हायलाइट्स का है जमाना

स्वप्ना साने
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

हेअर फॅशन आता फक्त हेअर कट किंवा हेअर स्टायलिंगपर्यंत सीमित राहिलेली नाही, तर विविध रंगांनी डाय करणे किंवा फक्त काही स्ट्रेंड्स वेगळ्या रंगाने डाय करणे, हेअर टेक्श्‍चर बदलणे, स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग करणे... हे सर्व म्हणजे लेटेस्ट हेअर फॅशन! 
आजचा आपला विषय आहे, हेअर कलर. स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा हेअर कलरचा आनंदाने स्वीकार केलाय आणि हेअर फॅशन करण्यात ते कुठेच कमी नाहीत. बऱ्याच लोकांचा हेअर कलर करण्यामागचा मुख्य उद्देश असतो, तो म्हणजे ग्रे कव्हरेज. म्हणजेच पांढरे झालेले केस कलर करणे. पण असेही फॅशनप्रेमी आहेत जे विविध रंग केसांवर ट्राय करत असतात. 
हायलाइट्स किंवा हेअर स्ट्रीक्स या नावाने पॉप्युलर असलेल्या या हेअर फॅशनने तरुणाईला जणू वेड लावले आहे.

हायलाइट्स

कमीत कमी हेअर लॉक्स घेऊन त्यांना ओरिजिनल हेअर कलरपेक्षा वेगळे कलर करतात. हे हेअर लॉक्स ओरिजिनल हेअर कलरमध्ये मिक्स होऊन नवीन कलर फ्लॅश करतात, याला हायलाइट्स म्हणतात. हेअर रुट्स डार्क कलरचे आणि खाली टिपपर्यंत लायटर शेड असतो. ही प्रोसेस वेगवेगळ्या पद्धतींनी केली जाते. जसे, फॉईल टेक्निक, चंकिंग, हेअर पेंटिंग आणि फ्रॉस्टिंग. तुमच्या केसांना नेमके काय सूट होते ते बघून तुमचा हेअर स्टायलिस्ट ती प्रोसेस ठरवेल आणि अर्थातच, तुम्हाला किती बोल्ड लुक हवा आहे त्यावरही कलर अवलंबून आहे.

स्ट्रीकिंग

थोड्या जास्त केसांचा स्ट्रेंड घेऊन कलर करणे, याला स्ट्रीकिंग म्हणतात. बेसिक हेअर टोनपेक्षा दोन किंवा तीन लेव्हल लाइट शेड चांगली दिसते. पण त्यापेक्षा जास्त लाइट शेड किंवा कॉन्ट्रास्ट लुक तुमची एकंदरीत स्टाइल बिघडवू शकतो.

दोन्ही पद्धती आवडीनुसार आणि केसांच्या क्वालिटीनुसार ठरवायच्या असतात. योग्य त्या तज्ज्ञाकडून क्वालिटी प्रॉडक्ट्स वापरून कलर केले, तर तुम्ही स्वतःला एक ग्लॅम लुक देऊ शकता.
हेअर कलर कितीही ट्रेंडमध्ये असला आणि ग्रे कव्हरेजसाठी वरदान असला, तरी त्यापासून होणाऱ्या साइड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे परमनंट किंवा सेमी परमनंट डाय असतात. वारंवार कलर केल्यामुळे केसांचे टेक्श्चर आणि स्ट्रक्चर बदलते. केस ड्राय आणि लाइफलेस होतात. या डॅमेजमुळे केस तुटतात आणि कधीकधी हेअर फॉलपण सुरू होतो.
योग्य ती काळजी घ्याल तर हायलाइट्सचा बोल्ड लुक तुम्हाला फ्लॅश करता येईल. कारण हा ट्रेंड कधी आऊटडेटेड होणार नाही, तर यात अजून नवनवीन प्रकार येत राहणार... आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो, हे आपल्याला माहिती आहेच. म्हणून, be fashionable, but wisely!

हायलाइट्स केल्यावर घ्यावयाची काळजी:-

  • *तज्ज्ञांकडून ही प्रोसेस करून घ्यावी आणि नंतर घ्यावयाची काळजी नीट विचारून व्यवस्थित फॉलो करावी. 
  • *लो-सल्फेट किंवा सल्फेट फ्री शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.
  • *आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग करावे.
  • * यूव्ही किरणांपासून प्रोटेक्शनसाठी उन्हात जायच्या आधी स्कार्फ किंवा हॅटचा वापर करावा.
  • *सॉल्ट वॉटर आणि क्लोरीनेटेड वॉटर, हायलाइट्स किंवा कलर केलेल्या केसांना खूप डॅमेज करू शकते. म्हणून स्विमिंग करताना प्रोटेक्टिव्ह ऑइलचा वापर करावा.

संबंधित बातम्या