ग्रहमान - ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९

अनिता केळकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

ग्रहमान

मेष - ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यवसाय नोकरीत नवीन कामे स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. वेळेचे बंधन योग्य प्रकारे पाळाल. पैशांची आवक चांगली राहील. नोकरीत वरिष्ठांनी दिलेल्या संधीचा योग्य उपयोग कराल. सहकारीही कामात मदत करतील. नवीन ओळखी होतील. महिलांच्या जीवनात प्रिय घटना घडतील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. 

वृषभ - भाग्यवर्धक सप्ताह व्यवसायात कामात मनाची एकाग्रता साधून यश संपादन करू शकाल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. मनातील ईप्सित साध्य करू शकाल. नोकरीत हातातील काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. अपेक्षित कामे होतील. महिला घरातील प्रश्‍न इतरांची मने न दुखवता सोडवू शकतील. नोकरदार महिलांचा वेळ सामाजिक कार्यात जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. 

मिथुन - शुक्राची साथ मिळेल. व्यवसायात इतरांना कठीण वाटणारी कामे हाती घेऊन त्यात यश संपादन कराल. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्याल. आर्थिक देणी देता येतील. जुनी वसुलीही होईल. नोकरीत मानसिक ताण कमी होईल. हातून पूर्वी घडलेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. नोकरदार महिलांची दगदग धावपळ वाढेल. घरात कामात वेळ जाईल. आरोग्य ठीक राहील. तरुणांचे विवाह ठरतील. 

कर्क - मनोनिग्रह ठेवावा. व्यवसायात नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करावा, यशप्राप्ती होईल. मेहनत करून कामात यश मिळेल. परिस्थितीशी मिळते जुळते घेतलेत, तर विशेष लाभ होईल. नोकरीत कामात वाढ होईल. त्यामुळे ताण पडेल, तरी काळजी घ्यावी. सहकाऱ्यांचीही मदत घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. महिलांनी उकर कामे काढू नयेत. झेपेल तेवढेच काम करून विश्रांती घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दुर्लक्ष करू नये. 

सिंह - व्यवसायात केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. कार्यतत्पर राहावे लागेल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवून संचय केलात, तर भविष्यात फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील. बेफिकीर राहून चालणार नाही. कामानिमित्त प्रवास घडेल. महिलांना स्वतःच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी योग्य व्यायाम, आहार यांच्यावर भर द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी झटकून अभ्यासाला लागावे. 

कन्या - ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल. व्यवसायात इतरांना कठीण वाटणारी कामे जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर यशस्वी करून दाखवाल. व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी घेतलेले अंदाज अचूक ठरतील. नोकरीत तुमचा उत्साही स्वभाव वरिष्ठांना भुरळ पाडेल. कौतुकाचा वर्षाव तुमच्यावर होईल. महिलांचा महत्त्वाकांक्षी स्वभाव उफाळून येईल. नवीन ध्येयाने कामाला लागाल. प्रकृतीमान चांगले राहील. विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक राहील. 

तूळ - मनातील सुप्त इच्छा आकांक्षा साकार होतील. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. त्यामुळे कामाचा बोजा वाटणार नाही. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. चांगली वार्ता कळेल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागले, तरी कामात रस घेऊन काम करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे विचार व कृती इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करावा. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. नोकरदार महिलांनी कौशल्याने प्रश्‍न सोडवावेत. महिलांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मन रमवावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता साधावी. 

वृश्‍चिक - कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. व्यवसायात नवीन कामे स्वीकारून पूर्ण कराल. कामात बदल करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. पैशांची चिंता मिटेल. कामाचे समाधान मिळेल. नोकरीत कर्तव्य श्रेष्ठ मानाल. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे कराल. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. नवीन खरेदीचे योग येतील. कलाकार, लेखक, खेळाडूंना मूड लागेल. नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात उत्साह येईल. 

धनू - व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधी चालून येतील. कामात तडजोडीचे धोरण ठेवलेत, तर विशेष लाभ होईल. आत्मविश्‍वास वाढेल. अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व वरिष्ठ व सहकाऱ्यांना कळून येईल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. महिलांना मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. शुभकार्ये ठरतील. 

मकर - व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे गोड बोलून इतरांकडून करून घेण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक येणी वसूल होतील. अनपेक्षित लाभ होईल. नोकरीत तुमचा प्रभाव इतरांवर चांगला राहील. सहकाऱ्यांची मने जिंकून धीराने प्रगती कराल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. महिलांनी कामात प्रसंगावधान राखून कामे करावीत. अनावश्‍यक खर्च टाळावेत. विद्यार्थ्यांनी ताण घेऊन अभ्यास करू नये. 

कुंभ - प्रिय घटना घडतील. ग्रहमान चांगले राहील. व्यवसायात विस्तार करण्याचे बेत सफल होतील. अधिक गुंतवणूक करू शकाल. कामात प्रगतीचा आलेख चढा राहील. योग्य मार्गदर्शन लाभेल. नोकरीत वेळेचे महत्त्व कळून येईल. चांगली बातमी कळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. महिलांच्या हातून सत्कर्मे घडतील. आनंदाचे क्षण उपभोगता येतील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांचे अध्ययनात मन रमेल. 

मीन - स्वच्छंदी व चंचल स्वभावाला पूरक वातावरण लाभेल. मनाप्रमाणे जीवन जगण्याची इच्छा साकार होईल. व्यवसायात कामे वेळेत पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. वारा वाहील तसे पाठ फिरवाल. त्यामुळे यश मिळेल. आर्थिक प्रश्‍न सुटतील. नोकरीत मिळालेल्या अधिकारांचा योग्य उपयोग कराल. प्रवास कार्यसाधक होईल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. महिलांना आवडीचे दागिने खरेदी करता येतील. महिला खरेदीचे सुख उपभोगतील. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग येतील. 
..............

संबंधित बातम्या