब्दाला घरात मान मिळेल. कामाचे कौतुक होईल. वेळ मजेत जाईल. 

धनू - खाण्यापिण्यावर बंधन ठेवलेत तर प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. व्यवसायात तुमच्या जिद्दी व प्रयत्नवादी स्वभावाचा विशेष फायदा होईल. कामांचा वेग वाढेल. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे भविष्यात लाभदायी ठरेल. हातून चांगले काम होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना कामाचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.

मकर - व्यवसायात नवीन आव्हाने स्वीकारुन ती तडीस न्याल. काही बदल करावेसे वाटतील तरी थोडा धीर धरावा. मोठ्यांचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्यावा. व्यवहारी दृष्टिकोन लाभदायी ठरेल. नोकरदार व्यक्तींनी हातातील कामे वेळेत संपवावीत. वरिष्ठांच्या मर्जीत राहून खुबीने वागावे. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. आनंदात,मजेत दिवस जातील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. 

कुंभ - तब्येत सांभाळून कामे हाती घ्यावीत. व्यवसायात विस्तार कराल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेवून ती पूर्ण कराल. पैशाची तजवीज होईल. नोकरदार महिलांना मनाप्रमाणे कामे करता येतील. कामाचे कौतुक होईल. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न करा यश मिळेल. घरात प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. महिलांना हौसमौज करता येईल. खर्चही मनाप्रमाणे कराल. विद्यार्थ्यांना यशदायी ग्रहमान.

मीन - पैशाचे व्यवहार करताना त्याचा ताळेबंद आधी करावा. मगच पुढे जावे. व्यवसायात कुवत ओळखून उडी घ्यावी. नाचरेपणा करू नये. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामात तत्पर रहाल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांवर विसंबून राहू नये. सकारात्मक दृष्टिकोन विशेष लाभदायी ठरेल. महिलांना मुलांच्या तैनातीत राहावे लागेल. कामाचा आनंद मिळेल. दगदग धावपळ होईल.

संबंधित बातम्या