व्हॅलेंटाइन स्पेशल...

स्वप्ना साने
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

फेब्रुवारी महिन्याचे दुसरे नाव म्हणजे व्हॅलेंटाइन मंथ! या महिन्यात तरुणांमध्ये जणू वेगळाच उत्साह बघायला मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीचे प्लॅनिंगही असते. त्यासाठी व्हॅलेंटाइन स्पेशल लुक तर हवाच. 

प्लॅंनिंग - व्हॅलेंटाइन डेला छान दिसायचे असेल, तर स्किन केअर आणि हेअर केअर प्लॅन करायला हवे. ब्यूटी थेरपिस्ट किंवा पार्लरमध्ये आधीच अपॉइंटमेंट घ्यावी, म्हणजे ऐनवेळी धावपळ होत नाही. एक पूर्ण आठवडा व्हॅलेंटाइन सेलिब्रेशन असते, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कपड्यांची निवड करून ठेवायला लागेल. कारण कपडे आणि पार्टीचे स्वरूप यावर तुमचा मेकअप अवलंबून असेल.

मेकअप आणि हेअर स्टाइल - स्मोकी आय आणि बोल्ड आयलायनरबरोबर रेड हॉट लिपस्टिक एकदम परफेक्ट पार्टी लुक आहे. टीनएजर्सना फक्त बोल्ड आय मेकअप आणि हॉट पिंक लिपस्टिक हटके लुक देईल. बोल्ड आणि ग्लॅम लुकबरोबर फंकी लुक आवडत असल्यास, थोडा बोल्ड फेस मेकअप करता येईल. उदा. डोळ्याच्या भोवती छोटे रेड हार्ट पेंट करणे किंवा नेल्सवर हार्ट डिझाईन करणे किंवा एकाच गालावर हार्ट पेंट करणे. कॅट आय लुक आणि पर्पल लिपस्टिक तर ग्लॅम दिसतेच. त्याबरोबरच तुमचे केस शॉर्ट आणि हायलाइटेड असतील, तर बोल्ड आणि ब्यूटिफुलचा किताब तुम्हालाच मिळणार! आयडिया भरपूर आहेत, तुम्हाला कोणता लुक कॉन्फिडंटली कॅरी करता येईल, ते तुम्ही ठरवायचे. 

तुमचे केस स्ट्रेट आणि लांब असतील तर हाय पोनी खूपच स्टायलिश दिसेल. कर्ली केस असतील तर छान डीप कंडिशन करून सॉफ्ट करावे. एकदम बोल्ड लुक आहे हा. नॉर्मल केस असतील तर सॉफ्ट व्हेवदेखील खूप शोभून दिसतात. केसांना हायलाइट करणे तर सध्या ट्रेंडमध्ये आहेच, पण या स्पेशल ओकेजनसाठी रेड किंवा पिंक हायलाइट सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल. ज्यांना पर्मनंट हायलाइट नको असतील पण बोल्ड लुक हवा आहे, त्यांनी टेम्पररी स्प्रेचा वापर करावा. 

नेल आर्ट - संपूर्ण व्हॅलेंटाइन वीकमध्ये रोज नवीन नेल आर्ट करता येईल. तुम्ही नेल बार किंवा नेल आर्ट सलूनमध्ये जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कृत्रिम नखेही लावू शकता. ज्यांचे नेल्स हेल्दी आहेत, ते घरीच रोज नवीन नेल आर्ट करू शकतात. हात सुंदर दिसायला डी टॅन आणि हँड पॉलिश करायला विसरू नका. तसेच पायाचीपण नखे वेल डेकोरेटेड असावी. 

आजकाल लहान मोठे सगळेच व्हॅलेंटाइन पार्टी करतात, त्यामुळे तरुण मुलीच नव्हे तर स्त्रियासुद्धा तेवढ्याच उत्साही असतात. त्यामुळे स्त्रियांनीसुद्धा स्वतःच्या आवडीनुसार मेकअप आणि हेअर स्टाइल प्लॅन करावी. पार्टी आणि सेलिब्रेशननंतर मेकअप व्यवस्थित काढावा आणि नेहमी CTM म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगचे रुटीन करायला विसरू नये. केसांवर हेअर स्प्रे आणि हायलाइट केले असल्यास डीप कंडिशन करावे किंवा हेअर स्पा करून घ्यावा, म्हणजे त्वचा व केस सुदृढ दिसतील.   

संबंधित बातम्या