ग्रहमान : २२ ते २८ डिसेंबर २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

ग्रहमान

मेष : ग्रहांची अनुकूलता वाढत जाईल, तेव्हा कृतीवर भर जास्त राहील. व्यवसायात चांगली घटना व चांगली बातमी कळेल. मंगळ तुम्हाला कार्यमग्न ठेवेल. नवीन ओळखीचा लाभ होईल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. नवीन कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. जीवनात नवचैतन्य वाढेल.

वृषभ : पैशाची सोंगे घेता येत नाहीत हे लक्षात ठेवून कृती करावी. मनावर संयम ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. भविष्यात लाभदायक ठरणारी कामे हाती घ्यावीत. हितचिंतकांची कामात मदत होईल. नवीन करारमदार होतील. उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीत, कामात नवीन जबाबदारीमुळे सुविधा मिळतील. प्रकृतीची चिंता मिटेल.

मिथुन : केलेल्या कामाचे चीज होईल. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. भावनेच्या भरात वाहून न जाता व्यवहार सांभाळावे. व्यवसायात चांगल्या गोष्टी घडतील. पैशाची सोय होईल. नवीन कामे मिळतील. त्यामुळे दगदग, धावपळ मात्र वाढेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची महती कळेल. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावे. तरुणांनी अतिआत्मविश्‍वास बाळगू नये.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल, तेव्हा वेळीच आळा घालावा. व्यवसायात कामांचे योग्य नियोजन करून कामांना प्राधान्य द्यावे. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. व्यवहार व मैत्री यांची गल्लत करू नये. नोकरीत बढाया न मारता हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करावीत. क्षमता ओळखून कामे करावीत. तब्येतीची काळजी घ्यावी.

सिंह : मनोबल उत्तम राहील. त्याच जोरावर नवीन काहीतरी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी येतील. कामात व पैशाच्या बाबतीत बरकत राहील. आर्थिक ऊब मिळाल्याने कामात नवीन बदल करावेसे वाटतील. परंतु करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. नोकरीत जादा भत्ते व लाभ होतील. कामाचा उत्साह वाढेल.

कन्या : बराच काळ मनात असलेली सुप्त इच्छा प्रत्यक्षात साकार झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात आवक जावक समान राहील. तरीही कामाचे समाधान मिळेल. कार्यपद्धतीत बदल घडवून उलाढाल वाढवण्यात यश मिळेल. नोकरीत अधिकाराची कक्षा ओलांडू नये. अपेक्षित ठिकाणी बदल किंवा बदली होईल. तरुणांच्या बाबतीत अनुकूल ग्रहमान राहील.

तूळ : सुसंधी मिळेल. त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठाल. कामे मिळतील. त्यात बदल करून उलाढाल व फायदा मिळवावा. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्व आघाड्यांवर सतर्क राहावे. नोकरीत कामाचा तणाव कमी होईल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. विवाहेच्छुंचे विवाह ठरतील.

वृश्‍चिक : तुमची जिद्द व चिकाटी तुम्हाला कामात यश मिळवून देताना उपयोगी पडेल. अशक्‍यप्राय कामात यश मिळवून कौतुकास पात्र ठरावे. व्यवसायात कायद्याचे उल्लंघन न करता कामे करावीत. प्रतिष्ठा मिळवून देणारी कामे मिळतील. जुने प्रश्‍न धसास लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून केलेली कामे लाभ देतील. मुलांच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा.

धनू : योग्य दिशा व मार्गदर्शनाचा लाभ होईल. माणसांची पारख करताना चुकू नये. व्यवसायात विश्‍वासार्हता पडताळून बघावी. मगच कामाची जबाबदारी व्यक्तींवर सोपवावी. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नये. नवीन करारमदार होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनाविरुद्ध वागावे लागले, तरी मतप्रदर्शन करू नये.

मकर : महत्त्वाच्या ग्रहांची साथ तुम्हाला गतिमान बनवेल. घेतलेले निर्णय अचूक आल्यामुळे प्रगती होईल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींवर विसंबून न राहता स्वयंसिद्ध राहावे. कामाचे नियोजन करून कामे पूर्ण करावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. त्यामुळे दगदग, धावपळ वाढेल. प्रवासाचे योग येतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील.

कुंभ : विस्कटलेली कामाची घडी बसविण्यास योग्य काळ आहे. प्रयत्न व नशिबाची साथ मिळाल्याने कामे मार्गी लागतील. व्यवसायात ठरवलेले उद्दिष्ट पार पाडावे. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. नोकरीत सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवावे. वादविवाद टाळावे. विचारल्याखेरीज सल्ले देऊ नये. 

मीन : सावध दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करावे यश मिळेल. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदत मिळेल. त्याचा लाभ घ्यावा. कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवावी. पैशाची तजवीज होईल. नोकरीत हट्टी स्वभावामुळे नुकसान होण्याची शक्‍यता आहे, तरी कार्यभाग साधून कामे पूर्ण करावे. कामानिमित्ताने दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्येत सांभाळा.
 

संबंधित बातम्या