ग्रहमान  १८ ते २५ डिसेंबर २०२१

अनिता केळकर
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

ग्रहमान  १८ ते २५ डिसेंबर २०२१

मेष 
या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल. कामात थोडी निराशा येईल, पण काम चालूच ठेवाल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील. पैशाची चिंता मिटेल. सहकारी व हितचिंतकांची मदत होईल. हौसेने एखादे काम हाती घ्याल, मात्र त्यात थोडा त्रास होईल. नोकरीत अतिउत्साहाच्या भरात कोणतेही आश्‍वासन देऊ नका. ते पूर्ण करावे लागेल. कामात थोडा धीर धरा. प्रकृतीमान सुधारेल.

वृषभ 
स्वकर्तृत्वावर विश्‍वास ठेवून कार्य करीत राहा, यश येईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. कामाच्यावेळी काम करून इतर वेळी आराम कराल. भांडवलाची तरतूद झाल्याने प्रगतिपथावर राहाल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील. वरिष्ठ कामात न मागता सवलत देतील. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. घरात मंगलकार्य ठरेल. महिलांना सभोवतालच्या व्यक्तींचे अंदाज अचूक येतील.

मिथुन 
काळानुरूप बदल कराल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करून फायदा मिळवाल. तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास उत्तम काळ आहे. काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. हातातील कामे पूर्ण होतील. नोकरीत आश्‍वासन देण्यापूर्वी तुमच्याकडून काय अपेक्षा आहे याचा अचूक अंदाज घ्या. चांगली बातमी कळेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील.

कर्क 
दीर्घकाळानंतर चांगले ग्रहमान लाभले आहे. त्याचा फायदा घ्या. व्यवसायात ठोस पावले उचलून कृती कराल. मनावरचे दडपण दूर होईल. अपेक्षित पैसे हातात मिळाल्याने नव्या योजना साकार होतील. परदेश व्यवहाराची नवीन संधी चालून येईल. नोकरीत उत्साहवर्धक वातावरण लाभेल. ओळखीचा उपयोग होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ मिळेल. घरात लांबलेले कार्य निश्‍चित ठरेल. परदेशगमनाची संधी चालून येईल. प्रकृतीमान सुधारेल.

सिंह 
आळस झटकून कामात  प्रगती करा. सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळवा. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग कराल. भागीदाराच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. ‘आपले काम बरे की आपण बरे’ हे धोरण नोकरीत उपयोगी पडेल. नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब सहन करावा लागेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील.

कन्या 
मानसिक आनंद मिळवून देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ चांगल्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. अडीअडचणींवर मात करून कामात प्रगती कराल. नवीन आखलेले बेत सफल होतील. आर्थिक स्थितीही सुधारेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या सूचनांचा विचार करतील. मान व प्रतिष्ठा मिळवून देतील. ओळखीचा उपयोग होऊन आवश्यक ती कामे होतील.

तूळ 
तुमचे प्रयत्न व कष्ट यांची योग्य सांगड घालतील तर यश फार दूर नाही असा अनुभव येईल. व्यवसायात शिस्त व योग्य नियोजनाने कामे होतील. पैशामुळे कोणाशी हितसंबंध दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. मध्यस्थांवर सोपविलेल्या कामावर देखरेख ठेवा. नोकरीत हाताखालच्या व्यक्तींकडून काम कसे करून घेता यावर यशाची भिस्त राहील. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलतही देतील.

वृश्‍चिक 
आशावादी राहाल. स्वप्ने साकार होतील. व्यवसायात ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी मिळेल. फायदा मिळवून देणारी कामे मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत नवीन कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काम मिळेल. मतलब साध्य करण्यासाठी वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात शुभकार्याची नांदी होईल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.

धनू 
सर्व आघाड्यांवर सज्ज राहा. तुमचे प्रत्येक काम महत्त्वाचे असेल. व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित मांडल्याशिवाय सुरुवात करू नका. महत्त्वाची कामे स्वतः हाताळून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल. पैशाची चिंता मिटेल. कमाई मनाप्रमाणे होईल. नोकरीत गरजेनुसार कामांना अग्रक्रम राहील. मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याकडे कल राहील. प्रवासयोग संभवतो. घरात गृहसजावट, नवीन खरेदीचे मनसुबे ठरतील.

मकर 
मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. व्यवसायात कामानिमित्ताने विविध स्तरावरील व्यक्तींशी भेटीगाठी होतील. नवीन कल्पना मनात येतील. पैशाचा ओघ राहिल्याने जुनी देणी देता येतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. पगारवाढ मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. घरात छोटा समारंभ साजरा कराल. आत्मविश्‍वास वाढेल.

कुंभ 
मनाला दिलासा देणारे ग्रहमान लाभल्याने निःश्वास टाकाल. व्यवसायात नेहमीच्या कामाचा तणाव असेल तरीही त्याची पर्वा करणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने अनेक बेत पूर्ण होतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल. वेळेचे गणित मांडून कामे उरका. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील व जादा सवलत देतील. नवीन हितसंबंध जोडले जातील.

मीन 
ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल. मनातील अनेक बेत साकार करण्यासाठी पावले उचलाल. व्यवसायात वेळेत कामे पूर्ण केलीत तर बराच फायदा होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. नवीन योजनांना मुहूर्त लाभेल. नोकरीत विशिष्ट कामासाठी परदेशगमनाची संधी मिळेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. घरात सांसारिक जीवनात आनंद देणारी बातमी कळेल.

संबंधित बातम्या