ग्रहमान : १८ ते २४ एप्रिल २०२०

अनिता केळकर
सोमवार, 20 एप्रिल 2020

ग्रहमान
 

मेष : नोकरी व्यवसायात कल्पकता दाखवून कामे कराल. नवीन कामाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील. अर्थप्राप्ती होईल, परंतु पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नोकरीत काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरात बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. महिलांना कामाचा आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य उपभोगाल. घरात आनंदाचे क्षण साजरे कराल. नवीन खरेदीचा योग संभवतो. प्रकृतीत छान सुधारणा होईल व मानसिक समाधान मिळेल. 

वृषभ : सर्व महत्त्वाचे ग्रह लाभदायक आहेत. व्यवसायात कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल. लोकांचे देणे देता आल्याने मनावरचा ताण कमी होईल. कामामुळे कौतुकास पात्र ठराल. नोकरीत आनंदाची बातमी कळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. ज्यादा कामातून वरकमाई करता येईल. महिलांसाठी घरातील वातावरण चांगले राहील. घरात सर्वांनुमते कार्यक्रम ठरेल, पार पडेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मिथुन : कामाचे योग्य नियोजन व योग्य वेळी झालेली हितचिंतकांची मदत यामुळे कामांना गती येईल. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. व्यवसायात आर्थिक येणी वसूल होतील. नोकरीत संवाद साधून काम करण्यावर भर द्याल. वरिष्ठांना दिलेला शब्द पाळाल. महिलांनी स्वावलंबी राहून गर्भसौख्याचा आनंद घ्यावा. मनातील स्वप्ने साकार होतील. चिंता मिटतील. मानसिक समाधान मिळेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील.

कर्क : तुम्ही सध्या द्विधामनस्थितीत आहात, तरी विचार करून कृती करावी. व्यवसायात मोठे धाडस तूर्तास करू नये. पैशांच्या व्यवहारात उधार उसनवार नकोत. मैत्री व व्यवहार यांच्यात गल्लत करू नये. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे, तरी आपल्या हातून चुका होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष द्यावे. अनावश्यक खर्च टाळावा. नको त्या कामात वेळ जाईल. महिलांना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आवडत्या छंदात मन गुंतवावे.

सिंह : सूचक घटनांद्वारे योग्य मार्गदर्शन मिळेल, त्याचा फायदा घ्यावा. व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने करून घेतलेत, तर लाभ तुमचाच होईल. प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतील. नोकरीत बढतीचा योग येईल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महिलांना परोपकाराची संधी मिळेल. तसेच महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. चांगल्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. तरुणांना कलागुण दाखवता येतील.

कन्या : महत्त्वाचे ग्रह साथ देणारे आहेत. व्यवसायात कर्तव्य श्रेष्ठ मानून प्राधान्य द्याल. कामात कर्तबगारी दाखवाल. तुमच्या मेहनतीस यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. अधिकाराचा योग्य उपयोग करून घ्याल. अपेक्षित पैसे मिळण्यास मात्र थोडा विलंब होईल. महिलांना परिस्थितीनुरूप कामात बदल करावा लागेल. कलावंतांना अपेक्षित यश मिळेल. प्रियजनांच्या जीवनातील सुखाचे प्रसंग साजरे कराल. तरुणांना साहस करण्याची खुमखुमी येईल.

तूळ : सर्व आघाड्यांवर सतर्क रहावे लागेल. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. संयम, सहनशीलता व सावधानता ठेवून वागावे लागेल. नोकरीत बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत तुमचे काम, तुम्ही चांगल्याप्रकारे करून स्तुतीस पात्र ठराल. घरातील अनावश्यक खर्च टाळावा. कर्तव्यपूर्तीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. महिलांना इतरांशी चांगले हितसंबंध राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. वादविवाद टाळून प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक : मृगजळाच्या पाठीमागे न धावता हातातील कामांवर लक्ष द्यावे. आर्थिक प्राप्ती झाली, तरी खर्चाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यवसायात नवीन कार्यक्षेत्राचा परिचय होईल. तसेच नवीन गोष्टी शिकता येतील. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. राजकारणी व्यक्तींना त्यांनी आखलेल्या डावपेचात यश मिळेल. महिलांना धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. गृहसौख्य मिळेल. मानसिक समाधान मिळेल.

धनू : व्यवसायात घेतलेले निर्णय बरोबर आहेत असे दिसून येईल. कामात आघाडीवर रहाल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. लाभदायक घटना घडतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत आनंदी व उत्साही वातावरण राहील. मनाप्रमाणे कामे होतील. चिंता दूर होईल. महिलांना केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. इतरांची कामात मदत होईल. काहीतरी करून दाखवण्याची मनोकामना पूर्ण होईल. मनातील स्वप्ने साकार होतील. सामूहिक क्षेत्रात मान मिळेल.

मकर : कामाचा ताण वाढला, तरी खुबीने कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. महत्त्वाची कामे स्वतः कराल. व्यवसायात प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. पैशांची तजवीज होईल. नोकरीत बोलण्या-वागण्याने गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अतिविश्वास टाळावा. घरात वादाचे प्रसंग टाळावेत. महिलांनी कोणावरही सहज विश्वास ठेवू नये. घरातील खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरात महिलांना जबाबदारी आणि कर्तव्य दोन्हीही पार पाडावे लागतील.

कुंभ : बुध, शनी अनुकूल आहेत. व्यवसायात हरतऱ्हेने आर्थिक लाभ होतील. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळवाल. प्रयत्नांना यश प्राप्त होईल. नोकरीत महत्त्वाकांक्षा उफाळून येईल. मोठ्या यशासाठी प्रयत्न कराल. कामानिमित्त प्रवास घडेल. तरुणांनी जादा धाडस करू नये. तब्येतीची काळजी घ्यावी. महिलांना मुलांकडून चांगली बातमी कळेल. पूर्वी ठरलेले समारंभ पार पडतील. गृहसौख्य उपभोगता येईल. मानसिक आरोग्य चांगले राहील.

मीन : कामात लवचीक धोरण स्वीकारून बदल कराल. व्यवसायात धोरणी राहून काही ठोस निर्णय घ्याल. योग्य दिशा मिळाल्याने प्रगतीचे चित्र स्पष्ट होईल. भविष्याची तरतूद करण्यासाठी पैशांचे योग्य नियोजन कराल. नोकरीत अनपेक्षित लाभ होतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. महिलांना प्रिय व्यक्ती भेटतील. आनंदवार्ता समजतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. मनाजोगता खर्च करता येईल. मानसिक समाधान मिळेल.

संबंधित बातम्या