ग्रहमान : ११ ते १७ एप्रिल २०२०

अनिता केळकर
सोमवार, 13 एप्रिल 2020

ग्रहमान
 

मेष : महत्त्वाचे ग्रह वातावरणातील अनुकूलता वाढवण्यास मदत करतील. कोणत्याही व्यवहारात घाईने निर्णय न घेता विचारपूर्वक घ्यावा. पैशांअभावी खोळंबलेली कामे हाती घेऊन मार्गी लावाल. पैशांची चणचण जाणवेल, तेव्हा खेळत्या भांडवलाची तरतूद करा. तुमचे कामातील बेत गुप्त ठेवा. नोकरीत कामात चोखंदळ राहा. ‘आपले काम बरे आणि आपण बरे’ हे धोरण ठेवा. घरात महिलांनी वादविवाद टाळावेत. अध्यात्मात रस घ्यावा. मुलांकडून चांगली बातमी कळेल. 

वृषभ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन पूर्ण करा मगच राहिलेली कामे हाती घ्या. कामामुळे दगदग वाढेल. कामात झालेला विलंब सहन होणार नाही. व्यवसायात ओळखीचा उपयोग करून कामे मार्गी लावा. नोकरीत अवघड कामे तुमच्यावर सोपवून वरिष्ठ तुमची परीक्षा बघतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात महिलांना आवडत्या छंदात वेळ रमविता येईल. विरंगुळा लाभेल. प्रियजनांबरोबर मजेत वेळ घालवाल.

मिथुन : विचार व कृती यांची योग्य सांगड घालून प्रगती कराल. कामात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या. नशीब साथ देईल. व्यवसायात वेळेत काम संपवा. मनाप्रमाणे उलाढाल राहील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. योग्य कामासाठी तुमची निवड होईल. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. बेकारांना नवीन संधी मिळेल. घरात प्रिय व्यक्तींच्या जीवनातील चांगला प्रसंग साजरा होईल. गृहसौख्य लाभेल. सामूहिक कामात प्रसिद्धीचे योग येतील.

कर्क : तुम्हाला ग्रहांची साथ आहे. त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे. वेळेचे व कामाचे योग्य गणित आखून कामे वेळेवर संपवण्यावर भर द्या. व्यवसायात नवीन कामे मिळतील. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह होईल, परंतु मोहावर आवर घाला. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. घरात गोंधळाची स्थिती असेल तर शांत चित्त राखा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. तरुणांनी अतिधाडस करू नये. महिलांनी डोके शांत ठेवावे.

सिंह : घर व व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. व्यवसायात कामांना चालना मिळेल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हितावह राहील. कामात वेळेचे बंधन पाळा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी शांत राहा. घरात आवश्‍यक ते बदल कराल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात फळ मिळेल. आप्तेष्टांचा सहवास मिळेल.

कन्या : कमी श्रमात जास्त यश मिळवण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी आवश्‍यक ते करारमदार होतील. मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने कामे संपवा. नोकरीत तुमच्या कतृत्वगुणांना वाव मिळेल. व्यवहार चातुर्यामुळे उत्तम यश मिळेल. घरात महिलांना दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. मुलांच्या हट्टाखातर चार पैसे जादा खर्च करावे लागतील. घरात मानले तर समाधानकारक असे धोरण ठेवावे.

तूळ : महत्त्वाचे ग्रह तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यास सज्ज आहेत. व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्यावा. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. पूर्वीच्या गुंतवणुकीतून कमाई होईल. नोकरीत जादा सुविधा मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. जोडधंदा असेल तर त्यातूनही उत्पन्न मिळेल. नवीन जागा, वाहनखरेदीचा बेत सफल होईल. तरुणांचे विवाह ठरतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे.

वृश्‍चिक : ज्या गोष्टींची तुम्ही बराच काळ वाट पाहात होतात, त्यात सकारात्मक घटना घडू लागतील. व्यवसाय-नोकरीत प्रगतीचा आलेख चढता राहील. खेळत्या भांडवलाची तरतूद झाल्याने पैशाची व्यवस्था होऊ शकेल. वैयक्तिक जीवनात चांगली घटना घडल्याने महिलांचा उत्साह वाढेल. ज्येष्ठांना मनाप्रमाणे जगता येईल. कलावंत, राजकारण्यांना यशप्राप्ती होईल. नवीन कामे स्वीकारताना वरिष्ठांना त्याबद्दलची माहिती विचारावी.

धनू : इकडे आड तिकडे विहीर, अशी सध्या तुमची अवस्था आहे. पण ‘सब्र का फल मीठा होता है’ हे लक्षात ठेवावे. प्रगतीसाठी व्यवसायात आधुनिक पद्धतीचा अवलंब करायला हवा. नवीन गोष्टींमध्ये खर्च करावा लागेल. कामात समाधान मिळेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अभ्यास करावा लागेल. कामात गुप्तात राखा. खर्चाचे बजेट कोलमडल्याने चिंता वाढेल. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. दगदग धावपळ करू नये. डोके शांत ठेवून काम करावे.

मकर : कृतीवर भर द्यावा. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. विचारांना चालना मिळेल. व्यवसायात बरकत असेल, पण खर्चाचे प्रमाणही जास्त असेल. शेअर्स, जमीनजुमला, स्थावर अशा प्रकारची जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरीत जादा काम करून जास्त कमाई करता येईल. वरिष्ठांची व सहकाऱ्यांची मदत मिळेल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. घरातील महत्त्वाच्या प्रश्‍नात ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. तरुणांचे विवाह जमतील.

कुंभ : स्वप्ने साकार होतील असा आठवडा आहे. व्यवसायात नवे बेत प्रत्यक्षात उतरवण्याची पूर्वतयारी करायला हरकत नाही. सध्याच्या व्यवसायात उत्पन्न वाढेल. नवीन जोडधंदा सुरू करता येईल. हव्या त्या सुखसुविधा तुम्हाला नोकरीत मिळतील. घरात सर्वांबरोबर सलोख्याने वागावे. सर्वांच्या विचाराने काही महत्त्वाचे निर्णय होतील. मोठ्या व्यक्तींना, ज्येष्ठांना त्यांच्या मनाप्रमाणे वागता येईल. महिलांना कामात समाधान मिळेल. सुखद प्रसंग साजरा कराल.

मीन : प्रगतीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी या आठवड्यात जरूर प्रयत्न करा, यश येईल. व्यवसायात अनुकूल घटना घडल्याने महत्त्वाकांक्षा वाढेल. पूर्वी ज्याकामात किंवा ज्या कारणाने निराशा आली होती, त्यात मनाप्रमाणे घटना घडून येईल. पैशाची चिंता मिटेल. जोडव्यवसायातून लाभ होईल. प्रवास घडेल. मजेत वेळ जाईल. तरुणांचे विवाह जमतील. प्रियजनांच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरे कराल. मनोधैर्य चांगले राहिल. महिनांनी प्रकृतीचे तंत्र सांभाळावे.

संबंधित बातम्या