ग्रहमान : ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१९

अनिता केळकर
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती होईल. ग्रहांची मर्जी आहेच. काही अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात काळ, काम, वेग यांचे प्रमाण व्यस्त राहील. पैशांची तजवीज झाल्याने चिंता मिटेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत एखादे काम युक्तीने वेळेत पूर्ण करू शकाल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. घरात शुभसमारंभ निश्‍चित होतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. महिलांना आवडत्या छंदातून विरंगुळा मिळेल.

वृषभ : प्रयत्नाला नशिबाची जोड लाभल्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने करावे. आवश्‍यक त्या व्यक्तींची नियुक्ती करून कामांना गती द्यावी. बाजारात चौफेर नजर ठेवावी. नोकरीत सवलती मिळतील, त्याचा योग्य तो उपयोग करावा. सहकारी व वरिष्ठांची मदत लाभेल. स्पर्धकांवर नजर ठेवावी. कर्तव्याला चोख रहावे. घरात सणसमारंभानिमित्त नवीन खरेदी होईल. महिलांना मानसिक समाधान मिळेल.

मिथुन : घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्रातील प्रगतीच्या वाटा रुंदावतील. व्यवसायात नवीन योजनेमध्ये गर्क रहाल. त्यात तुमचा बराच वेळ जाईल. नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष कराल. पैशांची ऊब राहील. नोकरीत महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर राहील. पुढाकार घेऊन कामात यश मिळवाल. जोडव्यवसायातून विशेष लाभाची शक्‍यता. घरात वातावरण आनंदी राहील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण राहील. खेळाडू, कलावंत यांना संधी मिळेल.

कर्क : भरपूर काम करून जीवनाचा आस्वाद घेण्याकडे तुमचा कल राहील. अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश संपादन कराल. व्यवसायात कामे मार्गी लागतील. नवीन योजनेत पुढाकार राहील. कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. नोकरीत भोवतालची माणसे मतलबापुरती तुमची खुशामत करतील. कामाचा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहाल. घरात नवीन खरेदी कराल. खर्चाचे बजेट कोलमडेल. विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. महिलांना मनाजोगता कार्यक्रम आखता येईल.

सिंह : परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन कामात प्रगती साधाल. व्यवसायात काही कारणाने चित्त विचलित होईल, त्यामुळे कामाचा ताण वाढेल. मात्र, सहकाऱ्यांची मदत घेऊन कामाचा भार हलका करावा. लवचीक धोरण उपयोगी पडेल. नोकरीत कायदा व नियमांप्रमाणे वागावे, त्यामुळे पुढे होणारा त्रास वाचेल. तुमच्या मनाला पटेल तोच निर्णय घ्यावा. वरिष्ठ व सहकारी यांना तुमची किंमत कळेल. घरात विचारापेक्षा कृतीवर भर द्यावा. महिलांनी कामाचा आनंद घेऊन काम करावे.

कन्या : पैशांच्या व्यवहारांना तुम्ही महत्त्व देता, त्यामुळे कोणाकडून पैसे वेळेवर मिळाले नाही, की तुम्ही अस्वस्थ होता, असाच अनुभव सप्ताहात येईल. व्यवसायात वसुली करताना डोक्‍यावर बर्फ ठेवून बोलावे लागेल. शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवून बोला, म्हणजे त्रास होणार नाही. नोकरीत शुल्लक कारणावरून गैरसमज होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. उधार, उसनवार शक्‍यतो टाळावे. जादा काम करून जादा पैसे मिळवता येतील. घरात आर्थिक चणचण भासेल, तरी चिडू नये.

तूळ : ग्रहमान साथ देईल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात दुर्लक्ष झालेल्या प्रश्‍नांची उकल होईल. प्रतिष्ठा मिळेल. सामंजस्याने तोडगा काढून कामात प्रगती साधू शकाल. पैशांची तजवीज झाल्याने तात्पुरता आर्थिक प्रश्‍न सुटेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत सत्तेपुढे शहाणपण नाही हे लक्षात ठेवावे. सहकारी व वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. घरात मानापमानाची भावना ठेवून वागू नये. मोठ्या व्यक्तींचा सल्ला पटला नाही, तरी ऐकून घ्यावा.

वृश्‍चिक : कामाची योग्य दिशा मिळाल्याने प्रगतिपथावर रहाल. गरजेप्रमाणे लोकांचा उपयोग करून घेतला, तर फायदा तुमचाच होईल. व्यवसायात कोणावरही विसंबून न राहता स्वयंभू व्हावे. ऐकीव बातमीवर विश्‍वास ठेवू नये. नोकरीत सहकारी काम करतील ही अपेक्षा नसावी. कामात तत्पर रहावे. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. नवीन खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल.

धनू : कामातील प्रगतीसाठी कामात बदल करून नवीन कार्यपद्धती स्वीकारावी लागते, असाच अनुभव येईल. नशीब साथ देईल, त्यामुळे त्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात काही प्रस्ताव पुढे येतील. स्वतःची कुवत ओळखून व त्यातील त्रुटींचा विचार करूनच पुढे जावे. हितचिंतकांकडून पैशांची सोय होईल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. वरिष्ठांकडून चांगली बातमी कळेल. घरात धार्मिक कामाचे आयोजन कराल. महिलांना मानसिक शांतता लाभेल.

मकर : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याकडे कल राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ आता मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. कामांना नवी दिशा मिळेल, त्यामुळे कमी श्रमात जास्त यश मिळाले. नोकरीत कंटाळवाणे काम संपवून सोपी कामे हातात येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. घरात तुमचे न पटलेले विचार इतरांना आता पटतील. सलोख्याचे वातावरण राहील. महिलांची प्रकृती व मनःस्वास्थ्य सुधारेल.

कुंभ : ''सर्वकाही पैशाने होते'' हा तुमचा भ्रम असेल, तर तो भ्रमनिरास होईल. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तुम्ही खूश असाल. ओळखीचा उपयोग होऊन तात्पुरती पैशांचीही तरतूद होईल. हितचिंतक मदतीला येतीलच, पण वेळेचे महत्त्व ओळखून कामाचे नियोजन करावे. नोकरीत ध्येय साध्य करण्यासाठी लवचिक धोरण स्वीकारावे. अहंपणा सोडून सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घ्यावीत. घरात टाळता न येणारे खर्च करावे लागतील. महिलांनी सजगवृत्ती ठेवून कामे करावीत.

मीन : सतत नवीन सहवास लाभला, तर तुम्ही आनंदी राहता असाच अनुभव येईल. काही कारणाने भोवतालचे वर्तुळ बदलेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील, त्यामुळे पुन्हा सक्रिय व्हाल. पैसे मिळवण्यासाठी एखादे धाडस करावेसे वाटेल. नवीन मैत्री व भागीदारीचे प्रस्ताव येतील. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची मदत लाभेल. कामांना गती येईल. जोडव्यवसायातून चांगली संधी नजरेस पडेल. घरात व्यक्तिगत प्रगतीचे संकेत दिसू लागतील. मनाप्रमाणे कामे होतील. यश येईल.

संबंधित बातम्या