ग्रहमान : २१ ते २७ डिसेंबर २०१९ 

अनिता केळकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

ग्रहमान
 

मेष : भोवतालच्या व्यक्तींची पारख करण्यात यश आले, तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतीलच असे गृहीत धरू नये. कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना योग्य ती सावधगिरी बाळगावी. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे वळावे. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. विचारांचा गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. घरात तटस्थपणे राहून काम केलेत तर फायदा होईल. तरुणांनी अतिधाडस करू नये.

वृषभ : स्वास्थ्य जपून काम केले, तर भविष्यात लाभ होईल. व्यवसायात तणाव निर्माण करणारी स्थिती असली, तरी काळजीपूर्वक पावले उचलावीत. व्यवसायात स्पर्धेमुळे सजग राहावे लागेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामातील बदल किंवा बदली यामुळे दबाव राहील. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. घरात प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घेणे कठीण जाईल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर राहील. महिलांनी प्रकृतीस जपावे. मनन चिंतनात वेळ घालवावा.

मिथुन : तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. ती हाती घेण्यापूर्वी हातातील कामे वेळेत संपवावी. पैशांची स्थिती चांगली राहील. हातातील पैसे काटकसरीने खर्च करावे. नोकरीत कामात गुप्तता ठेवावी. मतप्रदर्शन न करणेच चांगले राहील. प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नये. घरात वादविवाद टाळावा. कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नये. आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल व्हावी.

कर्क : आशावादी राहाल. कर्तव्यपूर्तीसाठी कष्ट करण्याची मानसिकता बळावेल. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. जुनी येणी वसुलीसाठी प्रयत्न राहील. कधी शक्ती तर कधी युक्तीचा अवलंब कामे पूर्ण करण्यासाठी कराल. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर टाळावा. कामात चोख राहून इतरांनाही कामात मदत कराल. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात नातेवाईक व आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. घरकामात महिलांचा वेळ जाईल. तरुणांनी अतिसाहस करू नये.

सिंह : अडथळ्यांची शर्यत यशस्वीपणे पार पाडून मार्गक्रमण कराल. व्यवसायात तुमचा पवित्रा सावध ठेवावा. तांत्रिक अडचणी, अडथळे येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तुमचे ठरवलेले कार्यक्रम मागेपुढे होण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाचे करार तूर्तास पुढे ढकलावे. नोकरीत मनासारख्या गोष्टी घडतीलच असे नाही. रागावर नियंत्रण ठेवावे. 'आपले काम बरे नि आपण बरे' हे धोरण लाभदायी ठरेल. घरात इतर व्यक्तींशी जपून बोलावे व वागावे. नातेवाईक, प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.

कन्या : संमिश्र ग्रहमान लाभले आहे. एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याचा तुमचा बेत असेल, तरी तुमच्या मनाला आवर घालावा. व्यवसायात विचारपूर्वक पावले उचलणे हितावह राहील. पैशांच्या व्यवहारात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. नोकरीत वादविवादापासून अलिप्त राहावे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून मगच स्वतःचे निष्कर्ष ठरवावे. नवीन ओळखी होतील. महिलांनी तब्येत सांभाळावी.

तूळ : मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात फार मोठी उडी नको. मात्र, थोडेसे धाडस करण्यास हरकत नाही. पैशांच्या व्यवहारात थोड्या त्रुटी राहतील. तरीही पुढे जाण्यासाठी धडपड राहील. जुनी येणी येतील. कामात स्वयंपूर्ण रहाल. नवीन करार मदार करताना अटी-नियमांचा सखोल अभ्यास करून मगच सह्या कराव्या. नोकरीत जपून वागावे व बोलावे. वरिष्ठांनी दिलेली आश्‍वासने ते पाळतील. सहकारी व वरिष्ठांची कामात मदत होईल. घरात वातावरण चांगले राहील. मनःशांती लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या मानी व अहंमन्य स्वभावाला ठेच लागण्याची शक्‍यता आहे, तरी जिभेवर नियंत्रण ठेवावे. व्यवसायात कोणतेही निर्णय घेताना गडबड करू नये. ज्येष्ठांचा सल्ला आवश्‍यक तेथे घ्यावा. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या मताला मान मिळेल. वरिष्ठांना न दुखावता तुम्ही तुमची भूमिका मांडावी. घरात व्यक्तींचे एकमत होणे कठीण आहे, तेव्हा वादाचे मुद्दे आवरते घ्यावेत. महिलांनी सलोख्याने वागून कामे संपवावीत.

धनू : तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक वातावरण मिळेल. त्यामुळे प्रगतीचा रथ पुढे जाईल. व्यवसायात नवीन कामांमुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन करार मदारही होतील. अपेक्षित यश मिळेल. नोकरीत मतभेद न करता सहकार्य मिळवावे. जादा कष्टाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. कामानिमित्त प्रवासयोग संभवतो. घरात आप्तेष्ट, नातेवाईक यांची ये-जा राहील. सुखद प्रसंग साजरा होईल. सलोख्याचे वातावरण राहील. प्रकृतीची चिंता कमी होईल. महिलांनी आध्यात्मिक प्रगती करावी.

मकर : अत्यंत धोरणी राहून कामाचे नियोजन कराल. व्यवसायात दुर्लक्ष झालेल्या कामांकडे लक्ष देऊन ती प्राधान्याने पूर्ण कराल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. विचार व कृती यांचा योग्य समन्वय साधून कामे मार्गी लावाल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहावे. सजगवृत्तीने चौफेर लक्ष ठेवावे. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावे. घरात तणावमुक्त वातावरण राहील. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्यापासून चार हात लांब राहावे.

कुंभ : थोडा विचारपूर्वक निर्णय घेऊन पुढे जावे. व्यवसायात भागीदारीच्या प्रश्‍नात ऊहापोह होईल. मात्र, त्यावरून कोणताच निष्कर्ष काढू नये. कामांना झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. पैशांचीही चणचण राहील. नोकरीत तुम्हाला होत असलेल्या गैरसोयींचा राग इतरांवर काढू नये. वादविवादांपासून लांब राहिलात तर हितसंबंध राखू शकाल. नोकरीत बदल करण्यापूर्वी जबाबदारीचा विचार करावा. घरात मोठ्या व्यक्तींना सांभाळून घ्यावे लागेल. महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन राखावा.

मीन : सध्या तुमचा मूड आनंदी असेल. त्यामुळे बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. नवीन कामे मिळतील. पैशांची चिंता मिटेल. भोवतालच्या व्यक्तींची मदत लाभेल. नोकरीत हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. व्यवसायातून विशेष लाभ होईल. वरिष्ठांना व सहकाऱ्यांना तुमच्या कामाचे महत्त्व कळेल. प्रतिष्ठा मिळेल. घरात मनाजोगती खरेदी करता येईल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. महिलांना मनःशांती लाभेल.

संबंधित बातम्या