ग्रहमान   १३ ते १९ ऑक्‍टोबर २०१८

 अनिता केळकर 
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मेष ः सतत कामात असणे हा तुमचा स्थायीभाव आहे. जेवढे काम कठीण तेवढी तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. व्यवसाय वाढीसाठी नवी शाखा उघडणे किंवा नव्या योजनांचा पाठपुरावा करणे, यासारख्या गोष्टींच्या मागे तुम्ही असाल. नोकरीत सहकाऱ्यांच्या कामात मदत करताना स्वतःचे काम तत्परतेने कराल. घरात होणारा खर्च इच्छा असूनही कमी करू शकणार नाही.

मेष ः सतत कामात असणे हा तुमचा स्थायीभाव आहे. जेवढे काम कठीण तेवढी तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. व्यवसाय वाढीसाठी नवी शाखा उघडणे किंवा नव्या योजनांचा पाठपुरावा करणे, यासारख्या गोष्टींच्या मागे तुम्ही असाल. नोकरीत सहकाऱ्यांच्या कामात मदत करताना स्वतःचे काम तत्परतेने कराल. घरात होणारा खर्च इच्छा असूनही कमी करू शकणार नाही.
वृषभ ः उत्साहवर्धक वातावरणाचा लाभ मिळाल्याने तुमच्या मनाला व बुद्धीला पटेल तेच तुम्ही कराल. व्यवसायात नवीन यंत्र, तंत्र आणि योजना राबवण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घ्याल. नोकरीमध्ये स्पर्धा कमी झाल्याचे जाणवेल. कामात किंवा नव्या नोकरीच्या बदलीसाठी प्रयत्न कराल. घरात आनंदी वातावरण असेल. एखादा समारंभ ठरेल.
मिथुन ः गुरू व बुध तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारे आहेत. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा वाढत जाईल. धंदा व्यवसायाच्या निराशेचे सावट दूर होईल. मनाप्रमाणे घटना घडू लागल्याने नवीन कल्पनांना धुमारे फुटतील. नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. आवश्‍यक त्या पैशाची तरतूद होईल. घर सजावटीचे व नूतनीकरणाचे बेत मार्गी लागतील.
कर्क ः रेंगाळलेल्या कामांना हवी तशी दिशा मिळाल्याने तुमच्यातील जिद्द वाढेल. धंदा व्यवसायात भविष्यात काय करायचे, हे ठरविले असेल तर त्या दिशेने कार्यवाही कराल. आवश्‍यक त्या पैशांची तजवीज झाल्याने नव्या कल्पना मनात रुजतील. आधुनिक पद्धतीच्या कामाचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. प्रवासाने ताजेतवाने व्हाल.
सिंह ः पैशाची ऊब मिळाल्याने बराच काळ मनात घर करुन राहिलेल्या मनीषा उफाळून येतील.  तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणाल. धंदा व्यवसायात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी तुमच्या योजना साकार कराल. नोकरीमध्ये तुमच्या गुणांना वाव मिळेल. चांगले काम मिळेल. घरात आवडत्या माणसांच्या सहवासात वेळ घालवाल.
कन्या ः तुमच्यात नवी आशा व ऊर्मी जागृत होईल. ग्रहांची साथ लाभेल. काळजी करीत न बसता कृतीवर तुमचा भर असेल. यशश्री खेचून आणण्याचा चंग तुम्ही बांधाल. धंदा व्यवसायात उगीचच लांबलेली कामे धसास लावाल. नोकरीमध्ये तुमच्या मागण्या वरिष्ठांपुढे मांडाल. नवी जागा घेण्याच्या विचारात आसाल तर त्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न कराल.
तूळ ः सध्या जरी फळ देणारे काम करीत नसाल तरी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. भविष्यकाळात आता केलेल्या चांगल्या कामाचा फायदा मिळेल. तुम्हाला ज्यांची मदत हवी आहे त्यांना खुबीने हाताळा. तुमच्यातील कलागुणांना मान व प्रसिद्धी मिळेल. धंदा व्यवसायात अपेक्षित बातमी कळेल. तरुणांचे विवाह जमतील. घरातील व्यक्तीबरोबर यशाचा आनंद अनुभवाल.
वृश्‍चिक ः  तुमच्या योजनांना चालना देणारी आर्थिक कुमक लागेल. कोणतीही कल्पना कार्यान्वित करण्यापूर्वी त्यातील फायद्या तोट्याचे गणित मांडून पाहावे. ज्या संधी नजरेच्या टप्प्यात आहेत त्यांचा जरूर उपयोग करुन घ्याल. जादा काम मर्यादेबाहेर जाऊन घेऊ नये. नोकरीत जादा काम करुन पैसे मिळण्याची संधी मिळेल. गरजेच्या वस्तूंची खरेदी होईल.
धनू ः आलेला क्षण आपला, असे समजून त्या क्षणांचा आनंद घ्याल. त्यात घरातील प्रियजनांनाही सामील करुन घ्याल. धंदा व्यवसायात नवीन कल्पना साकार कराल. पैशाची कुमकही मनाप्रमाणे लाभेल. कितीही अडथळे आले तरी ते विश्‍वासाने पार पाडाल. नोकरीत स्पर्धेतील आव्हान स्वीकाराल व त्यात यश मिळवाल. घरातल्यांना खूष करण्यासाठी बेत आखाल.
मकर ः तुमच्या तपश्‍चर्येला फळ मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. ज्या कामात यशाची अपेक्षा केली नव्हती त्यात काहीतरी चांगले घडण्याची शक्‍यता निर्माण होईल. धंदा व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. दूरदृष्टीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. जाहिरात व प्रसिद्धी माध्यमातून फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीत वरिष्ठ कामाला उत्तेजन देतील.
कुंभ ः प्रतिकूल परिस्थितीत कुठून आणि कसे तोंड द्यायचे हा संभ्रम मनात असेल. पण तुम्ही तुमच्या... सद्‌सद्विविवेक बुद्धीला अनुसरून काम करत राहावे. आज नाहीतर उद्या यश तुमचेच आहे हा दिलासा तुम्हाला पुढे नेत राहील. धंदा व्यवसायात बाजारातील परिस्थितीला अनुसरून पावले उचला. तुमचे प्रयत्न वाढवलेत तर यश तुमचेच आहे.
मीन ः जुने सोडून नवे आहे ते स्वीकारण्याची तुमची तयारी असेल. व्यवसायात जनसंपर्काचा उपयोग करुन घेतलात तर उलाढाल वाढेल. फक्त कोणतेही काम अर्धवट ठेवू नये. नोकरीमध्ये, स्पर्धेमध्ये तयारीनिशी तोंड द्यावे. हाताखालच्या व्यक्तींवर जरी काम सोपवलेत तरी त्यावर देखरेख ठेवावी. घरात भावनेच्या भरात मोठी महागडी खरेदी होईल.

संबंधित बातम्या