ग्रहमान - ६ ते १२ ऑक्‍टोबर २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मेष ः राशीच्या अष्टमात गुरू वर्षभर राहणार आहे, त्यामुळे प्रत्येक कामात प्रयत्नांना महत्त्व द्यावे लागेल. जास्त तणाव न घेता जेवढे तुम्हाला पटेल, रुचेल तेवढेच काम घ्यावे. अर्धवट कामे पूर्ण करावीत. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. तरुणांनी घाईने निर्णय घेऊ नयेत. घरामध्ये तुम्हाला थोडी तुमच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालावी लागेल. 

मेष ः राशीच्या अष्टमात गुरू वर्षभर राहणार आहे, त्यामुळे प्रत्येक कामात प्रयत्नांना महत्त्व द्यावे लागेल. जास्त तणाव न घेता जेवढे तुम्हाला पटेल, रुचेल तेवढेच काम घ्यावे. अर्धवट कामे पूर्ण करावीत. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. तरुणांनी घाईने निर्णय घेऊ नयेत. घरामध्ये तुम्हाला थोडी तुमच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालावी लागेल. 

वृषभ ः महत्त्वाच्या ग्रहांची साथ तुम्हाला आहे. त्यामुळे प्रगतीसाठी जी धडपड तुम्ही करत होता, त्यात सफलता मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. योग्य निर्णय व अचूक अंदाज व्यवसायात फायदा मिळवून देतील. रेंगाळलेल्या योजना मूर्त स्वरूपात साकार होतील. नोकरीत तुम्हाला आवडेल असे काम मिळेल. विरंगुळ्यासाठी छोटा प्रवास कराल. घरात शुभकार्य ठरतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. कलाकार - खेळाडूंना प्रसिद्धीचे योग. 

मिथुन ः गुरू राशीच्या षष्ठात आल्याने त्याची साथ तुम्हाला मिळणार नाही (पूर्वीइतकी) तरी यापुढे तुमची प्रत्येक कृती सावधपणे करावी. शारीरिक कुवत ओळखून त्याप्रमाणे कामाचे स्वरूप ठेवावे. व्यवसायात केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. नोकरीत मूड बदलता राहील. नवीन अनुभव येतील. घरात कुटुंबासमवेत वेळ घालवाल. तरुणांना मित्रमंडळींच्या सहवासाने उत्साह येईल. वृद्धांना तीर्थयात्रा घडेल. 

कर्क ः गुरूची पंचमातील साथ मोलाची ठरेल. व्यवसायात निर्माण झालेला तणाव कमी होईल. ज्या कामाची काळजी वाटत होती, त्यात आशादायक चित्र दिसेल. तुमच्या मनाप्रमाणे घटना घडल्याने यशाची खात्री वाटेल. नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामात सफलता मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. 

सिंह ः चतुर्थातील गुरू गृहसौख्याचा आनंद भरभरू देईल. व्यवसायात तुमच्या महत्त्वाकांक्षी कृतीने प्रत्येक गोष्ट सहजसाध्य कराल. नवीन विस्ताराच्या कामांना प्राधान्य द्याल. कामातील बदल फायदा मिळवून देईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. जादा सवलती व अधिकारही मिळतील. घरात आयुष्यातील वेगळ्या आनंदाचा अनुभव घ्याल. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत स्थलांतराचे बेत सफल होतील. 

कन्या ः गुरू राशीच्या तृतीयेत पुढील वर्षभर राहणार आहे, त्यामुळे तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. परदेश व्यवहारांना महत्त्व येईल. व्यवसायात कामात कसूर न करता कामाचा उरक पाडावा. नोकरीत तुम्हाला व तुमच्या कामाला महत्त्व मिळेल. जोडधंद्यातून जादा कमाई होईल. घरात मुलांच्या हट्टामुळे सहलीचा बेत आखाल. तुमचा थोडा वेळ तरी घरातील व्यक्तींबरोबर मजेत घालवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छा साकार झाल्याचा आनंद मिळेल. 

तूळ ः पैशाची घडी सुरळीत करण्यासाठी धनस्थानातील गुरू मदत करील. परंतु, भावनेच्या आहारी न जाता कामाचे योग्य नियोजन केलेत तर त्याचा आनंद मिळेल. व्यवसायात नेहमीपेक्षा उत्पन्न वाढेल. जीवनात स्थिरता येईल. नवीन कामे मिळतील. तरुणांना चांगली नोकरी मिळेल. बेकार व्यक्तींनी नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. घरात नवीन वास्तू खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल. 

वृश्‍चिक ः राशीत असलेला गुरू अनेक अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा आत्मविश्‍वास देईल. व्यवसायात महत्त्वाची कामे वेळेत उरकावीत. नोकरीत कामाचा ताण कमी झाल्याने सुटकेचा निःश्‍वास टाकाल. व्यक्तिगत जीवनात आशादायक घटना घडल्याने तुमची निराशा दूर होईल. कुटुंबासमवेत खरेदीचे बेत आखाल. 

धनू ः जिद्द व चिकाटी या जोरावर कामात प्रगती कराल. व्यवसायात खर्चाचे प्रमाण वाढेल. मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतीलच असे नाही, तरी मनाची तयारी ठेवावी. तडजोडीचे धोरण लाभदायी ठरेल. महत्त्वाच्या कामांना गती द्यावी. मोठ्या योजनांच्या मागे न धावता "जैसे थे' धोरण ठेवावे. नोकरीत आळस न करता तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. घरात कोणताही प्रश्‍न विचारपूर्वक हाताळा. नवीन सहवास लाभेल. 

मकर ः आर्थिक ऊब व सुख मिळणार असल्याने आनंदी राहाल. व्यवसायात चांगली वाढ होईल. स्थिरता मिळवून प्रगतीची नवीन दिशा मिळेल. नोकरीत चांगल्या संधी दृष्टिक्षेपात येतील. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळाल्याने त्यांची निराशा दूर होईल. हितशत्रूंपासून मात्र सावध राहावे. घरात लांबलेले समारंभ पार पडतील. शेअर्स व्यवहारात फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. प्रकृतीमान सुधारेल. 

कुंभ ः व्यवसायात तुमच्या अंगी असलेले कलागुण दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुमच्या कर्तृत्वाला उजाळा येईल. प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा गाठाल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील, त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. कौटुंबिक सौख्य उपभोगता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. तरुणांना स्थिरता लाभेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. 

मीन ः तुमच्या प्रगतीला पूरक ग्रहमान लाभल्याने कामात प्रगती होईल व तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक पाठबळ मिळेल. नवीन संधीचा फायदा घेऊ शकाल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. व्यक्तिगत जीवनात आनंदाची घटना घडेल. आनंदाची बातमी कळेल. अपेक्षित कामांना गती येईल. हितचिंतक मदत करतील. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल. 
 

संबंधित बातम्या