ग्रहमान : २९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२०

अनिता केळकर
सोमवार, 2 मार्च 2020

ग्रहमान
 

मेष : तुमच्यावर ग्रहांची मर्जी आहे. व्यवसायात प्रगती उत्तम होईल. आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. अनपेक्षित चांगली कामे होतील. नोकरीत वरिष्ठ कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, ती पूर्ण कराल. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. अपेक्षित कागदपत्रे हाती येतील. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगता येईल. मनपसंत व्यक्तींचा सहवास लाभेल. जिवाभावाची माणसे भेटल्याने आनंद मिळेल. वातावरण आनंददायी राहील. प्रवास सफल होईल.

वृषभ : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. नवीन कामांसाठी मोठी गुंतवणूक कराल. बेरोजगारांना काम मिळेल. वरिष्ठ कामानिमित्त जादा सवलती देतील, त्याचा लाभ घ्यावा. तुमचे विचार सहकाऱ्यांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांना नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल. मानसन्मान व प्रतिष्ठा मिळेल. आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीची उत्तम साथ मिळेल.

मिथुन : मनातील ईप्सित साध्य करू शकाल. व्यवसायात कामात प्रगती होईल. नवीन कामे मिळतील. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीत स्वतःचे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. मात्र, वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे पूर्ण करावीत. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. महिलांचा कामाचा उरक दांडगा राहील. नवीन जबाबदारी पेलाल. घरातील तणाव कमी करून सलोख्याचे वातावरण निर्माण केल्यास संवाद वाढेल.

कर्क : कामात तत्परता दाखवून यशप्राप्ती मिळवाल. नवीन आव्हाने पेलाल. व्यवसायात काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवण्याची इच्छापण होईल. नोकरीत अनपेक्षित लाभ होतील; शिवाय तुमच्या कौशल्याला पुरेपुर वाव मिळेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना स्वतःची हौसमौज पुरवता येईल. एखादा छोटासा कार्यक्रम आखाल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलावंत, खेळाडूंना यशदायक ग्रहमान.

सिंह : तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. योग्य निर्णय घेऊन कामात प्रगती कराल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत कितीही काम केले, तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही. कामात गुप्तता राखावी. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांच्या व इतरांच्या मागण्या, हट्ट पुरवावे लागतील. त्यांच्या तैनातीत राहाल. कुटुंबासमवेत छोटी सहल काढाल. सामाजिक कामात मान मिळेल.

कन्या : कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. व्यवसायात चोखंदळ राहाल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नोकरीत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. पैशांची तजवीज होईल. येणी वसूल होतील. महिलांना मन:स्वास्थ्य जपता येईल. घरकामात बराच वेळ जाईल. चांगली बातमी कळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल.

तूळ : ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात कामात कार्यक्षमता वाढवून कामे संपवाल. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. जुनी येणी वसुलीकडे विशेष लक्ष द्याल. खेळत्या भांडवलाची उपलब्धता होईल. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामंजस्याने वागून चांगली संगत ठेवाल. महिलांना आनंदवार्ता समजतील. आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. त्यामुळे मन आनंदी राहील.

वृश्‍चिक : व्यवसायात दुसऱ्यांची मदत कशाप्रकारे घेता यावर यश अवलंबून राहील. कठीण अशक्‍यप्राय कामात शक्तीपेक्षा युक्तीने यश मिळवाल. महत्त्वाची कामे धसास लागतील. इतरांचे सहकार्य मिळेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. गैरसमजुतीचे घोटाळे टाळावेत. जोडव्यवसाय असणाऱ्यांना लाभ होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल. खरेदीचा मोह होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

धनू : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानाल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. त्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागेल. कामात महत्त्वाचे निर्णय अचूक ठरतील. फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. स्वतःचे काम संपवून तुम्ही इतरांना कामात मदत कराल. केलेल्या कामाची शाबासकी मिळेल. महिलांना अंगी असलेले कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. कलावंतांना कलेत प्रतिभा सिद्ध करता येईल.

मकर : भविष्याचा विचार करून प्रत्येक कृती कराल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात नवीन गुंतवणुकीवर भर राहील. पैशांची स्थिती उत्तम राहील. नोकरीत कामाचा ताण वाढला, तरी अनुभव चांगला मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. प्रगतीचा आलेख उंचावेल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग येतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

कुंभ : 'प्रयत्नांती परमेश्‍वर' या म्हणीची आठवण होईल. निश्‍चय व चिकाटी यांच्या जोरावर महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लागतील. कामातील बेत गुप्त ठेवून कृतीवर भर द्याल. व्यवसायात आखलेले डावपेच यशस्वी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जादा सवलती मिळतील. महिलांना प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. मिळालेल्या संधीचा उपयोग करावा. चांगली बातमी कळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील.

मीन : भावनेपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ मानून प्रगती कराल. व्यवसायात कार्यतत्पर राहाल. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. नोकरीत महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. आनंदवार्ता समजतील. पैशांच्या मोहापासून चार हात लांब राहावे. वाईट संगत टाळावी. महिलांनी अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. दगदग धावपळ कमी करावी. आप्तेष्ट, नातेवाईकांच्या भेटीने आनंद मिळेल. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ग्रहमान.

संबंधित बातम्या