नखांची चमक

स्वप्ना साने
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

स्किन केअर प्रॉडक्ट्स आणि मेकअप प्रॉडक्ट्स घेताना आपल्या स्किन टाईप आणि स्किन टोनचा विचार करून घेतो, त्याचप्रमाणे नेल पॉलिशची शेड पण स्किन टोन बघूनच निवडावी. प्रत्येक व्यक्तीचा रंग वेगळा असतो. गोरा, गव्हाळ आणि सावळा असे त्याचे ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल. प्रत्येक स्किन टोनला शोभून दिसेल अशा नेल पॉलिशच्या अनेक शेड्स उपलब्ध आहेत.

तुमचा स्किन टोन गोरा किंवा व्हाइट असेल, तर कुठलेही डार्क कलरचे नेल पॉलिश तुम्हाला उठून दिसेल आणि हात अधिकच सुंदर दिसतील. डार्क कलर जसे रेड, ब्लू, डार्क पिंक, मरून, रुबी आणि इतर डार्क कलर्स तुमच्या स्किन टोनला परफेक्ट दिसतील. 

तुमचा स्किन टोन निमगोरा किंवा गव्हाळ असेल, तर तुम्ही डार्क आणि लाइट दोन्ही शेड्स लावू शकता, कारण या स्किन टोनला सगळे रंग खुलून दिसतात. ब्राईट कलर्स, मेटॅलिक कलर्स, मॅट कलर्स सगळेच या स्किन टोनला मॅच करतात. सिल्व्हर, गोल्ड, यलो, पिंक असे सगळेच कलर्स तुम्ही ट्राय करू शकता. 

तुमचा स्किन टोन सावळा किंवा डार्क असेल, तर शक्यतो डीप रेड, पिंक आणि निऑन कलर्स छान खुलून दिसतील आणि स्किन टोनमध्ये ब्लेंड होतील. पण नेल पॉलिश विकत घ्यायच्या आधी टेस्टर जरूर ट्राय करावे. 

क्विक टिप्स

  • नेल पॉलिश लावायच्या आधी हँड पॉलिशिंग किंवा मॅनिक्युअर जरूर करावे. स्किन टॅन निघून जाते आणि हाताची त्वचा तजेलदार दिसते. 
  • नखांना व्यस्थित शेप द्यावा आणि क्युटिकल रिमूव्ह करावेत. नेल्स शॉर्ट असतील तर राऊंड शेप द्यावा आणि लाँग असतील तर राऊंड किंवा स्क्वेअर असा हवा तो शेप देऊ शकता. 
  • नेल पॉलिश लावायच्या आधी बेस कोट जरूर लावावा. एक कोट वाळल्यानंतरच दुसरा कोट लावावा, म्हणजे फिनिशिंग येते आणि नेलपॉलिश टिकते.
  • नेल पॉलिशचा ब्रँड बघणेही महत्त्वाचे आहे. कमी दर्जाच्या प्रॉडक्टमुळे तुमच्या नखांचे नुकसान होऊ शकते. नखे पिवळी पडू शकतात आणि वीक होऊन तुटू शकतात. नेल बेड रफ होऊ शकतो. म्हणूनच चांगल्या क्वालिटीचे नेल पॉलिश घ्यावे. 
  • नेल पॉलिशचा वापर करताना अधूनमधून ब्रेक घ्यावा. सतत नखांवर कोटिंग असेल तर नेल्स ब्रिटल होतात. म्हणून काही दिवस नखे स्वच्छ करून रात्री त्यांना ऑलिव्ह ऑईल लावून मसाज करावे. यामुळे नेल्स स्ट्राँग होतात आणि त्यांची नैसर्गिक चमक कायम राहते. 

महत्त्वाचे : तुमची नखे खराब झाली असतील तर आधी तुमच्या ब्यूटी थेरपिस्टकडे जाऊन नेल ट्रीटमेंट घ्यावी, तोपर्यंत नेल पॉलिशचा उपयोग टाळावा. हेल्दी हात आणि नखे असतील तरच नेल पॉलिश लावून ते अधिक सुंदर दिसतील आणि तुमच्या हातांचे कौतुकही नक्कीच होईल.
(लेखिका कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत.)

संबंधित बातम्या