ग्रहमान : १ ते ७ डिसेंबर २०१८

अनिता केळकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ग्रहमान

मेष : व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली संगत उपयोगी पडेल. निर्णय अचूक ठरतील. मनातील बऱ्याच काळ रेंगाळत असलेल्या इच्छा पूर्ण होतील. चांगली बातमी कळेल. नोकरीत अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. नवीन ओळखी होतील. नवी संधी चालून येईल. घरात वातावरण आनंदी राहील.

वृषभ : स्वयंसिद्ध राहावे. व्यवसायात अनपेक्षित मदत मिळाल्याने आश्‍चर्याचा धक्का बसेल. कामात व्यवहारी दृष्टिकोन राहील. वेळेचे महत्त्व पटेल. पैशाची तजवीज झाल्याने खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत भविष्यात लाभदायी ठरणारे काम करावे. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याकडे कल राहील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : ग्रहांची मर्जी आहेच, तेव्हा संधीचा लाभ घ्यावा. व्यवसायात नवीन योजना आकर्षित करतील. खर्चाचा ताळेबंद केल्याखेरीज कोणतीही कृती करू नये. अंथरूण पाहून पाय पसरावे. नोकरीमध्ये कामाचे बेत गुप्त ठेवावे. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवावे.

कर्क : सभोवतालच्या व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायात कामांना निश्‍चित दिशा मिळेल. आर्थिक स्थितीचा आलेख उंचावेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवावी लागेल. नोकरीत कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन नोकरीसाठी प्रयत्नात राहावे. तरुणांना विवाहाचे वेध लागतील.

सिंह : कमी श्रमात जास्त यश मिळेल. ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. कामाचा तणाव कमी होईल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी. कामानिमित्ताने जादा सवलती मिळतील. तुमचे महत्त्व सहकाऱ्यांना कळेल. घरात मतभेदात समेट होईल. पाहुण्यांची ये-जा राहील.

कन्या : कामांना गती मिळेल. त्यामुळे तुमचा हुरूप वाढेल. व्यवसायात तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली कामेही गती घेतील. कामात बदल करून उलाढाल वाढवण्यात यश मिळेल. प्रगतीचा मोठा टप्पा गाठण्याची मनीषा राहील. नोकरीत केलेल्या कामाचा आनंद मिळेल. बेरोजगारांना नवी नोकरी मिळेल. जोडधंद्यातून फायदाही होईल. घरात शुभसमारंभ ठरतील.

तूळ : ग्रहमानाची साथ मिळेल. प्रगतीचा आलेख चढता राहील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. पैशाची चिंता मिटेल. परदेशव्यवहारासंबंधी निर्णय निश्‍चित ठरतील. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. वरिष्ठ व सहकारी नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल.

वृश्‍चिक : अडचणींवर यशस्वीपणे मात करून अपेक्षित यश मिळवावे. व्यवसायात नवीन कामांना चालना मिळेल. खेळत्या भांडवलाची सोय होईल. रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण होतील. एखादी अवघड वसुलीही होईल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडाव्यात. मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

धनू : योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याने वेगाने कामाला लागावे. ध्येयधोरणे ठरवून मगच कृती करावी. कामाच्या प्रमाणात फायद्याचे प्रमाण असेल. चार पैसे हातात खेळतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासयोग येतील. सुप्त कलागुणांना वाव मिळेल. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल.

मकर : द्विधा मनःस्थिती होईल, तरी सबुरीने वागावे. माणसांची पारख योग्यप्रकारे करावी. व्यवसायात जिद्द व चिकाटी या जोरावर कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे पार पडावे. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. सतर्क राहून सभोवतालच्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. नोकरीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता काम चोख करावे.

कुंभ :  मानसिक स्वास्थ्य लाभेल. त्याचा फायदा सर्व स्तरांवर होईल. व्यवसायात जी कामे विनाकारण लांबली होती ती हाती घेऊन मार्गी लावावी. आर्थिक स्थिती सुधारेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत मानले तर समाधान मिळेल. मागण्यांसाठी अडून राहू नये. वादविवादाचे प्रसंग टाळावे. माणसांची किंमत कळेल.

मीन : दिलासा देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात दिसते तसे नसते हे लक्षात ठेवावे. अतिविश्‍वास टाळावा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत मिळालेल्या अधिकारांचा वापर योग्य कारणासाठीच करावा. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. सहकारी व वरिष्ठांवर विसंबून राहू नये. घरात प्रश्‍नांची उकल होईल.

संबंधित बातम्या