ग्रहमान : २ ते ८ फेब्रुवारी २०१९

अनिता केळकर
गुरुवार, 31 जानेवारी 2019

ग्रहमान 

मेष : ग्रहांची कृपासृष्टी तुमच्यावर आहे. त्यामुळे सर्व आघाड्यावर अग्रेसर रहाल. व्यवसायात नवीन कामांचा शुभारंभ होईल. मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार होतील. आवश्‍यक त्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत तुमच्या मागण्या तुम्ही मान्य करुन घ्याल. वादाचे मुद्दे टाळावेत. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात कामाच्या पूर्ततेसाठी थोडा धीर धरावा. शुभकार्याची नांदी होईल. कलागुणांना वाव मिळेल.

वृषभ : कामात प्रगतीची दारे खुली होतील. त्यामुळे ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था होईल. व्यवसायात व्यवहारदक्ष राहून कामे संपवावी लागतील. कामातील बेत मागे पुढे होण्याची शक्‍यता आहे. तरी जिद्दीने व नेटाने पुढे जाण्याची तयारी ठेवावी. नोकरीत  वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. त्यामुळे तुमची बरीच धावपळ दगदग होईल. प्रकृतीच्या तक्रारीकडेही लक्ष द्यावे लागेल. घरात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवाल.

मिथुन : चांगले काम करुन कौतुकास पात्र ठरण्याची तुमची मनीषा असेल. नशिबापेक्षा प्रयत्नांवर जास्त विश्‍वास ठेवाल. व्यवसायात कामातील अडचणीवर मात करुन कामे मार्गी लावाल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत नवीन प्रकारचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलती देतील. कामानिमित्ताने प्रवासयोग संभवतो. महिलांना स्वतःच्या छंदाकडे लक्ष देता येईल.

कर्क : गुरुची साथ राहील. त्यामुळे व्यवसायात विस्ताराचे बेत मनात घोळतील. इतरांशी मिळते जुळते घेऊन कामे केलीत तर प्रगतीचा वेग वाढेल. पैशाची तात्पुरती सोय करावी लागेल. स्पर्धकांना तुमचे बेत कळणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरीत कितीही काम केले तरी अपुरेच पडेल. कामात शिथिलता येईल. घरात व्यक्तींचे मूड सांभाळताना तारेवरची कसरत होईल. महिलांनी झेपेल तेवढीच धावपळ दगदग करावी.

सिंह : सभोवतालच्या वातावरणाचा बारकाईने अभ्यास करुन मगच निर्णय घ्यावा. व्यवसायात स्पर्धा तीव्रतेने जाणवेल. तत्त्वांना मुरड घालून लवचिक धोरण स्वीकारावे लागेल. पैशाची उभारणी करणे आवश्‍यक राहील. नोकरीत व्यक्तींना प्रावीण्य  वाढवावे लागेल. वरिष्ठ व सहकारी यांच्याशी संबंध चांगले ठेवून कामे पूर्ण करावी लागतील. विचारल्याशिवाय सल्ला न देणे हितावह ठरेल. महिलांनी अतिविचार करू नये.

कन्या : सध्या दुधात साखर घातल्याप्रमाणे ग्रहांची साथ राहील. व्यवसायात बाजारातील होणारे बदल तुमच्या पथ्यावरच पडतील. आर्थिक परिस्थितीमध्ये लक्षणीय वाढ होईल. अपेक्षित कामे गती घेतील. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत अधिकाराच्या कक्षा रुंदावतील. चांगले बदल घडतील. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. तरुणांना सांसारिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.

तूळ : अंथरूण पाहून पाय पसरावेत. व्यवसायात पैशावरुन होणारे गैरसमज टाळावेत. कामात स्वःता पुढाकार घेतल्याखेरीज काही घडणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात शिथिलता येणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात अतिविश्‍वास बाळगू नये. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. घरात तुम्हास सुख व सौख्य लाभेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.

वृश्‍चिक : तुमच्या कर्तृत्वाला वाव देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कामात वाढ होईल. त्यामुळे दगदग धावपळ वाढेल. वेळेचे महत्त्व ओळखून कामांचा प्राधान्यक्रम ठरवा व त्याप्रमाणे कामे हाती घ्यावीत. गुप्त शत्रूपासून सावध राहावे. नोकरीत शांत चित्ताने निर्णय घ्यावा. कामात गुप्तता राखावी. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात व्यक्तिगत सुखात भर पडेल. विद्यार्थ्यांना करिअरचा चांगला मार्ग मिळेल.

धनू : सभोवतालच्या व्यक्तीकडून नवीन अनुभव येतील. व्यवसायात कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी सतर्क राहून कष्टाची तयारी ठेवावी. कामात उलाढाल व विक्री वाढवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर कराल. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत सहकाऱ्यांची खुशामत करुन काम करुन घ्यावे लागेल. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महिलांनी कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये.

मकर : दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, या म्हणीचा प्रत्यय येईल. तेव्हा जार सतर्कतेने वागावे. व्यवसायात स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. विचारापेक्षा कृतीवर भर राहील. पैशाच्या मोहापायी वेगळ्या वाटचालीचा अवलंब करु नये. नवीन गुंतवणूक करताना जरा जपून. नोकरीत हलक्‍या कानाने ऐकू नये. शहानिशा करुन मगच निर्णय घ्यावा. कोणतेही मतप्रदर्शन करु नये. महिलांनी वेळ मजेत घालवावा.

कुंभ : व्यवसाय व नोकरीत लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुमची दगदग धावपळ वाढेल. व्यवसायात हितचिंतकांकडून पैशाची मदत मिळाल्याने न उलगडलेले कोडे सुटेल. कोणतेही मोठे व्यवहार करताना त्यातील परिणामांचाही विचार करावा. नोकरीत रागावर नियंत्रण ठेवून कामे कराल. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. घरात मतभेद झाले तरी वाढणार नाहीत  याची दक्षता घ्यावी. तरुणांनी अतिसाहस करु नये.

मीन : कामांना चालना मिळाल्याने तुमचा आनंद द्विगुणीत होईल. व्यवसायात योग्य व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. हितचिंतकांची मदत मिळेल. पैशाची चिंताही मिटेल. नोकरीत कामात आलेली शिथिलता वरिष्ठांना सहन होणार नाही. तेव्हा आजचे काम आजच पूर्ण करावे. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महिलांची प्रकृती सुधारेल.

संबंधित बातम्या