ग्रहमान

अनिता केळकर 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

ग्रहमान 

मेष 
शनीबद्दलचे चांगले परिणाम दिसतील. धंदा-व्यवसायात स्पर्धा तीव्र होईल. त्यामुळे सजग वृत्तीने वागावे. आत्मविश्‍वास व मनोधैर्य उत्तम राहील. हातातील कामे कोणताही धोका न पत्करता वेळेत पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या मतांचा विचार करतील. तुमच्या शब्दाला मान मिळेल. घरात विचारविनिमयाने योग्य तोच निर्णय घ्याल. मुलांकडून अपेक्षित बातमी कळेल. विद्यार्थ्यांनी मात्र सहज यशाची अपेक्षा ठेवू नये. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. 

वृषभ 
डोक्यावरचे ओझे खांद्यावर येईल त्यामुळे हायसे वाटेल. व्यवसायात कामाचा व्याप वाढवण्याचा विचार कराल. विस्ताराचे बेत करता येतील. पैशाची चणचण कमी होईल. नोकरीत आवडीचे काम करता येईल. मानसन्मानाचे योग येतील. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात नवीन वाहन, वास्तू, जागा खरेदीचे स्वप्न साकार होईल. घरगुती कार्यक्रमांना प्राधान्य द्याल. महिलांना सांसरिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. प्रकृतिमान सुधारेल. 

मिथुन 
राशीच्या अष्टमस्थानातील वक्री शनी जबाबदाऱ्यांची जाणीव करून देईल. व्यवसायात कामाचे समाधान मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. कामानिमित्ताने छोटा प्रवास घडेल. नोकरीत तुमची कार्यक्षमता उत्तम राहील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. घरात जुने प्रश्‍न डोके वर काढतील. त्यामुळे लक्ष द्यावे लागेल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील. प्रकृतीची काळजी मिटेल. 

कर्क 
ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नवीन करार, सौदे होतील. कामाचा वेग समाधानकारक राहील. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. नोकरीत कामात तुमचे महत्त्व वाढेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना गती मिळेल. घरात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडल्याने दडपण कमी होईल. थोडासा वेळ व पैसा राखून ठेवून भावंडांच्या मदतीला उपयोगी पडता येईल. चांगली बातमी कळेल. 

सिंह 
अनेक प्रश्‍नांची उकल झाल्याने हायसे वाटेल. थोडा धीर धरला तर यशाची चव चाखता येईल. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. इतर कामे खुबीने गोड बोलून करून घ्यावीत. जुन्या रेंगाळलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत ‘इच्छा तेथे मार्ग’ याप्रमाणे कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. पैशाची ऊब राहील. आप्त, कौटुंबिक जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागेल. जुने प्रश्‍न मार्गी लागतील. 

कन्या 
स्वतःची आर्थिक व शारीरिक क्षमता ओळखून त्याप्रमाणे कार्यक्षेत्र निवडलेत तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल. भावनांना मुरड घालून जिद्द व आत्मविश्‍वास बाळगून कामे करावीत. व्यवसायात मानले तर समाधान मिळेल. अनुकूल वातावरणाने काही कामे पुढे सरकतील. नोकरीत जबाबदारी वाढेल पण फायद्याचे प्रमाणही वाढेल. नवीन ओळखी होतील. प्रवासयोग संभवतो. घरात समाधानकारक तोडगा निघाल्याने बरे वाटेल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. 

तूळ 
अंथरूण पाहून पाय पसरावेत. व्यवसायात प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे. प्रगतीला पूरक ग्रहमान आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. पैशाची आवकही वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. नोकरीत अपेक्षित सुविधा मिळाल्याने हुरुप येईल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. घरात महत्त्वाच्या निर्णयात तुमचा सिंहाचा वाटा राहील. शुभकार्ये ठरतील. मुलांची अपेक्षित प्रगती. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. 

वृश्‍चिक 
प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता राहील. व्यवसायात सर्वांगीण प्रगती होईल. नवीन उत्पन्नाचे साधन मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने आर्थिक चिंता मिटेल. नियोजनबद्ध कामे झाल्याने समाधान वाटेल. नोकरीत नवीन कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. त्यासाठी जादा अधिकार व सुविधा देतील. मात्र त्याचा गैरवापर करू नये. घरात तरुणांना करिअरमध्ये स्थिरता लाभेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान आहे. 

धनू 
आकांक्षा व जिद्द वाढेल. त्यामुळे प्रत्येक आघाडीवर अग्रेसर राहण्याचा विचार राहील. व्यवसायात जुने प्रश्‍न मार्गी लागतील. कामाचा विस्तार करण्याचा मानस प्रत्यक्ष साकार होईल. पैशाची चिंता मिटेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत पगारवाढ व बढती मिळेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. घरात कौटुंबिक जीवनात कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. प्रियजनांच्या सहवासाने आनंद वाढेल. मुलांच्या प्रगतीची बातमी कानावर येईल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. 

मकर 
ग्रहांची अनुकूलता लाभेल. त्यामुळे प्रगतीचा मार्ग पुन्हा एकदा निर्वेध होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारेल. योग्य दिशा  मिळाल्याने कामातील यश वाढेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जगाच्या प्रवाहाबरोबर वाटचाल कराल. नोकरीत चांगल्या संधी मिळतील. मात्र त्याचा व्यावहारिक उपयोग करून घ्यावा. नवीन ओळखी होतील. प्रतिष्ठा, मानमरातब मिळेल. घरात शुभप्रसंग येतील. आर्थिक, मानसिक, शारीरिक व घरगुती समस्यांतून सुटका झाल्याने हायसे वाटेल. प्रकृतिमान सुधारेल. 

कुंभ 
माणसांची योग्य पारख करून मगच विश्‍वास दाखवावा. व्यवसायात बाजारातील स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कामाची आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करावीत. नोकरीत बदल न करता शक्यतो जैसे थे राहावे. हातातील कामे संपवून मग नवीन कामांकडे वळावे. घरात हलके कान न ठेवता चोख कर्तव्य बजावावे. वादाचे प्रसंग आले तरी दुर्लक्ष करावे. प्रकृतीची हेळसांड होणार नाही याकडे लक्ष द्यावे. महिलांनी मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यानधारणा करावी. 

मीन 
नवीन काहीतरी करण्याच्या तुमच्या वृत्तीला ग्रहमानाची जोड मिळेल. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील. विस्ताराचे बेत प्रत्यक्षात साकार होतील. कामांना गती येईल. नोकरीत जोखमीचे व जबाबदारीचे काम मिळेल. कामानिमित्ताने सुखसुविधा मिळतील. प्रवासाचे योग येतील. घरात काही कारणाने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. तरुणांना स्थैर्य लाभेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. पैशाची चिंता मिटेल.

संबंधित बातम्या