ग्रहमान ५ ते ११ जून २०२१

अनिता केळकर
सोमवार, 7 जून 2021

ग्रहमान ५ ते ११ जून २०२१

मेष
मंगळासारखा आक्रमक ग्रह तुमच्या राशीस्वामी असल्याने व्यवसायात अचूक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांच्या हातून उत्तम कामगिरी होईल. कामानिमित्ताने प्रवास योग. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांचा वेळ पाहुण्यांची सरबराई करण्यात जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृषभ
व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामात कार्यतत्पर राहणे आवश्यक. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून जेवढा फायदा मिळवता येईल तेवढा मिळवा. नोकरीत तुमच्या कामामुळे तुम्हाला व तुमच्या शब्दाला मान मिळेल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. सणासमारंभाच्या निमित्ताने महिलांची बरीच खरेदी होईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील.

मिथुन
तुम्हाला पूरक असे ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात प्रगतीस अनुकूल  काळ आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. महत्त्वाचे करारमदार होतील. नोकरीत टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतील. दगदग, धावपळ वाढेल. अचानक धनलाभाची शक्यता. महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करता येईल. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

कर्क
कामात नवीन आव्हाने स्वीकारून ती तडीस नेण्याचा मानस असेल. व्यवसायात बदल करताना मोठी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. उधार उसनवार टाळा. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यात यशही मिळेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांचा आत्मविश्‍वास वाढेल. प्रियजनांसमवेत छोटीशी सहल काढाल.

सिंह
ग्रहमान व वातावरणाची उत्तम साथ मिळाल्याने उत्साह ओसंडून जाईल. व्यवसायात अनपेक्षित पण चांगल्या घटना घडतील. मनातील मोठे बेत प्रत्यक्षात साकार होतील. जमा-खर्चाचे गणित समसमान राहील. नोकरीत भावनेच्या भरात जादा कामे ओढवून घेऊ नका. बेकारांना नोकरी मिळेल. घरात नवीन वाहन, वस्तूंच्या खरेदीत महिलांचा बराच वेळ जाईल. पाहुण्यांची ये-जा राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

कन्या
जीवनात एक नवा दृष्टिकोन ठेवून कामाला लागाल. तुमची झालेली कुचंबणा नाहिशी होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. ती स्वीकारण्यापूर्वी स्वतःची आर्थिक व शारीरिक क्षमता ओळखा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सहकाऱ्यांवर फारसे विसंबून राहू नका.

तूळ
व्यवसायात विस्तार करून उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवाल. बँका व हितचिंतक यांची मदत खेळते भांडवल उभे करताना होईल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे हातावेगळी कराल. नोकरीत केलेल्या कामाचा आनंद मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. अंगी असलेल्या प्राविण्याचा उपयोग करून यश संपादन कराल. नोकरदारांना अनपेक्षित लाभाची शक्यता.

वृश्‍चिक
ग्रहमान संमिश्र फळ देईल. तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याला भरपूर वाव मिळेल. व्यवसायात आधुनिकीकरण करून नवीन विचारांचा अवलंब कराल. प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. नवीन आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे  होईल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागल्याने चिडचिड  होईल. ‘शब्द हे शस्त्र आहे’, हे लक्षात ठेवा. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करा. प्रकृतीमान चांगले राहील.

धनू
तुमच्या जिद्दी व प्रयत्नवादी स्वभावाचा फायदा होईल. व्यवसायात कामात बदल करून नवीन उत्पन्नाचे साधन शोधाल. नवीन योजनांना मूर्त स्वरूप येईल. जुनी येणी वसूल होतील. नोकरदार व्यक्तींनी कार्यैौतत्पर राहावे. जोडधंदा फायदा मिळवून देईल. घरातील महिलांच्या शब्दाला मान मिळेल. रेंगाळलेले प्रश्‍न तडीस लागतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

मकर
युक्ती व शक्तीचा वापर करून व्यवसायात यश संपादन कराल. योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी कराल. कौशल्याचा वापर करून अभिनव धाडस कराल. पूर्वी लांबलेले बेत व आर्थिक कामे गती घेतील. नोकरदार व्यक्तींनी मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करू नये. नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे विचार जरी पटले नाहीत तरी प्रतिउत्तर देऊ नये.

कुंभ
अनुकूल ग्रहमान व वातावरणाची साथ लाभेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मनाविरुद्ध जाऊन मोठी कामे करावी लागतील. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. वसुलीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. तडजोडीचा अवलंब करून कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. आत्मविश्‍वास वाढेल.

मीन
कामातील प्रगतीचा आलेख चढत जाईल. त्याचा आनंद मिळेल. आर्थिक स्थितीही उत्तम असेल. व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्या. त्याप्रमाणे कामात लवचिक धोरण ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे नेटाने पूर्ण करा. नोकरीत विनाकारण होणारी धावपळ कमी होईल. कामात बदलाची शक्यता बेकारांना नवीन कामाची संधी. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.

संबंधित बातम्या