ग्रहमान ः ५ ते ११ सप्टेंबर 

अनिता केळकर 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

ग्रहमान ः ५ ते ११ सप्टेंबर 

मेष 
व्यवसाय-नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे कराल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. 

वृषभ 
दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळवून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. तरुणांचे विवाह जमतील. 

मिथुन 
चित्त स्थिर नसल्याने तळ्यात मळ्यात राहाल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्यावे. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने कराल. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाल. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना नवीन वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करावेत. 

कर्क 
काहीतरी भव्यदिव्य करण्याची सूप्त इच्छा राहील. परंतु, सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जावे. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवावीत. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी चिडू नये. महिलांनी हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच तडजोडीचे धोरण ठेवून इतर व्यक्तींबरोबर वागावे. मानसिकतेला जपावे. 

सिंह 
हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आखलेले आडाखे अचूक येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खेळाडू, कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल. 

कन्या 
काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्यक ठरेल. नोकरीत प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवणे फायद्याचे ठरेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. 

तूळ 
तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल. 

वृश्‍चिक 
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्यप्राय कामे शक्य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्त्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल. तरी डोके शांत ठेवावे. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. तरुणांनी अतिसाहस टाळणे आवश्‍यक. 

धनु 
अचानक सर्व काही सुरळीत झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील. हातून चांगली कामे गती घेतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ती कृती कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाधान मिळेल. महिलांना परोपकाराची संधी मिळेल. धार्मिक कार्ये हातून घडतील. कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळेल. 

मकर 
रात्र थोडी सोंगे फार, अशी स्थिती असेल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दगदग धावपळही वाढेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांच्या व सहकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. कठीण कामे सहजपणे पूर्ण करून यश मिळवाल. महिलांना वेळेचा छान सदुपयोग करता येईल. कामाचे श्रेय मिळेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. 

कुंभ 
आळस झटकून मोठ्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसायात सुसंवाद साधून कामे करण्यावर जास्त भर राहील. अर्थप्राप्ती झाल्याने  खर्चाची चिंता मिटेल. प्रसंगावधान राखून कामे पूर्ण कराल. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. स्वतःचे काम संपवून इतरांना कामात मदत कराल. महिलांचा मानसिक ताण कमी होईल. सुवार्ता कळेल. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामूहिक कामात पुढाकार राहील. 

मीन 
तुमच्या वागण्या बोलण्याने तुम्ही इतरांची मने जिंकून घ्याल. नम्र व संयमाने वागून कामे पूर्ण कराल. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरी वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. तुमच्या कृतीतून त्यांना प्रेरणा मिळेल. महिलांना जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची ऊब मिळेल. खर्च वाढला तरी तो चांगल्या कारणासाठी होईल. मनःस्वास्थ्य मिळेल.

संबंधित बातम्या