ग्रहमान - १९ ते २५ जून

अनिता केळकर
सोमवार, 21 जून 2021

ग्रहमान - १९ ते २५ जून

मेष
तुमचा उत्साह द्विगुणित करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरूपात मिळेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कामात तत्पर राहाल. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कुटुंबासमवेत छोटा प्रवास घडेल. गृहसौख्य आनंद उपभोगाल.

वृषभ
कामाचे वेळी काम इतर वेळी आराम, असा पवित्रा राहील. व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लावाल. जुनी येणी वसूल होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. प्रवास घडेल. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. महिलांना बाहेरची कामे करण्यात रस वाटेल. घरात नातेवाईक, पाहुण्यांची ये-जा राहील.

मिथुन
व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. आर्थिक परिस्थितीही समाधानकारक राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. बदल करून कामाचा विस्तार वाढवाल. नोकरीत महत्त्वाचे करारमदार होतील. वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी जादा अधिकार व सवलती देतील. जोडधंद्यातून विशेष  लाभ होईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

कर्क
भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्याल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे मार्गी लावाल. कामात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. हितचिंतकांच्या मदतीने पैशाची तजवीज होईल. नोकरीत तुमच्या वागण्या-बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कामातील बेत गुप्त ठेवा. अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. उधार उसनवार देऊ नका. महिलांनी थोडे सबुरीचे धोरण ठेवावे. झेपेल तेवढेच काम करावे.

सिंह
नशिबाची साथ राहील. व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. नवीन कामे मिळतील. अर्धवट कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. हातून चांगली कामगिरी केल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहार-परदेशमगनाच्या कामांना गती येईल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. कुटुंबासमवेत  प्रवासाचे योगही येतील.

कन्या
मानमरातब व प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कामात विशेष सहभागी व्हाल. व्यवसायात माणसांची पारख खुबीने करून कामात उपयोग करून घ्याल. आर्थिक बाजू भक्कम राहील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लवचिक धोरण अवलंबाल. नोकरीत कोणाकडून कुठलीही अपेक्षा करू नका. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. जादा कामातून जादा पैसे मिळतील.

तूळ
व्यवसायात, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात आवश्यक ते बदल कराल. तुमची महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने हातून निसटलेली संधी पुन्हा मिळवाल. गैरसमज झाले असल्यास सामोपचाराने मिटवाल. नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. कमी श्रमात जास्त फायदा मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. नवीन ओळखी होतील. महिलांना सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.

वृश्‍चिक
तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार होतील. अनपेक्षित कामे मार्गी लागतील. व्यवसायात कामाला हुरूप येईल. पैशाची चिंता मिटेल. ओळखीचा उपयोग होईल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. त्यासाठी वरिष्ठ जादा भत्ते व सवलतीही देतील. बदलीच्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात महिलांना वातावरण आनंदाचे असेल. आवडते छंद जोपासता येतील. सुवार्ता कळेल.

धनू
तुमच्यातील धाडसी वृत्ती जागृत होईल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. कामात सक्रिय पुढाकार राहील. अर्धवट कामे मार्गी लावाल. नवीन कामे हाती घ्याल. कामाचा वेग वाढेल. नोकरीत वरिष्ठांना व सहकाऱ्यां‍ना तुमचे महत्त्व कळून येईल. बेकारांना नोकरी मिळेल. कामात मात्र गुप्तता राखा. क्षमता ओळखून कामे स्वीकारा. महिलांना मोठ्यांची मते पटणार नाहीत तरी वाद घालू नये. रागावर नियंत्रण ठेवावे.

मकर
जमा खर्चाचे बजेट कोलमडेल. अनपेक्षित खर्च वाढतील. व्यवसायात कामात विस्तार करण्याचे बेत ठरतील. त्यासाठी आवश्यक ते बदल कराल. खेळत्या भांडवलाची तरतूद बँका व इतर संस्थांमार्फत होईल. आज रोख व उद्याही रोखच हे धोरण विशेष लाभदायी ठरेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड पाहून तुमच्या मागण्या मांडाल. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ
कामात आलेली मरगळ झटकून मोठ्या उत्साहाने कामाला लागाल. नवीन कामे मिळतील. कामाचा वेग वाढल्याने आवश्यक ते बदल कराल. तुमची चिकाटी कामात दिसून येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील. सकारात्मक दृष्टिकोन लाभदायी ठरेल. बदलीसाठी सुसंधी चालून येईल. कामात रस वाटेल. मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल.

मीन
अनुकूल घटनांची नांदी होईल. यश नजरेच्या टप्प्यात आल्याने आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात उलाढाल वाढेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. नवीन कामाची संधी मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांचा घर सजावट  व दुरुस्ती यात बराच वेळ जाईल.

संबंधित बातम्या