ग्रहमान : १८ ते २४ मे २०१९

अनिता केळकर
सोमवार, 20 मे 2019

मेष : महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी राहील. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. हितचिंतकांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठ मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देतील. कामानिमित्त प्रवास व नवीन ओळखी होतील. जादा सुविधांचा लाभही मिळेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. प्रकृतीमान सुधारेल. वातावरण आनंदी व उत्साही राहील.

मेष : महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी राहील. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. हितचिंतकांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठ मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देतील. कामानिमित्त प्रवास व नवीन ओळखी होतील. जादा सुविधांचा लाभही मिळेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. प्रकृतीमान सुधारेल. वातावरण आनंदी व उत्साही राहील.

वृषभ : कमी श्रमात यश मिळेल. सुप्त बेत प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात काहीतरी वेगळे करून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न राहील. कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा विचार सफल होईल. नोकरीत अवघड व अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. पैशांची तजवीज होईल. घरात कुटुंबासमवेत लांबलेले प्रवासाचे बेत ठरतील. कामात मदत झाल्याने दगदग होणार नाही. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. कलावंत, खेळाडूंना यशदायक ग्रहमान.

मिथुन : बुद्धीच्या जोरावर कामात बाजी माराल. व्यवसायात नको त्या कामात वेळ जाईल. त्यामुळे हातातील कामांना विलंब होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन गुंतवणुकीची गरज भासेल. नोकरीत मानले, तर समाधान मिळेल. मनातील बेत वरिष्ठांचा मूड बघून सांगा. कामात कार्यतत्पर राहावे. वरिष्ठांचे समाधान सहजासहजी होणार नाही. घरात पैशाच्या व्यवहारात काटकसरीने वागावे. अत्यावश्‍यक तेवढेच खर्च करावेत. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.

कर्क : नशिबाची साथ मिळेल, तसेच ग्रहांची साथही मिळेल. व्यवसायात तुमचे अंदाज अचूक ठरतील. कामांना योग्य दिशा व गती मिळेल. कामाचा विस्तार होईल. नोकरीत जादा कामाची तयारी असेल, तर यश खेचून आणाल. बेकार व्यक्तींना नवीन कामाची संधी मिळेल. सद्य नोकरीत जादा सवलती व अधिकार मिळतील. घरात चांगली बातमी कळेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. शुभकार्यानिमित्त नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. मन आनंदी राहील.

सिंह : प्रश्‍नांची उकल झाल्याने हायसे वाटेल. मानसिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात योग्य व्यक्तींची साथ मिळाल्याने आधार वाटेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून दक्ष राहावे. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने नवीन कामे मिळवता येतील. नोकरीत आळस झटकून काम करावे. वेळेचे महत्त्व ओळखून कामे वेळेत पूर्ण करावीत. घरात स्वतःच्या गरजा व हौसमौज बाजूला ठेवून मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवश्‍यक तेथे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तडजोडीचे धोरण ठेवावे. घरात प्रेम व कर्तव्य यांचा योग्य समन्वय साधावा.

कन्या : संशय मनात ठेवून कोणतेही केलेले कार्य यशस्वी होतेच असे नाही, तरी विश्‍वासार्हता तपासून भोवतालच्या व्यक्तींवर कामे सोपवावीत व गोड बोलून खुबीने करून घ्यावीत. व्यवसायात कायद्याचे उल्लंघन न करता कामे मार्गी लावावीत. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. उधार उसनवार टाळावे. नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहावे. भोवतालच्या व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. एखादा निर्णय चुकल्याने कामात गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. घरात वातावरण गढूळ राहील. मुलांच्या विचित्र वागण्याचा राग येईल. मित्रमंडळींच्या भेटीगाठीचे योग येतील.

तूळ : गुरूची साथ मिळेल. मात्र, अतिआत्मविश्‍वास बाळगू नये. व्यवसायात प्रत्येक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. नोकरीत सहकाऱ्यांवर विसंबून न राहता स्वतःची कामे स्वतः करावीत. सहज वाटणाऱ्या कामात विलंब होण्याची शक्‍यता आहे. घरात स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न केलात, तर इतरांना राग येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल, कौतुक करावे. महिलांनी महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या हिमतीवर घ्यावेत.

वृश्‍चिक : कधी शक्ती, तर कधी युक्तीचा उपयोग करून कामे मार्गी लावावीत. व्यवसायात कामात योग्य समन्वय साधला गेल्याने यशाची खात्री वाटेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. पैशांची तजवीज होईल. नोकरीत हितचिंतकांची मदत मिळेल. आशावादी दृष्टिकोन लाभदायी राहील. वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी तडजोड करावी लागेल. घरात मनाप्रमाणे चांगली घटना घडेल. तरुणांचे विवाह जमतील. सामूहिक क्षेत्रात पुढाकार राहील. मानसन्मान मिळेल.

धनू : ग्रहमान हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे पूर्वीची आलेली निराशा झटकून कामाला लागावे. अहोरात्र काम केलेत, तरी कामाचा वेग कमीच वाटेल. व्यवसायात नवीन कामांना गती येईल. एखादी चांगली घटना घडेल. आर्थिक स्थितीही सुधारेल. योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याची काळजी घ्यावी. प्रलोभनांपासून चार हात दूरच राहावे. मते पटली नाहीत, तरी वाच्यता करू नये. घरात इतरांच्या भावनांचाही विचार करावा लागेल. कुटुंबासमवेत थोडासा वेळ घालवाल. मानसिक आरोग्य सुधारेल.

मकर : गुरूची साथ मिळेल, त्यामुळे रेंगाळलेल्या कामांना गती येईल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. हितचिंतकांची कामात मदत होईल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. भविष्याची तरतूद करण्यासाठी नवीन गुंतवणुकीचा विचार कराल. मात्र, अंथरूण पाहून पाय पसरावेत. नोकरीत जादा काम करून जादा पैसे मिळवता येतील. प्रवास घडेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. कामाचा झपाटा राहील. घरात कोणावरही जास्त भिस्त ठेवू नये. मनोबल वाढवण्यासाठी मनन चिंतन कराल.

कुंभ : अनपेक्षित येणाऱ्या अडीअडचणींवर मात करून मार्गक्रमण कराल. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध ठेवलेत, तर त्याचा लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामात ठोस बदल कराल. नोकरीत जिभेवर साखर ठेवून सहकाऱ्यांशी बोलून कामे करून घ्यावीत. तत्त्व बाजूला ठेवून मतलब साध्य केलात, तर बरेच काही मिळवता येईल. घरात खर्च वाढतील. वादाचे प्रसंग येतील, तरी डोके शांत ठेवावे. तरुणांनी भावनावश होऊन निर्णय घेण्याची घाई करू नये.

मीन : तुमच्या मनातील बेत व स्वप्ने साकार होतील. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. यशाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात उत्साहाच्या भरात नवीन कामे हाती घ्याल. मात्र, वेळ व काळ बघून कामाचे नियोजन केलेत, तरच यश मिळेल. पैशांची चिंता मिटेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. कामानिमित्त जादा सवलती देतील. जोडव्यवसायातून अचानक लाभ होईल. घरात शुभकार्याची नांदी होईल. तरुणांचे विवाह ठरतील. शिथिलता कमी होऊन घरकामात वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीबाबतची चिंता मिटेल.

संबंधित बातम्या